वेळ नसल्याच्या तुझा अभिनयाने....
अपरिहार्य केल दुर जाण.....
आठलाव तुलाही कधी.....
माझ ते तूझ्यात रहाणं....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
नाही रे जमत भावनांना.....
अभिनय ते बेगडी करण बर.....
किती वेदना आणी घाव झेलतात....
बोथट होण्याआधी त्या खर....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
खर अभिनय तर.....
राजकारणी करतात....
खरच नेते हे....
चांगले अभिनेते ठरतात....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
अभिनय करण्याची.....
त्या वेडीला आहे गोडी.....
नक्कल नेहमी करते......
सगळ्यांची ती थोडी थोडी.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
तुला मदत करण्याचा....
अभिनय ते करतील बर.....
काही तुझे आपले.....
असेही छळतील खर.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
रूप वेगवेगळे घेण्यात.....
असतात काहीजण पटाईत बर.....
अभिनय करतात इतका वास्तव....
कळेना काय खोट काय खर.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
आपली भुमीका कुठली.....
कळायला हवी खर....
अभिनयात मग....
मन रमत बर....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
आपल दूःख विसरून.....
दुसर्यांना हसवता याव....
खरा अभिनय तर....
विदुषकाकडून शिकाव....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
आपल दूःख विसरून.....
दुसर्यांना हसवता याव....
खरा अभिनय तर....
विदुषकाकडून शिकाव....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
छान जमतो त्याला.....
अभिनय असा.....
तो माझाच असल्याचा.....
भास होतो असा.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही...✍️✍️