31 December 2021

छंद .... 31/12.2021

तीला आनंदी व्हायला....
कुठे काही  लागतं.....
गुलाब हाती ठेवला  तरी.....
चंद्राला भेटल्याचा छंद तीचा भागतो...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

माझ्या  शब्दफुलात  रमण्याचा.....
छंद  सगळ्यांना रे  लागावा....
आपुलकीच्या शब्दांनी मी.....
पसारा चारोळींचा असा बांधाव....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आनंद  माझा....
भरून वाहीला......
कवितेच्या छंदात......
सांगावा रे तुझा पाहीला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तुला छंद काय गं.....
हळुच तो पुसला होता ......
आरसा समोर  धरताच......
गोड  गाली गं हसला होता.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मेहंदी  रचण्याचा छंदही....
मोहात ग पाडून गेला.....
आनंद  असाही देता येतो....
मेहंदीचा गूण गं आवडून गेला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

छंद  किती  आले......
आणी गेले   होते......
तुझ्यात रमण्याच्या छंदाला......
आजही जपून मी नेले होते ....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

छंद  जपावा
आपल्या  साठी बर
छान गं खर

छंद  जपावा
तुला कुणी म्हणत
नाही गणत

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                             शाही.... ✍️✍️


कोंदण... 31/12/2021

झाले  गेले  सारेच क्षण
निरोप गं द्यायला  आलेले
सरता वर्षे  पलिकडे गेला
अपरिहार्य  गं जाणेम्हा  झालेले
            काही  क्षण आठवणी गोड
             जाता म्हटले ठेव गं ओढ
             काही  क्षण होते रडत
              उणीव जाणार्‍यांची होते गाळतं
काहि क्षण डोळ्यांमागे
हसत अलगद लपून गेले
कसे न सांगू गोड  गुपीत
आपले असे जपून नेले
                काहि क्षण मिठी घेऊन
                आनंद अश्रृ  गाळत गेले
                काही क्षणांना हाथ जोडूनी
                माफ करा मी म्हणत गेले
सरत्या वर्षाने जाता जाता
अनुभवाचे गाठोडे सोडून  दिले
ऋणानुबंधानी मन भरून
नववर्षाचे स्वप्न देऊ केले
                झाले  गेले  होते  सोडायचे
                असे आठवात उरून गेले
                क्षण सारे कुठे गं सुटता
                 आठवांच्या कोंदणात दडून गेले

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                       शाही..... ✍️✍️


30 December 2021

जागी का स्वप्नी... 29/12/2021

जागी का स्वप्नी....
कळूनही ना कळले.....
मनाच्या खेळात  बघ ना.....
जगणेच रे हरले....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कसं रे रूळाव.....
आभासी या जगातं .....
मृगजळ  हे सारं.....
आलं की ध्यानातं....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

दुनियादारी  ने आता .....
पोक्तपण बहाल रे  केले.....
आभासी स्वप्नांच्या जगात.....
जागणे रूळणे मनाने सोडून दिले....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

जागेपणातील स्वप्न  तू....
असचं रे वाटलेलं.....
आभासी जगाने होतं....
स्वप्न  हे ही थाटलेल....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

हळूच  म्हणून  गेली  ती.....
येते रे स्वप्नात .....
रात्रभर जागलोच.....
असा ही गं स्वप्नात .....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आभासी या जगात.....
कसं रे मी रुळावं.....
तुझ्या भासांनी  तुझ्या....
पाऊलखुणांना रे गीळावं....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

नाही रे रुळत मी.....
आभासी या जगात....
फुलांच्या भासात खुपदा.....
काटेच रुतले रे मनात....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आभासी या दुनीयेत....
मन काही रे रूळेना.....
जागी का स्वप्नी.....
कोड काही  सुटेना....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

प्रत्येक  का चं उत्तर .....
खरच आलं असतं द्यायला....
छळला नसता प्रश्न ....
का म्हणून  यायला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

जागी का स्वप्नी .....
आता होते कळले.....
आभासी या दुनियेने......
असेही होते छळले......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                             शाही... ✍️✍️


आभासी या जगात.. 29/12/2021

आभासी या जगात......
रूळणार नाही  ना रे कंधी.....
स्वप्नात येऊन  सांगशील......
जपलय मलाच मनामंधी....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आभास तुझा
क्षण क्षण छळतो
तुला कळतो

आभास तुझा
मृगजळ  नाही ना
विचार मना
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

नाही रे रूळणार......
आभासी या जगात.....
स्वप्न  तुझे  जपायचे......
हक्क देशील ईतके जीवनात ......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आभासी या दुनियेत .....
रुळते रे कधी इतकी.....
तुझी माझी  भेट या.....
भासातच असते ना गोड  किती....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आभासी जगाची मला... 
नाही गं कळली निती....
ज्यांना आपले मानून बसली....
तेच परके करून  गेले  किती... 

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

सांग ना चंद्रा  कसं जमतं तुला....
आभासी हे जगणं.....
रोहीणीला म्हणे मनात तु गं नी.....
चांदण्यात  जुगलबंदीत ते नभांगणी रमणं....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

बालपणीच्या गोष्टींच्या आभासी दुनियेत ....
किती छान  ते मन रमायचं.....
दुनियादारी  ही कळता आता.....
कुठे आता तस रूळणं व्हायचं....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आभासी या दुनियेत ......
उगाच माझा तो वाटुन गेला.......
जागी की स्वप्नात प्रश्नात......
ह्या ही तो टाकून  गेला......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आभासी या दुनियेत.....
नाही रे  आता रुळतं....
आभासी तूझ्या उत्तरांसाठी...
मन नाही  रे झुरत...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                       शाही.... ✍️✍️




29 December 2021

शरणागती पत्करली। 29/12/2021

गूढ अंतरीचे....
शब्दावाचून कळावे....
संवाद  असे मनीचे....
अबोल्यातूनही  घडावे...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

शरणागती पत्करली  मी.....
तुझ्या  आठवांपुढे.....
संवादाची पताका  तुझी हवी  ....
जाणते व्यस्त  ना तु पोटापाण्याच्या प्रश्नांपुढे....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

संवाद  पताका कधी कधी.....
भावनांशी ही साधून घे.....
शरणागती पत्करावी  लागणार नाही .....
याची रे  ही हमी घे.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

शरणागती नको न पत्करावी तू.....
मान तू रे माझा.....
तूझ्या संवादाच्या  पताकेतच....
गुंतलायना ना श्वास  माझा ....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

शरणागती पत्करण.....
कधीकधी हिताच गं ठरत....
वाद तर संपतो पण.....
चुकीची जाणीव  प्रेमाने देणं ही घडतं...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

संवाद  हा नात्यातला सेतू .....
नको कधी तो हरायला....
जपून कर ही शब्दांची पेरणी......
काटे नको ग उगवायला.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

संवादाची पताका ....
खुपदा ती फडकते.....
शरणागती घेते जेव्हा .....
उशीरा भेटीला धडकते....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

शरणागती पत्करावी.....
अशी वेळ  कुठे तो येऊ देतो.....
कितीही चुकली तरी तो......
सांभाळून  असही घेतो....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

नातं हे युध्द नाही  गं सखी....
शत्रू होऊन शरणागती पत्करायला.....
ज्याला आपलं मानलं त्याच्यासाठी ...
सोप की गं मीपण हरायला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

दिव्य आहे  गं वेडू.....
रुसल्यावर  मनवणं तूला.....
मी शरणागती पत्करली ....
समजून घेना मला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

संवादाची पताका.....
सवयीची तीची  झालेली.....
शरणागती पत्करली  मी.....
जेव्हा ती अबोल्यात गेलेली....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                           शाही.... ✍️✍️


संवादाच्या पताका। 28/12/2021

अबोल्याच्या वेदनेला....
फुंकर  तुझी मीळावी....
संवादाच्या पहाटेसाठी....
किती मी झुरावी....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

अबोल्याच्या वेदनेला....
फुंकर  तुझी मीळावी....
संवादाच्या पहाटेसाठी....
किती मी झुरावी....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कोण म्हणतं रे संवाद  हा ....
शब्दातूनच मांडला जातो......
स्पर्शातून आणि  नजरेतून.....
खूपदा रे तो सांडला जातो....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

अधीन तिथेच होते ती.....
जिथे तिचं प्रेम  असतं.....
नको समजू अगतिकता तीची.....
तेच तर तीच बळ असतं.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

संवादाची पताका  तीची......
खरच ना फडकायला हवी होती .....
व्यक्त  होण्याची  संधी तीला......
शरणागती  शिवाय कुणी रे द्यायची होती ....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

शरणागती
पत्करायला हवी
नाही  ती नवी

शरणागती
आपसुक  घेतली
मन भेटली

शरणागती
जपायची ती नाती
संवाद हाती

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

शेत खाणाऱ्या  कुंपणाशी .....
अशी ती लढली.....
शरणागती नाही पत्करली...
म्हणूनच  सिंधुताई माझी घडली ...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

साँरी म्हणताच उत्तर .....
तो ही साँरीतच  देत असतो......
शरण आलो एकमेकांना  हे.....
सांगण्याचा गोड ना हा खेळ  असतो....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

शरणागती पत्करायला हवी.....
चुकीची जाणीव  झाल्यावर.....
असं ही मन जपता येते.......
कळेल समाधान भेटीला आल्यावर ....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

