05 December 2021

खंत... 5/12/2021

ती सारखी त्याच्या पाठी लागायची. तू व्यवस्थित  तयार  होत  जा सारखी भुणभुण  लावायची. त्याच्या धूम्रपानावरही ताशेरे ती ओढायची. एके दिवशी  तीने त्याला विचारले तु कधीच नाही  सांगत मला असं रहायला हवं, नटायला हवं. तुझ माझ्याकडे लक्षच नसतं कि तूझ्या लेखी मी परिपूर्ण  आहे. सांग काय ते. तो हळूच गाली हसला आणि  म्हटला, मला वाटतं  कोणत्याही  नात्याला बहरण्यासाठी  इतक प्रेम  कराव की त्या व्यक्तीचे दोष पुसटसेही दिसणार नाही. आणि  दिसलीच  तर समजावं प्रेमाची सीमा ओलांडली नाही. आणी म्हणून  मी नेहमी प्रयत्न  करतो ती सीमा ओलांडण्याचा.  ती गांगरतेच. खरच भाग्यवान  ना मी तुझ्यासारखा लाईफ पार्टनर  मला रे भेटला. पण खंत  राहीली मनात का नाही  ओलांडली मी प्रेमाची ती सीमा.....

खरच आपल्या सगळ्यांना  ही सीमा ओलांडता यावी. आपण उगाचच आपल्या  माणसाला गुण आणी दोष या सीमेवरच गाठतो. आणि  ह्या लहान लहान  गोष्टी  मोठ्या  वादाच कारण होतात. नक्कीच  प्रयत्न  असावा आपला माणुस आहे तसाच त्याला स्वीकारण्याचा. हे झालं  माझं मत तुमच मत नक्की सांग.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁                               शाही.... ✍️✍️ 


कदाचित असेल मी भाग्यवंत.. 5/12/2021

कदाचित  भाग्यवंत  मी....
स्त्री जन्म  जे लाभले....
खंत  हीच भृणहत्येच्या खेळीली...
समाजाने का दूर नाही  सारले...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आहेच मी खरंच  भाग्यवंत....
भारतभूमीवर जन्म तो झाला.....
खंत  एकच बंधूप्रेमाच्या संस्कृतीत....
का राजकारण जाती पातीचा  आला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मनातली खंत .....
काही  जात नाही.....
भाग्यवान  असूनही.....
हाती काही  रहात नाही ....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मनातील  खंत  जात नाही .....
कसं सांगाव रे तूला.....
झाली असते  भाग्यवंत......
हक्काने  माझी गं म्हटले असते मला.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कदाचित  असती....
मी भाग्यवंत .....
नसती का खरच....
मनातली  खंत...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कदाचित  असेल  मी भाग्यवंत ....
ऋणानुबंध  गोड  ते लाभतात....
खंत  एकच मनात भेटीचे....
योग सहज कुठे  घडतात ...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कदाचित  असेल  मी भाग्यवंत.....
लक्ष्मी म्हणून  जन्माला  रे येते.....
का जात नाही  खंत  मनातली ......
दोन्ही  घरी परकीच मी का रे रहाते....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कदाचित  असेल मी....
खूप  रे भाग्यवंत ....
माझ्या  आपल्यांची वाटे....
नको व्हावी मी कधी खंत ....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कदाचित  असेलही  मी भाग्यवंत ....
गोतावळा नात्यांचा लाभलेला.....
खंत एकच  दुनियादारीच्या खेळात....
जिव्हाळा मनातील का बांधलेला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                         शाही... ✍️✍️


04 December 2021

दखल कशी घ्यावी.... 4/12/2021

भावना कशा ना बेईमान  असतील....
निर्मळ मनाची स्पंदन ती....
दखल योग्य  ती घेता यावी....
आस प्रत्येक  मनी दडली ही....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

भाव मनीचे ....
बेईमान  झाले ....
त्याला कळण्याआधी...
निःशब्द  झाले....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

खूप  दिवसांनी  भेटला ....
आणि  अलगद मिठीत शिरला होता...
साँरी तो म्हणता म्हणता...
बेईमान परीस्थिवर चिडला होता...

