22 July 2022

लग्नाची बेडी.....चारोळी संग्रह

लग्नाची बेडी म्हणजे.....
नाही हं खेळ......
दोघांच्याही विचारांचा....
असावा लागतो ताळमेळ.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

एकट्याने कसा करावा.....
जीवनाचा प्रवास......
म्हणून लग्नाच्या बेडीचा....
असतो अट्टाहास....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

दोन घरांचा....

लग्नाची बेडी साकवं....

आलेख याचा....

कस बर रे आखावं.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

लग्नाच्या बेडीची.....

सोपी करावी परीभाषा.....

मान मन एकमेकांची जपता....

सुंदर होते संसाराची आशा.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

लग्नाच्या बेडीच....
छान ते असतं....
तुझ अस्तित्व....
भांगात माझ्या सजत....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तूझ माझ जमेना....
तूझ्या वाचून करमेना.....
लग्नाच्या बेडीच गुढ .....
कुणाही रे उमजेना.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

नेहमी एकमेकांपाठी.....

ठामपणे उभ रहाव.....

लग्नाच्या बेडीत.....

अपेक्षीत हेच रहावं.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

चांदण्यात जसा.....
नभातील शशी रमतो....
लग्नाच्या बेडीत तुझ्यासवे....
सख्या मला तस गमतं.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

लग्न बंधन तीच्यासाठी.....
लग्नाची बेडी झाली.....
हुंड्याची मागणी जेव्हा.....
बापापुढे आली.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

लग्नाच्या बेडीत.....
गुदमरत तीच मन......
गृहीत धरण्याचे........
वाढतात जेव्हा क्षण.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तीच अस्तित्व.....
त्याच्यात विरत.....
लग्नाच्या बेडीत.....
सहज ठरतं.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

लग्नाच्या बेडीत.....
वचन दिलेले....
एकमेकांची सुख दूःख....
वाटून घेतलेले....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

लग्नाची बेडी......
आयुष्यातील खास बंधन....
दोन मनांच.....
एकच स्पंदन......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

सुधरून तो जाईन म्हणून.....
लग्नाची बेडी नका बांधू बर....
तीच्या आयुष्याची बरबादी...
लक्षात ठेवा हे खर....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

लग्नाची बेडी....
अडकता पायात...
संसार जपता.....
सरते हयात.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                             शाही...✍️✍️



21 July 2022

चारोळी संग्रह...

मी आहेना सोबत
 सख्या म्हणणे तूझे इतके
आत्मविश्वास कीती वाढवतो
सांगू शकत नाही तीतके.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

स्पष्टतेशिवाय आत्मविश्वास....
आपत्ती बर ठरतो.....
ध्येय निश्चीत कर....
कुठे मग हरतो....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आयूष्याशी युध्द...
असेल तुला जिंकायचे...
स्वतःवरच्या विश्वासाला.....

कधी नाही हं गमवायचे......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आयूष्याशी युध्द...
असेल तुला जिंकायचे...
स्वतःवरच्या विश्वासाला.....
कधी नाही हं गमवायचे....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आकाशाची ओढ.....

दत्तक कुठे घेता येते.....

कबुतराला गरूडाचे पंख लावुन.....

भरारीचे वेड का देता येते.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

जमणार नाही मला.....
नको म्हणू बर.....
कर रे प्रयत्न.....
आत्मविश्वास वाढेल खर.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

पैज  स्वतःशी......
लावावी ती खर....
कधी आत्मविश्वास जींकेल....
कधी अहंकार हरेल बर.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

एक गुपीत....
सांगू का खर....
यशाची गुरुकिल्ली....
आत्मविश्वास बर.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

झाडाला धरुन ठेवतो....
मातीचा ओलावा....
तुझा आत्मविश्वासही....
तसाच तुलारे जपावा.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आत्मविश्वासात आहे....
अशी गं शक्ती बरं.....
पायथ्यावरून शिखरावर.....
पोहचवते जी खरं....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                            शाही....✍️✍️

            


आत्मविश्वास....चारोळी

तुला ती आवडते......
एवढेच तुझे म्हणणे होते.....
आत्मविश्वासाच्या परीभाषेत.....
आभाळ तीचू गाठणे होते.......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आत्मवीश्वासावर....
तीच्या जगेन बर ती....
तूमच्या डोळ्यात तीच्यासाठी...
विश्वास बघेन जेव्हा ती....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

हो!!मी करू शकते.....
एवढच म्हणायच खरं.....
आपल्या पंखांच बळ....

