आवडेल मला तुझ्या चेहर्यावर च.....
ते रे हसू व्हायला......
तुझ्या सर्व वेदनांना.......
स्वतःत असं सामावून ते घ्यायला.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
खोट हे हसणं.....
अपरीहार्य रे जगण्यासाठी.....
वेदनेचा त्रास नको आपल्यांना.....
म्हणून असाव नेहमी ते गाठी....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
ओठावर मांडते ती.....
खोटी हसरी कहाणी.....
ह्दयात दडवते ती.....
व्यथा अनामिक केवीलवाणी....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
कस ना रे आयुष्य......
कधी झुरत जगावं लागतं....
मनात वेदना लपवुनही.....
खोट खोट हसाव लागत....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
डोळ्यात पहाता तुझ्या......
दिसतो गं ओलावा नात्यांसाठी......
चेहर्यावर खोटे हसू आणी......
मनात जपला कोलाहल म कुणा गं साठी......
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
नाही ना रे संपली......
आपुलकी ती आपल्यातली.......
गर्दी असल्यागत खोट हसलास......
का वेदना ती लपवून नेलीस......
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
गर्दीलाच नाही तर ती.....
दुःखाला ही फसवत असते.....
खोटे हसण्यामागे जाणो.....
किती वेदना रिचवत असते....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
सासरी निघतांना लेक.....
खोटे खोटे हसत होती....
तीच्या मनाची ही घालमेल....
आईला रे डसत होती..
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
गर्दीत ती विधवा वेदना लपवत....
खोटे खोटे हसत होती.....
प्रश्नार्थक त्या नजरांमध्ये तरी.....
ती निर्लज्यच रे गणली होती....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
मंडपातील गर्दीत तो.....
खोट खोटे हसत होता.....
पाठवणी करायची लेकीची.....
वेदना त्या उगाच लपवत होता.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
समजून घेशील ना रे......
गर्दीत खोटे हसता डोळे गळले तर.....
इभ्रतीवर गालबोट उठवले.....
म्हणणार नाही ना असे कळले तर.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही.....✍️✍️