अपहरण करणारे....
जवळचे असतात....
व्देश कींवा लोभातून...
खेळ हा मांडतात....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
येईन स्वप्नातला राजकुमार.....
स्वप्न आई बाबा तुम्हीच ना हो जागवली....
कन्यादानाचा निर्णय घेतांना.....
एकदाही मर्जि जाणण्याची गरज नाही जाणवली.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
तीच्या वेदनेची.....
नियतीने न केली जाण.....
आई बाबां शिवाय.....
झाल तीच कन्यादान......
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
कधी द्यूतात हरली......
कधी दानात गणली......
स्त्रि ही खरच का......
वस्तूच ठरली....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
कन्यादानाच्या क्षणी.....
वर ही रडलेला ......
ऋणानुबंध रेशिमगाठीचा....
क्षणात असा जुळलेला.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
दान गोत्राच असत.....
कन्येच नसत बर.....
अज्ञानातून कन्यादान झाल.....
आताच सांगितल कुणी हे खर....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
कन्या तुला सोपवली.....
नाही रे केल दान......
माझ्या घराची लक्ष्मी.....
जप ती आहे माझा मान.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
निर्लज्यपणाचा स्तर....
किती तू गाठावा.....
कन्यादाना करणार्या बापालाच....
हुंडा तू मागावा....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
आवडती वस्तू देता....
मनाला कीती हुरहुर भारी.....
काळजाचा तुकडा कन्यादानात दीला....
ऋण हे त्याचे समजेल का कधी तरी....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही....✍️✍️