शरणागती पत्करली .....
त्या गळणाऱ्या  पिकलेल्या  पानाने....
संवादाच्या पताका का अबोल....
विचारावे स्वतःला  त्या हिरव्या  पानाने....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                            शाही.... ✍️✍️

28 December 2021

नियम खेळातील... 28/12/2021

संसाराच्या खेळातील...
नियम तु ही जाणत असतो.....
संसाररथाची चाके दोन्ही  आपण.....
महत्त्व  कुणाच का उगाच  भांडत असतो.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

पेराल तेच उगवेल....
निसर्ग नियम  हा जाणू...
सांगूनही कुणी ऐकेना...
सांगा ऐका कुणा म्हणू...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

नाही रे जमणार येण भेटीला....
स्वप्नात  नक्की  हो येऊन जाते ....
असे गोड  बहाणे देऊन.....
सहज ती मला जिंकून जाते....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

पुरे झाले  बहाणे.....
कामात व्यस्त रे  असण्याचे....
खेळ  बघ ना  सुरू  झाले  नभी...
वेड्या त्या चांदण्यांचे.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कसं रे जमतं मना तुला.....
बहाणे  जगण्यासाठी शोधून  घेणे....
जीवनाच्या या खेळात  तर.....
दुनियादारीचे नीयम जीवघेणे....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

खेळ  तूझ्या आठवांचे  ....
नियम कुठे पाळतात.....
गर्दीत ही  चोरपावलांनी येऊन ....
कितीदा रे त्या छळतात.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

खेळ  हा फक्त .....
हरण्या जींकण्यासाठी नसतो खेळायचा....
येणार क्षण आनंदाने स्वीकारावा.....
नीयम असतो हा जगण्यातला रे सांगायचा....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आपल्या  मध्ये  नसेल कधी.....
हार जीत ची खेळी.....
तू माझा सूर्य  आणि .....
मी धिटुकली पणती तूझी वेडी.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

नियम जगण्याच्या खेळाचा....
तीने सहज जाणला....
मन जिंकून घेण्याला....
गुपीत जगण्याचा  मानला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

नजरेच्या खेळाचे नियम ....
कधी रे कळले नाही.....
नजर कैदेत हरूनही.....
जिंकण्याची मजा काही ....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

नेहमी तो बहाणा करून....
सहज हरून जातो.....
मला जिंकण्याचा छंद....
त्याचा असा कळून जातो....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                            शाही.... ✍️✍️


चारोळी संग्रह। 28/12/2021

रोज तो आदित्य  बघना.....
उमेद जगण्याची  घेऊन येतो.....
मावळतीला जाता आपुलकीने.....
उद्या छानच असेल आस ही ठेउन जातो....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तूझ्यात आपूलकी.....
गतजन्मीची रे वाटली....
उमेद वेड्या मनी.....
जगण्याची होती  जागली.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

उन सावल्यांचा खेळात ....
उमेद ही गं नवी असावी.....
जुनी आपुलकी ही......
सोबतीने ग हसावी....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

उमेद ही नवी  असावी.....
आपुलकी ही जुनी असावी.....
आयुष्याच्या गणिताची सुत्र.....
इतकी सहज खर का असावी....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

उमेद आणि  भ्रम.....
फरक आता कळलेला.....
आपुलकी  जुनी गोड  तरी.....
अविश्वास  नात्यातला छळलेला.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

खेळ  अपेक्षांचे...
कुठे  नियमात बसतात.....
सगळ्यांना  आनंदी  ठेवण्याचे....
प्रयत्न  नेहमी रे फसतात.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कट्टि बट्टीच्या खेळाचे...
नियम कुठे कळले.....
निरागस पणा हरवण्याला....
दूनियादारीचे खेळ रे छळले...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

सांजवेळ  होताच गं सखे सुरू होतो.....
तुझ्या  आठवणींचा खेळ  जूना.....
  मनाच्या  दारावर....
ठेऊन जाते तूझ्या आठवणी पुन्हा ....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

उन सावल्यांचा खेळ ....
जगण शिकवून गेला...
उगाचच  अर्थ  सारे ...
समजावून हे ही गेला...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                         शाही.... ✍️✍️


27 December 2021

वेदना... 27/12/2021

आपुलकी नेहमी माझी......
अशी का छळली जाते....
नसते गं अपेक्षा  कधीही.....
तरी अश्रृत गाळली जाते....
कुठे  चुकते काही कळेना.....
सल ही सरता काही  सरेना.....
रोज  जाता सूर्य  अस्ताला .....
वेदना सार्या सोबतीला देते.....
येईल तो नवी उमेद  घेऊन .....

बळ असे स्वतःला क्षण क्षण देते....
आता एकच उमेद.....
वेड्या मनाला  गं द्यायची....
स्वतःची लढाई आता.....
स्वतःच ग आहे जींकायची.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                         शाही..... ✍️✍️


उमेद... 27/12/2021

जुनी आपुलकी मनामध्ये .....
सरणावरही रे जपेल......
तुझ्या सुखाच्या उमेदने .....
भेट तुझीच दूर सारेलं......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तुच तर गं उमेद घराची....
हे तू जाणते ना!!......
भांड्याला भांड लागता आवाज होईल.....
जून्या आपुलकीने जपशील नाती मानते ना!!....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

उमेद म्हणजे काय.....
सहज तो पुसून गेला.....
ग्रहणानंतरचा हसरा चंद्र.....
हळूच त्याला गं दाखवून  दिला.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आपुलकी  जुनी.....
नको शोधू कोणात....
तू तीला जपाव.....
असूदे गं ध्यानात ....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

शब्दफूलांची भेट.....
तुच दिलेला  ना ठेवा......
सांगावा देण्याची  उमेद हीच....
नको मार्ग  दुसरा .रे हवा....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

उमेद नवी
असावी ग मनात
आहे ध्यानात

उमेद नवी
तूझ्यात गं दीसते
गोड हसते

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

रात्रीच्या  पल्याड.....
उमेदीचा ग सुर्यप्रकाश......
आपुलकी असता सोबती.....
नात्यात बहरतो विश्वास ....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

उमेद नवी असतेच.....
अपेक्षाही का चोरपावलांनी  याव्यात....
आपुलकी ची परीक्षा  अशी.....
दुनियादारीत कितीदा द्याव्यात....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

उमेद असता सोबतीला .....
हार ती होत नाही.....
आपुलकी  जपता मनात.....
खंत  कसली रहात नाही ....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आपुलकीने वेड्या मनात.....
स्वप्न  वेगळे रचले होते.....
मी त्याची उमेद असल्याचे....
भास गं सारे फसले होते.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

दुःखाचे मळभ सार तू दूर....
असेन नेहमी रे मी सोबतीला....
इंद्रधनुष्य  होऊन उमेद देईन....
आजन्म  रहीन रे संगतीला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                               शाही.... ✍️



26 December 2021

दोष नाही.... 26/12/2021

दोष कुणाचा या चर्चेत.....
रस नाही मला.....
मन तुझं जपून घेण....
इतकेच ध्यानात  असते मला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

पाठीमागे  होणार्‍या  वायफळ चर्चेत .....
नाही  रस मला......
सांगतो ना  विश्वास  असू दे माझ्यावर.....
पण वेडू सांगून कळतं कुठे तूला...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

काही  झालं  तरी समजूनच घेते......
अशा वागण्यात दोष नाही  ना माझा.....
समजून  घ्यावे  मनातील दंव्द  तर......
चर्चा  करण्यात  रस नसतो तूझा.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

काही  झालं  तरी समजूनच घेते......
अशा वागण्यात दोष नाही  ना माझा.....
समजून  घ्यावे  मनातील दंव्द  तर......
चर्चा  करण्यात  रस नसतो तूझा.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तूझ्या  प्रेमात पडली ......
यात नाही ना दोष माझा..........
का चोरपावलांनी  येऊन.....
झाला या  मनाचा  राजा....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

स्त्री  म्हणून  जन्माला  आली .....
यात दोष  नाही  माझा.....
देवत्व तीला देणार्या  बेगडी चर्चेत.....
खरच वाटतं रस असावा माझा ...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

स्त्री  म्हणून  जन्माला  आली .....
यात दोष  नाही  माझा.....
देवत्व तीला देणार्या  बेगडी चर्चेत.....
खरच वाटतं रस असावा माझा ...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

चर्चा जिथे सहज.......
वादात गं बदलत जाते ......
चर्चा  अशी करण्यात ......
रस कुठे म रहाते .....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

चर्चा जिथे सहज.......
वादात गं बदलत जाते ......
चर्चा  अशी करण्यात ......
रस कुठे म रहाते .....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

चर्चा जिथे सहज.......
वादात गं बदलत जाते ......
चर्चा  अशी करण्यात ......
रस कुठे म रहाते .....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

चर्चा  कुठे घडते....
अबोल ती असते.....
दोष तीचा नसला तरी....
दोषी तीच ठरते....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

जे काही  झालं  त्यात.....
माझा दोष  नाही ....
सांगते तूला पण.....
ऐकण्यात तूला रस नाही .....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

रस नाही  रे आता ......
चर्चा  ती करण्यात ......
दोष माझा नाही  म्हणता ....
नातं ते हरण्यात.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

चर्चा  करण्यात .....
त्याचा रस नाही..... 
कबूल केल की......
झाल त्यात माझा दोष नाही ....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                             शाही.... ✍️✍️


