21 June 2022

चारोळी संग्रह....

बंद दारामागे काय?.....
कुतूहलाने ठोठावता  गं ते दार.....
गरज कळता फिरून नाही  येणार....
सांगू नकोअंतरमनातील वादळ  सगळ्यांना बर सार...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

स्त्रीच ती समजून घेण तीला....
उमजून नाही घ्यायच कुणाला....
मोनालीसाच्या पेंटींगसारख....
कुतूहल फक्त क्षणाला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मौनाच्या तलावात....
प्रश्नाचे खडे किती बर रे  मारावे.....
उठणार्या तरंगांचे  सांग ना.....
कुतूहल कधी का सरावे....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तुझ्या बदलण्याच कुतूहल.....
क्षणात रे तेव्हा सरल.....
अंधार पडता सावलीनेही.....
होत न जेव्हा एकट सोडल....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कुतूहल हे जणू.....
अवखड रे घोडा......
संयमाची लगाम लावता.....
थांबत नाही तो थोडा.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

बघ्याची भुमीका निभावतोय.....
आज तो समाजात बर.....
कुतुहलाने प्रश्न पडणार्या बालमनाला.....
नेहमी गप्प केल्याची ही का रे शिक्षा खर....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

नाविन्याच कुतूहल......
निसर्गाची गोड रे खेळी.....
जगण्याची वाढावी उत्सुकता.....
सांगावा हा त्यात रे प्रत्येक वेळी....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कुतुहल सरता......
प्रेम ही का सरत.....
प्रेम की वासना अंतर....
यावरून का ठरत.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कुतूहल वाटत......
गळणार्या त्या ढगांच.....
का बर रडतात.....
दूःख कळेना कधी त्यांच....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

प्रत्येक गोष्टीला जाणण्याच....
कुतूहल तीला भारी.....
काही गोष्टीची अनुत्तरीतच.....
कस सांगू गंम्मत असते सारी....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

नभातील शशीला पाहुन....
कुतुहल वाटत....
हा ही लीहण्यासाठी का....
रात्र रात्र जागतो....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

लहान मुलांसारख....
असाव  वेड मन.....
कुतुहल जीवनाच.....
रहाव क्षण क्षण.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                             शाही...✍️✍️


कुतूहल.....चारोळी संग्रह

वेडू आहे ना गं कुतूहल तुला......
मनात कोण माझ्या ती जाणण्याच........
डोळ्यात बघना प्रतिबींब तीच.......
धाडस नाही गं नाव ते सांगण्याच.......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

इच्छा पुर्ण झाली की नाही....
किती गं सखी जाणण्याच ते कुतुहल ....
सांग ना कळे ना मला....
मनातील तूझ्या हलाहल....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आपल मन ही.....
कुतूहलाचा  ना  विषय....
किती लीहाव त्यावर.....
नसंपणारा आशय.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

शांत मनात ही......
किती तो कुतूहल......
भ्रमात असल्याची......
ठेऊन का जातो तो सल....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तू आहेस जणू कुतूहल.....
न सरणार वेड्या मनातल....
साथ हवाय जन्मभराचा....
कळल का मर्म यातल....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

सकाळच्या कुतूहलात....
शांत रात्र जशी सरते.....
कस सांगू वेड्या मी.....
तशीच तुझ्यात हरते....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

गाडीतून दिसणारी पळती झाड.....
कुतूहल किती ना वाढवायची......
कुठ हरवला तो निरागसपणा......
सल हीच आता रहायची.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

नाही वाटत तीला म्हणे.....
कुतूहल आता कुठल्या गोष्टीच....
दूःख होत वेडी मला खुण ही...
तू निरागसपणा गवावून गं बसल्याच...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कुतुहल निरागस वयाच.....
वेळीच योग्य मार्गाने सराव बर.....
चुकता मार्ग  हे वादळ होऊन....
आयूष्यभराचा पश्चाताप  ठराव खर....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                             शाही.....✍️✍️


20 June 2022

चारोळी संग्रह.....

