31 July 2022

विषय-तुझं माझं जमेना....चारोळी संग्रह

तुझं  माझं जमेना.....
कसं म्हणु बरं.....
श्वासांशिवाय स्पंदनांच...
अस्तित्व असेल का खरं...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

विरूध्द ध्रृवात आकर्षण....
आहे रे किती ना खरं....
तुझं माझं जमेना तरी....
ओढ किती असते  बरं.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तुझं माझं जमेना.....
तूझ्यावाचुन करमेना......
प्रेम जास्त कुणाचं.....
यावर ही वाद शमेना....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तूझ्यासाठी तूझ्याशिच......
वेड्यागत ते भांडणं होतं.....
तुझं माझं जमेना मग.....
शेजार्यांच सांगणं होतं......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तुझं माझं जमेना....
आहे का रे हे खरं....
भेटता का रडतो.....
एवढ तरी मग सांग बरं....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

छोट्या छोट्या गोष्टींवर.....
उगाच  रे रूसणं होतं.....
प्रेम आहे वेड्या तुझ्यावर....
हयातून हेच सांगणं होतं....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तुझ्यावर रागवणं हा....
तुला आठवण्याचा बहाणा आहे....
तू आला की खुदकन हसतो....
तसा  राग माझा शहाणा आहे...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तुझं माझं जमेना......
नको व्हावं अस कधी......
असं झालं तर वेड्या.....
थांबेल माझ्या श्वासांची गती.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तुझं माझं जमेना......

अपरिहार्य रे मतभेद होणं.....

मनभेद न होऊ देता......

गरजेचे रे समजून घेणं.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तुझ्या माझ्या नात्यातील.....
गंम्मत ही छानं....
तुझं माझं जमेना तरीही विसरतो.....
भेटता वेळ नि जगाचं भानं.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तुझं माझं जमेना.....

कसं म्हणू बरं......

न बोलता तूझ्याशी.....

श्वास गुदमरतो खरं.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तुझं माझं जमेना.....

कसं म्हणू बरं......

न बोलता तूझ्याशी.....

श्वास गुदमरतो खरं.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

हवं तेच हिरावून नेते.....
असं का गं करते बरं......
तुझं माझं जमेना नियती.....
हेच आहे कटुसत्य खरं.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मी चुकता कारे.......
नेहमी तु सावरतो......
तुझं माझं जमेना तरीही.......
का चुकांचा माझ्या पसारा तू आवरतो....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तुझं माझं आता.....
जमणार नाही गं खासं.....
पाठीमागे निंदा केल्याचा.....
मनि रूततो गं फासं....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तुझं माझं जमेना......

तरिही असं का रे घडते......

सोबत असता भांडणं.....

नि विरहात मन रडते......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तुझं माझं जमेना......

तरिही असं का रे घडते......

सोबत असता भांडणं.....

नि विरहात मन रडते......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

सासु सुन म्हणता.....
तुझं माझं जमेना.....
आपण दोघ जीव त्याचा....
हे वेळीच का गं उमजेना.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

एकमेकात मन....
वेड  ते रमतं.....
तरीही तूझं माझं....
कुठे बर जमतं.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                           शाही....✍️✍️

                       


30 July 2022

विषय-- उंच माझा झोका -चारोळी संग्रह

उंच माझा झोक.......
आज गं खटकुन गेलां........
कितीदा बळीराजा माझा........
झोक्यावर लटकून गेला........

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तुझ्या सोबतीला सख्या.......
नाही कसली सरं......
उंच माझा कल्पनेचा झोका.....
जातो पार गगनावरं...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

वेडू तूला हसतांना.....
पहायच आहे खुपदा......
होईन मी  झोका तुझा.....
यासाठी गं कित्येकदा......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

माप ओलांडता......
भातुकली दुरावली.....
उंच झोक्याची स्वप्न.....
स्वप्नच मग रे राहीली......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

प्रेमाचा झुला झुलतांना.....
जाणले सख्या तूला जवळूनं.....
जपता तूला श्वासात....
नाही पहायचे आता वळूनझ.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तुझा स्पर्श होता सख्या...
झुल्याविन झुलते बरं.....
मन हिंदोळ्यावर....
नाव तूझेच येते खरं ....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

घ्यावा उंच झोका.....
आसमंत चुंबणारा.....
मेघांच्या कुशित......
लिलया झेपावणारा.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आपल्या प्रेमाचा झोका...
उंच होता नभात......
पहाटे पाहीले.....
असे रे स्वप्नात.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मागे नेला जितका झोका....
उंच तितकाच तो गेला......
किती सहज जगण्याचं....
गुपीत तो सांगुन ना गेला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तूझ्या आठवांचा झूला.....
घेऊन गेला नभातं.......
नभातीत शशी का हसला......
का प्रश्न आजही मनातं.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

उंच माझा झोका.......
वार्याची त्याला साथ.......
आभाळाला गवसणि घालण्याचं.....
आहे गं मनातं...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                          शाही....✍️✍️


29 July 2022

चारोळी संग्रह....

ऐक ना.....
एक बोलायचे होते......
तू तिथे मी.....
हे खेळ सारे मनाचे होते...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तू तिथे मी.....
हा निर्णय नियतीचा रेअसेन.....
मरेपर्यंत साथ देईन......
शब्द हा माझा रे असेन......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तूझी शपथ देऊन......
आजही सगळे मनवून घेतात.....
तू तिथे मी ला अर्थ......
कसे न जाणवून देतात.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तू तीथे मी...

अशि आहे बरं....

साखरेत दडलेली....

गोडी जशी खरं...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तू होशिल वेळ तर.....
मी क्षण क्षण होईन......
तूझ्यातच पण.....
गुंतून राहीन....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तू तीथे मी.......    
हे आपलं समीकरणं.......
दुनियादारीचं असतं.....
वेगळच रे व्याकरणं......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तू सागर वेड्या.....
मी तूझी लाट....
तूझ्यातच वळते....
माझी प्रत्येक वाट.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तू धागा तर......
मी  सुई.होइन...
उसवलेल सार....
जोडून घेईन....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तू कप तर.......
मी बशी होईन.......
सुख दुःख  सारी......
सांभाळून रे घेईन.......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तू कप तर.......
मी बशी होईन.......
सुख दुःख  सारी......
सांभाळून रे घेईन.......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तू तिथे मी....
आहे बर खरं......
मला भेटताच सगळे......
आधी तूझ विचारता बरं......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तू तिथे मी इथे......
तरीही मन जुळली......
नियतीची ही खेळी.....
नाही कधी कळली......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

विषयाचा साकव हरवला....
तुझ्या माझ्यातला....
तु तिथे मी इथे.....
अंतर वाढला नात्यातला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                          शाही....✍️✍️

                

   

         

       


28 July 2022

विषय-तू तिथे मी-चारोळी संग्रह....

