माझ्या मैत्रिणींशी बोलण ऐकता....
व्देश तीचा वाढून जातो....
मी लांबणार तर नाही या भीतीने.....
अश्रृ डोळ्याच्या कडा ओलांडून जातो....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
ईर्ष्या आणि व्देश.....
आग अशी लावून गेले....
घरातील दिव्यांनीच.....
अंधार घरात दाखवून दिले....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
ईर्ष्या आणि व्देश बघ ना.....
ते पक्षी कुठे रे जाणतात......
करूणा कशी जपावी.....
हे का ते आपल्याला रे सांगतात.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
करूणा म्हटली की स्त्री.....
समीकरण गं जुळलेल.....
द्वेषाला नको ग खतपाणी.....
अस्तित्व असेल तूझ विरलेलं....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
व्देशाची एक ठिणगी ....
मनात त्याच्या रुतून गेली.....
प्रेम होती ती त्याच आता.....
दुसर्या जातीची होऊन गेली ....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
द्वेष नाही करायचा.....
करूणा गं जपायची.....
समोरच्याने द्वेष केला म्हणून.....
आपण ही का ती पातळी गाठायची.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
प्रेम आणि व्देष.....
सारा भावनांचा खेळ ....
करूणा जपुन घे.....
व्देषाशी नको रे व्हावा मेळ.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
व्देषाची एक ठिणगी .....
नात्यात ती येऊन गेली.....
सख्ख्या शेजारींना ती......
वैरी क्षणात बनवून गेली.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
व्देशाची एक ठिणगी ....
विश्वास नात्यातला हरवून गेली ....
करुणेचा संस्कार असतांनाही.....
दुनियादारी ग सगळ चुकवून गेली ....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही..... ✍️✍️