06 July 2022

चारोळी संग्रह.....

रागावून मनही रचतं.....
अबोला घेण्याच रे षडयंत्र तुझ्याशी....
तु समोर येताच बघना.....
फीतूर होतो तो  कसा ना माझ्याशी.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मिठी घेता तो वेडा.....
होता खुप गं रुसला.....
हसण्यात दूःख लपवण्याचा....
षडयंत्र तीचा होता गं फसला.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

शकुनी  नी दुर्योधनाने.....
पांडवांना षडयंत्र करून लूटले बर....
पण विजय सत्याचा होतो....
शिकवण अंती भेटली हीच खर....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

ते रचत राहीले.....
नेहमी षडयंत्र तीच्यापाठी.....
जाणूनही गोड हसली ती.....
माणुसकी नाही सोडली तीने त्यांच्यासाठी....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

षडयंत्रात अडकतात....
माणस ती भोळी.....
घरघरात चालली की....
राजकारणाची खेळी....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

स्वतःची लायकी नाही.....
आल त्यांच्या लक्षात....
षडयंत्र रचून त्यांनी.....
विजय केला आपल्या पक्षात.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

षडयंत्र आहे की.....
नात्यांमध्ये ही रचलेली
आई बाबांच करतात निस्वार्थ प्रेम....
सत्य हे त्रिकालाबाधीत ठरलेली.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

षडयंत्र करून.....
जींकशील तू बर.....
पण आपल्याच नजरेत पडून....
लाचार होशिल खर....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

नियतीने ही बघना.....
षडयंत्र जणु गं रचला.....
नशीबात नसलेला तो.....
मनात येऊन बसला......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

षडयंत्र रचून......
नाही ह कुणाला फसवायचं....
पेरलेल उगवत.....
लक्षात हे असू द्यायचं.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

रचूदे षडयंत्र.....
कितीही कूणाला....
तू असशीन माझ्या मनात....

नेहमीच रेअस्तित्वाला.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

षडयंत्र नियतीही....
रचतेय रे वाटत.....
तु हवा असतांना....
अंतर का रे वाढतं....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                           शाही....✍️✍️


षडयंत्र.....चारोळी

नियतीचे ही षडयंत्र.....
कसे ना  रे जीवघेणे बरं.....
मोठे केल अनुभवांनी पण.....
, निरागसपण हीरावून घेतले खरं.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

षडयंत्र करणारी.....
आपलीच बर असतात.....
अभिमन्युच्या बलीदानात......
पुरावे आजही रे  दिसतात.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

नभातील शशीही वाटतं......
रचतोय षडयंत्र बर गं काही......

ढगाआड लपून लपून.......
खीडकीतून तो गं पहात राही....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

सहज कुठे रे घडले.....
स्वामित्व ते पुरूषाला देणे.....
युगा यूगापासून चाललेल्या षडयंत्रात....
आहे स्त्री चे ते मजबूर होणे....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

सोपा षडयंत्र आहे......
पंख तीचे छाटण्याचा बरं.....
प्रगती तीची वाढली की......
उठवतात चारीत्र्यावर तीच्या बोट हेच खरं.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कोरोना हा चिनचा षडयंत्र.....
की  होती नैसर्गिक विपदा..... 
आठवता आजही ते क्षण....
सल होते मनात रे खुपदा.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

गरीबी हा दैवी शाप....
नाही रे वाटत ना!.....
मानव रचीत षडयंत्र....
हे तुलाही पटत ना!.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

स्त्री- पुरूष भेदभाव....
षडयंत्र हा दुनियादारीचा....
कीती नुकसान यात रे.....
का कळेना मानव जातीचा.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

स्त्री- पुरूष भेदभाव....
षडयंत्र हा दुनियादारीचा....
कीती नुकसान यात रे.....
का कळेना मानव जातीचा.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                             शाही....✍️✍️


05 July 2022

चारोळी संग्रह.....

शब्दात जसा....
अर्थ असतो ना दडलेला.....
अंतरही आपल्यातला....
कळूनही  तसा न कळलेला.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

अश्रु आहेना जसा....
डोळ्यात रे लपून....
अंतर आपल्यातलं...
ठेऊ अस हं जपून ....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तु आणि मी जणू.....
नदीचे दोन  किनारे ना......
आपल्यातले अंतर आता....
कधीच न संपणारे ना.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तूझ्या माझ्यातील अंतराची.....
काय सांगू बर खेळी.....
जणू मृग आहे रे.....
कस्तुरीसाठीच वेडी....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मनाच अंतर.....
आपल्यात नसाव बर.....
मी सोबत नसताही .....
तु माझाच असावं खर.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

चातकासारख एकनिष्ट.....
खर रे होता यावं.....
तुझ्या माझ्यातील अंतराला.....
गमवण्याच्या भितीच नाव का द्याव.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

