18 July 2022

चारोळी संग्रह....

नको रे मला.....
दास्यत्वाचा आसरा बरं.....
असूदे मग तो....
सोनाच्या पिंजरा खरं....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

काळजीच्या  पिंजर्यात.....
कैद रे तीला केली.....
ती वेडी भरारी घेण.....
विसरून मग गेली....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आपल्याच दृष्टीकोनाच्या पिंजर्यात.....
अडकुन आपण पडतो.....
उगाच जगाला.....
वेठीस ते ना धरतो.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

पिंजर्यात कोंडून पाखरे.....
कधीच आपली होत नाही....
जा तुला मुक्त केले.....
समजून तू रे घेत नाही.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

एका पक्षाला.....
पिंजर्यातुन रे काढलेला.....
पण त्याच्या मनातून.....
पिंजरा काढायचाच राहीलेला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कोण नाही विचारत.....
पिंजर्यात बंद पक्षांना बर.....
आठवतात नेहमी तेच.....
जे उडून जातात खरं.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

भरारी घेण ही....
जणू रोग त्याला वाटुन गेला....
पिंजर्यात जन्मलेला पक्षी....
असा ही गं वागून गेला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

संकुचीत विचाराच्या पिंजर्यात....
अडकून सगळे पडले....
प्रगतीचे वारे फक्त....
कागदीच रे घडले.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

हतबल पक्षी.....
पिंजर्यात पाहीला.....
कसला मोह त्याला जाणो....
पिंजरा उघडा असूनही आत तो राहीला.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

पिंजर्यात संरक्षण.....

तीला म्हणे भेटते......

भृणहत्या काय मग??.....

दंव्द मनी पेटते....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                          शाही....✍️✍️

पिंजरा......चारोळी

श्वासाचा पिंजराही....
सोडेन साथ कधी......
व्हाव विसरण तुला.....
सोप रे त्या आधी....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

श्वासाचा पिंजराही....
सोडेन साथ कधी......
व्हाव विसरण तुला.....
सोप रे त्या आधी....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

पिंजरा नाही गं वेडू.....
आभाळ तुझ व्हावचय......
स्वच्छंदी आभाळात.....
विहरता तूला पहायचय....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

पिंजर्यातल्या पक्षीला.....
मुक्त ती करून देते.....
न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा....
आजही तीला आठवून जाते....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आहे म्हणे छंद त्याला.....
पिंजर्यात पक्षी पाळण्याचा.....
स्वप्न पहातो स्वतःसाठी.....
आभाळ ते गाठण्याचा....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

पिंजर्यातला पक्षी......
जणु स्त्रीच जग.....
आपलेच पंख कतरून.....
जमते तीलाच हसणे बघ.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आवडल असत रे......
प्रेमाच्या पिंजर्यात तुझ्याच रहायला.....
तूझ ते गृहीत धरण.....
लागल आता रे छळायला.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

अत्यावश्यक असूनही.....
कोरंनटाईन होण होत  ना वाईट कीती.....
आजही तो पिंजरा आठवता.....
मनात दाटते अनामिक भिती.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

रुढी परंपरांचा तो पिंजरा.....
कर्तव्य तीच म्हटल जातं....
किती सहज तीला.....
बंधनात ते डांबल जातं.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                            शाही....✍️✍️

                 


17 July 2022

चारोळी संग्रह....

तूझ माझ नातं.....
राहुदे असच खास....
दुनियादारीचा त्यात....
नको कधीच रे भास.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

स्वतः पेक्षा इतरांची.....
मन जी जपतात.....
दुनियादारीत त्यांच्या भावनांचे....
खेळ कुठे रे संपतात....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

एक ओढ आहे रे वेड्या.....
सोबतीने तूझ्या जगण्याची....
दुनियादारी कळते रे....
एकलीच वाट ती सरणाची....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

का रे आली......

मध्ये ही दुनियादारी....

प्रेम करतांना.....