मृगाला जसे वेड....
कस्तुरीचे असते......
तु तीथे मी......
असेच रे भासते....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तू मेहंदीचे पान तर.....
मी होईन रंग.....
तू तीथे मी अशी.....
राहीन संग संग.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तू तिथे मी.....
होते ना ठरलेले.....
का वाटते सांगना!.....
क्षण ते हरलेले.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तू तीथे मी.....
आहे नं तुला रे हमी....
मी तिथे तू मात्र....
का पडतो रे कमी....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तू तीथे मी.....
होईल का कधी खर.....
भेदभावाच गणित....
विसरल जाईल का कधी बरं....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मी तीथे तू......
हमखास बरं......
माझ्या भांगेत अस्तित्व....
तूझ रंगल खरं.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तूझ्यात वेड्या.....
रुजले रे इतकी.....
तू तीथे मी.....
आता ओळखच इतकी.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तू तीथे मी.....
असेन खरं.....
ह्दयापासून स्पंदन....
वेगळी होतात का बरं....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तू शब्द तर....
मी अर्थ असेन....
तू तिथे मी....
अशी तुला दिसेन....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तू शब्द तर....
मी अर्थ असेन....
तू तिथे मी....
अशी तुला दिसेन....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तू फुल तर....
सुगंध मी होईनं....
तु तीथे मी....
दरवळत राहीनं....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                          शाही....✍️✍️


27 July 2022

विषय-गैरसमज....चारोळी संग्रह

गैरसमजात का गं....
टाकून अशी जाते......
जातांना सांगना  वेडू....
का गं तू हसून जाते....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

फक्त मीच त्याच्या मनात.....
उध्वस्त करून गेला गं....
हाच गैरसमज....
किती जीवनात....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कधी कधी वाटतं.....
गैरसमजांनी ही सोडून ते जावं....
नात्यातील वादांना टाळून.....
मनांनी नातं पक्क व्हावं....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

समजून घेण्याची.......    

घे तु हमी......

गैरसमज कसे......

होतील बघ निकामी.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

एकमेकांविषयी बोलण्यापेक्षा.....
एकमेकांशि बोलायला रे हव....
गैरसमजांना असही ना....
दुर सारायला हव....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

चुक नसताही उगाचं....
अपराधी वाटून गेले.....
तुझे गैरसमज जेव्हा.....
वेड्या मनी आठवून गेले....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

गृहीत धरण्याची.....
तुझी रे खेळी.....
गैरसमज वाढवते....
प्रत्येक  वेळी.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

गृहीत धरण्याची.....
तुझी रे खेळी.....
गैरसमज वाढवते....
प्रत्येक  वेळी.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

गैरसमज नात्यातील......
जणू  रे वाळवी......
वेळीच दुर कर....
अश्रू लागतील नाहीतर गाळावी....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

गोड गैरसमज.....
मी ही रे केलेला.....
वाटतं उगाच तू....
फक्त माझाच रे झालेला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

गैरसमज होतो तीला.....
सगळ्यांना बघून मी म्हणे हसतो....
कसं सांगू  त्या वेडीला....
प्रत्येकीत चेहरा मला तीचाच दिसतो.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

माझ्या अबोल्याचे....
अर्थ कारे काढतोस....
गैरसमज करून का....
मलाही जाळतोस....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तु हसत.....
वळून पाहीले.....
आवडते तुला....
गैरसमज हे राहीले....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

संवाद नात्यातला....
जीथे संपतो.....
गैरसमज तीथे.....
मनसोक्त रमतो.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

गैरसमज इतका......
दोघात वाढला.....
न बोलताही त्याने......
अर्थ हवा तो काढला.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                          शाही....✍️✍️

लेखन असते हे......
कल्पनेचे तारे हो तोडून.....
गैरसमज करता वास्तवाशी....
अर्थ नका हो देउ जोडून....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

          


26 July 2022

कथा एका राजघराण्याची.....

राजा राणी च्या कथा....
आजही रे आठवतात.....
शेवटी सगळ छान होतं.....
आशावाद मनात ना साठवतात....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

भावनेच्या भरात...
वचन देऊ नये कधी.....
राजघराण्यातील कथेने....
निती ही शीकवली  आधी...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तह आणी करारातून.....
शान त्यांनी जपलेली.....
कीती राजघराणी.....
इतीहासात अशी लपलेली....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

सलीम आणी अनारकलीची.....
आठवते का प्रेम कहाणी......
प्रेमाला वीरोध करणारी....
होती काही राजघराणी.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

राजघराण्यातही स्त्रीयांची....
व्यथा नाही कमी बरं.....
अग्निपरीक्षा आणी वस्त्रहरण....
आहेत ज्वलंत उदाहरण खरं.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आठवते राजघराण्यातील ....
ती प्रेम कहाणी का तूला....
निरपेक्ष प्रेमाची जी.....
नल दमयंती यांची आवडते मला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

राजघराणे लयाला जाण्याची.....
नक्की वाचा कथा......
गोपीकाबाईंनी लीहीली.....
आपल्या आत्मवृत्तात ही व्यथा.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कथा राजघराण्याची....
अशीही ऐकली.....
हक्कासाठी जीथे.....
महाभारत घडली....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

राजघराण्यातून व्हायची म्हणे.....
प्रधा, चालीरीतींना सुरवात.....
सामान्य जनता ठेवायची.....
आदर त्यांचा मनात....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कथा एका राजघराण्याची.....
लीहीली असती खरं.....
त्याग नि बलीदान....
शब्दांत मांडता येत नाही बरं...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कथा एका राजघराण्याची.....
आजी नेहमी सांगायची.....
राजाची एक आवडती राणी.....
हमखास त्यात असायची.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

राजघराण्यांच्या कथांनी....
इतीहास भरलेला.....
काही चुका पुन्हा करु नये....
यासाठी का रे तो रचलेला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

एका राजघराण्याची....

वाचली होती कथा.....

त्यातही मांडल्या होत्या....

स्त्रीयांच्या व्यथा......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                        शाही....✍️✍️


25 July 2022

चारोळी संग्रह.....

छंद वाचनाचा.....
असा रे लागला.....
पुस्तकच खरा मीत्र.....
आता वाटू लागला.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तूला चोरून पहाण्याचा.....
छंद का रे जडला....
अर्थ याचा सांगना.....
तुला असेल जर कळला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

छंद तूझा वेड्या.....
असा ना रे लागला.....
नभातील शशीतही....
भास तुझाच जागला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

शब्दांचा पाऊस हा.....

तूझ्यासाठीच रे पडतो........

छंद तुझा लागला ......