आपणच बनायच बरं.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁


तीच्या बाह्यरूपावर....
ताशेरे ते ओढले गेले....
असेही आत्मविश्वासाला....
तीच्या खुपदा मोडले गेले....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तु येशिल म्हणूनी....
उभी आजही त्या वळणावर....
आत्मविश्वास सांगतो....

 आताभेटशील तू सरणावर.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आत्मविश्वासाचे बी....
अंकूरता मनात......
वाटत चमत्कारच घडतो....
आपल्याना जीवनात....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

वयाशी आत्मविश्वासाचे....
नाही बर घेण देणे.....
अनुभवाच्या आधारावर...

होत त्याच येणे जाणे.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

'माझ्या नजरेतून बघ वेडू......
आहेस गं तु सुंदर किती"......
आवडते मला राजा तुझी.....
आत्मविश्वास वाढवण्याची ही निती....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁


स्त्रिला दिलेली.....
निसर्गानेच रे कला.....
बटना इतका सहज जोडते....

आत्मविश्वास तो गमवलेला.....


🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तुझ्या हसण्यातूनही कळतो.....
आत्मविश्वास गं तूझा.....
सकारात्मक दृष्टीकोनाचा....
जणू तो आरसा  तूझा....


🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                          शाही...✍️✍️.

19 July 2022

रेशमी धागे.....चारोळी

नात्यांचे रेशमी धागे.....
नको बर गूंता त्यात....
एकदा पडली गाठ....
तर रहाते ती खोलवर आत....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

प्रेमाच्या रेशमी धाग्यात....
गुंतल मन एकदा.....
अव्यक्त त्याच रहाण.....
सल होत खुपदा.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

विश्वासाचे रेशमी धागे.....
वेळीच जपावे बरं......
एकदा झाला गूंता तर.....
सुटत नाही कधी खरं.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

स्वप्नांचे रेशमी धागे.....
उगाच वीणत बसली ती वेडी.....
सारेच ते उसवणार.....
कुठे कळली तीला नियतीची खेळी....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

एकनिष्ठेने जपावे......
धागे रेशमी नात्यांचे......
भरवश्याचा नको खेळ.........
घाव भरत नाही मनाचे......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

गाठ नसलेला रेशमी धागा......
जातो बर सुईत.....
उसवलेल क्षणात वीणतो....
यात तुझ्यासारखाच तोही रे पटाईत.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

प्रयत्नांची गरज असते.....
गुंता नात्यातला  सोडवण्यासाठी .....
प्रेम आणि  प्रयत्नाने.....
जपुन घ्याव्या रे रेशीमगाठी ....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

रेशीमबंधात  बांधशील का सख्या.....
धागा हा आपल्या मैत्रीचा ......
सुखी संसारासाठी आहे बर.....
तसा तो खूप खात्रीचा...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

रेशमी धाग्यांचा गुंताच जणू......

नात्यांचा हा खेळ .......

सोडवावा वाटे सगळ्यांना.....

पण नाही भेटायला वेळ.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                           शाही....✍️✍️

             

        


18 July 2022

चारोळी संग्रह....

नको रे मला.....
दास्यत्वाचा आसरा बरं.....
असूदे मग तो....
सोनाच्या पिंजरा खरं....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

काळजीच्या  पिंजर्यात.....
कैद रे तीला केली.....
ती वेडी भरारी घेण.....
विसरून मग गेली....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आपल्याच दृष्टीकोनाच्या पिंजर्यात.....
अडकुन आपण पडतो.....
उगाच जगाला.....
वेठीस ते ना धरतो.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

पिंजर्यात कोंडून पाखरे.....
कधीच आपली होत नाही....
जा तुला मुक्त केले.....
समजून तू रे घेत नाही.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

एका पक्षाला.....
पिंजर्यातुन रे काढलेला.....
पण त्याच्या मनातून.....
पिंजरा काढायचाच राहीलेला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कोण नाही विचारत.....
पिंजर्यात बंद पक्षांना बर.....
आठवतात नेहमी तेच.....
जे उडून जातात खरं.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

भरारी घेण ही....
जणू रोग त्याला वाटुन गेला....
पिंजर्यात जन्मलेला पक्षी....
असा ही गं वागून गेला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

संकुचीत विचाराच्या पिंजर्यात....
अडकून सगळे पडले....
प्रगतीचे वारे फक्त....
कागदीच रे घडले.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

हतबल पक्षी.....
पिंजर्यात पाहीला.....
कसला मोह त्याला जाणो....
पिंजरा उघडा असूनही आत तो राहीला.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

पिंजर्यात संरक्षण.....

तीला म्हणे भेटते......

भृणहत्या काय मग??.....

दंव्द मनी पेटते....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                          शाही....✍️✍️

आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...