राम आणि रावण.....
अंतर्मनात ग लपलेले....
अडगळ विचारांची दूर करता...
दंव्द दोघांत जुंपलेले....
राम आणि रावण=चांगले आणि वाईट वीचार
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
संस्कृती चे बळ घेऊन......
मी का भरारी मारू नये......
अडगळ सारून परंपरेत रमणे.....
प्रगती याला का जाणू नये....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
विचारांची अडगळ....
ही समाजाचीही झालेली....
तु स्वतः पासून सुरूवात कर ....
गती हळुह्रळु आलेली....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
अडगळ विचारांची दूर केली...
सुरवात केली स्वतः पासून झटकायला...
वेड्या मना बरोबर छान गेली म...
मनसोक्त ते भटकायला...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
नव्या पिढीला विचार कधी....
अडगळीचे वाटतात....
बदल हा नियम सृष्टीचा....
तरी अनुभव का दाटतात....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
अडगळ विचारांची ....
दुर ती सारायला गेली....
पाऊलखणांची व्रण त्यांची....
मनावर खोलवर राहून गेली...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
विचारांचि अडगळ.....
कारणीभुत वादाला.....
स्वतः पासून सुरूवात कर ...
अर्थ येईल जगण्याला...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
स्वतः पासून सुरूवात केली ....
अडगळ विचारांची दूर करण्याची....
हळुह्रळु लक्षात आलं .....
मरगळ हीच होती जगण्याची ...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
स्वतः पासून ...
सुरूवात कर...
अडगळ गैरसमजांची....
स्वतः आधी दूर कर...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही..... ✍️✍️