16 January 2022

शोध संपला.... 16/1/2022

सौंदर्य  म्हणजे काय......
सांगशील  का रे कंधी.....
सोबतीने प्रवास  सुरू करायचं.....
स्वप्न  आहे  रे मना मंधी ....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

शोध  सर्व  संपतात म्हणे.....
ह्दयात सौंदर्य  दिसता ......
सुंदर  प्रवास  सुरू झाल्यावर......
जप हो खाचखळगे तेव्हाच गं दिसता....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आपुलकीने तुझं ते बोलणं......
संस्कार तूझे मनाच गं सौंदर्य .....
जपुन वाग बर गैर अर्थ  होतो.....
नाही  इथे मनाच ते औदार्य .....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

शोध  सारे.......
खरच का संपतात.......
चंचल  मनाचे खेळ .......
सोपे नाही  कुठे ते कळतात.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

चुकांना  माफ  करण्यातही......
ह्दयाच सौंदर्य  गं दिसत.....
जुनाच प्रवास नव्याने सुरू  कर....
नातं बघ गोड कसं हसतं....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आई म्हटली की ह्दयाच सौंदर्य .....
शोध तीथे संपून जातात......
मनातील सर्व  वादळे......
क्षणात तीच्या जवळ विरून जातात ....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

काळजी घे म्हणता  म्हणता .....
काळीज गं माझे चोरून नेले......
काळजी घेणारं सुंदर  मन पहाता.....
शोध  सारे गं संपून गेले.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

विचारात  ही रे असतं....
मनाच सौंदर्य  लपलेल.....
समजून  घेण्याच्या प्रवासात......
नातं जमतं सहज म पुढे नेणं.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

शोध  संपतो म्हणे.....
ह्दयाचं सौंदर्य  दिसता.....
सुंदर  प्रवास  सुरू करशील.....
सोबतीने माझ्या  हसता.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                         शाही..... ✍️✍️


15 January 2022

चारोळी संग्रह। 15/1/2022

दारावर ठेवलेला तूझा गुलाब .....
खूप  काही  खुणवुन रे गेला.....
तुझा अबोल सांगावा असा.....
सुगंधात रे उधळून  गेला......

खुणवत होती ती.....
पुन्हा पुन्हा  पोटावर हात फिरवून....
भुक  तीची कळलीच नाही .....
माणुसकी गेली होती हरवून...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

अंधाराची सवय....
वेड्या मनाला रे पडली....
जेव्हा अस्तित्वासाठी.....
आपल्यांशी रे लढली.....

अंधाराची सवय.....
लढायला शिकवून रे गेली ....
मीच माझा काजवा होऊन....
वाटरे उजळवुन म दिली....

अंधाराची सवय....
नाही  सवयीची केली.....
लढाया बळ घेण्यासाठी ......
कधी कधी तीथे रे गेली .....

अंधाराची सवय.....
असावी रे जीवनी......
मनामध्ये  जपावी. रे....
प्रकाशाची  फक्त हमी.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

पुन्हा पुन्हा का खुणावतात.....
अश्रृ डोळ्यात लपलेल.....
मनाच्या  अंधार वाटेवर....
व्रण   का  ते जपलेले....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

अंधाराची सवय त्या मार्गाला ....
का तो मज रे खुणावतो.....
तुझ्या  पाऊलखुणा  शोधण्यात....
वेडे मन हे रमवतो.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

पुन्हा पुन्हा खुणावतो.....
तुझ्या  शब्दफुलांचा खेळ .....
नाही रे  बसत त्यांच्याशी....
मनाचा आता काही मेळ....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁


दाराआडून बाहेरच चंदेरी जग....
पुन्हा पुन्हा रे  खुणावतो.....
घे भरारी  म्हणता कितीदा.....
बंधनातल्या मनाला मनवतो.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                          शाही.... ✍️✍️


भिती वळणाची। 15/1/2022

गैरसमजांचे  चढ उतार.....
येतील रे सख्या जीवनात.....
भीती नको वादाच्या वळणांची.....
सांभाळेल रे मी खात्री ठेव मनात....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

