प्रत्येक कवयत्री आहे ना परी.....
शब्दांनी जादू तीच्या घडते.....
शब्दपंख लावून कशी ती वेडी....
कल्पनेच्या नभात ना उडते...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
वेडू देशील का ग हक्क.....
अश्रृ तुझे पुसण्याचे.....
तू हसता दिसते ग परी....
देना हक्क हसू ते जपण्याचे....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
हवी गं म्हणे परी.....
तूझ्यासारखीच एक गोड.....
पण नको बर तीला....
तूझी बडबड करण्याची खोड....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
असतेना लेक जरी.....
आई बाबांची परी.....
पण आई बाबाच असतात....
तीची जादूची कांडी खरी....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
अपूर्ण ते स्वप्न......
पण रोजच तो बघत असतो.....
गोड परीसोबत त्याच्या.....
स्वप्नात तो खेळत असतो....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
खुपदा ती वेडी.....
त्याची स्वप्नपरीच ठरते....
कधी अव्यक्त तर कधी....
दुनियादारीत ती हरते....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
सखी तुही जणु ......
आहे एक परी बर.....
सगळ्यांच्या अस्तित्वाला....
दिली गं ओळख नवी तुच खर....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
लेखणीही आहे गं....
जणू एक परी....
अव्यक्त रहात नाही....
वेदना ती अंतरी ....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
ताई माझी सखी....
परी माझी खास....
देते मला ती....
नेहमी आईचा गं आभास....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही.....✍️✍️