23 October 2021

मँसेज... 23-10-2021

ऐकना  म्हणताच.....
बोलना तु म्हणायचं .....
मँसेज  मधून  कस ना ते....
अंतरावरुन  गुंतण  घडायचं...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
तुझा तो गोड मँसेज .....
आजही जपून ठेवलेला....
येशील ना ग स्वप्नात..... 
मी चंद्र  थांबवून ठेवलेला...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
अंधश्रध्देच  वार ही....
मँसेज  मधून  फाँरवर्ड  झालेल....
एक मँसेज  शंभर  जणांना  पाठवा....
सुख म्हणे दारी आलेल...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
मोबाईल  खराब झाला ग वाटतं....
आई ती बोलून जाते ....
लेकराचा मँसेज  नाही  आला...
कि त्याला ही ती जपून घेते... 
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁 
                        शाही.... 
✍️✍️


22 October 2021

काँफी आणि तु... 22-10-2021

काँफी  सोबत  आपलं....
नजरेनेच  बोलणं.....
जागवत आजही ....
कठिण सार भुलणं...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
तुझी  जागा मनातली .....
सांगावि का लागेल....
काँफी  सोबत जागण्याचा....
अर्थ  तुलाही  कधी रे लागेल...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
एक भेट घेशील.... 
माझी तु अशी ....
मी तु आणि  काँफी.... 
सोबतीला नभातल शशी ...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
चहासोबत  रे.....
दुनियादारी  अडलेली....
काँफी  सोबत  तुझी....
आठवण रे रूळलेली...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
                        शाही..... ✍️✍️ 

दिरंगाई.... 22-10-2021

नातं हे खोट्यावर.....
नसत रचायचं......
दिरंगाई  का होईना .....
सत्य हे  कळायचं...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
दिरंगाई झाली नी.... 
गुपीत हे  कळले होते .....
अव्यक्त राहून मी....
स्वतःला च छळले होते...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
कळावं तुला असं....
खूप  काही  घडलेलं....
दिरंगाई झाली नी.... 
ओठातच अडलेलं....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
काय वेळेवर  घडावं ....
हे ही  होते  रे कळायला ....
दिरंगाईत  नको....
जगणं हे सरायला ....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
तुला  कळू नये म्हणून .....
दिरंगाई  जाणून केलेली.... 
तु समोर येताच मी.... 
तुझ्यात हरवून गेलेली ...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
                         शाही... ✍️✍️

21 October 2021

वळून नाही बघायचं.... 21-10-2021

वळून बघायचं  नाही.....
असा वादा तु न घेतलेला.... 
कसं सांगू  जीव ही..... 
सोबतच तूझ्या तू नेला...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
अलिप्त  होऊन.... 
वळून ते पाहीले.... 
सारे कठीण क्षण... 
अनुभव  होऊन राहीले ...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
दोष कुणाचे आठवतील .....
ईतके मागे नाही रे वळायचे ....
नको दुरावा नात्यात म्हणून ....
गुंतुन त्यात नाही पडायचे ...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
त्या जागी आता.... 
नाही रे जायचं....
ज्या वळणावर तूला.... 
गाठता नाही  यायचं...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
                           शाही.... ✍️✍️   

जाण होत नाही... 21-10-2021

टीचभर पोटासाठी .....
गाव ते सुटलेल.....
भेट  देणं  तीथे आता ....
स्वप्नवत वाटलेलं.... 
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
भावना  बोथट झाल्या .....
मन  ही रे रमत नाही..... 
तुझ्या  आठवांच्या गावी ....
जाणं रे जमत नाही .....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
आज ही ते पारीजातक....
आठवण तुझी  काढत  असते ....
फुले  सांडतात त्या जागेवर.... 
पाऊलखुणा तुझी जिथे दिसते ..
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
नाही  रे  बालपणाच....
जगणं ते व्हायच.... 
नाही रे ते निरागसपण...
वळून पुन्हा  यायचं...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
                           शाही... .✍️✍️

आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...