चर्चेत रस नाही.. 26/12/2021

खोडकर आहे सखा....
उगाच चर्चा  वाढवत असतो....
मन भरत नाही  त्याच भेटून.....
उगाच शब्दात  म उडवत असतो....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

चर्चा  करण्यात  नाही  रे रस.....
एक तूला सांगायचे होते ......
दोष तुझे दिसत नाही........
ईतके तूला आपले मानले  होते ....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

दोष दोघांचाही नाही....
म घाव  कसे ना देणार.....
प्रेमाची  नीयतीच रे  विरह ....
म  चर्चा  तर होणार....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

दोष कुणाचे आठवतील.....
ईतके मागे नाही  रे वळायचं....
नको दुरावा नात्यात म्हणून....
चर्चेत नाही  रे पडायचं....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

एक  दोष तूझा गं......
माझ्याशी हसतो......
माझी काळजी  करण्याचा.....
छंद   तूला दिसतो.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

दोष नाही  माझा .....
असं ती सहज म्हटली....
चर्चेत  रस नसणारीही.....
होती म पेटून  उठली....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

दोष नाही  माझा.....
स्वतःला  मी  रे समजावत असते....
चर्चेत  मुद्दा  काही  असूदे....
बोट मात्र माझ्याकडे  वळते...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

दुसर्‍यांचे दोष शोधण्याची....
जडलेली ग सवय....
स्वतः च काही शोधण्याच...
गणित नको ग  हवय...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

निर्भया माझी झाली .....
यात दोष  नाही  रे  माझा.....
तूझ्या अग्नीपरीक्षा घेण्याच्या चर्चेवर...
नाहीये उरला रस माझा...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

चर्चा  करण्यात  कधी....
रस नसतो रे तुला.....
मला गृहीत  धरणे....
किती सहज जमते पण  तुला......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                         शाही.... ✍️✍️


25 December 2021

तमा न कशाची... 25/12/2021

तमा कुठे बाळगली तीने.....
ओढ होती  तीला बाळाची.....
ऐकलीच बुरूज चढून गेली.....
हिरकणी होती ती नावाची....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁



स्वतःला  बिनधास्त  म्हणतो....
बोलतो तमा नाही मला  गं कसली....
बरी आहे ना! विचारता....
काळजी त्याची होती हसली....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कुणाच्या  व्देशाची  तमा....
नाही  रे बाळगत कंधी....
मन जिंकायचे ध्येय ठरलेले....
नेहमी रे मनामंधी...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तमा नाही  रे कधी.........
बाळगली कसली..........
अंधाराशी लढतांना........
धिटुकली  पणती होती रे हसली....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तमा न बाळगता  येतो.....
रोज  खीडकीत भेटीला.....
सांगना चंद्रा  नाव  काय देऊ....
अबोल  या गोड  प्रितीला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

द्वेष कधी फिरकला नाही ....
वेड्या या मनात ....
तीथे तुला जपलय हे.....
आहे  त्याच्याही ध्यानात....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तमा नाही बाळगली .....
कधी कशाची .....
संस्कारांना नेहमी जपलं....
माझ्या  रे मनाशी.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तमा नाही बाळगली .....
कधी कशाची ......
मन दुखावलं  जाणार नाही......
पध्दत ही असावी रे जगण्याची.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

व्देश कधी फिरकला....
नाही रे मनात....
भेदभावाचे गणीत....
आले नाही  ध्यानात .....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तमा नाही  बाळगली कसली .....
दुनियादारी  जाणून होते......
व्देश मनात फिरकला नाही कारण .....
प्रेमाने मन जिंकायचे मानून होते......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तमा नाही.....
बाळगली कसली.....
उगाच बोलता....
का मी हसली....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

जश्यास तसे वागण्याची.....
आवडत नाही  कला.....
माफ करून सोडून  देते....
फिरून नाही  बघत त्याला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

नाही  बाळगली  तमा.....
कोण काय म्हणेल  त्याची.....
मार्ग  सत्याचा धरला.....
जाणते हमी हीच यशाची....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                            शाही.... ✍️✍️


   

तमा नाही बाळगली। 25/12/2021

बालकडू  गं दिले जपण्याचे......
तमा नाही  बाळगली कस म्हणणार......
स्वतःची तमा नाही  केली  म्हणेन  हवतर.....
पण नातं नाही  गं कुठलही  हरणार.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁



लैला मजनू सारखं.....
आपलं प्रेम  गं असाव.....
जखम तूला होता......
वेदनेने मी गं विव्हळाव....

असा गोड सखा  असतांना......
व्देश कसा मनात गं फिरकावा.....
तमा नाही  बाळगत जगाची कधी...... 
सांगावा  सांग गं त्याला हा आधी.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तमा कशाची
मी बाळगली नाही
बोलते काही

तमा कशाची
नको न कधी रू
नको गं हरू

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

परकी म्हणून  छळली.....
म द्वेष कुणाचा रे करायचा ......
तमा नाही  बाळगली कसली.......
अपरिहार्य रे मार्ग  हसत हसत जगायचा.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

किती छान  होता  रे तो......
कट्टी बट्टी  चा  ना खेळ.......
व्देश मनात धरू नका.......
सांगायची कधी नाही  ना आली वेळ ......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

सुर्य आणि  समुद्राने.....
कधी   तमा  न बाळगली......
क्षमता असूनही मर्यादेत  रहाण्याची......
कला निसर्गाने सहज  ना सांगीतली...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तमा बाळगत नाही ती कसली....
व्देश ही मनात  धरत नाही.....
आई च आहे  ना जी कधी.....
कुठेच उणे पडत नाही .....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तमा, नाही  बाळगली  कसली....
अनाथांची झाली  आई....
व्देशालाही प्रेमाने जींकले.....
अशी माझी सिंधुताई.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                         शाही.... ✍️✍️


24 December 2021

दिशाहीन वारा... 24/12/2021

अनोळख्या वाटेवर गं .....
पाऊल सावकाश  टाकायचे.....
ध्येय नाही गं गाठणे कठीण.....
सोबत अनुभव  ही साठायचे.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁


अनोळखी  वाट.....
चालून गं तू पहा.....
जोडेन गं कुठेतरी.....
आश्वस्त  तु रहा....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁


अनोळख्या वाटेवर .....
अडखळले रे पाऊल.....
येना लव करच.....
लागली तूझी चाहूल....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

ऊन सावल्यांच्या खेळात ....
अनोळखी  ही वाट.....
अपरिहार्य  चालणं ना.....
जीवनाचा हा कठीण घाट..

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

सोबत मागू का रे.....
दिशाहीन  वाऱ्याची.....
सवय नाही ना  चांगली.....
नेहमी ती आधाराची....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

अनोळख्या  वाटेवर .....
चालून का रे पाहू......
सोबती तु असशील .....
विश्वासावर का या राहू....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

वारा हा दिशाहीन....
बंधनात रहात नाही ...
त्याच्या  भरवश्यावर  मी....
वाट धुंडाळत नाही ...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

जो स्वतःच दिशाहीन. ..... 
सोबत तो काय देणार.....
अनोळखी  वाटेचा.....
पर्यायच  कामी येणार....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

दिशाहीन  वाराही....
सोबतीचा वाटला.....
त्याचा स्पर्शाने  उगाच....
भास तूझा जागला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

अनोळखी  वाटेवर ....
चालून का रे पाहू....
प्रवाह  विरूध्द  असं....
एकदा  का जगून पाहू....
...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

अनोळख्या  वाटेवर.....
असाच तु ही भेटलेला.....
गतजन्मीचे ऋणानुबंध  म्हणत.....
ओळखीचा वाटलेला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

अनोळखी  वाट.....
ओळखीची भासेल......
तु फक्त  प्रयत्न  कर....
तीही बघ हसेल.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                       शाही..... ✍️✍️


अनोळखी वाट... 24/12/202

अनोळखी  वाट  गं आई ......
माझ्या  स्वप्नांकडे   नेते......
दिशाहीन वाऱ्याची  चिंता सोडून......
चालण्या हात तुझा माझ्या  हाती का   देते ?....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

ऐक ना!, राजा थांबशील ना.....
अनोळख्या वाटेवर  माझ्यासाठी...
बघ ना तो दिशाहीन  वारा....
लागलाय रे माझ्या  पाठी.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

अनोळखी  ती नजर भेट ....
अनोळखी  ती वाट .....
खरच का रे जुळून  येईल...,
तुझी  माझी  रेशीमगाठ.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

अनोळखी  वाट....
चाल गं खंबीरपणे .....
खेळ  नाही गं जगणे.....
समजून  घे हे गंभीरपणे .....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

सोबत मागू
दिशाहीन  गं  वारा
नको  पसारा

चालू पहाते
अनोळखी  वाट  ना
हो दे साथ ना

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

नको दिशाहीन  वाऱ्याची  सोबत....
उगाच  तो छेडत  असतो....
उगाच  बट  केसांची उडवून .....
लगट अशी तो साधत असतो...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

नको दिशाहीन  वाऱ्याची  सोबत....
उगाच  तो छेडत  असतो....
उगाच  बट  केसांची उडवून .....
लगट अशी तो साधत असतो...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

अनोळख्या वाटेवर .....
चालता मन रूळलं......
ओळखीच्या वाटांवर......
अपेक्षाभंगांनी रे छळलं.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁




मागितली सोबत.....
दिशाहीन त्या वार्याला.....
अनोळखी  वाटेवर बघना.....
उभा   तो रे पहार्याला .....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                            शाही... ✍️✍️