भाव त्याचे तेच होते...
तीला  ही कळले होते ...
दखल जगरहाटीची नाही  म्हणता ...
अश्रृ  डोळयातून गळले होते ...

भाव तेच असतात...
बेईमान  जगरहाटी  करुन जाते...
दखल समजून  घेण्याची  घेतली की...
नाते हे अबाधीत  रहाते...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

दखल कशी घ्यावी .....
परीस्थिती  ती बदलत असते....
गरज ती संपली की.....
भावना बेईमान  होत असते...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

राग हि त्याचाच करते....
अश्रृ  ही त्याच्या  मिठीत गळतात...
बेईमान  भावनांचे खेळ  ...
तो समोर  असता कुठे कळतात...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तूझ्या  फक्त  वीचाराने....
भावना बेईमान  होतात....
कधी गाली  हसतात....
कधी ओघळून  वाहतात...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

दखल कशी घेऊ...
या बेईमान भावनांची....
रूसताही ह्या तूझ्यावर...
आणि  रडतात ही तुझ्याचसाठी ...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

बेईमान  झाल्या भावना ....
नाव तुझे ऐकताच....
बोलणार नाही  ठरवल पण....
फितूर झाल्या तुला बघताच...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

दखल कशी घेऊ.....
बेईमान  त्या होतात....
दुनियादारी  सोडून....
नको तिथे गुंततात...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

नको छळू  शशी.....
ढगाआड लपून.....
बोथट होतीत भाव....
लवकरच  ये रुसवा सारून ...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                         शाही..... ✍️✍️


बेईमान भावना.... 4/12/2021

दखल नाही  घेतली...
भावनांची कंधीं......
बोथट त्या होत गेल्या....
नि सल राहीली मना मंधीं....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

जवळ असूनही  मन तुझं....
माझ्याकडे रे वळत नाही.....
भावनांचं असं बेईमान होणं.....
वेड्या मनाला रे  कळतच नाही....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

बेईमान  आपल्या  भावनांची....
वेळीच सख्या दखल घेतो....
माझ्या  इभ्रतीची  काळजी...
वेडा अशी जपून घेतो...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

बेईमान  ना
नको रे व्हाव कधी
समज आधी

बेईमान  ना
भावना  नको अशा
सांभाळ तशा

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

बेईमान  भावनांची....
दखल नाही  घ्यायची ....
अशा भावनांशी.....
सलगी नाही  ठेवायची....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

बेईमान होतात  भावना .....
अपेक्षा  त्या  वाढल्या की....
दखल ही घ्यावी कशी....
दुनियादारी  कळली की...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

लाजणं ग तूझ.....
सारं सांगुन  गेलं होतं ....
बेईमान  भावनांच.....
तेच  तर दखल घेण होतं.....


🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तीच्या भावनांशी ती....
बेईमानीने रे वागते....
दखल घ्यायला  गेली त्यांची....
तर ती म्हणे स्वैराचारी वागते...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

बेईमान  नाही  रे भावना ....
दखल तु घेशील का ....
दुर गेल्यावर तु  ह्दय दाटतं....
का रे ऊत्तर  तु देशील का....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                     शाही.... ✍️✍️


03 December 2021

चांदणे.... 3/12/2021

शीतल ही रात्र नी...
टिपूर हे चांदणं...
संपेन कधी...
लाजेच तुझं ग कोंदण...
बघ की नभातील चंद्र...
भाळी तुझ्या  सजवीला...
चांदण्यांच्या कर्णफुलांनी...
श्रृंगार  ग करवीला...
चांदण्यागत हसू तुझ..
मुखचंद्रावर खुलू दे...
बंध सारी भुलून...
अशी जवळी ये...
माझ्या  चांदणीला..
मिठीत माझ्या  लपवू दे...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁


आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...