विज्ञानाच्या मँजीकची.....
शिकून घे गंम्मत.....
मांत्रीकाच्या मँजीकची....
उरणार नाही मग कींमत...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

काहीतरी जादूटोणा....
केला त्या वेडीने.....
तीच्या शिवाय काही दिसेना....
वेडावल या खेळीने.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

वेडू  माझी करते.....
जादूटोणा बर.....
ये नारे ती म्हणता.....
सुचतच नाही काही खर....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

जादूटोण्याचा खेळ.....
श्रध्देशी तो जोडला गेला.....
भोळाभाबडा भक्त असा.....
भोंदूगीरीने नाडला गेला.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

सत्याला नाकारते.....
तीच अंधश्रध्दा बर..........
जादूटोणा म्हणजे....
भ्रमाचा खेळ खर.......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मांत्रीकाचे मंत्र......
भावनांचा खेळ बर.......
बिघडवेल जीवनाचे तंत्र....
वेळीच सावध हो खर......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

जादूटोणा अंधश्रध्दा.....
विषय येता खर.....
दाभोळकरांच्या उल्लेखाशिवाय....
तो कसा होईल पुर्ण बर....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

जादूटोणा करणार्यांनी.....
कौशल्य दाखवाव सिमेवर.....
खेळ हा फसवण्याचा......
चालतो अंधश्रध्देच्या हमीवर.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

शीक्षणाची आता.....
धरूयाना कास....
अंधश्रध्दा जादूटोणा.....
चला करू यांचा र्हास....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

प्रगती झाल्याची अहाळी.......
उगाच  ग उठली होती......
जादूटोणा च्या नावावर स्त्री.....
चेटकीण म्हणवता जीवंत पेटवली होती.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

जादूटोणा येतोना.....
सांग  ना रे  तुला करता बर.....
अनोळख्यावर कुणी......
सहज मन का हरत खर....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                            शाही.....✍️✍️


जादूटोणा...चारोळी संग्रह

जादूटोणा नाही गं वेडू......
Telepathy असते म्हणे......
आठवण काढता मँसेज त्याचा येणं ......
हे खर प्रेमातच घडते म्हणे.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

साक्षरतेच प्रमाण वाढताही.....
जादूटोणा विधेयक आणावा लागला.....
अ.नि.स.च्या कामात उचलू खारीचा वाटा.....
अपरीहार्य तो सांगावा लागला.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

श्रध्दा आणी कर्मांवर.....
असूदे अढळ विश्वास बर.....
मांत्रीकाच्या मंत्रात नाही ताकत.....
थांबवेल जी प्रगती नी श्वास खर....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

होत रे एक निरागस वय.....


जादूवरही विश्वास बसायचा.....
दुनियादारीच्या शहाणपणात तर....
सत्यावरही संशयच असायचा....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

नभातील शशीवरही.....
जादू अशीना चढली.....
रोज येऊन खीडकीत म्हणतोकी.....
मला आहे गं तु आवडली....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

यावी रे मला.....
जादू अशी करता.....
दूःख तुझे सारे घेऊन......
आनंदाश्रू डोळ्यात तुझ्या भरता...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁


कायदे आणी विधेयक आणून.....

नाही बदलत मनोवृत्ती बर.....

शिक्षण आणी प्रबोधनच....

अंधश्रध्देवर उपाय खर....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

जादूटोणा केला की......
काही खाऊ घातले  बर......
तुझ्या आठवणीत जग वीसरलो.....
कस हे घडत सांग ना खर.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

भीकारीच वाटत होता.....
मांत्रीक ना तो तसा.....
बळी देऊन श्रीमंत होण्याचा.....
जमला नाही स्वतःसाठीच ऊपाय रे कसा....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

लींबु मीरची आहेत......
पदार्थ ते खाण्याचे.......
कसे व्हावे ते कारण.....
जीव घेण्या देण्याचे....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                         शाही....✍️✍️


कुतुहल त्या वेडीच.....मुक्तछंद

सांग ना ग आई....
सात च्या आत आदित्य🌞...
का गं घरी पळतो....
ताईसारख त्यालाही....
वाटेवर का कुणि छळत....
कुतुहल त्या वेडीच....
असं अंतरमनाला छळतो.........
सांगना गं आई....
चांदण्यात राहूनही....
नभातील शशी  का गं 🌛🌛...
अबोल नी शांत असतो.....
मुला मूलींनी मैत्री नाही करायची....
नभांगणीही नीयम का हा ही असतो??....
कुतूहल त्या वेडीच...
असं अंतरमनाला छळतो.........
सांगना ग आई....
चांदण्याची हजेरी🌟🌟...
घेत असेल का ग कुणी.....
कोण आजारी,कोण दांडी मारली...
नोंद त्यांची कूणी ....
ठेवत असेल ना  कुणी....
कचराकुंडीत कुणी....
टाकत तर नसेल.....
कळींसारख कुणी....
कुस्करत तर नसेल......
कुतुहल त्या वेडीच....
असअंतरमनाला छळतो....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                     शाही...✍️✍️


आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...