स्त्री शिक्षणाचे विचार ....
उधळले जर नसते....
स्वतःला छळणे ते.....
विदारक किती गं असते....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
त्याला कुणीतरी.....
हक्काच आपलं म्हणे भेटलं....
उधळला हा विचार तरीही....
मन का रे हे पेटलं....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
उधळले विचार.....
संकुचित सारे....
छळतील मलाच अशांना....
नाही गं द्यायचे थारे.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
विचार माझे मला....
कुठे ते छळतात.....
सोबतीला तुला पहाता....
तेही आता जळतात....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
उधळलेले विचार तूझे गं....
हळुहळू समजतील....
नको स्वतः ला छळू असे....
मार्ग ही उमजतील....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
स्वतःला नाही छळणार....
वादा हा देशील का रे.....
विचार उधळतां उधळता....
माझ्यासाठी हसू तुझ उधळशील का रे....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
खरच विचार तीचे....
उधळतां का तीला येतात....
किती सल होऊन ....
तीला छळून घेतात....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
त्याचे ते उधळलेले विचार....
उगाच प्रश्नात टाकून गेले....
गैरसमजांच वादळं....
माझे मलाच छळून गेले....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
खूपदा तुझे विचार ....
उधळून देण होत....
बंधनात असही....
स्वतःला छळण होत....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
विचार सारे....
उगाच उधळले होते...
स्वतःला छळणे....
रोज घडणे होते....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
छळले असते स्वतःला....
विचार ते उधळून ....
कस सांगू सोप नाही....
क्षणात जाण विसरून...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
जमत रे आता मला.....
दुनियादारी च जगणं....
विचार सारे उधळून....
स्वतःला छळणं.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
विचार सारे आता.....
शब्दफुलात मांडले.....
छळतील तुलाही भेटून...
कागदावर आहे सांडले....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही.... ✍️✍️