आज तुझे शब्द गं....
लाजतच भेटीला आले....
गुपीत तूझ्या मनातले....
खोडकर उमजून गं गेले...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
काहीस उमजलं वाटतं....
जीवनाच रे कोड....
उजाडता चलना सोडवू गणीत....
जगण्याच थोड थोड.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
उमजायला लागल तीला
चूल आणि मूल पुढे तीच जगणं
शशी ला भेटून यावे आभाळी
उजाडता पडू लागले तिलाही स्वप्न
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
उमजायला लागल आता.....
महत्त्व तीच्या अस्तित्वाचे ....
उजाडता दिसतय वाढता....
प्रमाण तीच्या टक्केवारीचे.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
उमजल खूप पण........
समजायचे राहून जातं .....
उजाडणारा प्रत्येक दिवस.....
वेगळाच अनुभव ठेऊन जातो....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
उमजल खूप पण........
समजायचे राहून जातं .....
उजाडणारा प्रत्येक दिवस.....
वेगळाच अनुभव ठेऊन जातो....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
कधी कधी उमजत नाही ...
मलाच माझ वेड मन....
उजाडलं म्हणता ही.....
ऐकत नाही ते एकही क्षण....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
उजाडता उजाडता....
दंव्द ग ते संपले....
आता काहीसे...
मार्ग उमजले...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
उजाडण्या आधी....
अंधार गडद होतो....
उजाडायचं थांबत नाही ....
हे उशीरा उमजून येतो....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
सहज का उमजतो....
उन सावल्यांचा खेळ ....
उजाडला उजाडता...
निघायला नको वेळ...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
उमजले आता काहीसे ....
दुनियादारीचे खेळ .....
उजाडला बदलता नाती...
लागत नाही वेळ....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
लीपी तुझ्या मुळे.....
उमजले गं मोल शब्दांचे ....
उजाडता अस्तित्व शोधेन....
संकल्प या वेड्या मनाचे....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