03 August 2022

विषय- ओल्या सांजवेळी....चारोळी संग्रह

तु येण्याची अपेक्षा....
उगाचच  रे वाढुन जाते....
ओली सांज जेव्हा....
खिडकीत माझ्या न येऊन जाते....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

सरून गेली तरीही......
रोजच आठवुन जाते......
ती ओली सांजवेळ......
जीला मी विसरू पहाते......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

एका ओल्या सांजवेळेची.....
प्रत्येक सांज वाट रे पाहीली....
ती न आल्याची सल....
आजही रे मनी राहीली....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तूला परतून आणणारी....
सांजवेळ  रोज  यावी....
पहाता तुला डोळे  भरून....
अलगद मिठीत तुझ्या  मी शीरावी...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

ओल्या सांजवेळी....
नभ ही नटलेले.....
तु येशिल परतुनी भेटीला.....
हे त्यालाही वाटलेले....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

ओल्या सांजवेळी......
आठवांचे दिप जळलेले.....
ओसंडलेल्या आसवांना......
अर्थ प्रेमाचे नव्याने कळलेले.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

ओल्या सांजवेळी.....
पक्षि परतले घरट्यात....
पाखरा तु कधी परतशिल....
घालमेल आईच्या मनात....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

ओल्या सांजवेळी......
मनि उठले काहुर......
चिंब झाल्या आठवणि......
कोसळता पहिली सर......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

ओल्या सांजवेळी.....
सोबतिला सावली देउन जा....
मी भैरवि गायली....
तु पारवा गाउन जा.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

ओल्या सांजवेळी जपल्या....
कळ्या संवेदनांच्या स्पर्शातल्या.....
त्या कळ्यांची ताटवे फुलवुन जा....
समज भावना रे मनातल्या....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

ओल्या सांजवेळी.....
पापणिला येई पुर.....
आठवणि ओल्या तुझ्या....
नेई दुर दुर.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

भिजलेल्या डोळ्यांनी.....
कातरवेळ टळुन जाई.....
ओली सांजवेळ......
आठवण तुझी ठेउन जाई....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                           शाही...✍️✍️


02 August 2022

चारोळी संग्रह....

प्रेमाचा रंग राजा....
कसाही दिसुदे.....
विश्वास त्यात रे...
हमखास असुदे.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
प्रत्येक फुलावर.....
नसतं रे भाळायचे......
एकनिष्ठेत प्रेमरंग खरा....
कधी रे हे जाणायचे.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

भेटुन तु गेल्यावर.....
पाऊसही गळतो.....
विरह हा सोपा नाही....
त्यालाही रे का कळतो....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

जात पात धर्मात.....

प्रेम कधी का बांधले गेले....

माणुसकीच खरा प्रेमरंग....

सहज किती सांगुन दिले.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

प्रेमरंग खरा......
त्यागातच असावा....
आई बाबांच्या प्रेमात....
तोच तर दिसावा....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

अव्यक्त प्रेमाचा रंग.....
आहे तसा खास......
उगाच मनात आहे......
तू माझा असल्याचा भास.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

प्रेमरंग मैत्रीतील.......

असतो खास.......

प्रत्येक नात्यात........

असावा याचा भास....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                          शाही....✍️✍️


नकाराच्या भितीने.....

सांगितले कुठे जाते.....

एकतर्फि प्रेम असे......

आजन्म सल होऊन रहाते......


प्रेमरंग देशप्रेमाचा......

जवानांचा पहावा......

देशासाठी किती सहज.....

बलिदान जीवाचा द्यावा......


प्रेमरंग मातृत्वाचा...

मि काय त्याची महती द्यावी.....

आभाळाचा कागद आणि.....

समुद्राची शाही कमी यास पडावी....



विषय--प्रेमरंग...चारोळी संग्रस

प्रेमरंग वेड्या तुझा....
असा रे चढला.....
प्रत्येक चेहर्यात....
भास तुझा छळला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

प्रेमरंग  वेडू......

तूझ्यावर असा चढावा.....

येण्यास तुला क्षण नी.....

जाण्यात आयुष्य सरावा....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आवडलं असतं रे....
तूझ्या प्रेमरंगात रंगायला...
पण तुला कुठे वेळ...
जाणुन मला घ्यायला...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

फक्त तुझ्या विचारानेही.....
गाली ते हसणं होतं.....
प्रेमरंगात तुझ्या रंगल्याचं....
सखींच रे म्हणणं होतं....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

रुसव्या फुगव्याचाही म्हणे.....
प्रेमरंग नात्यात असावा.....
ओढ एकमेकांची वाढते.....
हा समजही त्यात दिसावा...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

अव्यक्त असुनही.....

नकार त्यात नसतो.....

कधी कधी प्रेमाचा.....

असाही रंग असतो....



कधी हास्याची रांगोळी....

कधी अश्रूंचा भार......

प्रेमाचा असाही रंग.......

होतो कधी थोडाफार.....


कधी कधी अबोल.....

कधी शब्दांचे हार....