23 December 2021

उव्देगाची कल्पना न केलेली बरी.... 23/12/2021

ऊव्देगाची  कल्पना ....
नाही  ग करायची.....
ओझी माझी  आता....
मलाच नाही  पेलायची....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁


तुझं ते चिंतेच ओझ.....
तुलाच रे झेपेना.....
तुझ्या काळजीने उव्देग  वाढतो.....
कल्पनाही  तूला ही करवेना....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तुझ्या  उव्देगाची.....
कल्पना  ही   करायची नाही .....
माझी ओझी  तूला.....
आता झेलायची नाही .....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

ओझं जबाबदारी च....
नको ना लादून घेऊ....
सोबतीने चल ना....
तु मी वाटून घेऊ....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

माझ्या कर्तव्यांची ओझी....
उव्देग तूझा रे वाढवून जातात.....
कल्पना  करवत नसली तरी.....
वेदना तुझ्या  जीव रे  माझा जाळून जातात....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तुझी न झेपणारी ओझी....
मला रे वाटायची......
माझ्या ऊव्देगाची कल्पना  सोड....
तुला का सोबत अशी ही पटायची....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

ओझी भावनांची ....
नाही  रे पेलतं.....
जपून घेईल मन....
असं नाही  कुणी  भेटत....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आम्हाला  आमची ओझी....
मोठी ती वाटत गेली.....
खरच बळीराजा तुझ्या  ऊव्देगाची ....
कल्पना ना  कुणा आली....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

बेरोजगार तरूणांच्या  उव्देगाची....
कल्पना  न केलेली बरी....
पदवीच्या ओझ्याखाली....
कितीदा  तो जातो बळी....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁



द्यायची आहे रे  साथ.....
तुझी ओझी  पेलण्यासाठी .....
होऊन राहीन  सावली....
नेहमी रे तूझ्या पाठी....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁



ऊव्देगाची  तूझ्या ......
कल्पनाही कुणा नसते....
पुरुष म्हणून  तुला तर....
रडण्याची मुभापण नसते...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁



ऊव्देगाची  तूझ्या ......
कल्पनाही कुणा नसते....
पुरुष म्हणून  तुला तर....
रडण्याची मुभापण नसते...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                     शाही.... ✍️✍️


उव्देग तूझा... 23/12/2021

तुझ्या  ऊव्देगाची कल्पना ....
मला नाही  करायची....
ती वेळ  येण्याआधीच ....
मी रे तुला सावरून घ्यायची.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

उव्देग  नको  ना करू गं.....
समजवून  त्याच सांगण असतं.....
वादळ मनाची मला देना गं....
हक्काने  हे मागणं असतं....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

उव्देग  करते सारखी....
म्हणून  तू रे बोलत असतो.....
भावनांचा वादळ समजून घेण्यासाठी ....
कधी मनाशी माझ्या संवाद  का साधत असतो.... 

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तीच्या ऊव्देगाची कल्पना  नाही.....
का तर  गृहीत ती रे धरलेली असते....
आपल्यांनीच परकेपणाचे ओझे लादून....
खूपदा अशी छळलेली असते....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁



उव्देग  तीचा.....
कधी कुणा कळला.....
पेलल नाही ओझं म...
अश्रृ  वाटे तो गळला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁



तुझ्या  ऊव्देगाची कल्पना ....
आता नाही  गं करायची ....
पायवाटेवर  तूझ्या.....
फुल गं पेरायची......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁


अपेक्षांची ओझी....
माझी मला झेपत नाही ....
तुझ्या  ऊव्देगाची  कल्पना....
मला म जमत नाही....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तुझ आणि  माझं....
असं काही  राहील का.....
सांभाळून  घेऊ एकमेकांना ....
स्वप्न  हेच पाहीले का.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                        शाही.... ✍️✍️


22 December 2021

स्वतःशी संवाद तो.. 22/12/2021

संवाद स्वतःशीच जेव्हा ....
होतो ना रे शांत .......
नको वाटतो  मला......
तसा रे तो एकांत ....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

नको वाटतो गं अबोला.....
एकांतात तो तुझा.....
तुझ्या  त्या बडबडीत .....
रमतो गं जीव माझा.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

, संवाद  स्वतःशी  साधता......
वेगळीच रे उकल झाली....
तूझ्यात मी विरल्याची.....
कितीदा  ती दखल झाली....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

नको असलेला एकांत ही.....
शाही गोड  तेव्हा वाटून गेला ....
तुझ्या शब्दफुलात माझा.....
भास जेव्हा गं हसून गेला...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

नकोसा वाटतो....
मला तो एकांत .....
माझ्या  आपल्यांची.....
नको पडावी त्यात भ्रांत.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

स्वतःशी उत्तम....
संवाद मी साधून घेते.....
एकांताची अशी.....
कधी मी  .भांडून घेते...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

सक्तीचा एकांत....
नकोसा रे वाटतो....
जणू आपलंच  कुणी....
दुर आपल्याला टाकतो

...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

नकोसा वाटतो ....
मला तो एकांत.....
जवळ असूनही  जेव्हा ....
बसतो तू शांत...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

स्वतःशी उत्तम .....
संवाद  मी साधून घेते ....
तुझ्या  सोबतीने  मी....
स्वतःला नव्याने  जाणून घेते ....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आवडतं मला.....
स्वतःशी संवाद  साधायला....
सोप जात मग....
शब्दात सगळ बांधायला...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                            शाही.... ✍️✍️


एकांत असा.... 22/12/2021

माझी आणि  एकांताची.....
खूप  गोड  मैत्री गं.....
उत्तम  स्वतःशी संवाद  घडवण्याची....
देतो तोच खात्री गं.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

नकोसा वाटतो  तो एकांत ....
जिथे तू शून्यात हरवतो.....
शोध  स्वतःचा घेतो म्हणता.....
भविष्याच्या चिंतेत  स्वतःला  गमवतो......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

वाटतो  संवाद  साधावा.....
कधी तो स्वतः शी....
एकांत  ही म बोलका होतो....
जणू  मैत्री जुनी त्याच्याशी....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

स्वतःशी संवाद साधायला ......
एकांत  तो बरा असतो......
खूप  गर्दीत  ही आपलं कोण.....
प्रश्न  हा खरा असतो.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

स्वतःशी  संवाद  साधतांना.....
आरसाही  रे हसला होता .....
उगाचच गं म्हणे  तू......
काच हा पुसला होता....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

नको असलेल्या  एकांताशी.....
मी रे गट्टी केलेली.....
तु रहा कामात व्यस्त......
तुझ्याशी कट्टी केलेली......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

काळजावर लागलेले घाव....
एकांतात रे गळतात.....
असे स्वतःशी संवाद .....
अश्रृंमार्फत घडतात....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

नको असलेला एकांतही.......   

खूप  काही  शिकवून  जातो...... 

सावलीही साथ देत नाही...... 

संवाद असा स्वतःशी घडवून  जातो......


🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

एकांत असा.....
खूप  गं छळतो.....
सोबतीने तुझ्या......
गोडवा गं त्याचा कळतो.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                           शाही..... ✍️✍️


21 December 2021

जाऊन सांगा सगळे तीला। 21/12/2021

तुच तर गं ....
जीवन माझे सगळे......
तुझ्याविना  घडेल.....
कसे काही वेगळे ....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

जाऊन सांगाना.....
सगळे तीला .....
सरणावर  ही भेटीची....
तीच्या आसं राहील मला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

जाऊन सांगा  ना....
सगळे तीला....
वळून पहाणे  तीचे......
आठवते आजही मला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

जाऊन सांगा  ना.....
सगळे  तीला.....
चोरून पहाणे तीचे....
हवे आजही मला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

जाऊन सांगाना सगळे.....
शब्द तीला माझे कळतात....
तिच्याविना माझ्या  असण्याला....
अर्थ  कुठे उरतात....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

चुकली ती तरी....
साँरी मी म्हणेन....
जाऊन सांगाना तीला....
असं मी जपेन...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

जाऊन सांगा ना ....
सगळे  तीला....
उन सावल्यांच्या खेळात ....
आजन्म  साथ हवी तीची मला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

जाऊन सांगा ना ....
सगळे  तीला...
मला समजून घेणे...
जमते फक्त  तीला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

जाऊन सांगा  ना....

सगळे तीला...

अश्रृ  तीचे....

छळतात मला...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

जाऊन सांगा  ना....
सगळे तीला....
सावली व्हायचं आहे ...
तीची हो मला...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                     शाही.... ✍️✍️


गुंता हा सोडवावा कसा। 21/12/2021

गुंतायच नाही  तुझ्यात....
सांगायला होती ती आली.....
मिठीत रडून सोडणार नाही  ना...
वादा हाच ती घेऊन  गेली....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

गुंता हा सोडवायचा म्हणता....
कसा ना  तु गुंतवत जातो.....

