01 July 2022

चारोळी संग्रह

चुकलेल्या निर्णयांचे.....
परीणाम ते रे जाणतात......
विचार करून निर्णय घ्यावे.....
उगाच का वडीलधारे म्हणतात.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

किती अशा प्रश्नांना......
सामोर ना जाव लागत......
चुक की बरोबर ठरवण्यासाठी.....
निर्णय आधी घ्यावा लागतो.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

घेतलेला निर्णय कधीच.....
चुकीचा नसतो रे बर.......
फक्त तो बरोबर आहे.....
हे सीध्द करण्याची जीद्द हवी रे खर....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

शंकेची पालच ती......
घात करून गेली......
निर्णय चुकीचा ठरणार म्हणत......
ती निर्णय घ्यायचच राहुन गेली.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

निर्णय चुक की बरोबर......
नको हा विचार आधी......
अनुभव भेटेल की आत्मविश्वास.....
हे निर्णय घेतल्यावर कळतरे कधी......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

अहंकाराशी मैत्री.....
चुकीचा निर्णय ठरते बर.....
हा निर्णय चुकीचा......
संगतीत याच्या हे कळत नाही खर.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

सुंदर विचारांऐवजी.....
सुंदर चेहरा आवडून गेला......
हा चुकीचा निर्णय.....
आयुष्यभर मग रडवून  गेला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

रागात घेतलेला निर्णय....
चुकतो रे बर.....
पश्चाताप होऊन....
सलतो मग खर ....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

निर्णय घेतांना.....
चुक नको रे व्हायला....
आजन्म राहील....
सल ती  सलायला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

निर्णय निर्णय असतात बर....
चुक की बरोबर....
हे वेळ आणी अनुभव....
ठरवते ना खर....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                             शाही....✍️✍️


चुकीचे निर्णय.....चारोळी

निर्णय चुकला म्हणून......
माणूस नसतो वाईट बर.....
परीस्थीती कधी कधी.....
टाकते अशाही प्रसंगात खर.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

क्षणभंगुर भावनांच्या ओघात.....
निर्णय नको घेऊ बर......
आयुष्यभर टोचत रहातील......
कठोर वाटत पण आहे खर......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

सोडून जाण्याचा निर्णय.....
शब्दातच रे होता खर......
मनातुन आठवणी......
कधी जातात का सांग बर.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

वेडू तु सोबत असता.......
नसते ग कसली भीती......
निर्णय चुक की बरोबर.....
प्रश्न असू दे मग किती.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

चुकीच्या निर्णयाविरोधात....
आवाज जो उठवतो.....
अस्तीत्व आपल तो.....
असही रे वठवतो....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

ठाम रहायला शिकाव.....
निर्णय चुकला तरी.....
स्वतःवर असला विश्वास तर....
सुरुवात कुठूनही करता येते खरी....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

चुकतात नियती.......
तूझे ही निर्णय बर.......
नशिबात नसलेल्यावर......
का ग प्रेम जडत खर......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

चुकीचे असतात.....
निर्णय ते सारे..........
स्वार्थ नी लोभाचे.....
विणलेले ना ज्यात दोरे.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तुझा कुठलाच निर्णय.....
चुकीचा नसतो बर.....
मला वेळेवर पटत नाही....
हे माझच रे चुकत खर......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                              शाही....✍️✍️


30 June 2022

चारोळी संग्रह....

रडल्या शिवाय आई बाळाला....
पाजत ही नाही....
आपल्या हक्कांसाठी लढाव लागत...
का ग तुला हे समजत नाही.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

नको रे हक्क....
मालमत्तेत कुणाच्या....
समजून घ्याव सगळ्यांनी....
भावना ह्या रे वेड्या मनाच्या....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तिची हक्कांची परीभाषा.....
कुठे कळते  रे कुणाला.....
नको वर्चस्व तीला कुणावर......
जगू दे कधीतरी हव तस रे मनाला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

हक्क हवाय रे फक्त....
वेड्या तूझ्या मनावर....
हव तेव्हा दे तू....
वाट बघेन सरणावर.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

का बर तिला हक्कांसाठी......
आपल्यांशी लढाव लागतो......
चुक कुणाची शोकांतीका हीच......
समाजापुढे प्रश्न हा मांडावा लागतो....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तिचा जगण्याचा हक्क......
सहज नाकारला गेला.....
गर्भातच अंत तीचा......
का रे सहज स्विकारला गेला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मतदानाच्या तिच्या हक्कांचीही.....
होते की पायमल्ली.....
सरपंच ती असली तरीही.....
दुसर्याच्याच हाती निर्णयाची रे किल्ली....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

लग्न तीचं झाल की.....
हक्कदारही तीचे बदलतात.....
आपल्याच माहेरच्यांना भेटायला.....
परवानगी सासरचे देतात.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

