03 July 2022

अंधाराच जाळ....चारोळी

अंधारापाशी आहे....
लपवावपवीचा खेळ....
आतल्या गाठीच्या माणसांशी....
मन घालत उगाच ते मेळ....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

उजाडण्या आधी....
अंधार गडद होतं....

उजाडायचं थांबत नाही ....
हे उशीरा उमजून येतझ....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

ज्ञानाचा दिवा.....
तेवावा घरोघरी.....
अज्ञानाचा अंधार.....
फिरेल मग माघारी....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

भरून आले मेघ.....
जाळ निराशेच सरलं.....
थेंब थेंब पाऊस होऊन.....
मन आनंदाने भरलं....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

वेडू तुझी सोबत .....
  जणू कीरण गं आशेचा....
फीटतील अंधाराचेही जाळे.....
विश्वास होतो वेड्या मनाचा...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

अंधाराच जाळ.....
पावलो पावली असेल....
प्रकाशालाही बघ तू.....
शाप अंधाराचा दिसेल....

खर्यालाही बघ तू....
खोट्याचा आला  शाप....
भ्रष्टाचार किती वाढला....
पण सत्याचच वरना माप...

धर्माला ही बघ तू....
अधर्माचा शाप आहे ....
जाती पाती च हे खुळ...
मानवतेचा रे  अंत आहे...

नको विसरू सहासाला....
दूःसाहासाचा शाप बर...
पुसटशीही सीमा...
नको ओलांडू खर....

दुःख,निराशा,लोभ....
अवीचार अंधाराच जाळ बर...
द्रव्याच्या हव्यासापाई...
बनू नको तु पशू खर...

अंधार्याच्या या जाळ्यात....
नकोच अडकू कधी....
परतीचा मार्ग नाही यातून...
समजून घे आधी....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                            शाही....✍️✍️

02 July 2022

चारोळी संग्रह....

सुख आणी दूःख.....
येतात ग पाहुणे होऊन.....
अनुभवाची भेट देऊन.....
जातात क्षणभर राहुन.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

क्षणभराची ती नजरभेट.....
बाकी सारा मनाचा खेळ......
क्षणभराच्या या सुखात आजही.....
सरते  बर रे कातरवेळ......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

क्षणभराच्या सुखासाठी.....
कळी तो  ग कुस्करून गेला.....
क्षणभराच्या मोहात बघ ना....
माणुसकीच तो हरवून गेला...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

क्षण क्षण सुखाचा होतो.....
तु सोबत रे असतांना.....
सुख म्हणजे तूच दिसतो.....
वेड्या मनाला हसतांना....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

क्षणभराच सुख......
येतं पाहुणा होऊन....
अहंकाराची परीक्षा....
जातं बरं घेऊन.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

क्षणभराच सुखही....
विकत नाही हं घेता येत.....
दुनियादारीच हे सत्य.....
का नाही रे ध्यानात येत.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

क्षणभराच सुखच होत.....
तुझ्याशी   ते रे भेटण....
आयुष्य आता त्या.....
गोड क्षणांवर रेटण.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

क्षणभराच्या सुखाच....
मोह वेड्या मनाला.....
सुख भाग्यात असाव....
कस समजाऊ त्याला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

क्षणभराच सुख.....
म्हणून आठवेल रे तुला.....
कधीतरी जमल तर बघ.....
तुही आठव बर मला.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

क्षणभराच सुख.....
मनभर करता याव....
आपल्या दृष्टीकोनावर.....
हे सगळ अवलंबून रहाव....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                         शाही....✍️✍️


क्षणभराच सुख....चारोळी

क्षणभराच्या सुखाची....
वाटते गं भिती.....
उगाच त्याच्या ओढीत....
दूःख गाठले किती....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

क्षणभराच्या सुखामागे....
इतका गं तो धावला....
स्वःलाही नाही मग.....
कधी तो गावला.....