तुला कुठे रे कळतो.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तूझ्या आठवणींचा सुगंध.....
सख्या असा दरवळतो.......
तूला आठवण्याचा छंद.....
मला मग जडतो......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मोगर्याच्या सुगंधात....
गंध तुझाच जागला.....
भावनांना वेड्या माझ्या....
छंद तुझा लागला......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तूझ्यामुळे लागला सखी....
लीहीण्याचा गं छंद.....
कीती वाचकांशी जुळला....
घट्ट तो ऋणानुबंध.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

व्यक्त होण्याचा.....
छंद तूझ्यामुळे सखी लागला....
चारोळी लीहून.....
थोडा गं तो भागला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                          शाही....✍️✍️

छंद तुझा लागला.....चारोळी

छंदच असतो जो....
स्वतःशी भेट घडवून जातो....
स्वःताला सिध्द करण्याची संधीही....
खूपदा ना  देऊन जातो...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

सगळ्यांना जोडून ठेवण्याचा.....
छंद तीचा घायाळ तीला करुन गेला....
तीच्या मनाचा आक्रंद.....
कुठे कुणा तो ऐकू आला.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁


पुष्पात सुगंध.....
जसा ना दडलेला.....
तसाच तूझा छंद.....
मला रे जडलेला.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

वेडू बडबड करण्याचा छंद.....

तूझा मला रे जडला.....

एकांतात स्वतःशीच संवाद......

असा खुपदा मग घडला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

चातकाला जसा.....
पाऊसाचा वेध लागतो....
तुझा छंद असाच.....
वेड्या मनात जागतो....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

छंद तूझा असा......
लागला वेड्या मनाला.....
ह्दयाची स्पंदन घेतात.....
नाव तुझच क्षणा क्षणाला.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

श्रावणात सृष्टिलाही......

छंद जणु लागतो......

पारिजातकाचा तो सडा......

मन मोहून टाकतो.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

लाटांशी बोलण्याचा.....

छंद लागला रे तुझा.....

दुर देशावरून जणू.....

सांगावा देतात त्या तूझा ......

.

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
आयुष्यावर प्रेम करण्याचा....

छंद लागला रे तूझा.....
चंद्रमौली झोपडीतही....
समाधानी जगण्याचा....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                           शाही...✍️✍️  

23 July 2022

चारोळी संग्रह.....

तूझ्या सोबतीचे सारे क्षण सख्या....
झाले जणू पावसाचे थेंब......
आठवणींच्या तलावावर.....
करून गेले रे ओलेचिंब....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तलाव म्हटला की....
गाळ त्यात जास्त....
आठवणींचा झराच...
व्हावा वाटतो रास्त .....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तूझ्या आठवणींच्या तलावात.....
   क्षणांचा जणू दगड भीरकावला....
कीती तरंग उठले नी ......
तू सोबतच जाणवला.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आठवणींच्या तलावावर....

टाकले जाळे कीतीदा....

क्षण मासोळी होऊन....

निसटले इथेही खुपदा.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁                         शाही....✍️✍️

आठवणींचा तलाव

आठवणींच्या तलावात....
मंद मंद लाटा....
जणू तुझ्या येण्याच्या....
खुणावणार्या त्या वाटा...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आठवणींच्या तलावावर....
वाट तू पहातो.....
भ्रम वेड्या मनाचा.....
आजही रहातो....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

डोळे नाही तलाव.....
तरीही गळले....
आठवणींच्या तलावाचे.....
अर्थ यात दडले.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आठवणींच्या तलावात....
वल्हवतो का तू रे नाव....
सांभाळ बर खोलवर तीथे...
न सुकणारे काही घाव....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आठवणींच्या तलावावर......

आले हिरवे शेवाळ......

कीती क्षण गूदमरले......

जणू दाखवतो तो काळ......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आठवणींचा तलाव....
ह्दयात आहे रे जपून.....
हव तेव्हा बोलून घेते....
वेड्या तुझ्याशी लपून.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

 आठवणींच्या तलावातं.....

तेव्हा जणू कमळ उमलते....
तुझ्या सोबतीच्या क्षणांनी....

वेड मन जेव्हा ना बावरते

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आठवणींच्या तलावावर.....
सोनेरी मासोळी हसली....
आठवण बालपणीची.....
जणू क्षणभर रे भासली.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आठवणींच्या तलावात.....

होते एक कासवं......

जणू अनुभवाची शीदोरी म्हणता....

डोळ्यात त्याच्या आसवं....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आठवणींच्या तलावावर.....
कशी जाऊ सांग बरं.....
पोहता येत नाही हे गुपित....
तूलाच ना ठाऊक खरं.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                           शाही....✍️✍️

         


 

22 July 2022

लग्नाची बेडी.....चारोळी संग्रह

लग्नाची बेडी म्हणजे.....
नाही हं खेळ......
दोघांच्याही विचारांचा....
असावा लागतो ताळमेळ.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

एकट्याने कसा करावा.....
जीवनाचा प्रवास......
म्हणून लग्नाच्या बेडीचा....
असतो अट्टाहास....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

दोन घरांचा....

लग्नाची बेडी साकवं....

आलेख याचा....

कस बर रे आखावं.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

लग्नाच्या बेडीची.....

सोपी करावी परीभाषा.....

मान मन एकमेकांची जपता....

सुंदर होते संसाराची आशा.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

लग्नाच्या बेडीच....
छान ते असतं....
तुझ अस्तित्व....
भांगात माझ्या सजत....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तूझ माझ जमेना....
तूझ्या वाचून करमेना.....
लग्नाच्या बेडीच गुढ .....
कुणाही रे उमजेना.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

नेहमी एकमेकांपाठी.....

ठामपणे उभ रहाव.....

लग्नाच्या बेडीत.....

अपेक्षीत हेच रहावं.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

चांदण्यात जसा.....
नभातील शशी रमतो....
लग्नाच्या बेडीत तुझ्यासवे....
सख्या मला तस गमतं.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

लग्न बंधन तीच्यासाठी.....
लग्नाची बेडी झाली.....
हुंड्याची मागणी जेव्हा.....
बापापुढे आली.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

लग्नाच्या बेडीत.....
गुदमरत तीच मन......
गृहीत धरण्याचे........
वाढतात जेव्हा क्षण.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तीच अस्तित्व.....
त्याच्यात विरत.....
लग्नाच्या बेडीत.....
सहज ठरतं.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

लग्नाच्या बेडीत.....
वचन दिलेले....
एकमेकांची सुख दूःख....
वाटून घेतलेले....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

लग्नाची बेडी......
आयुष्यातील खास बंधन....
दोन मनांच.....
एकच स्पंदन......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

सुधरून तो जाईन म्हणून.....
लग्नाची बेडी नका बांधू बर....
तीच्या आयुष्याची बरबादी...
लक्षात ठेवा हे खर....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

लग्नाची बेडी....
अडकता पायात...
संसार जपता.....
सरते हयात.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                             शाही...✍️✍️



21 July 2022

चारोळी संग्रह...

मी आहेना सोबत
 सख्या म्हणणे तूझे इतके
आत्मविश्वास कीती वाढवतो
सांगू शकत नाही तीतके.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

स्पष्टतेशिवाय आत्मविश्वास....
आपत्ती बर ठरतो.....
ध्येय निश्चीत कर....
कुठे मग हरतो....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आयूष्याशी युध्द...
असेल तुला जिंकायचे...
स्वतःवरच्या विश्वासाला.....

