16 July 2022

का हिरावला हक्क तीचा???

आज हा विषय आला आणी वाटल गुफांव तीला शब्दांमध्ये.तसे शब्द माझे थीटेच तीच्या संघर्षापुढे...ही सत्य घटना माझ्या बालमैत्रीणीची....खुप गर्व आणी अभिमान उषा सखी तूझा गं....
              वयाच्या 14 व्या वर्षि घरची  मोठी नात म्हणून उषाला बोहल्यावर चढवल गेल.बाबांच वय झालेलं त्यांची इच्छा पुर्ण व्हावी म्हणून हा मोठ्यांचा हट्ट... .आजही आठवते शाळेतल्या गणवेशात भांग भरून मंगळसूत्र घालून येणारी ती निरागस उषा.        
             तारूण्याच्या उंबरठ्यावरच संसाराशी गट्टी जमवत दोन्ही घरांचा मान जपत ती संसारात रूळली.देवयानी आणी आकाश नक्षत्रावाणी दोन फुल नियतीने तीला मातृत्वरूपात दान दिली.
            पण नियतीच ती!! का रुसली,काय गून्हा झाला ही सल मनात देऊन उषाला वैधव्य देऊन नीघून गेली.पुन्हा कमी वयात आभाळ कोसळल तीच्यावर .खुप कमी वयातच नवीन संघर्ष आल पदरी.
.           समाज,नियती स्वतःशी लढा देत दोन्ही लेकरांना मोठी केली. संस्कार नी वीद्येच दान देऊन आपली कर्तव्य पुर्ण केलीत.लेकरांनीही आपल्या आईच्या कष्टांचा मान ठेवला.
          आज उषा ची लेक देवयानी ही बी.ई.इलेक्ट्राँनिक्स कम्यूनिकेशन यात पदवी घेऊन  परदेशी जाँबसाठी जाण्याची तयारी करतीय. आणी आकाश बीसी. एस. करून आपला स्वतःची वेगळी वाट निर्माण करतोय.
        हे सगळ लीहीण्या ईतक सहज नक्कीच नव्हत.खुप खस्ता,प्रश्न,वादळ आली ,पण उषा न डगमगता लढली.
         हे सगळ करणारी एक आई आपल्या मुलीच कन्यादान नाही करू शकली. का??तर वैधव्य असल्यामुळे.आजच देवयानीच्या लग्नाचा वाढदीवस आणी हा वीषय योगायोग.
         आणी मनातील ही सल कर्तव्य पूर्ण करूनही हक्क कन्यादानाचा का नाही तीला,उषाला!!!.....
              गर्व वाटतो उषा तूझा इतक्या संघर्षातून तू दोन्ही पाखरांना आभाळ दिल उडण्यासाठी....आणी माफ कर तूझा तो कन्यादानाचा हक्क मीळवून देण्यात आम्ही सगळ्या सखीच असमर्थ पडलो....🙏🙏

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                        शाही....✍️✍️


कन्यादान....चारोळी

अपहरण करणारे....
जवळचे असतात....
व्देश कींवा लोभातून...
खेळ हा मांडतात....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

येईन स्वप्नातला राजकुमार.....
स्वप्न आई बाबा तुम्हीच ना हो जागवली....
कन्यादानाचा निर्णय घेतांना.....
एकदाही मर्जि जाणण्याची गरज  नाही जाणवली.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तीच्या वेदनेची.....
नियतीने न केली जाण.....
आई बाबां शिवाय.....
झाल तीच कन्यादान......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कधी द्यूतात हरली......
कधी दानात गणली......
स्त्रि ही खरच का......
वस्तूच ठरली....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कन्यादानाच्या क्षणी.....
वर ही रडलेला ......
ऋणानुबंध रेशिमगाठीचा....
क्षणात असा जुळलेला.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

दान गोत्राच असत.....
कन्येच नसत बर.....
अज्ञानातून कन्यादान झाल.....
आताच सांगितल कुणी हे खर....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कन्या तुला सोपवली.....
नाही   रे केल दान......
माझ्या घराची लक्ष्मी.....
जप ती आहे माझा मान.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

निर्लज्यपणाचा स्तर....
किती  तू गाठावा.....
कन्यादाना करणार्या बापालाच....
हुंडा तू मागावा....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आवडती वस्तू देता....
मनाला कीती हुरहुर  भारी.....
काळजाचा तुकडा कन्यादानात दीला....
ऋण हे त्याचे समजेल का कधी तरी....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                           शाही....✍️✍️


10 July 2022

चारोळी संग्रह......चारोळी

वेड प्रेमाच पक्षांच......
आंधळ कुठे असतं......
पंख फुटता पाखरांना......
उडण्या आभाळ असतं......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तुझं माझं वेड प्रेमाच....
जणू गोड  रे कोडं....
तूझं माझं जमेना तरीही......
किती ती एकमेकांची  न ओढ.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तू जवळ असलास की.....
वाटत जवळ सगळ आहे....
कळल का वेड्या  तूला....
वेड प्रेमाच  हे वेगळच आहे....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

ह्दय फाडून दाखवू का.....
किती गं प्रेम तूझ्यावर......
तूझ हे असं वेड प्रेमच.....
जादू करत रे माझ्यावर.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