हक्क तीला समजतात......
पग गाजवायला ती टाळते....
अव्यक्त राहून अशी ती.....
स्वतःलाच रे जाळते....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तीला रूसण्याचा हक्कही.....
नसतो रे कधी कधी.....
मनवायला नसेल कुणी.....
हे जाणतेना रे ती आधी....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तु तीचा असल्याचा हक्क......
कसा जतवशिल सांग ना......
मंगळसुत्र आणी कुंकू तुझ म्हणत.....
जपते ती तूझी असल्याचा मान ना.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

शिक्षणाचा तीचा हक्क.....
आधी तीला कळावा......
इतर हक्कांचा मग.....
प्रश्नच रे सरावा.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तिचे हक्क सांग ना......
खरच का कधी कळतील.....
दोन्ही घरी का परकी ती.....
खरच प्रश्न हे सरतील......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तिनेच तिच्या हक्कांची.....
कधी जाणीव नाही केली......
कुंपण शेत खातय म्हणत......
लढायची ही राहुन गेली......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कर्तव्य सगळी......
सांगीतली जातात......
आपल्यांकडून हक्क तीचे....
असे डावलले जातात.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                            शाही....✍️✍️


तीचे हक्क.....चारोळी

माझ्या वेळेवर आणी माझ्यावर....
हक्क वेडी तुझाच खर....
अस सांगून बघ ना....
किती तू रडवून गेला बर.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

रूसण भांडण भरभरून बोलण......
हक्क गाजवण ही कमी केल......
कळल का वेड्या तुला तू.......
तीला रे गमावून दिल......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

सोपी  रे ती समजून घ्यायला.....
खुप काही तीची अपेक्षा नसते......
लहान लहान गोष्टीत आनंद तीचा....
हक्क नी अधीकाराची  इतकीशी तीची जाणीव असते.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कुंकू तीच हरता......
हक्क सारेच सरले....
स्त्री की बाहुली ती....
दंव्द मनी उरले....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

स्पंदनांचा हक्क.....
जीतका असतो ना ह्दयावर....
तीतकाच हक्क वेडू.....
तुझा बर गं माझ्यावर.......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तिचा हक्क गरजेचा ना रे .....
गुणांच्या आणि वैचारीक प्रगतीसाठी......
समाजाची प्रगती कशी रे.....
तीच राहीली जर पाठी......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कर्तव्य पार करूनही.....
नसते तीच्या हक्काला कींमत....
कुठे ती चुकते कळेना....
जीवन आहे तीच जणू  रे गंम्मत....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

नशिबाला देईल बर.....
हक्क न भेटल्याचे दोष....
तूझ्यावर,राजा....
नसेल रे कधी रोष.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

हक्क कसा दाखवू....
सांग बर आधी....
तु माझाच असल्याच....
सांगीतलेच नाही तु कधी...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आपल्या माणसांशी.....
हक्कांसाठी कसं ना लढू.......
जिंकली तरी हारच ती......
सत्य हे आहे रे कटू....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                           शाही....✍️✍️


29 June 2022

तडजोड ....चारोळी संग्रह

आयुष्याची घडी प्रत्येक वेळी....
मनासारखी रे बसत नसते....
तडजोड ही कूणालाही.....
कधी चुकत बर नसते.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आयुष्य म्हणजे तडजोड......
नाही वाटत खर.....
तु सोबत असता......
कस म्हणू बर.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आयुष्य म्हणजे तडजोड.....
नियतीशी जगण्यासाठी......
प्रत्येकाच्या पदरी बांधलेल्या.....
सुखदुःखाच्या ना गाठी.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आयुष्य म्हणजे तडजोडी.....
शिवाय पर्याय नाही बर.....
यशाची प्रत्येक पायरी.....
देतेना हीच ग्वाही खर....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आयुष्य म्हणजे तडजोड.....
कुणी स्वार्थासाठी केलेली.....
कुणी परमार्थ साधण्यासाठी.....
ती निभावून नेलेली.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तडजोड म्हणजे स्वतः बरोबर.....
इतरांनाही समजून घेणे खर....
अवघे धरू सुपंथाच जणू....
आधुनिक रूप बर.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तडजोड आयुष्याच.....
दुसर नाव बर.....
अन्यायाशि तडजोड करण....
मोठ पाप खर....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तुझ्यासाठी वेड्या......
तडजोड   रे करत असते......
किती मन दुखावणार्यांशी.....
  जुळवून रे ती घेत असते.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मोडतोड करण्यात......
कुठे लागत ज्ञान बर......
तडजोड करायला लागत....
खुप शहाणपण खर.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तडजोड उरते.........
नेहमीअपरीहार्य बर.......
आवडलेल की निवडलेल.......
नाही जमत यात सांगड घालण खर......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तडजोडीची तीला....
इतकी सवय असते....
स्वप्न ही ती.....
विचार करून बघते....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आयुष्य म्हणजे....
तडजोड ना....
त्यातच असते....
जगण्याची खरी ओढ ना...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                           शाही....✍️✍️


आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...