कधी नाही हं गमवायचे......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आयूष्याशी युध्द...
असेल तुला जिंकायचे...
स्वतःवरच्या विश्वासाला.....
कधी नाही हं गमवायचे....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आकाशाची ओढ.....

दत्तक कुठे घेता येते.....

कबुतराला गरूडाचे पंख लावुन.....

भरारीचे वेड का देता येते.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

जमणार नाही मला.....
नको म्हणू बर.....
कर रे प्रयत्न.....
आत्मविश्वास वाढेल खर.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

पैज  स्वतःशी......
लावावी ती खर....
कधी आत्मविश्वास जींकेल....
कधी अहंकार हरेल बर.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

एक गुपीत....
सांगू का खर....
यशाची गुरुकिल्ली....
आत्मविश्वास बर.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

झाडाला धरुन ठेवतो....
मातीचा ओलावा....
तुझा आत्मविश्वासही....
तसाच तुलारे जपावा.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आत्मविश्वासात आहे....
अशी गं शक्ती बरं.....
पायथ्यावरून शिखरावर.....
पोहचवते जी खरं....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                            शाही....✍️✍️

            


आत्मविश्वास....चारोळी

तुला ती आवडते......
एवढेच तुझे म्हणणे होते.....
आत्मविश्वासाच्या परीभाषेत.....
आभाळ तीचू गाठणे होते.......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आत्मवीश्वासावर....
तीच्या जगेन बर ती....
तूमच्या डोळ्यात तीच्यासाठी...
विश्वास बघेन जेव्हा ती....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

हो!!मी करू शकते.....
एवढच म्हणायच खरं.....
आपल्या पंखांच बळ....

आपणच बनायच बरं.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁


तीच्या बाह्यरूपावर....
ताशेरे ते ओढले गेले....
असेही आत्मविश्वासाला....
तीच्या खुपदा मोडले गेले....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तु येशिल म्हणूनी....
उभी आजही त्या वळणावर....
आत्मविश्वास सांगतो....

 आताभेटशील तू सरणावर.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आत्मविश्वासाचे बी....
अंकूरता मनात......
वाटत चमत्कारच घडतो....
आपल्याना जीवनात....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

वयाशी आत्मविश्वासाचे....
नाही बर घेण देणे.....
अनुभवाच्या आधारावर...

होत त्याच येणे जाणे.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

'माझ्या नजरेतून बघ वेडू......
आहेस गं तु सुंदर किती"......
आवडते मला राजा तुझी.....
आत्मविश्वास वाढवण्याची ही निती....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁


स्त्रिला दिलेली.....
निसर्गानेच रे कला.....
बटना इतका सहज जोडते....

आत्मविश्वास तो गमवलेला.....


🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तुझ्या हसण्यातूनही कळतो.....
आत्मविश्वास गं तूझा.....
सकारात्मक दृष्टीकोनाचा....
जणू तो आरसा  तूझा....


🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                          शाही...✍️✍️.

19 July 2022

रेशमी धागे.....चारोळी

नात्यांचे रेशमी धागे.....
नको बर गूंता त्यात....
एकदा पडली गाठ....
तर रहाते ती खोलवर आत....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

प्रेमाच्या रेशमी धाग्यात....
गुंतल मन एकदा.....
अव्यक्त त्याच रहाण.....
सल होत खुपदा.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

विश्वासाचे रेशमी धागे.....
वेळीच जपावे बरं......
एकदा झाला गूंता तर.....
सुटत नाही कधी खरं.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

स्वप्नांचे रेशमी धागे.....
उगाच वीणत बसली ती वेडी.....
सारेच ते उसवणार.....
कुठे कळली तीला नियतीची खेळी....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

एकनिष्ठेने जपावे......
धागे रेशमी नात्यांचे......
भरवश्याचा नको खेळ.........
घाव भरत नाही मनाचे......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

गाठ नसलेला रेशमी धागा......
जातो बर सुईत.....
उसवलेल क्षणात वीणतो....
यात तुझ्यासारखाच तोही रे पटाईत.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

प्रयत्नांची गरज असते.....
गुंता नात्यातला  सोडवण्यासाठी .....
प्रेम आणि  प्रयत्नाने.....
जपुन घ्याव्या रे रेशीमगाठी ....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

रेशीमबंधात  बांधशील का सख्या.....
धागा हा आपल्या मैत्रीचा ......
सुखी संसारासाठी आहे बर.....
तसा तो खूप खात्रीचा...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

रेशमी धाग्यांचा गुंताच जणू......

नात्यांचा हा खेळ .......

सोडवावा वाटे सगळ्यांना.....

पण नाही भेटायला वेळ.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                           शाही....✍️✍️

             

        


18 July 2022

चारोळी संग्रह....

नको रे मला.....
दास्यत्वाचा आसरा बरं.....
असूदे मग तो....
सोनाच्या पिंजरा खरं....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

काळजीच्या  पिंजर्यात.....
कैद रे तीला केली.....
ती वेडी भरारी घेण.....
विसरून मग गेली....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आपल्याच दृष्टीकोनाच्या पिंजर्यात.....
अडकुन आपण पडतो.....
उगाच जगाला.....
वेठीस ते ना धरतो.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

पिंजर्यात कोंडून पाखरे.....
कधीच आपली होत नाही....
जा तुला मुक्त केले.....
समजून तू रे घेत नाही.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

एका पक्षाला.....
पिंजर्यातुन रे काढलेला.....
पण त्याच्या मनातून.....
पिंजरा काढायचाच राहीलेला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कोण नाही विचारत.....
पिंजर्यात बंद पक्षांना बर.....
आठवतात नेहमी तेच.....
जे उडून जातात खरं.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

भरारी घेण ही....
जणू रोग त्याला वाटुन गेला....
पिंजर्यात जन्मलेला पक्षी....
असा ही गं वागून गेला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

संकुचीत विचाराच्या पिंजर्यात....
अडकून सगळे पडले....
प्रगतीचे वारे फक्त....
कागदीच रे घडले.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

हतबल पक्षी.....
पिंजर्यात पाहीला.....
कसला मोह त्याला जाणो....
पिंजरा उघडा असूनही आत तो राहीला.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

पिंजर्यात संरक्षण.....

तीला म्हणे भेटते......

भृणहत्या काय मग??.....

