14 January 2022

चढ उतार... 14/1/2022

चढ उतार ही येतील .....
आणि कठीण वळणही येतील.....
तुझ्या  माझ्या  प्रेमाची परीक्षा.....
सगळेच  रे अशी घेतील....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

वळणाची भीती नको गं घेऊ....
सोबती मी असतांना....
चढ उतार ठरलेले तरीही .....
दिसावी मज गं तू हसतांना ....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

दुर्लक्ष  तुझं करणं.....
आणी अबोल ते होण.....
नको वाटतं असं वळण...
जीवनात  कधी रे येणं....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

भिती वाटते  त्या वळणाची.....
दोष नात्यात  एकमेकांचे रे दिसतात......
समजून  घेणे ठरलेले तरीही ......
दुनियादारीत नाते ते फसतात.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

ठरलेले चढ उतार.....
लढणं अपरिहार्य रे करून जातात....
भीती असली वळणाची तरीही.....
ओढ जगण्याची ठेऊन  जातात.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

सांगता कुठे येत.....
संकट कुठलं अंगावर येईल.....
भीती असते मनात....
जगणं वळण कसं घेईल...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

त्या वळणावर पून्हा.....
तू असल्याचा भास  झाला......
वेड्या  मनाला  पून्हा......
भूतकाळाचा ध्यास झाला.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

भिती मला त्या वळणाची.....
आपलेच परकेपण जतवून जातात.....
चढ उतार  ठरलेले तरीही.....
सल असेही  रडवून जातात ....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

वळणाची  रे भीती वाटते .....
साथ सख्या देशील ना.....
चढ उतार जगण्याचे चढता....
हात हाती घेशील ना.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                   शाही..... ✍️✍️


शोध तीचा... 14/1/2022

आजही रमते म्हणे ती.....
स्वप्नातल्या राजकुमारासोबत......
नविन प्रवास सुरू  करून ही.....
कित्येंकींवर येते ही नोबत ......

शोध खरच का संपला तीचा......
राजकुमार तर तो भेटलाच नाही.....
मन आणि  मान जपणारा.....
फक्त  स्वप्नातच असतो नाही?? .....

रूप आणि  मनाच्या सौंदर्यावर......
नेहमी तीची कसोटी  असते......
आवडणार मन न आवडत होतं.....
चुक तीची  यात काय असते.....

मन जपणारा तीला भेटावा.....
शोध  तिचाही असा संपावा.....
सुंदर  प्रवासाची  सुरुवात  करता.....
सखाच तो राजकुमार रे वाटावा......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                     शाही... ✍️✍️


13 January 2022

साद.... 14/1/2022

उत्तरे चिन्हांकित .....
कुठे  ती कळली......
वळणावरची  नजरभेट ......
एकमेकांतच रे अडली......
         जाता जाता तू वळून......
         किती दा न पाहिले.......
         भविष्य अंकित  सोबतीच......
        भाव मनी  राहीले.....
येते का  सय तुला.....
गोड  त्या क्षणांची....
बोलतात का अश्रृ .....
तुझ्या  त्या  मनाशी....
       मनपटलावर  आजही......
      जपलय ना  मला .......
       साद घालता येशील....
       वादा ध्यानी ना  तुला......
भविष्य अंकित .....
भांगेत भरायच.....
येना लव कर......
साद किती घालायचं....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                        शाही..... ✍️✍️


शब्दगंधा... 14/1/2022

ज्याला ही भाव दिला .....
पायमल्ली  तो करत गेला.....
जगरहाटीचा खेळ  असा......
आता मीच हा संपवुन दिला....
शिकली आता गं.....
स्वतः तच रमायला ......
शब्दांबरोबर आता माझं......
खूप  लागल  गं जमायला....
खूप  गोड  सखी ....
आता गं  मी त्यांची....
खूप धमाल मस्ती ....
सुरु  बर ग आमची.....
कधी ते उगाच.....
रुसून गं बसतात....
कसे बसवू चारोळीत....
विनवण्या म फसतात....
थकली मि म्हणता....
गोड  गं ते हसतात.....
चारोळीत येऊन.....
लाईनीत म बसतात......
आजन्म  आता ही.....
सोबत गं असावी.....
शेवटच्या  श्वासापर्यंत .....
मैत्री गं ही जपावी.....
शाही आता शब्दातच.....
नेहमी ती  गंध द्यावी...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                       शाही.... ✍️✍️


12 January 2022

चारोळी संग्रह आणि हायकु। 1/2/12022

का म्हणून छळावं स्वतःला .....
क्षुल्लक  कारणांसाठी .....
ज्यांना  कदर नाही  आपली......
का फिरावं अशांच्या पाठी.....

क्षुल्लक  कारणं  असतात माझी.....
का म त्यात तू गुंतून जातो....
मी उगाच असं छळते स्वतःला ....
त्रास  तुला का म होऊन जातो ....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

छळले होते
क्षुल्लक  ते बोलणे
पोल खोलणे

छळले होते
दोष दाखवलेले
रागवलेले

छळले होते
अपेक्षांचे वादळ
सांग सरळ

छळले होते
जाणुन ते टाळणं
अश्रृ  गाळणं

छळले होते
स्वार्थी  ते वागणे
मन लागणे

छळले होते
आवरले नाही  मना
चूकच होना

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

भावनाही कधी कधी.....
का अशा छळत असतात......
अबोला धरून  क्षुल्लक कारणांवरून....
डोळ्यातुन  गं म गळत असतात.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

भास आणि  स्वप्नांमध्ये .....
का रे ते छळणं असं......
मनामध्ये  तू  लपलाय
हेच जणू सांगणं सं....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

क्षुल्लक कारणं होतं......
नजर नजरेला भिडली होती......
अव्यक्त  प्रेमाने असं छळलं.......
दोघेही  विरहात रडली होती .......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

का रे मना सांग ना  तु......
का उगाचच छळत असतो....
गुण दोषांचे क्षुल्लक कारण देऊन ...
भाव मनातील टाळत असतो....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

वेळ  देऊन भेटीला उशीरा येणे.....
का रे सख्या असे ते छळायचे......
क्षुल्लक कारण असले तरीही.....
असं झूरण पिडादाई तुला कधी  रे कळायचे....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                        शाही..... ✍️✍️


आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...