गावला-भेटला

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁


क्षणभराच्या सुखासाठी.....
बळी प्राण्यांची देतो.....
कसा रे माणसा तू......
इतका रे स्वार्थी होतो.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

क्षणभराच्या सुखाचा.....
मोह नाही  रे बरा.....
पाठशिवणीचा खेळ हा....
ऊन सावल्यांचा सारा....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

क्षणभर भेटत सुख......
वेडू तुला गं आठवून........
देतजा गं अशा कधी.......
आठवणी तूझ्या बर पाठवून......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

क्षणभराच्या सुखामागे.....
किती रे पळशील......
आई बाबांना वेळ दे.....
खरे सुख कळतील.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

क्षणीक सुख ते.....
जणू दव पानावर.....
अलगद निसटून जात.....
मन येत मग भानावर....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

क्षणिक सुखासाठी नको मांडू....
प्रेमाचा रे खेळ बर.....
तूझ्या ह्या खेळापायी....
उध्वस्त होतात आयुष्य खर.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

एश्वर्य आणी सुख.....
क्षणीक  इथले.....
आनंदाचे रंग म्हणता.....
उगाच जीव रे त्यात गुंतले...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

क्षणभराच सुख जणू.......
फुलपाखरु खोडकर......
निरपेक्ष असता भावना....
अलगद येऊन बसत मनपटलावर.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                           शाही....✍️✍️


01 July 2022

चारोळी संग्रह

चुकलेल्या निर्णयांचे.....
परीणाम ते रे जाणतात......
विचार करून निर्णय घ्यावे.....
उगाच का वडीलधारे म्हणतात.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

किती अशा प्रश्नांना......
सामोर ना जाव लागत......
चुक की बरोबर ठरवण्यासाठी.....
निर्णय आधी घ्यावा लागतो.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

घेतलेला निर्णय कधीच.....
चुकीचा नसतो रे बर.......
फक्त तो बरोबर आहे.....
हे सीध्द करण्याची जीद्द हवी रे खर....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

शंकेची पालच ती......
घात करून गेली......
निर्णय चुकीचा ठरणार म्हणत......
ती निर्णय घ्यायचच राहुन गेली.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

निर्णय चुक की बरोबर......
नको हा विचार आधी......
अनुभव भेटेल की आत्मविश्वास.....
हे निर्णय घेतल्यावर कळतरे कधी......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

अहंकाराशी मैत्री.....
चुकीचा निर्णय ठरते बर.....
हा निर्णय चुकीचा......
संगतीत याच्या हे कळत नाही खर.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

सुंदर विचारांऐवजी.....
सुंदर चेहरा आवडून गेला......
हा चुकीचा निर्णय.....
आयुष्यभर मग रडवून  गेला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

रागात घेतलेला निर्णय....
चुकतो रे बर.....
पश्चाताप होऊन....
सलतो मग खर ....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

निर्णय घेतांना.....
चुक नको रे व्हायला....
आजन्म राहील....
सल ती  सलायला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

निर्णय निर्णय असतात बर....
चुक की बरोबर....
हे वेळ आणी अनुभव....
ठरवते ना खर....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                             शाही....✍️✍️


चुकीचे निर्णय.....चारोळी

निर्णय चुकला म्हणून......
माणूस नसतो वाईट बर.....
परीस्थीती कधी कधी.....
टाकते अशाही प्रसंगात खर.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

क्षणभंगुर भावनांच्या ओघात.....
निर्णय नको घेऊ बर......
आयुष्यभर टोचत रहातील......
कठोर वाटत पण आहे खर......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

सोडून जाण्याचा निर्णय.....
शब्दातच रे होता खर......
मनातुन आठवणी......
कधी जातात का सांग बर.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

वेडू तु सोबत असता.......
नसते ग कसली भीती......
निर्णय चुक की बरोबर.....
प्रश्न असू दे मग किती.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

चुकीच्या निर्णयाविरोधात....
आवाज जो उठवतो.....
अस्तीत्व आपल तो.....
असही रे वठवतो....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

ठाम रहायला शिकाव.....
निर्णय चुकला तरी.....
स्वतःवर असला विश्वास तर....
सुरुवात कुठूनही करता येते खरी....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

चुकतात नियती.......
तूझे ही निर्णय बर.......
नशिबात नसलेल्यावर......
का ग प्रेम जडत खर......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

चुकीचे असतात.....
निर्णय ते सारे..........
स्वार्थ नी लोभाचे.....
विणलेले ना ज्यात दोरे.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तुझा कुठलाच निर्णय.....
चुकीचा नसतो बर.....
मला वेळेवर पटत नाही....
हे माझच रे चुकत खर......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                              शाही....✍️✍️


आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...