दंव्द मनी पेटते....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                          शाही....✍️✍️

पिंजरा......चारोळी

श्वासाचा पिंजराही....
सोडेन साथ कधी......
व्हाव विसरण तुला.....
सोप रे त्या आधी....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

श्वासाचा पिंजराही....
सोडेन साथ कधी......
व्हाव विसरण तुला.....
सोप रे त्या आधी....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

पिंजरा नाही गं वेडू.....
आभाळ तुझ व्हावचय......
स्वच्छंदी आभाळात.....
विहरता तूला पहायचय....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

पिंजर्यातल्या पक्षीला.....
मुक्त ती करून देते.....
न केलेल्या गुन्ह्याची शिक्षा....
आजही तीला आठवून जाते....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आहे म्हणे छंद त्याला.....
पिंजर्यात पक्षी पाळण्याचा.....
स्वप्न पहातो स्वतःसाठी.....
आभाळ ते गाठण्याचा....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

पिंजर्यातला पक्षी......
जणु स्त्रीच जग.....
आपलेच पंख कतरून.....
जमते तीलाच हसणे बघ.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आवडल असत रे......
प्रेमाच्या पिंजर्यात तुझ्याच रहायला.....
तूझ ते गृहीत धरण.....
लागल आता रे छळायला.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

अत्यावश्यक असूनही.....
कोरंनटाईन होण होत  ना वाईट कीती.....
आजही तो पिंजरा आठवता.....
मनात दाटते अनामिक भिती.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

रुढी परंपरांचा तो पिंजरा.....
कर्तव्य तीच म्हटल जातं....
किती सहज तीला.....
बंधनात ते डांबल जातं.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                            शाही....✍️✍️

                 


17 July 2022

चारोळी संग्रह....

तूझ माझ नातं.....
राहुदे असच खास....
दुनियादारीचा त्यात....
नको कधीच रे भास.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

स्वतः पेक्षा इतरांची.....
मन जी जपतात.....
दुनियादारीत त्यांच्या भावनांचे....
खेळ कुठे रे संपतात....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

एक ओढ आहे रे वेड्या.....
सोबतीने तूझ्या जगण्याची....
दुनियादारी कळते रे....
एकलीच वाट ती सरणाची....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

का रे आली......

मध्ये ही दुनियादारी....

प्रेम करतांना.....

विसरलो होतो जी सारी....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

दुनियादारी खरच....
वेळीच कळावी.....
भावनांशी खेळणार्यांनी....
नाहीतर सहज वाट लावावी....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

खर शिक्षण....
दुनियादारीच देते....
स्वप्न आणी वास्तवता.....
यातल अंतर शिकवते....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

बर झाल तु मला.....
दुनियादारी शिकवून गेला.....
वेळ खुप महत्वाची.........
मूद्दा हा ही पटवून दिला.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

प्रेमाचा त्रिकोण.....
दुनियादारी शिकवून गेला.....
भरवसा सहज नाही करायचा....
धडा मोठा देऊन गेला...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

जे लोक तोंडावर.....
बोलतात गोड.....
दुनियादारीत पाठीमागे....
निंदा करण्याची त्यांना खोड....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

दुनियादारीचे आपले.....
वेगळेच बर कायदे......
बदलतात ते नेहमी......
पाहुन  जो तो आपले फायदे....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                          शाही....✍️✍️


दुनियादारी.....चारोळी

खोट्या ला खर करण्याची.....
नाही रे आली कलाकारी.....
यालाच म्हणतात सारी....
खरी रे दुनियादारी.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

ज्याच्यावर विश्वास करावा.....
धोका त्यानेच द्यावा.....
दुनियादारीचा हा खेळ.....
वेळीच लक्षात यावा.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

दुनियादारी त्याला.....
छान जमते गं बरं....
टाळायचं असल की....
वेळ  नसतो गं म्हणतो खरं....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तुझ्या माझ्यात सख्या.....
का हवी दुनियादारी.....
तु माझा नी मी तुझी.....
हीच आपली दुनिया सारी....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

बळी तो कान पीळी.....
नियम हाच रे ठरलेला.....
नैतिकतेचा वाली....
दुनियादारीत कुठे उरलेला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

दुनियादारी जपण्याची......
धडपड तीची किती सारी.....
मन दुखल किती तरी.....
नेते ती हसण्यावरी.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

प्रेमाची दुनियादारी.....
नाही गं कळत मला.....
का प्रेम करतो??......
कस सांगू बर तुला.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तूझ्या केसांच्या गुंताइतकी.....
सोपी नाही गं बरं.....
उमजता उमजेना.....
दुनियादारी ही खरं.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मी तुझा म्हटल्यावर वेडू.....
विषय सगळे संपल्यात.....
नको आणू ना दुनियादारी....
कधी गं तू आपल्यात....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                          शाही....✍️✍️


16 July 2022

चारोळी संग्रह....

नाही रे बाहुली.....
दिली कन्यादानात जरी.....
युगा युगांची परंपरा.....
दुनियादारी म्हणत निभावली खरी......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

परक्याच धन म्हणता.....
कुठे परकी ती करता येते....
कन्यादान करता म्हणून.....
आई बाबांना गहीवरून येते.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

दोन घरांच्या आनंदाचा....
लेकीवर असतो भार.....
या दुनियादारीमुळे.....
कन्यादानाचा त्रास बापाला तो फार.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कन्यादाना आधी.....
करावा विद्यादान.....
हुंडा मागणार्याचीही.....
लाजून झुकावी मान.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

दोन कुळांचा.....
जपते ती मान......
म्हणून कन्यादान.....
आहे ना श्रेष्ठदान.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

प्रत्येक आई बाबा.....
मागतात वरदान......
भेटावे त्यांना पुण्य.....
करण्याचे कन्यादान.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

या पेक्षा कुठल मोठ.....
दान असेन बर.....
अंगाखांद्यावर खेळलेली लेक....
कन्यादानात बापाने दिली खर.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कन्यादान आहे ना.....
महान दान खर......
का मग मुलीच्या बापाची....
मान असते खाली बर....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

शरीरातून काढून जणू.....
प्राण  देण  ते  होतो.....
कीती मोठ काळीज त्या बापाच....
कन्यादान जो करतो....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मन तीचे आजही.......
गहीवरून बर जाते.....
विवाहात पार पडलेले.....
कन्यादान जेव्हाही आठवून जाते....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कन्यादान आहे ना....
सर्वात श्रेष्ठ दान....
का भृणहत्या करून....
करावी कर्मांची घाण....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कन्यादान करुन ही बापाने....
विचारल तीला जाते.....
तुझ्या बापाने लग्नात.....
काय गं अस दिल होते?....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कन्यादानाच पुण्य....
भाग्यवानांच्या नशिबी येत....
लक्ष्मी चा जन्म.....
लेक म्हणता प्रत्येका घरी कुठे होतो....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁                             शाही....✍️✍️


का हिरावला हक्क तीचा???

