23 June 2022

चारोळी संग्रह....

भास आणी आभासाचा खेळ.....
लाईट कँमेरा अँक्शनच जग बर....
मोह होतो सगळ्यांना त्याचा पण.....
वास्तविकता त्या मागची नक्की जाणून घे खर....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

लाइट कँमेरा अँक्शनचा खेळ.....
दुनियादारीत सहज ना घडतो....
कोण कीती महत्वाचा पाहून....
अभीनय  नात्यातला  ठरतो...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

लाईट कँमेरा अँक्शन या सगळ्याचा....
मोह त्या वेडीला फार बर.....
पण शोकांतीका ही की समाजात....
आजही नाही ह्या कलेला हवा तीतका मान खर....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

लाईटच्या प्रखरतेवर.....
खेळ सावलीचे चालले होते.....
कँमेर्यानेही ह्या अँक्शनला.....
दुनियादारीची गहनता म्हणता टिपले होते...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मनाच्या कँमेर्यात वेड्या.....
तुझच रे चीत्र बर.....
पण हाताच्या रेषांमध्ये....
असाव नाव तूझ खर....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

जीवनाच्या रंगमंचावर.....
भुमीकेची संहीता नसते रे लीहीलेली.....
नियतीने लाइट कँमेरा अँक्शन म्हणता.....
अनुभवातून हळू हळूअसते ती साकारलेली.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

लाईट कँमेरा अँक्शन ची दूनिया....
फक्त भास दुरून झगमगाटाचा.....
जाणतो ना सत्य, सुर्य चंद्र होण्यासाठी....
शाप असतो जळण्याचा नी ग्रहणाचा...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
 

कँमेर्यात घेतलेल्या चीत्रात.....
सुंदरता तूझी गं टिपली होती.....
अबोल नजरेतील तूझ्या.....
मनातील वादळ त्यालाही गं छळली होती....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

सौंदर्यासारखाच क्षणभंगूर.....
लाईट कँमेरा अँक्शनच जग....
बाह्य रुपावर नको भाळू.....
अंतरमनातले गुण बर बघ.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आहे गं त्या वेडीला......
नक्कल करण्याचा छंद......
लाइट कँमेरा अँक्शन म्हणता....
होते ती स्वतःतच धुंद.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

लाईट कँमेरा अँक्शन.....
रंगमंचावरची जणू जादू बर.....
पात्र क्षणात येत जन्माला.....
अभिनेता स्वतःला अभिनयात हरवतो खर....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                                शाही....✍️✍️

लाईट कँमेरा अँक्शन......
म्हणण्याचीच वेळ....
तीच्या आतल्या अभिनेत्रीचा.....
व्हायचा सुरू अभिनयाचा मग खेळ....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁


लाइट कँमेरा अँक्शन....चारोळी संग्रह

जीवन उभा आहे जणू.....
घेऊन कँमेरा छान .....
अँशन करूया चल ना सुंदर हसण्याची....
विसरून सूख दूःखाचे भान....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

Focus नी blur करण.....
कँमेरा सहज शिकवून गेला.....
दुनियादारीचा वेगळाच दृष्टीकोन....
जीवनात मग येऊन गेला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

नेहमी हसत रहाव मी.....
याच ठेवतो ग सख्या भान.....
आहे ग जीवनाच्या माझ्या.....
फोटोग्राफर असा तो छान.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तुझ्या नजरेच्या कँमेर्याने.....
खास मज सख्या बनवून दिले....
दुनियादारीच्या कँमेराने....
दोषच होते  रे गणवून दिले.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

माझ्या वेडुचा  हा खोडकरपणाच.....
प्रेमात तीच्या मला पाडून गेला.......
फोटो पाठव तूझा म्हटलो तर.....
तीने गुलाबाचा फोटो  हो धाडून दिला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कँमेरा तर माध्यम बर.....
क्षण तो कैद करण्याचा.....
क्षणात काय त्या दडलय.....
हा दृष्टीकोन ठरवतो बघण्याचा.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

लाइट कँमेरा अँक्शन म्हणता.....
भुमीकेत आपल्या ती रंगून गेली....
शो मस्ट गो आँन ब्रीद हे आठवून.....
वयक्तीक दुःख आपल लपवून गेली.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

सीसीटीवी कँमेर्याच्या भीतीने.....
गुन्हे  खरच का थांबतात.....
वरचा बघतोय की क्षणक्षण आपल्याला....
लोग या वीचाराने का नाही ते वागतात...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

जणू नवखी अभिनेत्रीच....
लेखणीही  आज बावरली.ना अशी...
लाइट कँमेरा अँक्शन ऐकता....
गोंधळून ती घाबरलीच जशी.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                       शाही...✍️✍️


गंम्मत.....