एकतर्फी प्रेमाच वेड.....
अँसीड हल्ले करवून गेलं.....
अशा विकृत वेडामूळे......
वेड प्रेमाच खूळ ही ठरुन गेलं....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

वेड प्रेमाचे.....
आई बाबां कडून शिकावे....
गुण दोषांसकट  सहज....
निस्वार्थ कस ते जपावे...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

त्याच प्रेमाच वेड.....
आहे तस गोड.....
माझ्याइतकीच त्यालाही....
आहे गं माझी ओढ.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

वेड प्रेमाचं.....
ठरवून कुठे लागतं....
अनोळखी तो क्षणभरात....
श्वास वाटायला लागतो....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

वेड प्रेमाचे.....
मर्यादेत लपलेले....
जणू चीखलात....
कमळ जपलेले.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

टाईम पास की.....
वेड प्रेमाचे.....
अंतर समज बर......
खेळ नको जीवनाचं खर....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

वेड प्रेमाच म्हणत.....
समर्पण तो गं मागतो.....
वेळीच सावध हो बर....
खेळ हा वासनेचा वाटतो....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

वाटत भेटाव कुणी....
वेड प्रेम करणार....
माझ्यासाठी काळजी घे स्वतःची....

हक्कान रे म्हणणार...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

वेड प्रेमाचे.....
असावे खर.....
पण त्याग शीकावे....
यातून बर....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तूझ्या प्रेमाचे वेड....
असे वेड्या लागले....
प्रत्येक चेहर्यात......
भास तुझे जागले.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

वेड प्रेमाचे.....
शब्दात कुठे मांडता येते....
ओठावर येऊन शब्द.....
ओठातच गोठून जाते....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तुझ्या दूःखात वेड्या......
डोळा माझाही गळतो.....
मी तूझीच असल्याचा.....
अर्थ तूला  कुठे कळतो.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                         शाही...✍️✍️


वेड प्रेमाचे....चारोळी

तूझ्या नावाने साद रे........


कितीदा मी देऊन गेले.......


वेड प्रेमाचे लागले म्हणत......


सगळेच मग हसून गेले........

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

नकाराच्या भीतीने.....
खुपदा असेही घडते ......
वेड हे प्रेमाचे.......
अव्यक्त राहून ही रे छळते......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁


वेड  हे प्रेमाचे.....
सरत नाही कंधी......
साथ  नसली तरी......
असतेच ते मनामंधी.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

वेड हे प्रेमाचे.....
असे रे लागले.....
नभातील शशीतही.....
भास तूझेच जागले.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तुला आठवता....
येते  रे गाली हसू......
वेड हे तुझ्या प्रेमाचे.....
लागल की सगळ्यांना दिसू.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तीच्या नकाराला.....
होकार नको समजू बरं....
वेड प्रेमाचे नाही रे.....
विकृती आहे ती खरं.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तु समोर आलास की....
होते  रे मी मुक.....
तु गेल्यावर वाटते.....
सांगायचे तर होते खुप.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तु समोर आलास की....
होते  रे मी मूक.....
तू गेल्यावर वाटते.....
सांगायचे तर होते खूप.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

सगळ्यात असूनही.....
अलीप्त ते वाटते.....
जेव्हा तुझी आठवण....
वेड्या मनी रे दाटते....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                             शाही....✍️✍️


09 July 2022

चारोळी संग्रह.....चारोळी

नजरेच्या भाषेची.....
नाहीच उमजली तूला खेळी....
मीटलेल्या डोळ्यातही.....
कस सांगू तूच रे प्रत्येक वेळी....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तूझ्या डोळ्यांची भाषा.....
खळखळणार्या झर्या साखरी.....
खुप आवडते मी तूला.....
सांगावा तूझा देतात सारखी....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कधी कधी वेडू.....
रहात जा गं चुप.....
डोळ्यांनाही डोळ्यांशी.....
बोलायच असत खुप....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

डोळ्यांची भाषा...
त्याला नाही ग कळली.....
त्याला आपल समजून....
होती ती गळली.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मनात होती एक....
गोड वेडी आशा.....
कधीतरी कळेल तूला.....
माझ्या डोळ्यांची रे भाषा....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तूझी डोळ्यांची भाषा.....
डोळ्यांना रे कळली.....
क्षणात ह्दयाची....
स्पंदन ती जुळली.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मनात काय तीच्या.....
डोळ्यातून कळत होत....
भरून आलेल्या आभाळागत....

मुकच ते गळत होत.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

डोळ्यांची भाषा.....
चरीत्र ही ग ठरवून जाते.....
चंचल की संस्कारी.....
लवणारी पापणी सांगून जाते....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

डोळे तुझे गं.....
किती ना बोलतात....
मनातील दुंःख सारी.....
पापणीआडची खोलतात....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

डोळ्यांची भाषा तूझी.....
कोड्यात रे टाकून गेली.....
खर का मी तुला....
सांग ना आवडून गेली....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

डोळ्यांची भाषा.....
तुझी आवडते रे मला.....
तू लपवलेल सार......
सांगून जाते ती मला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                          शाही....✍️✍️


आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...