05 January 2022

आभाळमाया.. माई

शब्दात  कसं ना बांधाव.....
माईंंच मायाळू रूप......
शब्द  ही होते नतमस्तक ......
म्हणे कठीण आम्हा  खुप .....

परीस्थितीला दोष देऊन ......
लढणं सहज गं टाळलं जातं.....
जीवनी माई तुझी पहाता....
जगण्याचा अर्थ  लागून जातो....

नभातील  तारा की.......
काट्यावरील  फुल म्हणू......
आई तु अनाथांची .......
आभाळमाया कशी गणू.....

जात, शिक्षण, संस्कार...
सारं खोटं वाटतं......
परीस्थिती  खरा गुरु.....
तुला जाणता वाटतं.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                          शाही.... ✍️✍️

जुनीच आसवे... 5/1/2021

जुनीच माझी आसवं......
म डोळ्यातुन तूझ्या का गळतात....
फसवे सारेच दुःख माझे.....
सांगना तुला का रे छळतात....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

नको रे डोळ्यांवर.....
पापण्यांचे पहारे.......
जून्या आसवांना आता.......
मुक्याने वाहू देऊ का रे.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आसवे जुनी
किती गं छळतात
हो कळतात

आसवे जुनी
पापणीत लपली
मने जपली

आसवे जुनी
तुझीच ना रे भेट
जपली थेट

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

वयपरत्वे ते दुर्लक्षित  करणं.....
फसवं हे दुःख  छळत  रे किती.....
फेरा हा चुकणार नाही  कुणाला.....
जुन्या आसवांनी  गळून सांगावे तरी किती......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

दुःख  ते दूःख.....
फसवे का लटके नाही  रे मज कळले....
गणीत त्यांचे मांडता....
आसवे आजही आपसुकच होते गळले....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आई मी सुखात गं.....
नजर चुकवून  ती बोलुन गेली....
फसव्या या दुःखाने तीने......
जुनीच आसवे गोठवून दिली....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

अपेक्षाभंगांचे फसवे दुःख ......
अपुर्णत्वाचाच शाप त्याला......
जुन्या  आसवांना  गळतांनाही.....
का नाही  याचा भास झाला .....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                           शाही... ✍️✍️


04 January 2022

दुजोरा.... 4/1/2022

कसा मी दुजोरा देऊ .....
वेड्या रे या दुनियादारीला.....
तु माझा नाही  होणार......
सांगता ते येऊन क्षण क्षणाला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

दुजोरा  दिला  त्याने.....
आज हळू येऊन.....
जाईल गं म्हणे स्वतःला .....
तुझ्याकडे ठेऊन.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तूझी काळजी मी.....
स्वतः कडे ठेऊ का....
दुजोरा  देशील.....
हक्क असा घेऊ  का....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कसा देऊ ना दुजोरा  या वेड्या मनाला .....
स्वतः कडे तुला जपायचे म्हणतो....
तु तर नभातला चंद्र .....
हा वेडा तुझ्यातच रे रमायच  म्हणतो....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

 ठेऊ तो क्षण स्वतःकडे.....
जो तूझा माझा होता.....
दुजोरा  नाही  दिला त्यानेही.....
तूझ्याशीवाय तो ही भांडला होता...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

काय ठेऊ  स्वतःसाठी.....
आपल्यात रमण्याची मला रे खोड.....
कसा ना  देऊ दुजोरा मनाला.....
त्याला लागली एकांताची रे ओढ.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

सोडून  जायचं तू......
आणी मी दुजोरा देऊ......
स्वतः कडे सांगशील......
श्वास  गेल्यावर मी काय ठेऊ....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कसा पाठिंबा  द्यावा बर.....
चुकीच्या  त्या वागण्याला....
धुम्रपान  करतो तो......
अर्थ  नाही  अशा जगण्याला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

त्याचा आनंद  कशात.....
कळत नाही  बोलून गेला....
दुजोरा  कसा न देऊ.....
जीव असा तो जाळून गेला ....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

माझ्या  प्रत्येक  कामात .....
दुजोरा  तुझा हवा.....
कळला नाही  हा, कायदा....
माझ्यासाठी का हवा....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                              शाही... ✍️✍️


दुजोरा देशील... 5/1/2022

देशील का दुजोरा .....
असा तु मला.......
गुण  दोषांसकट......
सरणावर ही जपशील ना मला.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁


हक्कच नाकारले तु नात्यातले.....
कसा रे मी दुजोरा  तो द्यावा......
स्वतःचा म्हणून  जपलं होतं  ज्याला मनात.....
सांगशील शोध  त्याचा कुठे रे  घ्यावा.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कसा न देऊ  दुजोरा ......
तुझ्या  अव्यक्त  त्या राहण्याला......
स्वतः कडे का ठेवते लपवून......
अर्थ  लागू दे चोरून तुझ्या गं  पहाण्याला.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कसा देऊ  दुजोरा.....
गृहीत तूझ्या धरण्याला......
स्वतः  कडे काय  ठेऊ ......
उरलं काय आता हरण्याला.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

शब्दा शब्दात  दुजोरा  देतो  ......
संगतीला तो असण्याचा.......
दुःख  नको  ठेऊ स्वतःकडे....
काळजीला दे गं सांगावा तो   हसण्याचा.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

ठेऊ का आठवांचा थवा....
तूझा रे माझ्या कडे.....
दुजोरा  देऊन सांगशील त्यांना ......
छळू नका तीलाना  गडे....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कसा दुजोरा देऊ ......
छंद  तूला आभाळ गवसण्याचा......
स्वतः  कडे  आता काय ठेऊ केला गैरसमझ .....
तुलाच आपला आभाळ तो समजण्याचा.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

दुजोरा  देण्याईतकी......
खरच का रे मी गणली जाते .....
स्वतः साठी  काय ठेऊ .....
परकी मी दोन्ही  घरी रे मानली जाते...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

दुजोरा  देण्याईतकी......
खरच का रे मी गणली जाते .....
स्वतः साठी  काय ठेऊ .....
परकी मी दोन्ही  घरी रे मानली जाते...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कसा रे दुजोरा  देऊ ......
कुंपणच ईथे शेत खाते.....
स्वतः  कडे काय ठेऊ.....
स्वार्थाचे जगणे कुठे रे येते....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                      शाही.... ✍️✍️


03 January 2022

दुजोरा.... 3/1/2021

अनुभवांची शिदोरी ....
सोबतीला असता.....
नविन सुरूवात कर....
हसता हसता....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

सांगना नियती
देशील का ग दुजोरा
मला तु नेहमी .....
खूप  काही  नको गं
दुःख करशील
थोडे  से कमी....
नाही  गं दूखवावे
मन माझ्या  आपल्यांच
अपेक्षांची त्याच्यांकडून
नसावी ग मला हमी.....
प्रयत्नांना माझ्या
यश गं कमी
नको व्हावी  कधी
सल माझ्या  मनी....
स्वतः  साठी  आता
काय गं मागावे
माझ्या  आपल्यांचे सुख
नेहमी तु जपावे....
तु फक्त, सोबतीचा
भास मला दे
जिंकून  दाखवेल
अशी गोड आस मला दे....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                                   शाही.... ✍️✍️  


आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...