दोघांच्या मनात चालतात....

खेळ असेही फार....


कधी बंधनांची मजबुरी.....

तरीही भेटीची ओढं.....

अनामिक म्हणता.....

नात्याला नाव गोडं....


वेगळे नियम यात.....

वेगळेच जग....

प्रेमरंगात एकदा....

रंगुन ते बघ....


या रंगात जो.....

रंगला असेल....

प्रेमरंग त्यालाच....

समजला असेल...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                           शाही...✍️✍️

         

01 August 2022

आत्मविश्वास....चारोळी

तुला ती आवडते......
एवढेच तुझे म्हणणे होते.....
आत्मविश्वासाच्या परीभाषेत.....
आभाळ तीचू गाठणे होते.......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आत्मवीश्वासावर....
तीच्या जगेन बर ती....
तूमच्या डोळ्यात तीच्यासाठी...
विश्वास बघेन जेव्हा ती....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

हो!!मी करू शकते.....
एवढच म्हणायच खरं.....
आपल्या पंखांच बळ....

आपणच बनायच बरं.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁


तीच्या बाह्यरूपावर....
ताशेरे ते ओढले गेले....
असेही आत्मविश्वासाला....
तीच्या खुपदा मोडले गेले....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तु येशिल म्हणूनी....
उभी आजही त्या वळणावर....
आत्मविश्वास सांगतो....

 आताभेटशील तू सरणावर.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आत्मविश्वासाचे बी....
अंकूरता मनात......
वाटत चमत्कारच घडतो....
आपल्याना जीवनात....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

वयाशी आत्मविश्वासाचे....
नाही बर घेण देणे.....
अनुभवाच्या आधारावर...

होत त्याच येणे जाणे.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

'माझ्या नजरेतून बघ वेडू......
आहेस गं तु सुंदर किती"......
आवडते मला राजा तुझी.....
आत्मविश्वास वाढवण्याची ही निती....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁


स्त्रिला दिलेली.....
निसर्गानेच रे कला.....
बटना इतका सहज जोडते....

आत्मविश्वास तो गमवलेला.....


🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तुझ्या हसण्यातूनही कळतो.....
आत्मविश्वास गं तूझा.....
सकारात्मक दृष्टीकोनाचा....
जणू तो आरसा  तूझा....


🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                          शाही...✍️✍️.

त्या रात्री....चारोळी संग्रस

त्या रात्री  तो स्वप्नात.....
मिठी गं देऊन गेला.....
दिवसभर ज्या दिवशी त्याला......
विसरायचा निर्णय होता केला....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

अमावस्येच्या त्या रात्री......
शशि म्हणे रे नभात नसतो....
तो रोहीणिला भेटायला.....
 ढगांमध्ये का तो लपून बसतो....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

त्या रात्री घडले.....
इतके ते छानं......
त्याच्या मनात मी असल्याची.....
दिली होती त्याने गं जाणं....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मनाच्या शिंपल्यातं.
आजही ती रात्र रे बंद.....
दरवळे  वेड्या त्यातं......
तुझ्या आठवांचा गंध.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

त्या रात्री घडलं असं......

स्वप्न सारीच जळून गेली......

पतसंस्थेत गबन करुन......

सारी ती पळून गेली ......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

महागाई आणि बेरोजगारीने.....
तांडव असे घातलेले......
रोजगतं त्या रात्रीही.....
उपाशिच तेरे झोपलेले.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

त्या रात्री म्हणे.......
असही घडलं होते.....
इर्भतीच्या नावावर....
आरूषी हत्याकांड रे रचल होते.....

.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

त्या रात्री असं.....
छान ते घडलं होतं....
तो माझा झाल्याचं....
स्वप्न गं पडलं होतं.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

काय घडलं त्या रात्री??.....

हळुच तो पुसुन गेला......

संशयाचा त्याचा सुर......

खुप गं छळून गेला.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

काय घडलं त्या रात्री?......
सांगितले असते तुला......
पण न सांगण्याची गळ.....
घातलीय तीने मला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

काय घडलं त्या रात्री??......
उत्सुकता सगळ्यांना लागून होती.....
ती वेडी परीक्षा म्हणता.....
अभ्यास करत जागून होती....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

काय घडलं त्या रात्री??.......
चर्चा गावात रंगली होती......
मतदान जवळ येता म्हणे......
मत कुणी विकली होती......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

काय घडलं त्या रात्री??.....
कुणालाच नाही कळलं.....
माळीन गाव हरवून.....
अवशेषात उरलं....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

काय घडलं त्या रात्री??....
नाही समजलं.....
वाईट स्वप्न होत वाटत...
उगाच मन दचकलं....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

काय घडल त्या रात्री??...

कळल कुठे अजून....

विषय का नाही आला...

प्रश्न आहेच पडून...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

काय घडलं त्या रात्री?.....
कोडे आजही तसचे होतं....
कोणी म्हणे भुत तर.....
कोणी म्हणे चोर होते...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                          शाही....✍️✍️


आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...