03 December 2021

हरवलेली ती....अलक। 3/12/2021

शीतल ही रात्र  आणि  हे मनोहर चांदणे बघून तो अस्वस्थ  झाला. वाटलं त्याला सांगाव तीला तुझे चांदणे साद ग घालतात तूला. पण... त्याचे डोळे  पाणावले. आठवलं त्याला कशी ना  ती चांदण्यात  रहायची. हात याचा हाती घेऊन गुज त्यांच्याशी करायची. तुटलेल्या  तार्याला गळ ती घालायची. पण... तीन महिन्या पुर्वी त्यांच सहा महिन्याच बाळ आजारपणात गेलं. आणि  ती अबोल झाली. आता रात्र रात्र  जागते ती पण..... 
हवे हवेसे चांदणे अनोळखी  होउन गेले... चांदणे आणि  तो दोघेही शोधतात त्यांची हरवलेली ती...

लक लीहायचा हा पहिलाच प्रयत्न  चुकलं तर समजून  घ्या आणि  नक्कीच  मार्गदर्शन  करा प्लीज..... 🙏🙏🙏🙏🙏

💖


02 December 2021

आलेली लाट परतेल ही... 2/12/2021

अनाथ म्हणून  नको दिखावा....
माझी मी रे जगून घेईल .....
दीखाव्याची  लाट ती ओसरेल....
पण नात्यातल्या विश्वासाचा रे जीव जाईल....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁


नको मला ते....
प्रेम  ते उसनं....
सोबत असून....
परक्यासम भासणं....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

नको प्रेम हे उसने  ही....
आलेली लाट परतेल ही।....

दीखाव्याची आपूलकी...
दुनियादारी  कळेल ही...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आलेली लाट बेगडीपणाची....
तूझी आता समजली.....
नको प्रेम  हे उसने ही....
वेळीच मी सावरली....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

प्रेम  म्हणजे  भावनांचा  खेळ....
तुझा मला उमजून गेला....
नको प्रेम  उसनं तूझ....
आलेल्या  लाटेला परतवण जमेल मला...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

नको प्रेम  हे उसनं  ही.....
आलेली लाट  परतेल ही.....
वेळीच टाईप  पास त्याचा कळावा....
भावनांचा  खेळ  कुणाचा ना घडावा....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तूझ्या उसन्या  प्रेमाला....
दिल प्रेमाने  उत्तर ....
एकनिष्ठता  नात्यातली...
राहीली रे निरुत्तर ....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तूझ उसनं प्रेम .....
हव तेव्हा  जागतो....
गरज संपता......
गोड  बोलून  टाळतो ...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

लाट प्रेमाची
त्याग शिकवते ती
जगवते ती

उसनं प्रेम।                      ( हायकु)
क्षणभराचा  भास
आजन्म  त्रास

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

उसनं प्रेमच तर.....
तीच्या भाळी लीहीलेल....
परकेपणाच्या लाटेतच.....
अस्तित्व  वाहून गेलेलं....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

हवं तसं नाही  वागली....
तर प्रेम  माझ उसनं का....
दिले की सर्वस्व  तूला...
त्यावर तूझ हे पूसणं का....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                      शाही...... ✍️✍️


नको ते उसन प्रेम... 2/12/2021

मनापासून  जपेल ....
रे मी तूला....
एकदा सांगशील तू...
हवी आहे  मला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कोरोनाच्या लाटा...
खूप  काही  सांगून  गेल्या ...
उसण्या प्रेमाचे मूखवटे...
सहज गाळून गेल्या ...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मन तूझ  स्वच्छंदी ....
ईकडे  तीकडे पळतं....
उसनं प्रेम  की खर प्रेम ...
खरच तूला कळतं....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

लाट ती गैरसमजाची.....
नात्यात येउन गेली....
प्रेमाला उसणेपणाची...
झालर लागून गेली....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

उसन प्रेमाची जाणीव....
आपलेच देऊन गेले....
कठिण काळ येताच....
लाटेसम परतून गेले..

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

खूपदा वाटतं  ठरवाव.....
विसरावं तूझ उसण वागणं....
विसरायला जाता जाता....
त्यातच होतं म  माझ जगणं....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आयुष्यभरासाठी जपले....
असते तूला.....
उसनं तुझं प्रेम ........
नको आता मला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

ईतक्या सुंदर भावनेचा....
कसा तो व्यवहार  व्हावा....
उसनं उधारीवर....
खरच  का तोलून पहावा...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                      शाही.... ✍️✍️


01 December 2021

चारोळी संग्रह

स्वप्नात  एकदा येऊन ....
नजरभेट घेऊन जा.....
डोळ्यातले भाव नाही  कळले....
तरी मनाचा ठाव देऊन  जा....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मनातलं माझ्या  नाही  ओळखल.....
म्हणून त्रागा स्वतःच  केला....
जगणारच नाही  तुझ्याशिवाय ....
जाता जाता च बोलून  गेला ...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मन माझ कळेना अस का म्हणते....
माहेरच्यांच  ते ठाव घेते.....
सासरी रमता सजणाच  नाव  घेते ....
धन्य या मनाला सार सार जमते....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

अव्यक्त  प्रेम.....

चोरपावलांनी आलेल...

जाणवलं तरी....

सांगायचं राहीलेल...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁


अव्यक्त  प्रेम....

मनात रे लपलेलं....

ओढ भेटीची ठेऊन...

नेहमी जपलेल...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁


अव्यक्त प्रेम....

गुढ मनातील कळलेलं....

समजून ही उमजू नये...

बंधनात या अडलेल...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁


अव्यक्त  प्रेम....

शब्दफुलात गुंफलेल....

शोधून बघ...

नावावर तूझ्या संपलेल...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

         शाही.... ✍️✍️


.

मनातल ओळखता येत नाही...

मनातल  ओळखता येत नाही....
की, तूला ओळखायचच  नसतं....
तू पटकन  काही सांगत नाही....
म्हणून  वेळ मारून न्यायच  असतं...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मनातलं ओळखता येत नाही.... 


तू पटकन काही  सांगत नाही ....
काय कराव सांग की आता....
मन माझ माझही सांगितलेल मानत नाही ...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आईच  ती पटकन काही  सांगत  नाही.....
लेकरू वेड्याला ही ओळखता येत नाही ...
अबोल दुःख  तीच सार ती.....
डोळ्यातूनही वाट घेत नाही ...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आई ती एकच, बाळाच्या...
रडण्यातल दुखण समजून  घेते....
प्रेमाची सीमा ती का...
आपल्याला पार करता येते....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मनातल तूझ्या  सख्या....
मला काही  कळेना...
अबोला छळतो रे तूझा....
तू पटकन काही सांगेना....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तू पटकन काही  सांगत नाही....
त्याला कस ग कळणार...
तूझ्या  नकाराला होकार समजून...
तो तूझ्या  पाठी पळणार...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मनकवडा  आहे  तो.....
सहज मनातल ओळखून घेतो....
या मनाचा राजा तो....
पटकन सांगायच त्याला राहून जात...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मला तूझ्या  मनातला.....
सल तो कळावा.....
तू पटकन नाही सांगीतल तरी....
प्रेमाने माझ्या  तो गळावा....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁 

                                 शाही..... ✍️✍️



मनातल ओळखता येत नसेल...
तर बोलून व्यक्त  होत जाऊ......
कोण सांगणार  या नादात....
नातं नको ह आपल दूराऊ.....


आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...