आज हा विषय आला आणी वाटल गुफांव तीला शब्दांमध्ये.तसे शब्द माझे थीटेच तीच्या संघर्षापुढे...ही सत्य घटना माझ्या बालमैत्रीणीची....खुप गर्व आणी अभिमान उषा सखी तूझा गं....
              वयाच्या 14 व्या वर्षि घरची  मोठी नात म्हणून उषाला बोहल्यावर चढवल गेल.बाबांच वय झालेलं त्यांची इच्छा पुर्ण व्हावी म्हणून हा मोठ्यांचा हट्ट... .आजही आठवते शाळेतल्या गणवेशात भांग भरून मंगळसूत्र घालून येणारी ती निरागस उषा.        
             तारूण्याच्या उंबरठ्यावरच संसाराशी गट्टी जमवत दोन्ही घरांचा मान जपत ती संसारात रूळली.देवयानी आणी आकाश नक्षत्रावाणी दोन फुल नियतीने तीला मातृत्वरूपात दान दिली.
            पण नियतीच ती!! का रुसली,काय गून्हा झाला ही सल मनात देऊन उषाला वैधव्य देऊन नीघून गेली.पुन्हा कमी वयात आभाळ कोसळल तीच्यावर .खुप कमी वयातच नवीन संघर्ष आल पदरी.
.           समाज,नियती स्वतःशी लढा देत दोन्ही लेकरांना मोठी केली. संस्कार नी वीद्येच दान देऊन आपली कर्तव्य पुर्ण केलीत.लेकरांनीही आपल्या आईच्या कष्टांचा मान ठेवला.
          आज उषा ची लेक देवयानी ही बी.ई.इलेक्ट्राँनिक्स कम्यूनिकेशन यात पदवी घेऊन  परदेशी जाँबसाठी जाण्याची तयारी करतीय. आणी आकाश बीसी. एस. करून आपला स्वतःची वेगळी वाट निर्माण करतोय.
        हे सगळ लीहीण्या ईतक सहज नक्कीच नव्हत.खुप खस्ता,प्रश्न,वादळ आली ,पण उषा न डगमगता लढली.
         हे सगळ करणारी एक आई आपल्या मुलीच कन्यादान नाही करू शकली. का??तर वैधव्य असल्यामुळे.आजच देवयानीच्या लग्नाचा वाढदीवस आणी हा वीषय योगायोग.
         आणी मनातील ही सल कर्तव्य पूर्ण करूनही हक्क कन्यादानाचा का नाही तीला,उषाला!!!.....
              गर्व वाटतो उषा तूझा इतक्या संघर्षातून तू दोन्ही पाखरांना आभाळ दिल उडण्यासाठी....आणी माफ कर तूझा तो कन्यादानाचा हक्क मीळवून देण्यात आम्ही सगळ्या सखीच असमर्थ पडलो....🙏🙏

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                        शाही....✍️✍️


कन्यादान....चारोळी

अपहरण करणारे....
जवळचे असतात....
व्देश कींवा लोभातून...
खेळ हा मांडतात....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

येईन स्वप्नातला राजकुमार.....
स्वप्न आई बाबा तुम्हीच ना हो जागवली....
कन्यादानाचा निर्णय घेतांना.....
एकदाही मर्जि जाणण्याची गरज  नाही जाणवली.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तीच्या वेदनेची.....
नियतीने न केली जाण.....
आई बाबां शिवाय.....
झाल तीच कन्यादान......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कधी द्यूतात हरली......
कधी दानात गणली......
स्त्रि ही खरच का......
वस्तूच ठरली....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कन्यादानाच्या क्षणी.....
वर ही रडलेला ......
ऋणानुबंध रेशिमगाठीचा....
क्षणात असा जुळलेला.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

दान गोत्राच असत.....
कन्येच नसत बर.....
अज्ञानातून कन्यादान झाल.....
आताच सांगितल कुणी हे खर....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कन्या तुला सोपवली.....
नाही   रे केल दान......
माझ्या घराची लक्ष्मी.....
जप ती आहे माझा मान.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

निर्लज्यपणाचा स्तर....
किती  तू गाठावा.....
कन्यादाना करणार्या बापालाच....
हुंडा तू मागावा....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आवडती वस्तू देता....
मनाला कीती हुरहुर  भारी.....
काळजाचा तुकडा कन्यादानात दीला....
ऋण हे त्याचे समजेल का कधी तरी....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                           शाही....✍️✍️


10 July 2022

चारोळी संग्रह......चारोळी

वेड प्रेमाच पक्षांच......
आंधळ कुठे असतं......
पंख फुटता पाखरांना......
उडण्या आभाळ असतं......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तुझं माझं वेड प्रेमाच....
जणू गोड  रे कोडं....
तूझं माझं जमेना तरीही......
किती ती एकमेकांची  न ओढ.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तू जवळ असलास की.....
वाटत जवळ सगळ आहे....
कळल का वेड्या  तूला....
वेड प्रेमाच  हे वेगळच आहे....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

ह्दय फाडून दाखवू का.....
किती गं प्रेम तूझ्यावर......
तूझ हे असं वेड प्रेमच.....
जादू करत रे माझ्यावर.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

एकतर्फी प्रेमाच वेड.....
अँसीड हल्ले करवून गेलं.....
अशा विकृत वेडामूळे......
वेड प्रेमाच खूळ ही ठरुन गेलं....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

वेड प्रेमाचे.....
आई बाबां कडून शिकावे....
गुण दोषांसकट  सहज....
निस्वार्थ कस ते जपावे...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

त्याच प्रेमाच वेड.....
आहे तस गोड.....
माझ्याइतकीच त्यालाही....
आहे गं माझी ओढ.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

वेड प्रेमाचं.....
ठरवून कुठे लागतं....
अनोळखी तो क्षणभरात....
श्वास वाटायला लागतो....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

वेड प्रेमाचे.....
मर्यादेत लपलेले....
जणू चीखलात....
कमळ जपलेले.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

टाईम पास की.....
वेड प्रेमाचे.....
अंतर समज बर......
खेळ नको जीवनाचं खर....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

वेड प्रेमाच म्हणत.....
समर्पण तो गं मागतो.....
वेळीच सावध हो बर....
खेळ हा वासनेचा वाटतो....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

वाटत भेटाव कुणी....
वेड प्रेम करणार....
माझ्यासाठी काळजी घे स्वतःची....

हक्कान रे म्हणणार...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

वेड प्रेमाचे.....
असावे खर.....
पण त्याग शीकावे....
यातून बर....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तूझ्या प्रेमाचे वेड....
असे वेड्या लागले....
प्रत्येक चेहर्यात......
भास तुझे जागले.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

वेड प्रेमाचे.....
शब्दात कुठे मांडता येते....
ओठावर येऊन शब्द.....
ओठातच गोठून जाते....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तुझ्या दूःखात वेड्या......
डोळा माझाही गळतो.....
मी तूझीच असल्याचा.....
अर्थ तूला  कुठे कळतो.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                         शाही...✍️✍️


वेड प्रेमाचे....चारोळी

तूझ्या नावाने साद रे........


कितीदा मी देऊन गेले.......


वेड प्रेमाचे लागले म्हणत......


सगळेच मग हसून गेले........

