तुझ्या नावात माझ नाव....
होत बर रे विरघळत....
नामकरणाच हे सुंदर स्वप्न...
पुन्हा पुन्हा नाही रे पडत....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
मैत्रीपेक्षा थोड जास्त नी....
प्रेमापेक्षा थोड रे कमी.....
सांगना रे काय नामकरण करू....
जगाला हवी अशाही नात्याची हमी....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
पैश्याच्या गरजेतून शरीर ती विकता.....
नामकरण तीच वेश्या तु करून गेला.....
वासनांध होऊन कळी तू कुस्करली......
नामकरण काय करायचे प्रश्न तीलाही सल होऊन गेला......
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शांती नामकरण केल तूझ.....
तूच मन अशांत करून गेली....
नामकरणाचा खेळी सारी.....
क्षणात कशीना पलटवून दिली....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
बंदीवानाच जीवन हे.....
नामकरण तरी गोड केल.....
लाँकडाऊन नशिबाच म्हणत.....
सगळ हसण्यावारी तीने नेल.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
नामकरण नात्याच....
कस रे तू करत असतो....
तूझ असत ते प्रेम आणी...
माझा हट्ट कसा ना ठरत असतो...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
ठरवून नाही गं नामकरण पण.....
फरिश्ता सारखाच तो जीवनात होताआला....
वादळ,दुंख,राग काढण्याची आता...
हक्काची माझी जागा झाला....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
तु म्हणे गुलाब वेडी.....
मी नीवडूंग राणातला....
नामकरणाचा हा व्दंद ....
छळतो रे वेड्या तूझ्या मनातला....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
नामकरण विधी....
थांबतो कुठे.....
कधी प्रेमाने कधी व्देषाने...
चालत असतो मागे,पुढे....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
कधी शाररीक व्यंगावरूनही....
नामकरण होते....
कधी बाह्य रुपावरूनही....
लाडाने साद छान दिली जाते....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
नामकरणात भेटलेल्या नावात.....
असतो अर्थ छान.....
तसेच असावे आचरण......
हेतू असतो त्यात गहन.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही..✍️✍️