14 November 2021

भाव ते... 13-11-2021

नियतीचा खेळ  तो.....
कसा ना रे टळणार.....
पल्याडच्या त्या पाऊसात....
आठवणी तुझ्या रे  छळणार...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आठवणिंच्या  खेळामध्ये ....
नेहमी डाव माझ्यावर असतो....
कळूनही न कळण्याचा तुझा....
जुनाच तो भाव असतो....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

भाव सारे आज.....
कागदावर सांडले.....
कितीदा समजावले तरी.....
तुझ्या  भेटीसाठी  भांडले....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

जुने भाव ....
नव्याने  ग मांडावे....
जगरहाटीचे खेळ ...
किती समजावून ग  सांगावे
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁 

                         शाही.... ✍️✍️

स्वर गुपीत.... 14-11-2021

मधुर स्वर  ते...


वहाणार्या नदिचे...


दर्याखोर्यातून  वाहत राहणेच....


गुपीत हे जगण्याचे.....


मधुर स्वर  ते....


कोकिळा गाऊन गेली ...सौंदर्य  रुपात नसतेच...


गुपीत हे जगण्याचे ...


ती ठेऊन गेली....


मधुर स्वर पोपटाचे..


तो ही गोड बोलून  गेला...


मिरची खाऊनही गोड  बोलता येते...


स्वभाव गुण तो जपून गेला... .


🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                           शाही... ✍️✍️


13 November 2021

बुरखा.... 12-11-2021

ज्याला ही भाव दिला .....
पायमल्ली  तो करत गेला.....
जगरहाटीचा खेळ  असा......
आता मीच हा संपवुन दिला....
शिकली आता गं.....
स्वतः तच रमायला ......
शब्दांबरोबर आता माझं......
खूप  लागल  गं जमायला....
खूप  गोड  सखी ....
आता गं  मी त्यांची....
खूप धमाल मस्ती ....
सुरु  बर ग आमची.....
कधी ते उगाच.....
रुसून गं बसतात....
कसे बसवू चारोळीत....
विनवण्या म फसतात....
थकली मि म्हणता....
गोड  गं ते हसतात.....
चारोळीत येऊन.....
लाईनीत म बसतात......
आजन्म  आता ही.....
सोबत गं असावी.....
शेवटच्या  श्वासापर्यंत .....
मैत्री गं ही जपावी.....
शाही आता शब्दातच.....
नेहमी ती  गंध द्यावी...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                       शाही.... ✍️✍️


ती फुले ... 12-11-2021

तुझी ती शब्दफुले ....
प्रेमाने दरवळतात....
जुन ते स्मीतहस्य ....
नकळत फुलवतात...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

ती मला आज त्या.....
सदाफुलीत दिसलेली.....
बारा महिने उमलूनही....
सुगंध  नाही  म्हणून  हिरमुसलेली....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

स्मितहास्य  तुझ पाहून.....
जणू गुलाबच दरवळून  गेला.....
काट्यावर राहूनही हसता येतं....
जगणं किती सहज शिकवून गेला ....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तुझ्या  आठवांची  फुले....

क्षणभंगुर  सुगंधात रे उरलेली...
निर्माल्य त्यांची कधीच....
दुनियादारीत दुर रे सारलेली...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                          शाही.... ✍️✍️


12 November 2021

आनंदाच्या सागरात... 11-11-2021

आनंदाच्या सागरात .....
समाधानाचा मोती गवसला....
दुःख  ही हे पहाता.....
क्षणभरात हिरमुसला...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तुझ्या  नजरेची  ग जादू......
ओढ वेगळीच लावत असते.....
जेवढं वाटत विसरावं तूला.....
तेवढीच तु ग आठवत असते.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

जादू ती आईला....
न जाणो कशी येते....
न सांगताही मन सगळ्यांचे...
कशी ना ती समजून  घेते...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आनंदाच्या सागरात....
दुःख सारी विसरली जातात....
असे भ्रमाचे खेळ....
दुनियादारीत च खेळली जातात...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                  शाही.... ✍️✍️


आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...