अलगद वाटे सोडवावं हे कोड....
तर श्वासात तू  का उरून रहातो...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

गुंता तूझ्या माझ्या  प्रेमाचा....
कळला कुठे  तूला.....
कळूनही मला कुठे .....
सोडवता तो रे आला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

साद देऊन हळूच म्हणतो....
काळजी घे गं स्वतःची....
वेळ  नाही  ग बोलाया....
लगबग आहे  कामाची...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कधी कधी कळत नाही  म
जपणं आहे  की टाळणं त्याचं
अशा या गुंत्यातून
सहज का होईल सुटण तीचं

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

गुंतून न पडता.....
गुंता का  गं सुटतो....
मनाचा हा खेळ.....
ठरवून  कुठे  घडतो....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

गुंतून  न पडता कुठे .....
गुंता हा सोडवावा वाटे .....
उन सावल्यांचा खेळात.....
हसून वेचावे गं  काटे....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

गुंतून पडले तुझ्यात.....
नाही  सुटणार  रे हा गुंता....
तुला माझा म्हणता....
सोडली  रे दुनियादारीची चिंता ....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

गुंतून  न पडता....
गुंता नात्यातला सोडवावा....
अपेक्षांच्या धाग्यांना....
अलगद रे दुरावा द्यावा....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

गैरसमजांना उणे करून.....
आपल्यांनाच बेरीज करते.....
गुंतून न पडता स्वार्थोत.....
नाते किती ती जपून धरते ....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                          शाही... ✍️✍️


20 December 2021

गुंता....20/12/2021

सांगना चंद्रा मी.....
शोध  तुझा कसा घ्यावा.....
तुला छंद चांदण्यात रमण्याचा.....
आणी मला सोबती तुच हवा....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तुझा मेसेज येणं....
जणू शब्दाने  स्पर्शून  जाण होत....
क्षण क्षण  करता करता ....
पून्हा  नव्याने  गुंतन होत...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

ठाव घेता मनाचा.....
गुंता भावनांचा गं कळतो....
सोडून  द्याव म्हटल तर.....
अधिकच गुंतन  घडतो .....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

गुंतवणारे खूप  भेटतील.....
शब्दांना ग भुलायच नाही ......
फायद्या तोट्याच्या दुनियादारीत .....
नात्यांना कधी ग गुंतवायचं नाही ....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

झुरत मी बसावं आणि .....

अबोल तु रहावं....
सांगशील  अशा गुंतन्याला...
नाव बर काय द्याव.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

गुंतत नाही  गं मी कुठेच.....
शब्दा शब्दात तो सांगत असतो ......
करमत नाही  बोल ना गं......
म्हणत हजार मँसेज म पाठवत असतो....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                            शाही... ✍️✍️


शोध.... 20/12/2021

शोधाव म्हटलं  स्वतःला ....

उगाच आरसा पाहत  बसले...

बदललेले रूप  पहाता....

अश्रृ  ही होते हसले...

उगाच वाटलं नात्यांमध्ये...

शोध माझा घेऊन  पहावा...

प्रत्येकाच्या अपेक्षांच डोंगर ...

जीव तो माझा  घ्यावा.....

उगाच वाटत तूझ्या माझ्यात....

शोध  मी स्वतः चा घेते.....

हरवले होते  तुझ्यात  मी.....

पण जाणिवेत ही तूझ्या नहोते.....

रमावं म्हटलं  स्वतःतच...

स्वतःला  तुझ्यात गमवून  बसले....

नाव तुझे घेता वेडे मन....

बघ ना कसे गोड हसले....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                    शाही....  ✍️✍️


19 December 2021

तुझ्या माझ्यात शोधता.. 19/12/2021

अंतरी शोधता.....
रंग  ते भावनांचे....
वेड लावून गेले  गं मला....
शब्दगंधा तूझ्या चारोळ्यांचे...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तूझ्या माझ्या लेकरात....
बालपण आपल दिसलं....
शोधता स्वतः ला......
मी माझ गं रमलं....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मी माझ्यात रमावे.....
अपरिहार्य रे  झालेले....
उत्कट  वेड्या प्रेमालाही....
विरहाचे शाप आलेले....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

विषय तुझा येताच गं.....
स्वतःशी ते भेटणं होतं....
तुझ्या  माझ्यात  स्वतःला  शोधता .....
माझ्यातच म रमण होतं.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

शब्दफुलात .माझ्या आता....
अशी  मी रमते.....
तुझ्या  माझ्यात  स्वतःला  शोधता....
गम्मत  चारोळ्यांची मते....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

श्वास  नी स्पंदनाचं नातं....
कसं मी  माझ्यात रमावं....
स्वतःला  शोधण खरच का....
तुझ्याविना जमावं....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मी माझ्यातच रमते....
कुणा कुठे गमते....
तुझ्या  माझ्यात ....
ही स्वतःला  शोधते....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आवडतं तुला....
मी माझ्यातच  रमलेली....
तूझ्या माझ्यातही अशी...

खुपदा गमलेली....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                           शाही... ✍️✍️


शोधता स्वतःला। 19/12/2021

सांगना चंद्रा मी.....
शोध  तुझा कसा घ्यावा.....
तुला छंद चांदण्यात रमण्याचा.....
आणी मला सोबती तुच हवा....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आवडेल तूला.....
माझ्यात रे रमायला....
शोधता स्वतः ला....
माझ्यात गुंतायला.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

शोध  घेता स्वतःचा.....
पसरलेल आयुष्य आवरत गेले ....
पाऊलखुणा  तूझ्या  वळणावळणावर होत्या....
त्यातच मी म हरवत रे गेले....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कशी रमशील स्वतःत....
सुगंध होऊन श्वासात....
माझ्या  गं वसली गालावरील ....
खोडकर खळी   कशी तुझी  हसली...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁


शोधता स्वतः ला.....
रुसवा तुझा भेटून गेला ....
अबोला  तूझा असा.....
जीवघेणा  होऊन गेला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁



तुझ्या  माझ्यात  आता ....
शोधत नाही  स्वतःला.....
चंद्र  ही हसून म्हटला.....
तूझ्याशीवाय  तो बघे ना कुणाला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मी माझ्यात रमावे....
सहज कुठे  घडते....
माझे अस्तीत्व....
तूझ्यातच रे अडते....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

रमावे कधी
माझ्यात मी का रे
छान  ना वारे

तुझ्यात मी का
शोधावे ते स्वतः ला
प्रश्नच मला

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                             शाही.... ✍️✍️  


18 December 2021

विचार ते... 17/12/2021

स्त्री शिक्षणाचे  विचार ....
उधळले जर नसते....
स्वतःला  छळणे ते.....
विदारक किती गं असते....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

त्याला कुणीतरी.....
हक्काच  आपलं म्हणे भेटलं....
उधळला हा विचार तरीही....
मन का रे हे पेटलं....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

उधळले विचार.....
संकुचित  सारे....
छळतील मलाच अशांना....
नाही गं द्यायचे थारे.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

विचार माझे मला....
कुठे ते छळतात.....
सोबतीला तुला पहाता....
तेही आता  जळतात....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

उधळलेले  विचार  तूझे गं....
हळुहळू  समजतील....
नको स्वतः ला छळू असे....
मार्ग  ही उमजतील....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

स्वतःला  नाही  छळणार....
वादा हा देशील का रे.....
विचार उधळतां उधळता....
माझ्यासाठी  हसू तुझ उधळशील का रे....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

खरच विचार तीचे....
उधळतां का तीला येतात....
किती सल होऊन ....
तीला छळून घेतात....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

त्याचे ते उधळलेले विचार....
उगाच प्रश्नात टाकून गेले....
गैरसमजांच वादळं....
माझे मलाच छळून गेले....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

खूपदा तुझे विचार ....
उधळून  देण होत....
बंधनात असही....
स्वतःला  छळण होत....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

विचार  सारे....
उगाच उधळले होते...
स्वतःला  छळणे....
रोज  घडणे होते....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

छळले असते स्वतःला....
विचार ते उधळून ....
कस सांगू सोप नाही....
क्षणात जाण विसरून...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

जमत रे आता मला.....
दुनियादारी च  जगणं....
विचार सारे  उधळून....
स्वतःला  छळणं.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

विचार सारे आता.....
शब्दफुलात  मांडले.....
छळतील तुलाही भेटून...
कागदावर आहे  सांडले....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                      शाही.... ✍️✍️


विचार उधळून दे। 18/12/2021

निरागसपणा हरवला आणि....
सुटला खेळ  बाहुला बाहुलीचा....
जीवनाचा सार  एकच  रे.....
भासे आधार ही  आता सावलीचा.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

विचार  उधळण्याची.....
आहे  चंद्राला खोड गं.....
रमतो तो चांदण्यात आणि ......
म्हणतो रोहीणी तूझी  मला ओढ गं.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

विचार तूझे....
कर्तृत्वात गं बांधून घे....
छळू नको स्वतःला ....
गुपीत जगण्याचे जाणून घे...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मीच मला छळायचं नाही .....
खूपदा रे ठरवते.....
तुझी आठवण येऊन म.....
सहज मला हरवते...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कितीदा असं .....
मलाच मी रे छळलेल....
उधळावे की जपावे विचार.....
कोड्यात  जेव्हा मन हे पडलेल.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तुझ्या विचारातुन.....
तु उधळणार नाही  ना मला.....
या विचारानेच  रे.....
कितीदा छळले मला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

विचार सारे
झिम्मा  ते खेळतात
हो छळतात

विचार सारे
कृतीचा म्हणे पाया
सांभाळ राया
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

खूपदा मलाच मी....
छळले असे....
भेदभावाचे गणीत....
सोडवू गं कसे....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आवडत नाही  मला....
स्वतःला  तू गं छळलेले.....
उधळून  दे ते सारे  विचार....
डोळ्यातून असता जे गळलेले....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                           शाही.... ✍️✍️