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

नकाराच्या भीतीने.....
खुपदा असेही घडते ......
वेड हे प्रेमाचे.......
अव्यक्त राहून ही रे छळते......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁


वेड  हे प्रेमाचे.....
सरत नाही कंधी......
साथ  नसली तरी......
असतेच ते मनामंधी.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

वेड हे प्रेमाचे.....
असे रे लागले.....
नभातील शशीतही.....
भास तूझेच जागले.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तुला आठवता....
येते  रे गाली हसू......
वेड हे तुझ्या प्रेमाचे.....
लागल की सगळ्यांना दिसू.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तीच्या नकाराला.....
होकार नको समजू बरं....
वेड प्रेमाचे नाही रे.....
विकृती आहे ती खरं.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तु समोर आलास की....
होते  रे मी मुक.....
तु गेल्यावर वाटते.....
सांगायचे तर होते खुप.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तु समोर आलास की....
होते  रे मी मूक.....
तू गेल्यावर वाटते.....
सांगायचे तर होते खूप.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

सगळ्यात असूनही.....
अलीप्त ते वाटते.....
जेव्हा तुझी आठवण....
वेड्या मनी रे दाटते....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                             शाही....✍️✍️


09 July 2022

चारोळी संग्रह.....चारोळी

नजरेच्या भाषेची.....
नाहीच उमजली तूला खेळी....
मीटलेल्या डोळ्यातही.....
कस सांगू तूच रे प्रत्येक वेळी....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तूझ्या डोळ्यांची भाषा.....
खळखळणार्या झर्या साखरी.....
खुप आवडते मी तूला.....
सांगावा तूझा देतात सारखी....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कधी कधी वेडू.....
रहात जा गं चुप.....
डोळ्यांनाही डोळ्यांशी.....
बोलायच असत खुप....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

डोळ्यांची भाषा...
त्याला नाही ग कळली.....
त्याला आपल समजून....
होती ती गळली.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मनात होती एक....
गोड वेडी आशा.....
कधीतरी कळेल तूला.....
माझ्या डोळ्यांची रे भाषा....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तूझी डोळ्यांची भाषा.....
डोळ्यांना रे कळली.....
क्षणात ह्दयाची....
स्पंदन ती जुळली.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मनात काय तीच्या.....
डोळ्यातून कळत होत....
भरून आलेल्या आभाळागत....

मुकच ते गळत होत.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

डोळ्यांची भाषा.....
चरीत्र ही ग ठरवून जाते.....
चंचल की संस्कारी.....
लवणारी पापणी सांगून जाते....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

डोळे तुझे गं.....
किती ना बोलतात....
मनातील दुंःख सारी.....
पापणीआडची खोलतात....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

डोळ्यांची भाषा तूझी.....
कोड्यात रे टाकून गेली.....
खर का मी तुला....
सांग ना आवडून गेली....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

डोळ्यांची भाषा.....
तुझी आवडते रे मला.....
तू लपवलेल सार......
सांगून जाते ती मला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                          शाही....✍️✍️


डोळ्यांची भाषा....चारोळी

तुझ्या दूःखात वेड्या......
डोळा माझाही गळतो.....
मी तूझीच असल्याचा.....
अर्थ तूला  कुठेरे कळतो.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

बरी आहेस ना तू!!.....
डोळ्यांनीच तू पुसतो.....
किती रे वेड्या तू.......
मला माझाच भासतो

....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

डोळ्याची भाषा तुझी......
कळते बर वेडी......
डोळ्यात कचरा गेल्याची....
नको गं ही परकेपणाची  खेळी....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

डोळ्यांची भाषा जेव्हा....
डोळ्यांना रे समजते.....
शब्दांचे गळून पडणे.....
स्वाभावीक  हे उमजते.......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

निःशब्द नजर तूझी......
खुप काही गं बोलून गेली....
बंधनांची घालमेल......
शब्दांवाचून मांडून गेली.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तूझी वासनांध डोळ्याची भाषा....
कळते बर तीला.....
तीची झुकलेली अबोल नजर.....
सल होते का रे कधी तुला.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

डोळ्यांची भाषा कळली की....
मन लागत ना  कळायला....
अबोल राहीले ओठ तरी....
ह्दय लागत समजायला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मनातील वादळ आई......
डोळ्यातून  गं तूला कळायची......
नाही गं समजून घेणार कुणी.....
आता अबोलच ती गळायची....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

लाजून तुझी नजर.....
हळूच ती चोरून घेण.....
कीती गोड आहे वेडी.....
तुझी प्रेमाचीअशी कबुली देण.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

अनोळखी झालेली नजर.....
तुझी गेली रे छळून.....
दूरावा आल्याची ती भाषा....
आली रे कळून.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                             शाही....✍️✍️


08 July 2022

जोडीदाराची निवड......चारोळी

जोडीदार निवडतांना.....
खानदान त्याच पहावं......
संस्कार नि विश्वासाच गणीत.....
अवलंबून यावर गं रहावव.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

बाप,भाऊ,मीत्र,सखा......
या नात्यांची गं जोडीदार सावली असावा....
सुख दुःखाच्या वहीवाटेवर.....
साथ तो पावलो पावली  असावा.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

जोडीदार बोलका नसला तरी.....
माझी  बडबड गोडीने तो ऐकणारा गं असावा....
चारचौघात लव यू नाही म्हणला तरी.....
सगळ्यांसमोर अपमान करणारा गं नसावा....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

जोडीदारासोबत निर्माण झालेली......
कोडी सोबतीने सोडवता आली पाहीजे.....
खरच जोडीदारामध्ये  खरा मीत्र ही.....
बघता आला गं पाहीजे.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

साम्यतेची नको करू....
वेडी गं ओढ.....
विपरीत जोडीदाराची निवडही....
ठरते गं खुपदा गोड...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

जोडीदार शोधता जातो.....
आपण  आपल्या गरजा घेऊन.....
निवड करण्याची अपेक्षा कशी.....
जातोच जर  मागणारा होऊन....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

काही नसत योग्य अयोग्य.....
अवास्तव मानसीकता ती....
जोडीदाराची निवड करता.....
पहावी जुळवून घेण्याची मानसिकता ती....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

प्रामाणिक आणी निर्व्यसनी.....
असावा गं जोडीदार.....
संसार सुखाचा होण्यासाठी....
असते हे महत्वाचे फार.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

लग्न ही वैयक्तीक बाब......
निवड ही असावी तुझीच खरी.......
दुसर्यांच्या सल्यावर नको निर्णय......
चुक  ठरू शकते  ही मोठी बरी......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

दोष आणी गुण......
अपरीहार्य माणुस म्हणता......
हे जाणूनही जो सावरून घेतो.....
त्यालाच ना जोडीदार गणता.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आयुष्य नाही परीकथा......
लग्न म्हणजे गं जबाबदारी.....
जोडीदार निवडतांना समझ......
वास्तव नी कल्पनेतली ही दरी......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

जोडीदार निवडतांना......
पुरूषाची  पहावी म्हणे कर्तबगारी.....
रूपावर भाळू नका....
म्हणतात वडीलधारे सारी....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

जोडीदार निवडण म्हणजे.....
नाही हं स्वप्नातल्या राजकुमाराला भेटण....
जात कुळ समाजावर होत......
व्यवहार लग्नाचा तो थाटण.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

