13 January 2022

साद.... 14/1/2022

उत्तरे चिन्हांकित .....
कुठे  ती कळली......
वळणावरची  नजरभेट ......
एकमेकांतच रे अडली......
         जाता जाता तू वळून......
         किती दा न पाहिले.......
         भविष्य अंकित  सोबतीच......
        भाव मनी  राहीले.....
येते का  सय तुला.....
गोड  त्या क्षणांची....
बोलतात का अश्रृ .....
तुझ्या  त्या  मनाशी....
       मनपटलावर  आजही......
      जपलय ना  मला .......
       साद घालता येशील....
       वादा ध्यानी ना  तुला......
भविष्य अंकित .....
भांगेत भरायच.....
येना लव कर......
साद किती घालायचं....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                        शाही..... ✍️✍️


शब्दगंधा... 14/1/2022

ज्याला ही भाव दिला .....
पायमल्ली  तो करत गेला.....
जगरहाटीचा खेळ  असा......
आता मीच हा संपवुन दिला....
शिकली आता गं.....
स्वतः तच रमायला ......
शब्दांबरोबर आता माझं......
खूप  लागल  गं जमायला....
खूप  गोड  सखी ....
आता गं  मी त्यांची....
खूप धमाल मस्ती ....
सुरु  बर ग आमची.....
कधी ते उगाच.....
रुसून गं बसतात....
कसे बसवू चारोळीत....
विनवण्या म फसतात....
थकली मि म्हणता....
गोड  गं ते हसतात.....
चारोळीत येऊन.....
लाईनीत म बसतात......
आजन्म  आता ही.....
सोबत गं असावी.....
शेवटच्या  श्वासापर्यंत .....
मैत्री गं ही जपावी.....
शाही आता शब्दातच.....
नेहमी ती  गंध द्यावी...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                       शाही.... ✍️✍️


12 January 2022

चारोळी संग्रह आणि हायकु। 1/2/12022

का म्हणून छळावं स्वतःला .....
क्षुल्लक  कारणांसाठी .....
ज्यांना  कदर नाही  आपली......
का फिरावं अशांच्या पाठी.....

क्षुल्लक  कारणं  असतात माझी.....
का म त्यात तू गुंतून जातो....
मी उगाच असं छळते स्वतःला ....
त्रास  तुला का म होऊन जातो ....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

छळले होते
क्षुल्लक  ते बोलणे
पोल खोलणे

छळले होते
दोष दाखवलेले
रागवलेले

छळले होते
अपेक्षांचे वादळ
सांग सरळ

छळले होते
जाणुन ते टाळणं
अश्रृ  गाळणं

छळले होते
स्वार्थी  ते वागणे
मन लागणे

छळले होते
आवरले नाही  मना
चूकच होना

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

भावनाही कधी कधी.....
का अशा छळत असतात......
अबोला धरून  क्षुल्लक कारणांवरून....
डोळ्यातुन  गं म गळत असतात.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

भास आणि  स्वप्नांमध्ये .....
का रे ते छळणं असं......
मनामध्ये  तू  लपलाय
हेच जणू सांगणं सं....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

क्षुल्लक कारणं होतं......
नजर नजरेला भिडली होती......
अव्यक्त  प्रेमाने असं छळलं.......
दोघेही  विरहात रडली होती .......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

का रे मना सांग ना  तु......
का उगाचच छळत असतो....
गुण दोषांचे क्षुल्लक कारण देऊन ...
भाव मनातील टाळत असतो....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

वेळ  देऊन भेटीला उशीरा येणे.....
का रे सख्या असे ते छळायचे......
क्षुल्लक कारण असले तरीही.....
असं झूरण पिडादाई तुला कधी  रे कळायचे....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                        शाही..... ✍️✍️


10 January 2022

तडजोड (अलक) 9/1/2022

            रोजच्या वादांना  कंटाळून  त्याने निर्णय घेतलाच विभक्त होण्याचा. तीला तर मुलांना  एकत्र कुटुंबात वाढवायच होतं. जाणत होती ती आजी बाबा आणि  नातवांमधला लळा. पण चुक कुठे होत  होती  हेच उमजत नव्हतं. सासूबाईंच्या मनातली वादळ ही तीला कळालं, पण काय तडजोड  करावी कस थांबवावे हे जाण उमजत नव्हतं. निघायची  वेळ  जवळ आली. निघायच्या आधी  सासूबाईंचा आशिर्वाद  घेतला. आणि  डबडबलेल्या डोळ्यांनी त्यांचा हात हातात  घेत म्हटली, "कुठे चुकत होते  आई सांगाल का मला, म्हणजे ती चुक मी माझ्या  सुनेला आणि  मुलीला नाही करू देणार. ". एक  स्त्री म्हणून  सुनेला समजून घेण्यासाठी  मी हवी ती तडजोड  करेल. स्त्री म्हणजे  तडजोडच ना आणि  तडजोड  म्हणजे जोडतोड. सांगना आई ! कुठे कमी पडते मी हे सावरायला. आई आहात ना!करा ना मदत माझा विखुरणारा परीवार आवरायला. चालना करू ना तडजोड  आपल्या  परिवाराला  प्रेमात  एकत्र बांधून  ठेवण्यासाठी. एक  स्त्री म्हणून  माझ्या  वेदनांना  तूम्ही समजू शकतात. कराल ना मदत परिवाराला एकत्र बांधून  ठेवण्यासाठी. हवी ती तडजोड  करू या आपण एकत्र  रहाण्यासाठी...... तडजोड अहंकार  आणि  गैरसमज  यांना  दूर सारून नात्यांना समजण्याची केलेली सुरूवात........
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
                       शाही... ✍️✍️

शल्य (अलक) 9/1/2022

             तो रागारागातच दार तीच्या तोंडावर  मारुन बाहेर  निघून गेला. तीने कसेतरी स्वतःला  सावरले. डोळे  पुसत ती किचनकडे वळली. उगाचच  कामात गुंतवून  घेण्याचा निष्फळ प्रयत्न करत  होती. लहान मोठे  वाद आणि  मतभेद  हे संसारात  होतात. त्यांच्यातही ते व्हायचे, पण आज बोलतांना  त्याने तीच्या मनाचा  विचार कुठे  होता केला. 
         भाऊ नसल्यामुळे  वय परतावे आई बाबांची होणारी हेळसांड  पाहीली नाही  गेली. आणि  म्हणून  त्यांना  आपल्या कडे आणायचा प्रस्ताव  वजा विनंती केली. पण तो म्हटला हे "हे घर माझ  आणि  निर्णय  मी घेईल. "त्याच माझ घर म्हणणं खोलवर टोचून गेलं. 
       कोण होती ती, कुणी आणलं इथे, दिवसरात्र संसाराच्या खस्ता का?? सल होण्यासाठी.... अस्तित्व विरलय  ज्याच्यात त्याने असं बोलणं.... 
हे शल्य आजन्म  राहील,सल बनून मनात..... हो शल्य आपल्या  माणसाने दिलेली कडवट टुचणारी भेट.......
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
                        शाही.... ✍️✍️

आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...