17 December 2021

समजून घेशील... 17/12/2021

म्हणणे लादत नाही.....
बर गं हे  ना म्हणणे.....
आपल्या माणसांकडेच का गं.....
अपेक्षांचे वादळ  ते वळणे.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

लादत नाही  म्हणणं तुझ्यावर....
एक पण सांगू का रे ....
तूझ्या आनंदात माझ रे सुख....
समजून  घेशील तर मागू का रे ...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तु का नाही  समजून घेत ....
माझे गं म्हणणे.....
लादत नाही  तरी  आवडत नाही .....
हट्टाने  तुझे ते अडणे...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

जे माझे आपले......
सहज मला रे समजून जातात.....
लादावं म्हणणं माझं.....
वेळ   अशी कुठे ती येऊ देतात....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

नाही  रे लादणार.....
माझं म्हणणं  तुझ्यावर.....
बंधन घालणे काय.....
हा, त्रास खुपदा झाला मनावर.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

का नाही  समजून घेत ....
तु माझं म्हणणं.....
लादाव असं नाही  रे....
माझ्या  नात्यांना जपणं...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

नातं हे लादण्यासाठी....
असतं का कुठे.....
हक्क आहे समजून  घेण्याचा....
प्रश्न  म नसतो पूढे....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

का नाही  समजून घेत....
लादलेल मनावर.....
लवकर कुठे मीटतात....
घाव ते  पुसल्यावर....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

समजून घेतले असते तू.....
तर  म्हणणे मी लादले असते....
नात्यातले हे हक्क....
कर्तव्यातून जागले असते.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                              शाही.... ✍️✍️


नाही लादत म्हणणे.... 17/12/2021

नाही  लादत म्हणणे.....
कधी ती कुणावर....
समजून  घेण्याची  जबाबदारी .....
लादून घेते ती स्वतःवर...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

पुर्ण  दिवस जातो चंद्रा.....
वाट तुझी  रे पहाण्यात.....
लादणार नाही म्हणणे कधी रे....
पण भेटणार ही नाही असू दे ध्यानात....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तीच्यातर हसण्यावरही.....
सीमारेषा लादल्या  जातात.....
समजून कुणी घेत  नाही......
भावना अशाही दाबल्या जातात....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

लादल जात तीच्यावर.....
संस्काराच्या रे नावाखाली.....
कुंपणच शेत खातं म.....
समजुन घेणारा नाही  रे वाली....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तुझं म्हणणं  लादून घेण्याची....
खोड रे मला जुनी....
दुनियादारीत मान तुझा.....
शेवटी तु तर आहे ना धनी....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

भाषा हा आहे ना .....
संवादाच साधन.....
का म   लादल जाव......
बोलता भाषेच बंधन....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कधी इशार्यांची  रास मांडते.....
कधी गं अश्रूंचा पूर सांडते.....
कशी समजून घेऊ तुला.....
या विचारातच रात माझी गं भांडते....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

लादत नाही
म्हणणे त्याच्यावर
घे मनावर

लादत नाही
समजून घेणं ते
जपणं  रे ते
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

समजून  घेण्याच्या परीक्षेत....
नेहमीच  का रे फसतो....
सरळ मनाच्या संवादालाही....
म्हणणे लादते   म्हणतो.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                          शाही.... ✍️✍️


16 December 2021

उजाडेल हळू हळू..... 16/12/2021

आज तुझे  शब्द   गं....
लाजतच भेटीला आले....
गुपीत तूझ्या मनातले....
खोडकर उमजून गं गेले...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁



काहीस उमजलं वाटतं....
जीवनाच  रे कोड....
उजाडता चलना सोडवू गणीत....
जगण्याच थोड थोड.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

उमजायला लागल तीला
चूल आणि मूल  पुढे तीच जगणं
शशी ला भेटून यावे आभाळी
उजाडता पडू लागले तिलाही स्वप्न

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

उमजायला लागल आता.....
महत्त्व  तीच्या अस्तित्वाचे ....
उजाडता दिसतय वाढता....
प्रमाण  तीच्या टक्केवारीचे.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

उमजल खूप  पण........
समजायचे राहून जातं .....
उजाडणारा प्रत्येक  दिवस.....
वेगळाच अनुभव  ठेऊन   जातो....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

उमजल खूप  पण........
समजायचे राहून जातं .....
उजाडणारा प्रत्येक  दिवस.....
वेगळाच अनुभव  ठेऊन   जातो....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कधी कधी उमजत नाही ...
मलाच माझ वेड मन....
उजाडलं म्हणता ही.....
ऐकत नाही  ते एकही क्षण....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

उजाडता उजाडता....
दंव्द ग ते संपले....
आता काहीसे...
मार्ग उमजले...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

उजाडण्या आधी....
अंधार गडद होतो....
उजाडायचं थांबत नाही ....
हे उशीरा उमजून येतो....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

सहज का उमजतो....
उन सावल्यांचा खेळ ....
उजाडला उजाडता...
निघायला नको वेळ...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

उमजले आता काहीसे ....
दुनियादारीचे खेळ .....
उजाडला बदलता नाती...
लागत नाही  वेळ....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

लीपी तुझ्या  मुळे.....
उमजले गं मोल शब्दांचे ....
उजाडता अस्तित्व शोधेन....
संकल्प या वेड्या  मनाचे....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁


उमजले होते... 16/12/2021

डोळे  भरुन आले की....
नभातला शशी  ही रडत असतो.....
उमजल नाहि ना  शाही तूला.....
हा संवाद का घडत असतो....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

उमजल म्हणे त्याला.....
मन ग गुंतल माझ्यात.....
उजाडला स्वप्नात  येऊन.....
सांगून गेला  कानात....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

उमजल मला .....
तु भेटीसाठी  आतूर झाला....
उजाडता बघ ह  दारावर.....
गुलाब  कोण ते ठेऊन गेला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

माझी शब्दफुले.....
उमजतात का रे तुला.....
मनातल गुपीत सगळ......
येऊन सांगतात ना तुला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

उमजल आता सारं......
वेळ  सगळं शिकवून गेली .....
आपलेपणाचे बेगडी चेहरे....
हळूच ती उसवून  गेली....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

उमजत सगळ्यांना.....
पण समजून  घेणारा गं भेटावा.....
उजाडेल अशी  पहाट म्हणता.....
आयुष्याचा किती पल्ला  गाठावा....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कधि कधि  ह्या ऊजाडण्याची....
उगाच रे भीती दाटते....
स्वप्नातली भेट आपली इवलीशी....
ती संपू नये असे रे वाटते...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

उजाडेल  हळू हळू....
पण साथ तु रहाशील ना.....
उमजल जगणं तुझ्यात....
अर्थ  जगण्याचा तू होशील ना....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

विरह तो येण्याने .....
मला रे उमजलं होतं.....
तुझ्या  शिवाय  जगणं व्यर्थ ....
सहज ते समजल होतं....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                            शाही.... ✍️✍️


15 December 2021

पुन्हा सुरूवात... 15/12/2021

संकल्पांचं काय करावं....
खुपदा ते फसतात....
प्रयत्न  असता पुन्हा पुन्हा ....
जिंकून ते  म हसतात...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

विकल्प खूप  आहेत ....
मार्ग  रे चुकवायला.....
संकल्प एक कर....
पून्हा सुरूवात  करायला...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

संकल्पांचे काय करू....
ध्येय तु असल्यावर....
सांभाळून   घेतो तु....
नेहमी मी चुकल्यावर....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

विकल्प खूप  येतील....
दुर तूला रे न्यायला......
संकल्प सोडू नको.....
माझं ते  रे व्हायला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

प्रयत्न  करण्याचा संकल्प ....
नेहमी तु करत जा....
उन सावल्यांच्या खेळात....
अशी ही तु जिंकत जा.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

संकल्प ही वाट गं.....
ध्येयाकडे जाण्याची.....
नको माघारी फिरणं आता.....
सुरूवात करू पून्हा लढण्याची.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

संकल्प तो केला....
माघारी नाही फिरायच....
पुन्हा  पुन्हा  प्रयत्न  करुन...
जिंकल्यावर थांबायच...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

पुन्हा  संकल्प ...
नवीन कर...