विसरलो होतो जी सारी....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

दुनियादारी खरच....
वेळीच कळावी.....
भावनांशी खेळणार्यांनी....
नाहीतर सहज वाट लावावी....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

खर शिक्षण....
दुनियादारीच देते....
स्वप्न आणी वास्तवता.....
यातल अंतर शिकवते....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

बर झाल तु मला.....
दुनियादारी शिकवून गेला.....
वेळ खुप महत्वाची.........
मूद्दा हा ही पटवून दिला.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

प्रेमाचा त्रिकोण.....
दुनियादारी शिकवून गेला.....
भरवसा सहज नाही करायचा....
धडा मोठा देऊन गेला...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

जे लोक तोंडावर.....
बोलतात गोड.....
दुनियादारीत पाठीमागे....
निंदा करण्याची त्यांना खोड....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

दुनियादारीचे आपले.....
वेगळेच बर कायदे......
बदलतात ते नेहमी......
पाहुन  जो तो आपले फायदे....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                          शाही....✍️✍️


दुनियादारी.....चारोळी

खोट्या ला खर करण्याची.....
नाही रे आली कलाकारी.....
यालाच म्हणतात सारी....
खरी रे दुनियादारी.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

ज्याच्यावर विश्वास करावा.....
धोका त्यानेच द्यावा.....
दुनियादारीचा हा खेळ.....
वेळीच लक्षात यावा.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

दुनियादारी त्याला.....
छान जमते गं बरं....
टाळायचं असल की....
वेळ  नसतो गं म्हणतो खरं....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तुझ्या माझ्यात सख्या.....
का हवी दुनियादारी.....
तु माझा नी मी तुझी.....
हीच आपली दुनिया सारी....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

बळी तो कान पीळी.....
नियम हाच रे ठरलेला.....
नैतिकतेचा वाली....
दुनियादारीत कुठे उरलेला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

दुनियादारी जपण्याची......
धडपड तीची किती सारी.....
मन दुखल किती तरी.....
नेते ती हसण्यावरी.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

प्रेमाची दुनियादारी.....
नाही गं कळत मला.....
का प्रेम करतो??......
कस सांगू बर तुला.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तूझ्या केसांच्या गुंताइतकी.....
सोपी नाही गं बरं.....
उमजता उमजेना.....
दुनियादारी ही खरं.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मी तुझा म्हटल्यावर वेडू.....
विषय सगळे संपल्यात.....
नको आणू ना दुनियादारी....
कधी गं तू आपल्यात....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                          शाही....✍️✍️


16 July 2022

चारोळी संग्रह....

नाही रे बाहुली.....
दिली कन्यादानात जरी.....
युगा युगांची परंपरा.....
दुनियादारी म्हणत निभावली खरी......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

परक्याच धन म्हणता.....
कुठे परकी ती करता येते....
कन्यादान करता म्हणून.....
आई बाबांना गहीवरून येते.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

दोन घरांच्या आनंदाचा....
लेकीवर असतो भार.....
या दुनियादारीमुळे.....
कन्यादानाचा त्रास बापाला तो फार.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कन्यादाना आधी.....
करावा विद्यादान.....
हुंडा मागणार्याचीही.....
लाजून झुकावी मान.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

दोन कुळांचा.....
जपते ती मान......
म्हणून कन्यादान.....
आहे ना श्रेष्ठदान.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

प्रत्येक आई बाबा.....
मागतात वरदान......
भेटावे त्यांना पुण्य.....
करण्याचे कन्यादान.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

या पेक्षा कुठल मोठ.....
दान असेन बर.....
अंगाखांद्यावर खेळलेली लेक....
कन्यादानात बापाने दिली खर.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कन्यादान आहे ना.....
महान दान खर......
का मग मुलीच्या बापाची....
मान असते खाली बर....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

शरीरातून काढून जणू.....
प्राण  देण  ते  होतो.....
कीती मोठ काळीज त्या बापाच....
कन्यादान जो करतो....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मन तीचे आजही.......
गहीवरून बर जाते.....
विवाहात पार पडलेले.....
कन्यादान जेव्हाही आठवून जाते....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कन्यादान आहे ना....
सर्वात श्रेष्ठ दान....
का भृणहत्या करून....
करावी कर्मांची घाण....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कन्यादान करुन ही बापाने....
विचारल तीला जाते.....
तुझ्या बापाने लग्नात.....
काय गं अस दिल होते?....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कन्यादानाच पुण्य....
भाग्यवानांच्या नशिबी येत....
लक्ष्मी चा जन्म.....
लेक म्हणता प्रत्येका घरी कुठे होतो....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁                             शाही....✍️✍️


आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...