17 November 2021

शब्दांना गंध असते तर.. 16/11/2021

शब्दांना  जर गंध  असते तर.....
मजा त्यांची आली असती.....
मात्रृप्रेमाच्या अत्तराने.....
ती ही त्रृप्तच झाली असती....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मी शब्द  आहे  तर.....
तू त्याचा अर्थ  रे....
दूर झालो आपण तर....
जगणंच होईल व्यर्थ रे...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

हसवण्याचा एक  गोड प्रयास तो....
मन दूखवण्याचा ना कोणता ध्यास असतो....
कटू शब्दांना गोड  करेल...
असा का कोणता शब्दसूवास असतो...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

जीवापाड  जपलेल्या माणसांचाही.....
शब्दाने गैरसमझ होऊन जातो....
शब्दफूलांच्या कोणत्या गंधांनी...
गैरसमज हा प्रेमाने दरवळून जातो....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

शब्दफूलांना प्रीतीचा तो.....
कोणता गंध मी द्यावा....
शब्दांनी झालेले घाव....
या शब्दगंधांनी भरून नीघावा...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                          शाही..... ✍️✍️

भाव ते जुने.... 16/11/2021

भाव कोणतेही  असुदे ....
तुला ते कळतात...
समजावून  सांगण्याचे...
प्रश्न च सरतात...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

खेळ  हा नियतीने.....
असा काही मांडला.....
जगणं आणि  स्वप्न .....
यात मेळच नाही  बांधला...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

लोभस असतं सर्व  काही ....
जे कल्पनेत  रचते.....
आता ते आवडत नाही ....
जे वास्तवात दीसते....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

जुने भाव  ते....
खुपदा रे छळले....
नव्याने  वापरायचे....
समजूनही टाळले...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                       शाही.... ✍️✍️


16 November 2021

आठवणि त्या.. 16-11-2021

आज ही ते पारिजातक....
आठवण तूझी काढत असते....
फुले सांडतात त्या जागेवर....
पाऊलखुण तुझी जिथे दिसते....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

काही  नाती  आता....
आठवणीतचं ग उरलेली....
काही दुनियादारीने तर....
काही नियतीने  ग चोरलेली...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आठवणींशी माझं नात....
तस ते गोड  आहे....
त्यांनाही माझ्या  इतकीच...
माझी ती ओढ आहे.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आठवणी त्या पाठशिवणीचा  खेळ .....
सहज  खेळून जातात.....
कधी गाली स्मीतहस्य  तर कधी....
नयन कडा ओलावून  जातात....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                       शाही.... ✍️✍️


आठवणि... 16-11-2021

आठवणींची साठवण....
नेहमी ग जपली....
उन सावल्यांच्या खेळातील ....
अनुभव  त्यात ग लपली...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

माझ्या आठवणीत तुझ्याही.....
डोळा कधी का पाणी येते.....
का विसरण्याची खोड तुझी....
नेहमी तुझ्या रे कामी येते...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तु दिलेला गुलाब....
आजही जपून  आहे ....
आपल्या  प्रत्येक  पाकळीत....
गोड  आठवणी  लपवून  आहे ....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                             शाही..... ✍️✍️

किती गोड  ना आठवणी.....

क्षण क्षण लपवून  असतात.....
फायदे तोट्याच्या दुनियादारीत.....
प्रामाणिकपणा जपून असतात....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁



15 November 2021

चंद्र हा झाकोळला... 15-11-2021

रोहीणीच्या  विरहात .....
चंद्र  ढगाळून  रडलेला.....
त्याचा प्रत्येक  अश्रू  ग.....
चांदण्यात तो मढलेला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

चंद्र  हा झाकोळलेला....
जाणीव तुझी रे ठेऊ.न गेला....
का नाही रे कळले.....
पण तुच रे आठवत गेला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁


पाठशिवणीचा  हा खेळ ....
शशी तु का रे खेळावा .....
जाणीव कधी होणार  तुला.....
भावनांचाही भरतो  रे मेळावा...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁



चंद्र  हा झाकोळला नी.....
मनाला हुरहूर  लागली....
ऋणानुबंध  जुळले त्याच्याशी....
उणीवेतून जाणीव ही जागली...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

अर्थ  नवा .....
या जाणीवेला....
का ग चंद्र  माझा...
झाकोळलेला...

।🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                        शाही..... ✍️✍️


आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...