पुर्णत्वाची  त्यांच्या...
कास तु गं धर...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

नाही  आवडत तुझ....
संकल्प ते, सोडून  देणं....
सुरुवात  कशी करू....
म्हणत स्वतःत गं अडणं...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

पून्हा नव्याने सुरूवात गं...
करायची सांग ना....
संकल्प हा करशील....
साद मला देशील का ...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

पुन्हा  सुरूवात....
त्याने गं केली....
नभातील शशीने...
ग्रहणाची चिंता का केली...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                              शाही... ✍️✍️


संकल्प.... 15/12/2021

जपशील ना
संकल्प
वेळ  अत्यल्प

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

संकल्प  भेटीचा नभातील शशीचा ....
खीडकीत येऊन  ही गं फसला....
शाही साद देउन ही ....
चेहरा कुठे गं त्याला दिसला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

नाती जपून ठेवण्याचा....
संकल्प तीचा ठरलेला.....
परकी म्हणता सगळे तरीही....
प्रयत्नांत खंड न पडलेला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

प्रयत्न  आपल्या  हातात.....
सुरूवात कशीही रे करायची....
संकल्पांशी मैत्री आपली.....
नेहमी घट्ट  न धरायची....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

संकल्प तीचे सारे....
कुठे ते पुरे होतात....
कर्तव्याच्या गर्दीत पुन्हा  सुरूवात  करू...
म्हणत किती रे उणे होतात....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

संकल्प गोड  त्याचा....
हळूच त्याने सांगीतला....
जगायचं तुझ्या  सोबत म्हणून....
साथ गं त्याने नेहमीसाठी मागीतला...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

त्याच्या  शब्दांवर भुलायच नाही....
संकल्प खूपदा गं केलेला...
तो समोर येताच...
संकल्प पून्हा फसून  गं गेलेला...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

वनसंवर्धनाचा संकल्प ....
मनी तो धरूया.....
झाडे खूप  लावून....
सुरूवात  अशी करूया ...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

पहाटेचा गोड  गारवा....
संकल्प  तो ठेऊन गेला....
लढायच नेहमी संकटांशी....
सांगावा जणू तू दिला...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

सहज सोप कुठे रे....
माझं ते संकल्प करणं....
सुरवात  पुन्हा  करता ही....
होतं की तुझ्यात हरण....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                        शाही..... ✍️✍️


14 December 2021

करूणेला जागा नाही.... 13/12/2021

आज हरवलेलं बालपण...
उगाच ग हसून गेलं....
द्वेष, लोभ, मत्सर  यात ग.........
करूणेलाही  गं हरवून दिलं.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

द्वेषाशी नाही  ग....
सख्य ते करायचं.....
करुणेचा चल ना.....
मना मनात रूजवायच....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

व्देशाची एक ठिणगी ....
वादाला पुरी ठरली....
करूणा रुजेल मनात....
आस मनी  न उरली.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

द्वेषाचा व्देष ही रे....
सहज तो करता यावा.....
माणुसकी आणि  करुणेचा मोल....
सहज  का तो जपता यावा....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

वर्णभेदाच्या वादात.....
व्देशाची  ठिणगी रे  पडली.....
संकुचित  विचारसरणीच्या राणात....
करूणाला  जागा  न उरली....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

इंग्रजांनी जाता जाता.....
व्देशाची ठिणगी  पाडली.....
जाती पातीच्या या रानात.....
करूणा नकळत सारली...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

द्वेषाच्या पेटलेल्या  रानात....
करुणेला जागा नसते....
एक छोटासा  गैरसमज ....
आणि  माणुसकी त्यात फसते...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

व्देशाची एक ठिणगी....
पुरेशी होती....
मनात  खरच....
जागा का थोडीशी होती ...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

व्देशाची एक ठिणगी .....
उध्वस्त  सारे गं करून जाते....
जपावे या अवगुणापासून.....
करूणा ती संपवून गं जाते....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

व्देशाची  ठिणगी ....
पडू नाही  दिली नात्यात...
हरवलेल्या करूणेला.....
नाही ग आल ध्यानात ....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

व्देशाच्या पेटलेल्या रानात ...
करूणा हळहळत होती....
व्देशाची एक ठिणगी  अशी....
माणुसकीला का छळत  होती...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                           शाही... ✍️✍️


व्देशाची ठिणगी... 13/12/2021

माझ्या  मैत्रिणींशी बोलण ऐकता....
व्देश तीचा वाढून जातो....
मी लांबणार  तर नाही या भीतीने.....
अश्रृ  डोळ्याच्या कडा ओलांडून  जातो....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

ईर्ष्या आणि  व्देश.....
आग अशी  लावून  गेले....
घरातील दिव्यांनीच.....
अंधार घरात दाखवून  दिले....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

ईर्ष्या आणि  व्देश बघ ना.....
ते पक्षी कुठे रे जाणतात......
करूणा कशी जपावी.....
हे का ते आपल्याला रे सांगतात.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

करूणा म्हटली की स्त्री.....
समीकरण  गं जुळलेल.....
द्वेषाला नको ग खतपाणी.....
अस्तित्व  असेल तूझ विरलेलं....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

व्देशाची एक ठिणगी ....
मनात त्याच्या  रुतून गेली.....
प्रेम  होती ती त्याच आता.....
दुसर्या  जातीची  होऊन गेली ....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

द्वेष नाही  करायचा.....
करूणा गं जपायची.....
समोरच्याने द्वेष केला म्हणून.....
आपण ही का ती पातळी गाठायची.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

प्रेम  आणि  व्देष.....
सारा भावनांचा  खेळ ....
करूणा जपुन घे.....
व्देषाशी नको रे व्हावा मेळ.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

व्देषाची एक  ठिणगी .....
नात्यात ती येऊन गेली.....
सख्ख्या  शेजारींना ती......
वैरी क्षणात बनवून  गेली.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

व्देशाची एक  ठिणगी ....
विश्वास  नात्यातला हरवून गेली ....
करुणेचा संस्कार  असतांनाही.....
दुनियादारी  ग सगळ चुकवून गेली ....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁  

                         शाही..... ✍️✍️


13 December 2021

म्हणणे इतकेच... 13/12/2021

म्हणणे  माझे  इतकेच.....
समजून  तु घेतले असते....
मौनाच्या वादळात....
अडकणे घडले नसते....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

बडबड ही नको त्याला....
मौन ही नको असतं.....
म्हणणे इतकेच की.....
इतक गुंतण कुणात रे बर नसतं....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तुला पहाता.....
मौन माझं रे बोलक होतं....
म्हणणे  इतुके च की.....
स्वतःला  ही रे म भुलण होतं....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

म्हणणे माझे  इतुकेच......
चुकते  कुठे  कळत नाही  मला....
मौन तुझं बोलकं  तरीही.....
सांगायला हव तेच सांगत नाही  मला...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

म्हणणे माझे  इतुके....
समजून घेशील....
मौन तुझे बोलके ....
क्षणभर सारशील....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मौन तुझं बोलकं.....

खूप  काही  बोलून  गेलं.....
मनातील गुपीत तूझ्या.....
मनात माझ्या  ठेऊन गेलं....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

अबोली ती माझी....

मौनातून बोलते....
म्हणणे माझे  इतकेच म्हणता....
क्षण क्षण गुंतवून घेते....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

बोलघेवडा तो माझा....
मौनातूनही बोलतो....
रुसव्या फुगव्याचा खेळ....
त्याच्या डोळ्यातून घडतो....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मौन ही तूझे....
बोलायचे किती....
अर्थ  हवे ते....
लावायचे किती...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

म्हणणे  माझे  इतुकेच.....
नाही  समजले त्याला....
मौन तुझे बोलके....
म्हणून  ही गेला मला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

माझ्या  मौनाला ही.....
हवे ते अर्थ दिले....
बोलके ते की गैरसमज....
इतकेच समजायचे होते  राहीले...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                          शाही.... ✍️✍️


मौन तुझे... 12/12/2021

कधि कधि मौन त्याचा.....
हवा हवा सा वाटतो....
बेगडी त्याच्या  शब्दांपेक्षा...
तो नेहमी  खरा वागतो....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आई जवळ  असली की.....
मौन कुठे गं  रहाता येते....
एक हक्काचं तेच  ठीकाण....
हव तस व्यक्त तीथे  होता गं येते....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मौनात तूझ्या.....
मी लपलेली असावी....
शब्दात ही तुझ्या....
मी रे गुंफलेली  दिसावी...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

पहीली भेट  आपली....
मौनातच गं घडलेली....
तु माझी आहे हे.....
शब्दावाचून  कळलेली....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कुणाच कुणाशीवाय....
नाही रे अडायचं....
मौन देऊन शब्दांना....
बाकी  आता छळायचं....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

शब्द  सहज नाही  कळतं....
मौन कसे कळावे....
तीच्या ह्या संयमालाही....
गर्विष्ठ  म्हणून  छळावे...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मौनही बोलक असतं.....
तो लांब गेल्यावर कळलं....
आठवणीत त्या वेड्याच्या....
डोळे  दिनरात गं गळलं....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

म्हणणे एकच ना....
माफ कर ना आता....
मौन बोलक असुदे....
नको ना  सजा आता....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

म्हणणे एकच ना....
माफ कर ना आता....
मौन बोलक असुदे....
नको ना  सजा आता....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                               शाही.... ✍️✍️


12 December 2021

नविन घडवायचे नाही... 12/12/2021

अपेक्षांच्या वादळात.....
नको आता अडकायला.....
घडेल काही  नविन....
स्वप्नात  अशा नको  रे  रंगायला...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

नवीन  काही  नाही घडवायचे ....
अशात मला नाही  रे अडायचे....
कठीण रे दुनियादारीशी लढणं.....
पण साथ तु  नेहमी हं असायचे....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

भुलवणार्या तूझ्या शब्दात......
नाही  रे अडकायचे आता .....
नवीन  घडायला नको  काही ....
ऐकशील हे जाता जाता....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

नविन नको घडायला काही.....
प्रयत्न  खूप   रे केले ......
नको अडकायला मन तुझ्यात ......
वाटता अडकत तुझ्यात गेले....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

नको वाटतं काहि प्रश्नात अडकायला.....
पण जगणं उगाच त्यात अडकत जातं....
नको काही घडायला म्हणता....
तेच का रे घडत जात....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

नको वाटतं काहि प्रश्नात अडकायला.....
पण जगणं उगाच त्यात अडकत जातं....
नको काही घडायला म्हणता....
तेच का रे घडत जात....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

घडवायचं काही  नाही ....
म्हणून  अडकायचे नाही....
असे पळवाट शोधून ....
जगायच गं नाही ...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

नाही  ग अडकायचं....
नजर कैदेत  तूझ्या....
नविन काही  घडाव....
असं नशिबी  नाही  ग माझ्या...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मला नाही  अडकायचे   तुझ्यात....