नको गं भीती मनात.....
तारुण्याच्या त्या वळणाची.....
चढ उतारावर तोल धर...
भीती नाही  गं म हरण्याची...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

चुकेल मी खुपदा....
सावरून तुलाच रे घ्यावं लागेल....
विरहाचं वळण नाही  ना येणार....
वादा ही तुलाच रे द्यावा लागेल....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

जीवनाचा मार्ग  कठीण....
कधी उतार कधी चढ ठरलेले.....
मला भीती  वळणाची वाटताही.....
गतीमान  रहाण्या धडपडीत रूळलेले....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

जगण्याची  दिशा.....
भीती वाटणारी वळणे रे  ठरवुन जातात....
प्रत्येकाच्या आयुष्यात  अशी.....
धोक्याची  वळणे येउन जातात.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

प्रवासाची ईच्छा  ही.....
नको कधी हरायला.....
भितीदायक  वळणे येतीतच......
असाव आपलं कुणी सोबती चालायला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

उन सावल्यांच्या खेळात.....
चढ उतार रे ठरलेले.......
वळणाची ती भीती मनात .....
अचानक येउन छळलेले....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आठवतेना ते वळण.....
आजही भीती दाटून देतं.....
चढ उतार  हे  ठरलेले होते.....
येण त्यांच अपरिहार्य  होतं....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

वळणाची होती भीती मनात .....
आणि  वळणावर तू भेटलेला.....
नियतीचा हा खेळ  मनाला .....
होता उशीरा तो कळला.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                      शाही.... ✍️✍️


14 January 2022

चढ उतार... 14/1/2022

चढ उतार ही येतील .....
आणि कठीण वळणही येतील.....
तुझ्या  माझ्या  प्रेमाची परीक्षा.....
सगळेच  रे अशी घेतील....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

वळणाची भीती नको गं घेऊ....
सोबती मी असतांना....
चढ उतार ठरलेले तरीही .....
दिसावी मज गं तू हसतांना ....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

दुर्लक्ष  तुझं करणं.....
आणी अबोल ते होण.....
नको वाटतं असं वळण...
जीवनात  कधी रे येणं....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

भिती वाटते  त्या वळणाची.....
दोष नात्यात  एकमेकांचे रे दिसतात......
समजून  घेणे ठरलेले तरीही ......
दुनियादारीत नाते ते फसतात.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

ठरलेले चढ उतार.....
लढणं अपरिहार्य रे करून जातात....
भीती असली वळणाची तरीही.....
ओढ जगण्याची ठेऊन  जातात.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

सांगता कुठे येत.....
संकट कुठलं अंगावर येईल.....
भीती असते मनात....
जगणं वळण कसं घेईल...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

त्या वळणावर पून्हा.....
तू असल्याचा भास  झाला......
वेड्या  मनाला  पून्हा......
भूतकाळाचा ध्यास झाला.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

भिती मला त्या वळणाची.....
आपलेच परकेपण जतवून जातात.....
चढ उतार  ठरलेले तरीही.....
सल असेही  रडवून जातात ....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

वळणाची  रे भीती वाटते .....
साथ सख्या देशील ना.....
चढ उतार जगण्याचे चढता....
हात हाती घेशील ना.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                   शाही..... ✍️✍️


शोध तीचा... 14/1/2022

आजही रमते म्हणे ती.....
स्वप्नातल्या राजकुमारासोबत......
नविन प्रवास सुरू  करून ही.....
कित्येंकींवर येते ही नोबत ......

शोध खरच का संपला तीचा......
राजकुमार तर तो भेटलाच नाही.....
मन आणि  मान जपणारा.....
फक्त  स्वप्नातच असतो नाही?? .....

रूप आणि  मनाच्या सौंदर्यावर......
नेहमी तीची कसोटी  असते......
आवडणार मन न आवडत होतं.....
चुक तीची  यात काय असते.....

मन जपणारा तीला भेटावा.....
शोध  तिचाही असा संपावा.....
सुंदर  प्रवासाची  सुरुवात  करता.....
सखाच तो राजकुमार रे वाटावा......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                     शाही... ✍️✍️


आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...