01 April 2022

एप्रिल फुल डे.....चारोळी

1582 मध्येएक एप्रिल ला.....
नववर्ष म्हणे साजरा व्हायचा.....
1जानेवारी नववर्ष ठरवता.....
1एप्रिल फुल डे म रहायचा......

कुणि म्हणत विदुषक बसता.....
राजगद्दीवर त्याने काढला नियम.....
वर्षातला एक दिवस सर्व मुर्ख होऊन वागावे....
हसवण कठिण किती दुःख विदुषकाचे जाणावे....

एप्रिल फुल चा खेळ आज.....
ऊचकी ही खेळून गेली.....
तू आठवण काढतो म्हणता......
ती फुल मला  ना बनवुन गेली....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁


माझ्या प्रत्येक रचनेत....
असत बर तूझच नाव.....
आज आहे एप्रिल फुल.....
आहे ना तुला ठाव.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आज सासुबाई म्हणून गेल्या....
सुन माझी ग लाडाची.....
एप्रिल फुल ला अशी का.....
खोडी त्यांनी ना काढायची.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आवडेल का तूला.....
मी दिला जर एप्रिल फुल.....
मी ही हसत केल होत की.....
तू दिलेला गुलाब कबुल....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आज तो काक ही.......
छतावर काव काव करुन गेला.....
कोण पाहुणे येतील म्हणता.....
एप्रिल फुल म्हणुन गेला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

सुटलेल्या हातांनी....
याव वाटत ऐटीत.....
एप्रिल  फुल बनवत होतो....
म्हणत घ्याव ग मिठीत...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

करतो ग तूला काँल.....
बोलावस वाटतय तुझ्याशी.....
किती छान एप्रिल फुल  मँसेज मध्ये....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

खेळून गेला वेडा तो माझ्याशी....

वेड्या मनाला आवडत....
एप्रिल फुल करायला.....
नभातील शशीला ही म्हणतो की....
लागला रे तु आवडायला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

होऊन एकमेकांचे आजन्मासाठी.....
कितीदा ना एकमेका विचारत असतो....
एप्रिल फुल रोज असा होते.....
सांग तु ही ना जाणत असतो.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

काही क्षण आनंदाचे.....
सक्तिने आणायचे जीवनात....
एप्रिल फुल डे मनवायच....
यासाठी असत का रे मनात....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

लव यु वेडू म्हणत त्याने.....
गोड ग मँसेज केला....
एप्रिल फुल बोलायला...
गडबडीत विसरून का तू गेला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

ब्युटिफुल म्हणता.....
आज आरशानेही बघ काढली खोडी....
एप्रिल फुल म्हणता.....
आठवली रे तुझीही खोडी....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

बालपणीचा तो खोडकरपणा....
एप्रील फुल म्हणता पुन्हा जगू.....
समंजसपणाच्या  त्या मुखवट्याला....
आज लपवून घे तू बघू....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

वर्षातला एक दिवस....
हसा आणी हसवा.....
एप्रील फुल म्हणता.....
आपल्यांनाच थोड फसवा....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तो मला तर ग. ....
रोजच फूल  बनवून हसतो.....
सांगशील त्याला जाऊन.....
एप्रिल फुल डे कधी ग असतो....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

चल ना मर्यादा विसरून....
एकमेका उगाच हसवू....
एप्रिल फुल डे म्हणत....
गंम्मत म्हणता फसवू....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

एप्रिल फुल डे...
म्हणजे मुर्ख बनवायच का....
खर अस हे फक्त....
एकच दिवस घडायच  का....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                            शाही....✍️✍️


आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...