कितीदा ती म्हणते.....
सोडून नाही  जाणार ना रे.......
म्हणता मिठीत पडून  रडते...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

अडकायचे नाही  असं.....
ठरवून कुठे होते......
नविन काही  घडणार याच......
आमंत्रण नियती कधी का देते....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                              शाही.... ✍️✍️

अडवायचे नाही...12/12/2021

नाही  रे अडकवायचे ....
शपथ तुझी  देऊन....
निरागसपणे वागणे तूझे....
जाईल  की जीव घेऊन....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

नवीन काही घडवायचं  नाही
सांग ना  सखि कसं ग म्हणायचं
नविन विषय तू दिल्यावर
शब्दांना नाही  का म आशयात अडकवायचं

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

अडकायचे नाही  ना रे तुला.....
शब्दफुले तरी भेटीला येतील....
नवीन घडणार नाही काही तरीही... 
तूला सांगावा रोज  प्रितीचा देतील....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

अडकायच नाही कधी.....
लोभाच्या रे जाळ्यात.....
नवीन  घडवायचे  नाही  म्हणता.....
फसू नको भ्रष्टाचाराच्या आळ्यात.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

माहेरच्या  उंबरठ्यावर.....
नाही  रे मना अडकायचे.....
नविन संसाराच्या  वहीवाटावर.....
संस्कार  तिथले तर गिरवायचे.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

अडकायचे नाही  गं.....
कोण काय म्हणेल यातं....
नवीन काही घडवायचं ....
तर बळ शोध  तू त्यातं....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

अडकायचे
आहे फक्त  तूझ्यात
मी न माझ्यात

घडवायच
योजलेले मनात
ठेव ध्यानात

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

नाविन्याची ओढ.....
मना मनात रे लपलेली....
अडायचे की बाहेर पडायचे....
दंव्दात या पडलेली.....   

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

नाही  गं अडायचे ....
संकुचित  विचारसरणीत....
नवीन  घडवायचे हेच....
करशील ना सुनिश्चित ....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁  

                               शाही.... ✍️✍️


11 December 2021

सांगूनही का न कळे...

न सांगताच तुझं वेडू....
सार ग  मला कळतं....
तुझ्या  इभ्रतीखातर म....
वेड मन माझं झुरतं...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कितीदा ग तूला....
सांगावे गुपीत मनातले....
कळूनही निःशब्द  तू.....
कसे ग जगणे हे बंधनातले.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

काहिच का नाही  कळत....
कितीदा रे तूला  सांगून....
जीव तुझ्यावर जडला...
बसली रे तुला आपलं मानून....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कितीदा  तुला सांगावे....
कळत नाही  ना गं तुला....
गृहीत  धरण नसतं ग ते....
तु माझी जतावण असतं तुला...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कितीदा ती सांगते....
कळतच नाही  कुणाला....
कधी म्हणतात कोड गं तू....
कधी म्हणता अक्कल  का तुम्हाला...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

काहीच का कळत नाही  मना....
किती रे तुला सांगू...
स्वप्न  आणि  अपेक्षांच्या हिंदोळ्यावर ....
नको रे स्वतःला  बांधू....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

शब्दगंधा ग तू म्हणे....
गंध तुझ्या  शब्दात .....
कळलच नाही  कधी लपली....
येऊन वेड्या या मनात...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

सांगूनही खरच का.....
तीला कळले नसेलं....
का बंधनांच जग तीच....
तीला अडलं नसेल....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

वाटले वादळं सारी....
शब्दात ती बांधली जातील....
सांगूनही मनाचे खेळ.....
खरच का असे संपून जातील ...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                                शाही... ✍️✍️


निष्पाप असं काही मिळावं..

निष्पाप  असे काही  ....
सहज कुठे गवसते....
स्वतः च असावं काही ...
आस ही खुपदा  हरवते....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

स्वतःचे मला.....
काहीतरी मिळावे .....
सोपे नाही रे  हे.....
जीवन  सहज जे कळावे...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

निष्पाप  मला
रहाता ना ते यावं
सुख वहावं

निष्पाप  मला
बालपण ते आठवे
वाटे ते हवे

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

निष्पाप  मनाने सांगुनदे.....
बेईमान कधी रे तु होऊ नको....
प्रेम माझे मिळावे, मला यासाठी .....
उगाच बंधनात या गुदमरू नको...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

माझ असं मला....
व्यक्त  होणं  देशील का....
निष्पाप जगणं मिळावं.....
साथ माझी होशील का...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

माझं अस आभाळ....
मला रे मीळाव.....
निष्पाप   स्वप्नांच्या रंगांनी....
वाटते मी ते रंगवाव....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

स्वतःच काही  मीळावे......
उगाचच रे वाटले....
निष्पाप  माझे श्वास  ही....
गोड  म गाली हसले....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

दृष्टिकोन  असा निष्पाप ....
मला रे भेटून गेला....
सारं माझाच होतं म....
प्रश्न  सर्व  मिटवून  गेला .....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                                शाही.... ✍️✍️🍫




07 December 2021

सांगशील का... 7/12/2021

वेदनेचे पहारे.....
खूपदा रे आवरते.....
विसरली सारे  म्हणता....
स्वतःला  कितीदा सावरते.....

दुनियादारीच्या खेळात.....
अपरिहार्य   असतं विसरणं....
जे जाव विसरायला  म्हणता....
घट्ट  त्याच ह्दयात धरणं.....

खूप  वादळ  अशी....
विसरुन जावं  वाटत त्यांना.....
ओघळून  त्यांच येण....
घडत रे पुन्हा पुन्हा ....

वेदनेची हे पहारे....
नको रे आता पून्हा.....
सतावू नका म्हणून....
सांगशील का तू त्यांना ...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                                 शाही... ✍️✍️



05 December 2021

खंत... 5/12/2021

ती सारखी त्याच्या पाठी लागायची. तू व्यवस्थित  तयार  होत  जा सारखी भुणभुण  लावायची. त्याच्या धूम्रपानावरही ताशेरे ती ओढायची. एके दिवशी  तीने त्याला विचारले तु कधीच नाही  सांगत मला असं रहायला हवं, नटायला हवं. तुझ माझ्याकडे लक्षच नसतं कि तूझ्या लेखी मी परिपूर्ण  आहे. सांग काय ते. तो हळूच गाली हसला आणि  म्हटला, मला वाटतं  कोणत्याही  नात्याला बहरण्यासाठी  इतक प्रेम  कराव की त्या व्यक्तीचे दोष पुसटसेही दिसणार नाही. आणि  दिसलीच  तर समजावं प्रेमाची सीमा ओलांडली नाही. आणी म्हणून  मी नेहमी प्रयत्न  करतो ती सीमा ओलांडण्याचा.  ती गांगरतेच. खरच भाग्यवान  ना मी तुझ्यासारखा लाईफ पार्टनर  मला रे भेटला. पण खंत  राहीली मनात का नाही  ओलांडली मी प्रेमाची ती सीमा.....

खरच आपल्या सगळ्यांना  ही सीमा ओलांडता यावी. आपण उगाचच आपल्या  माणसाला गुण आणी दोष या सीमेवरच गाठतो. आणि  ह्या लहान लहान  गोष्टी  मोठ्या  वादाच कारण होतात. नक्कीच  प्रयत्न  असावा आपला माणुस आहे तसाच त्याला स्वीकारण्याचा. हे झालं  माझं मत तुमच मत नक्की सांग.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁                               शाही.... ✍️✍️ 


कदाचित असेल मी भाग्यवंत.. 5/12/2021

कदाचित  भाग्यवंत  मी....
स्त्री जन्म  जे लाभले....
खंत  हीच भृणहत्येच्या खेळीली...
समाजाने का दूर नाही  सारले...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आहेच मी खरंच  भाग्यवंत....
भारतभूमीवर जन्म तो झाला.....
खंत  एकच बंधूप्रेमाच्या संस्कृतीत....
का राजकारण जाती पातीचा  आला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मनातली खंत .....
काही  जात नाही.....
भाग्यवान  असूनही.....
हाती काही  रहात नाही ....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मनातील  खंत  जात नाही .....
कसं सांगाव रे तूला.....
झाली असते  भाग्यवंत......
हक्काने  माझी गं म्हटले असते मला.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कदाचित  असती....
मी भाग्यवंत .....
नसती का खरच....
मनातली  खंत...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कदाचित  असेल  मी भाग्यवंत ....
ऋणानुबंध  गोड  ते लाभतात....
खंत  एकच मनात भेटीचे....
योग सहज कुठे  घडतात ...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कदाचित  असेल  मी भाग्यवंत.....
लक्ष्मी म्हणून  जन्माला  रे येते.....
का जात नाही  खंत  मनातली ......
दोन्ही  घरी परकीच मी का रे रहाते....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कदाचित  असेल मी....
खूप  रे भाग्यवंत ....
माझ्या  आपल्यांची वाटे....
नको व्हावी मी कधी खंत ....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कदाचित  असेलही  मी भाग्यवंत ....
गोतावळा नात्यांचा लाभलेला.....
खंत एकच  दुनियादारीच्या खेळात....
जिव्हाळा मनातील का बांधलेला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                         शाही... ✍️✍️


आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...