17 May 2023

आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे....
वाचुन कुठे कळतात....
स्वतःसोबत घडले तरच....
अर्थ त्यातले वळतात....

आयुष्यातल्या पुस्तकातील धडे.....
प्रत्येकाचे वेगवेगळे.....
गोळा बेरीज करता त्याची.....
जीवन हे उलगडे....

आयुष्यातल्या पुस्तकातील धडे....
देत होती ग्वाही.....
प्रामाणिकता आणि मेहनतीला....
पर्याय नाही काही....

आयुष्यातल्या पुस्तकातील धडे....
हेही होते पटले.....
छोटया मोठ्या चुकातुनच....
मोठमोठे धडे भेटले....

आयुष्यातल्या पुस्तकातील धडे....
देऊन गेले समज भारी...
नशिब करते अपेक्षाभंग....
कर्म देतात फळ सारी.....

आयुष्यातल्या पुस्तकातील हे धडे....
महत्वाचे रे वाटले....
सोडून जाणार्यांनी दिलेले धडे....
लक्षात ठेवावे हे पटले....

कर्तव्य पुर्ण करता.....
हक्क आपसुक भेटते....
आयुष्यातल्या पुस्तकातील धडे....
नेहमी हे पटते....

आयुष्यतल्या पुस्तकातील धडे....
स्वःअनुभवावर मांडले....
धेयाचे चिंतन नि सातत्याने.....
कितींनी यश  सहज गाठले....

आयुष्यातल्या पुस्तकातील धडे....
देऊन गेले शिकवण.....
आपले सोबत असले की....
अशक्य नसते काहीपण.....

आयुष्यातिल पुस्तकातील धडे....
गोष्ट सांगत होते छानशी.....
करू नको तुलना बरं.....
कधी  ती  इतरांशी.....

आयुष्यातल्या पुस्तकातील धडे....
सांगत होते खरं.....
वेळेवर सोपवुन द्यायची....
काही प्रश्नांची उत्तर बरं.....

आयुष्यातल्या पुस्तकातील धडे....
देऊन गेले जाणं.....
स्तुति असो की निंदा....
हरवु नको भान....

आयुष्यातल्या पुस्तकातील धडे....
गेली गुपीत सांगुन....
प्रत्येक समस्येत असते....
संधी ती लपुन....

आयुष्यातल्या पुस्तकातील धडे....
देत होते कटु बोध....
सगळ्यात कठीण म्हणे आपल्या माणसांमध्ये....
आपली माणसांची शोध....

आयुष्यातल्या पुस्तकातील धडे....
देत होते गतकाळाची जाणं....
झालेल्या चुकांमधुन शिकायचे....
सांगणे हेच यातुन मान....

आयुष्यातल्या पुस्तकातील....
गीरवता इतरांचे धडे.....
स्वतःचे धडे लीहायला.....
विसरायचे नाही हं गडे....

आयुष्यातल्या पुस्तकातील धडे....
वाचता हे रे कळले....
आयुष्याचे दुसरे नाव.....
तडजोड हे पडले....

आयुष्यातल्या पुस्तकातील धडे....
सांगत होते  कटुसत्य खरं...
प्रेमकहाणीचा शेवट.....
विरहानेच होतो बरं....

आयुष्यातल्या पुस्तकातील धडे....
असले कडवट जरी....
वेड्या सोडायची नाही....
वाट सत्याची खरी....

माझ्या आयुष्यातल्या....
पुस्तकातील धड्यात....
तूझ नाव लीहेन....
वेडू मी कोड्यात...

आयुष्यातील पुस्तकातील धडे....
इतरांचे वाचले तु कीती जरी....
तूझ्या दृष्टीकोनावरून ठरेल वेड्या...
तुझ्या जीवनाची वाट खरी...

आयुष्यातल्या पुस्तकातील धडे....
रोज नवे नवे....
तरी कळेना माणसाला....
खरं काय हवे....

                          शाही..✍️✍️


आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...