12 October 2021

जीवन.. 12-10-2021

आपण धावपळ करतो ....
उद्या चांगला होण्यासाठी ....
उद्या  मात्र असतो ...
कधी न येण्यासाठी ...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
जीवन हे आशेवर....
जगायचे रे असते....
अपुर्ण  रहाणार्‍या  इच्छेला ....
स्वप्न  रे म्हणायचे असते....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
आपण बांध घालतो.....
वाहणाऱ्या  पाण्याला....
कठिण रे बांध घालणे....
ओघळणार्या अश्रू  धारांना....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
जीवनात दुःख यावं .....
वहाणार्या झर्यासारख.... 
नको व्हायला  ते कधीही ....
साचलेल्या  तळ्यासारख...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
                         शाही... ✍️✍️🌹

11 October 2021

धुके..10-10-2021

धुके ते वीरताच....
तु ही रे हरवतो ....
स्वप्नातच भेट .....
का रे तु ठरवतो.....
🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞
धुके  हे विरता....
 सुर्यकिरण होऊन तुझं येणं.....
अलगद मिठी  घेता...
आठवत रे  अस भेटणं...
🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞
कसा ना हा वेडा  निसर्ग ....
धुक्यात  ना वीरतो....
जणु तु नी मी....
एकमेकांत ग हरवतो....
🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞
धुके  हे विरतांन....
दव ते सांडलेले.... 
पहाटेच्या  त्या स्वप्नाने  सरतांना....
दुःख  आपले का मांडलेले ...
🌞🌞🌞🌞🌞 🌞🌞🌞🌞🌞🌞🌞🌞
                          शाही... ✍️✍️

सावली.... 11-१०-2021

नाही  आवडत मला.....
उन्ह  तु माझ  झेलावं....
सावली होऊन  मि ही....
आभाळ तुझ ही पेलाव....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
स्वतः च्या सावलीला....
शोधत बसले....
अस्तित्वाचे अर्थ.... 
उगाचच हसले...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
अर्थ  जीवनाचे.....
कोड्यात टाकत होते....
सावली शोधता शोधता.... 
प्रश्न  नव्याने जाळत होते ...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
                                 शाही...✍️✍️

10 October 2021

नाविक.. 10-10-२०२१

सत्य शोधण्याच्या लढाईत.... 
अहिंसा कामी ती आलेली.... 
तिच  तर  सत्याच्या विजयाची.... 
हमी रे नेहमी झालेली....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
जीवनसागराच्या अनुभवातून ....
मी नाविक तरबेज झालेली.... 
अफवांच्या पुरात सत्य हरवते ....
हि अफवा लक्षात आलेली...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
मी नाविक तसा तरबेज...... 
हा अनुभव कि अहंकार रे..... 
सत्याला अफवांमध्ये शोधण्यास.... 
'मी "ला आली नेहमीच हार रे....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
                        शाही...  ✍️✍️ 

कांकण

माझ्या  कांकणांची किणकिण ....
आठवण तूझी  देते....
तु शोधतो शब्द ....
मी साद  ती अशी देते ...

आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...