02 November 2021

ती...... 2-10-2021

दोष देऊन स्वतःला.....
वाद ती टाळून  जाते......
संसार  सुखाया व्हावा  म्हणून..... 
स्वतःला खुपदा जाळून  जाते...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
दोष कुणाला  देत  नाही.....
मन तिच रडत असतं....
अति झाल कि म ते.....
दैवावर  टळत असतं....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
प्रेम  त्याच कमी झाल.....
उगाचच तीला वाटुन  गेल.....
वया बरोबर रूप  सरणार.....
भीतीने  मन दातुन गेल.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
स्त्री जन्म  हा शापच....
उगाचच तीला वाटत असत....
दोष  माझा नाही म्हणता.....
मातृत्वाच बळ तीच हसत असतं....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
                       शाही.... ✍️✍️

याद... 2-11-2021

डूब रही  थी सब्र कि कश्ती 
और  सामने  साहिल था
आयेगा  वो बचाने  हमे
वहम ये उतनाही प्यारा  था.....

याद  उनकी  जब भी  आयी
बेकरार  ही कर जाती  है
कभी आँख  मे नमी
कभी लबो पे मुस्कान  भर जाती  है.... 

आज हिचकीयोने हमे
बेहाल सा कर दिया 
शायद उसने  हमे
शिद्दत  से  फिर याद किया..... 
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
                      शाही..... ✍️✍️

01 November 2021

दिल दोस्ती दुनियादारी (SSKPशाळा1994तुमच्यासाठी खास )

दोस्तीच तर.....
दुनियादारीतुन वाचलेली....
नात्यांवर  तर.....
अपेक्षांची धुळ साचलेली ...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
दुनियादारी जपतांना ....
एक  गोष्ट  ध्यानी आली ....
दोस्ती  हीच दिल  ची....
धडकन होती झाली ....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
अपेक्षा आणि  प्रेमापलीकडे.....
मनात जे रूजू जात.....
लोभस हे नातं मैत्रीच ....
जन्मभर ते मनात राहतं....

दुनियादारी जपतांना ....
भेट  सहसा होत नाही ...
दुरावा  हा असा  मैत्रीतला....
कधी कधी  आवडत नाही...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁 
                 शाही... ✍️✍️ 





सख्या रे.. (भेटशील किनार्‍यावर) 1-10-2021

तुझच राज्य....
वेड्या  या मनावर.... 
जाण्याआधी सरणावर .....
भेट  व्हावी किनार्‍यावर...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
किनार्‍यावर  ग शोधतांना .....
लाटेला ग तु दिसलेली..... 
मनावर राज्य  तुझेच  सांगतांना ....
ती ही गाली  हसलेली ....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
मनाला थोड सावरायचा आहे.... 
तूझ्या  मिठीचा किनारा  देशील ना ....
तुझच राज्य मनावर आहे..... 
स्पंदनातून समजून घेशील ना .... 
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
एकनिष्ठ  किनारा तो...... 
लाटेसाठी अडून बसतो..... 
कधी कधी भास तुझा.... 
मला त्यात दिसतो ....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
                     शाही..... ✍️✍️

31 October 2021

भाव अंतरीचे... 31-10-2021

अंतरीचे  भाव सारे .....
शब्दात  कुठे  बांधता  येतात..... 
अश्रू माझे  सखा होउन.... 
खूपदा  ओघळून त्यांना  नेतात ....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
अंतरी भाव का.... 
पुन्हा पुन्हा उठलेले ....
आठवांचे काहूर....
का मनी दाटले ....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁भाव अंतरीचे तीच्या.....
तीने  कुठे  जाणले ......
डोळ्यातून  ओघळतांनाही ....
अलगद  पुसुन टाळले....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
                     शाही.... ✍️✍️ 

 



आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...