तुझ्या, सोबतचा प्रत्येक क्षण ....
मी जपून ठेवलेला ....
उणे बेरजेच्या खेळातून ....
अलगद लपवून ठेवलेला....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
उणे बेरीज करता करता .....
एक सल रे जाणवून गेली.....
सुटलेल्या हातांना कुठे मांडू....
दुनियादारी शिकायची राहून गेली ...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
उणे बेरजेच्या खेळामध्ये .....
खूप काही ग गमवून बसले.....
आई आली ग बेरजेला.....
बाबांना पण हरवून बसले ....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
एक विचारलं तर ....
खर ना रे सांगशील ....
उणे बेरीज करतांना....
मला कुठे मांडशिल...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
उणे बेरजेचे गणित .....
नाही रे जमत मला....
तुला बेरीज करुन......
शून्यात धरते मी मला...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
तुझ्या सोबतच्या क्षणांना....
गणीतात कसं ना, मांडाव ....
साऱ्या निरपेक्ष भावनांशी ....
अनोळखी होऊन कसं ना भांडाव ...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
उन सावल्यांचा हा खेळ .....
सोपा होता मांडायला.....
समाधान धरले गाठीशी की.....
काहीच रहात, नाही गमवायला....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁 शाही... ✍️✍️