उपेक्षांनी खुपदा......
एकटं तीला पाडली.....
मनावरच्या वळांना बळ करून.....
सिंधुताई माझी घडली .....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
उपेक्षा की प्रेम तुझं....
कळत नाही कंधी.....
ह्दयात ठेवशील की....
जपशील मना मंधी....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
उपेक्षांनी त्या..
एकटे ते पाडले......
हक्क गृहीत धरण्याचे देऊन ....
का गं स्वतःला जाळले....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
तुझ्या माझ्या नात्यांत.......
नाही द्यायची उपेक्षेला जागा.......
जगरहाटीच्या या खेळाला ही.......
गुंतवू बांधून प्रेमाचा धागा......
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
उपेक्षा देतो तु....
हरकत नाही त्याची.....
खोट प्रेम नको हो करू.....
शिक्षा, ही नाही सहन व्हायची......
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
उपेक्षा करते रे.....
नेहमी तूझ्या दोषांची......
जाणवता त्या सल मनाला.....
प्रेम माझं का आटल्याची.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
कारे करतो उपेक्षा.....
एकटी असे पाडुन.....
मनात आहे रे स्वप्न .....
किती रे देऊ गाळून......
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
जाणतोना उपेक्षाच......
पदरी त्या पडलेल्या.....
तु समाजशील अपेक्षेत.....
वळ होऊन मनावर उठलेल्या.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
आपल्यांच्या अपेक्षांनी.....
उपेक्षित करून एकटे गं पाडले....
मनावर उठले वळ......
सल होऊन नेहमी छळले.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
कुंपणच रे शेत खातं .....
वळ मनावर रहातील....
उपेक्षांशी कस लढु......
जिंकूनही नातीच रे हरतील......
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
आर्थिक विवंचना ही.....
उपेक्षित करून एकटं रे पाडते.....
मनावर उठतात वळ.....
नात्यातले एकटेपण असेही जाळते....
....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
मनाचे वळ गं.....
बळ आता केलेले.....
उपेक्षांनी एकटे पाडून....
जगणे आता कळलेले....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
स्त्री म्हणून उपेक्षांशी....
नात गं माझ जोडलेलं.....
मनावर वळ घेऊन ही.....
लढणं कुठे मी सोडलेल.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही.... ✍️✍️