जायचे ते ठरलेले ....
कवितेत म गाणे....
प्रकाशाचे रे उरलेले....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
जगण्याच्या तिमिरातून ....
एकटि ती चाललेली ....
जीवनाच्या कवितेत....
सावल्यांशीच म भांडलेले....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
विरहाच्या तिमीराला....
कधी न रे जुमानले.....
कवितेत तुला माझ्या....
स्पंदन माझे मानले....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
झुंडशाही च्या तिमीरात....
विवेकाची न कधी तमा....
जागृत असूनही न लढता....
करशील का स्वतःला क्षमा ....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
सांगणारे शशी मज .....
तिमिरात का साथ दिली....
सोबतच्या चांदण्यांची....
मजसाठी तमा तु का न केली ...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁अहिंसा असो कि अ. नि. स......
गोळ्या त्या डागलेल्या......
प्रगती च्या बाता पहा.....
तिमिरातून तेजाकडे चालल्या....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
रोहिणी व्हावी मी तुझी.....
असं तूला ना वाटायचं.....
शशी होऊन असं का ....
तिमिरातच तु भेटायचं ....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही...✍️✍️