देशील का दुजोरा .....
असा तु मला.......
गुण दोषांसकट......
सरणावर ही जपशील ना मला.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
हक्कच नाकारले तु नात्यातले.....
कसा रे मी दुजोरा तो द्यावा......
स्वतःचा म्हणून जपलं होतं ज्याला मनात.....
सांगशील शोध त्याचा कुठे रे घ्यावा.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
कसा न देऊ दुजोरा ......
तुझ्या अव्यक्त त्या राहण्याला......
स्वतः कडे का ठेवते लपवून......
अर्थ लागू दे चोरून तुझ्या गं पहाण्याला.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
कसा देऊ दुजोरा.....
गृहीत तूझ्या धरण्याला......
स्वतः कडे काय ठेऊ ......
उरलं काय आता हरण्याला.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शब्दा शब्दात दुजोरा देतो ......
संगतीला तो असण्याचा.......
दुःख नको ठेऊ स्वतःकडे....
काळजीला दे गं सांगावा तो हसण्याचा.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
ठेऊ का आठवांचा थवा....
तूझा रे माझ्या कडे.....
दुजोरा देऊन सांगशील त्यांना ......
छळू नका तीलाना गडे....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
कसा दुजोरा देऊ ......
छंद तूला आभाळ गवसण्याचा......
स्वतः कडे आता काय ठेऊ केला गैरसमझ .....
तुलाच आपला आभाळ तो समजण्याचा.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
दुजोरा देण्याईतकी......
खरच का रे मी गणली जाते .....
स्वतः साठी काय ठेऊ .....
परकी मी दोन्ही घरी रे मानली जाते...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
दुजोरा देण्याईतकी......
खरच का रे मी गणली जाते .....
स्वतः साठी काय ठेऊ .....
परकी मी दोन्ही घरी रे मानली जाते...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
कसा रे दुजोरा देऊ ......
कुंपणच ईथे शेत खाते.....
स्वतः कडे काय ठेऊ.....
स्वार्थाचे जगणे कुठे रे येते....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही.... ✍️✍️