दुराव्यातही नाही संपत....
प्रेम तेच खरं.....
तुझ्या -माझ्यात असूदे...
कितीही अंतर बरं....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

पाण्याशिवाय मासा.....
जगेल का सांग बर......
तुझ्या माझ्यातील अंतराच.....
हेच असेल खर.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मेहंदीच्या पानात.....
लाल रंग लपलेला......
अंतर तुझ्या माझ्यात....
इतकाच मी जपलेला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

अंतर असावं....
तुझ्या माझ्यात रे थोड.....
भेटण्याची राहील ना....
मनात रे ओढ....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

अंतर तूझ्या माझ्यात....
नाही रे खास....
आपण दोघ माणूस....
तू विसरतो हाच फास....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

अंतर तुझ्या माझ्यात....
कस रे सांगावं.....
फुलात सुगंध इतका....
तु माझ्यात रेअसावं....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                          शाही....✍️✍️


अंतर तूझ्यात- माझ्यात....चारोळी

ऐक ना!! म्हणताच.....
तूझं बोल ना! म्हणणं....
तूझ्या माझ्यातल्या अंतराच....
कीती गोड ना रे विरघळणं....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

अंतराचीही बघना.....
कशी ती गंम्मत असते......
किती  गुंतलोय एकमेकात......
सांगण्याची त्याचीच तर हिम्मत असते....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

अंतरही मला.....
आपल्यातलं आवडून जातं.....
एकमेकांना जपण आपल.....
त्यानंतर कीती ना वाढून जातं.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

सप्तपदीत सरले होते ना.....
तुझ्या माझ्यातले रे अंतर......
का उठतात सांग मग गैरसमजांची....
वादळे ही निरंतर.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

सांगूनही कळेना.....
का रे तूला शब्द माझे....
का वाढले सांगशिल.....
अंतर तूझे माझे.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

पुन्हा  पुन्हा भेटावस वाटत तूला.....
पण बंधन तुझी का सुटतात.....
जपते तु ही मनात मला....
पण अंतर कुठे मिटतात....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

वेळ नाही म्हणत.....
संवाद आपले ते सरावे......
तूझ्या माझ्यातील अंतराला....
खरच नियतीला का  रे दोषी धरावे.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

त्या दोन डोळ्यांसारख....
अंतर तुझ्या माझ्यात.....
सोबत असूनही आता.....
भेट नाही रे जीवनात....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

शरीर नि आत्माच....
जणू आपण दोघं.....
अंतर येताच यात.....
अस्तित्वही सरेल बघ.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                            शाही....✍️✍️


04 July 2022

चारोळी संग्रह.....

शत्रूच बरे गं.....
समोरून वार  करतात....
मित्रच शत्रू झाले तर....
घाव ते विश्वासघात ठरतात....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मैत्री हे अनमोल नातं.....
पण,अपवाद असतात  ना सगळ्याला....
खुप गहन अर्थ गं सखी....
मित्रच शत्रू म्हणण्याला...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

श्वासांचा नाही रे भरवसा.....
दुरावा आला तर समजून  घेशिल ना....
मित्रच रहा शत्रू नको होऊ बर....
गैरसमज झाले तर उमजून तू घेशिल ना....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

श्वास नि स्पंदनांच्या नात्यात.....
नसतात कधीच रे बेड्या....
मित्रच तु शत्रू नाही होणार आहेच.....
इतका हक्क नि विश्वास फक्त तुझ्यावर वेड्या....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कस मांडू गणित.....
मीत्र की शत्रू बर.....
कुणी अस भेटलच नाही....
ज्याने छळल नाही खरं....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

ठरवून कुणीच......
मित्र किंवा शत्रू होत नसतो......
शब्दातून कींवा व्यवहारातून......
माणुस हा रे दुरावत असतो......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मित्रच शत्रू होऊन....
काळजात वार करून गेला....
जग होत जे नात कधी....
औपचारीकता आता ठरून गेला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

खरा मित्र कधीच....
शत्रू नाही होत बर....
स्वार्थातून केलेल्या मैत्रीचा....
अंत शत्रूत्वात होतो खर...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

नाही समजत दुनियादारी......
घरचे कितीदा समजवून गेले.....
मित्रच शत्रू झाले नि.....
पोचपावती ही देऊन गेले......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तुमचा जवळचा मित्रच....
होतो म्हणे शत्रू मोठा बर....
त्याला कळलेली असतात....
आपली  कमजोरी खर....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

शत्रूही आता....
मित्र म्हणून येतात....
बेगडी रूप असे....
घात करून जातात....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मित्र म्हणून भेटला......
पण शत्रूगत गं वागून गेला.....
खरच भरवसा नाही करायचा कुणावर....
खुणगाठ जन्मासाठी बांधून गेला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                           शाही....✍️✍️


आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...