लाइट कँमेरा अँक्शनची......
खरी गंम्मत वेगळी होती....
तीच्या लग्नाच्या व्हीडीओ शुटींग मध्ये....
पात्रच इतकी सगळी होती....
गोरी तेवा गाव बडा प्यारा....
सुर ते मागे चालत होते....
माहेरच्या त्या पायवाटा बघता....
अश्रू तीचे दाटत होते....
नाश्ताल्या विचारल नाही म्हणता....
मामा रूसल्याचे क्षण ही होते...
चिंतेत टाकणारे ते क्षण ...
आज गोड आठवणीत हसले होते...
बहारो फुल बरसाओच्या सुरात....
स्वतःला पहात ती हरखून गेली....
मीही हीरोईन दिसायची की...
म्हणत गोड ती लाजून गेली....
सख्याचे राजबींड रूप ते पहाता....
गोड क्षणात रमून गेली....
किती खराब झाली तब्यत म्हणता....
स्वतःलाच जपायला सुचवून गेली....
पाठवणीचे क्षण पाहुन....
डोळे पुन्हा ओघळले होते....
मनात जपलेले सारे क्षण....
कँमेरात ते जीवंत होते.....
लाइट कँमेरा अँक्शनचा....
खरा अर्थ तीला कळला होता...
या तीन शब्दात....
जीवनाचा सार दडला होता....
मनाच्या कँमेरात क्षण क्षण...
जपायचा असतो...
आशेचा प्रकाशाला बळ बनवून....
कृतीने ध्येय गाठायच असत...
लाइट कँमेरा अँक्शन म्हणता...
गोड ते हसायच असत....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                               शाही....✍️✍️


22 June 2022

चारोळी संग्रह.....

तोंडघशी पडणारे......
आपण त्यांचे सावज बर.....
अच्छे दिन आयेगेचा......
मतांसाठी राजकारणी बेगडी आवाज हे खर...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तीच प्रेम असेल तर.....
इभ्रतीच होत  का हो राजकारण.....
त्याने केला बलात्कार तर ......
पुरूष तो सोप ना हे स्पस्टीकरण.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

राजकारण आहे.....
दुधारी तलवार बर.....
परीणाम आता तुझ्या वापरावर....
भ्रष्टाचाराचा खेळ थांबव तू खर....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तुमच्या एक मतावर....
देशाच भविष्य घडू शकत....
म्हणून मतदान करा.....
खेळ राजकारणाचा थांबू शकतो....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

माणूस नाही करत.....
माणसाचा व्देश कंधी....
राजकारण भडकवत.....
भेदभावाची आग मनामंधी.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

वर्षानुवर्ष  गरीब....
जनतेला धोका देण्याच.....
असत जे कारण.....
तेच तर रे वेड्या  राजकारण......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

राजकारण आता.....
राजरोसपणे घडतो.....
हीच दुनियादारी म्हणत.....
फरक कुणा पडतो.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

शब्दफूलांच्या या यात्रेतही....
राजकारण आलेल.....
कमी रेटींगची खेळी.....
मानसीकता वीकृत दाखवून गेलेल...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

नको राजकारण....
कधीच जाती पातीच....
नुकसान होत यात....
सर्व मानवजातीच....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                              शाही.....✍️✍️


राजकारण.....चारोळी संग्रह

तोंडावर हसू......
आणी मनात  रे कपट.....
स्वार्थी नात्यांच राजकारण......
मनाला  आता नाहीरे पटत.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

प्रत्येक गोष्टीत राजकारण.....
आहे हे खर......
पण प्रत्येक गोष्ट राजकारणात....
आणायची नसते बर....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

राजकारणात जाण्याचा....
नको बर सख्या करू  तू विचार....
तूला आहे  बर तो....
खर बोलण्याचा आजार.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

रंगाचही राजकरण.....
आता आता कळल.....
खरच ग रंगांनाही.....
बंधन जातीच छळल....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

का ग वेडू अशी तू.....
प्रेमात राजकारण खेळून गेली....
एकांतात होकार देऊन पून्हा.....
सगळ्यांसमोर नकार जाहीर करून गेली...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

धर्माच राजकारण.....
नाही रे बर.....
माणुसकी हाच धर्म....
विसरायच नाही खर....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

भारतात शीष्टाचार....
तूम्हीच आणाल तरूणांनो बर...
राजकारणात पडून आता....
टेबलाखालचा भ्रष्टाचार थांबवाल नारे खर...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

राजकारण म्हणे दलदल.....
साफ कुणी करायची बर....
पैसे घेऊन मत द्यायची.....
सांगाल चुक कुणाची खर...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

हो की नाही उत्तर दे.....
नाहीतर बोलणार नाही हं कधी....
प्रेमाच हे राजकारण करतो बर....
सख्या गं अधी मधी.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

शाळेच आणी त्याच.....
पटलच नाही  कधी बर.....
शिक्षणमंत्री झाला तो ही.....
राजकारण हे अस खर....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

राजकारणात असावी.....
शुध्द रे समाजसेवा.....
रंजल्यागांजल्यांच्या समृध्दीचा....
मार्ग हा रे हवा....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                             शाही......✍️✍️    


आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...