माणूस म्हणता कुणीच.....
परीपुर्ण नसतं......
जोडीदार निवडतांना......
विचार नि स्वभावाला महत्व गं द्यायच असतं....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आई बाबांची काळजी घेणारा.....
मुलगाच जोडीदार गं निवडावा....
नात्यांना जपण्याचा गुणच.....
संसार सुखाचा मांडून जावा....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

जोडीदार नियतीने.....
असतोच ठरवलेला.....
भेटीसाठी निमीत्तांचा.....
खेळ हा खेळवलेला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मनात जो असतो......
तोच नशिबात रे असावा.....
जोडीदाराच्या निवडीत....
भाग्य कधी नं रे रुसावा....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

काही क्षणात कसा ना....
जोडीदार तो निवडायचा.....
कुणाला समजून घ्यायला......
आयुष्यही कमी पडायचा....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

जोडीदाराची निवड.....
कुठे तीच्या संमतीने होते.....
व्यवहार सगळे जुळले तर....
तीचे सरळ लग्न होते....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                                शाही....✍️✍️


07 July 2022

चारोळी संग्रह....

गैरसमजांच्या बंधनातून.....
नात्याची मुक्ती कर बर......
एकदा हरवला विश्वास तर.....
फिरून पुन्हा येत नाही खर.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

इच्छा अपेक्षांच्या बंधनातून......
घेऊ याना रे मुक्ती......
निरपेक्ष निरव्याज प्रेमाची......
करूया ना मनाला सक्ती.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

काही बंधन अपरीहार्य.....
कळावं गं कळीला.......
काट्यांशिवाय फुलाच संरक्षण नाही.....
नियम निसर्गानेच हा घालून दिला......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

स्वातंत्र आणि स्वैराचार.....
यातला अंतर रे कळावा.....
बंधनातुन मुक्त होण्याचा.....
मर्म यातच रे दडावा.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

संकुचीत विचारसरणीच्या.....
बंधनातुन हो मुक्त बर.....
प्रगतीचा खरा अर्थ......
यातच दडलाय खर.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

सरणावरच होते ती.....
खर तर  रे मुक्त......

समर्पण देऊनही.....
जीवन तीच रहात रिक्त .....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

"मी'पणाच्या बंधनातून.....
मुक्त व्हायलाच ना रे हवं......
नाती जपतांना इतक......
समर्पण द्यायलाच नारे हवं.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

नकाराचा हक्क तूला.....
खर गं वेळीच कळावा.......
बंधनातून मुक्त होण्याचा......
एक मार्ग हाही ठरावा......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

अंतरमनातून नाही होणार......
तूझ्या बंधनातून कधीच मुक्ती.....
पण,दुनियादारी जपण्याची......
केलीय आता रे मनावर सक्ती......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

जीथे रोजच अग्नीपरीक्षा.....
द्यावी लागते तीला.....
अशा बंधनातुन मुक्त......
खरच होता येत का तीला.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

जो नव्हताच माझा......
आपल समजण्याची चुक केली.....
अशा एका बंधनातुन......
स्वतःलाच मुक्ती दिली.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

काही बंधनातूक मुक्ती.....
सरणावर रे भेटते.....
सोबत नसले तरी.....
आयुष्य त्यातच रेटते....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁                               शाही....



बंधनातून मुक्ती.....चारोळी

का घेऊ बर मुक्ती.....
तुझ्या वेडया प्रेमबंधातून......
मेल्यावरही प्लँनचिट शीकून......
पुन्हा घेऊन येणार्या निरागस मनातून....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

नको देऊ वेडू......
बंधनातून मुक्ती तूझ्या......
कस गं सारू नाव तूझ.....
श्वासातून बर माझ्या......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

नको असलेल्या बंधनातून....
दिली ना रे  तूला मुक्ती....
हक्काने बोल म्हणण्याची.....
नाही रे आता सक्ती....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मोहाच्या बंधातून....
घ्यावी बर मुक्ती.....
जीवनाची खरच.....
हीच आसक्ती....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

लीपी परीवारातील ऋणानुबंधातुनही ......
मुक्ती कधीच नको बरं.....
दूराव्यातूनही मन जपलेली......
माणुसकीचा हा ठेवा खरं....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तुझ्या बंधनातून सखी.....
आजन्म नाही मुक्ती.....
तूझ्यामुळे कळली मला....
लेखणीची खरी गं शक्ती....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तुझ्या आठवणिंच्या बंधनातून.....
करना रे माझी मुक्ती.....
सांग ना त्यांना नका करू....
तूला आठवण्याची मला सक्ती.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आपल्या माणसांच्या बंधनात....
आहे गं खर मुक्ती.....
त्यातच आहे बर.....
जगण्याची खरी शक्ती....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तूझ्या बंधनातून मुक्त.....
नाही रे होता येणार.....
पाण्याशीवाय माशाला.....
कसं रे जगता येगार......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

सुगंधासारख होता यावं.....
बंधनातुन मुक्त....
दरवळ दुर पसरला तरी.....
गुंतण एकमेकातच फक्त.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                        शाही....✍️✍️


06 July 2022

चारोळी संग्रह.....

रागावून मनही रचतं.....
अबोला घेण्याच रे षडयंत्र तुझ्याशी....
तु समोर येताच बघना.....
फीतूर होतो तो  कसा ना माझ्याशी.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मिठी घेता तो वेडा.....
होता खुप गं रुसला.....
हसण्यात दूःख लपवण्याचा....
षडयंत्र तीचा होता गं फसला.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

शकुनी  नी दुर्योधनाने.....
पांडवांना षडयंत्र करून लूटले बर....
पण विजय सत्याचा होतो....
शिकवण अंती भेटली हीच खर....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

ते रचत राहीले.....
नेहमी षडयंत्र तीच्यापाठी.....
जाणूनही गोड हसली ती.....
माणुसकी नाही सोडली तीने त्यांच्यासाठी....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

षडयंत्रात अडकतात....
माणस ती भोळी.....
घरघरात चालली की....
राजकारणाची खेळी....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

स्वतःची लायकी नाही.....
आल त्यांच्या लक्षात....
षडयंत्र रचून त्यांनी.....
विजय केला आपल्या पक्षात.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

षडयंत्र आहे की.....
नात्यांमध्ये ही रचलेली
आई बाबांच करतात निस्वार्थ प्रेम....
सत्य हे त्रिकालाबाधीत ठरलेली.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

षडयंत्र करून.....
जींकशील तू बर.....
पण आपल्याच नजरेत पडून....
लाचार होशिल खर....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

नियतीने ही बघना.....
षडयंत्र जणु गं रचला.....
नशीबात नसलेला तो.....
मनात येऊन बसला......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

षडयंत्र रचून......
नाही ह कुणाला फसवायचं....
पेरलेल उगवत.....
लक्षात हे असू द्यायचं.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

रचूदे षडयंत्र.....
कितीही कूणाला....
तू असशीन माझ्या मनात....

नेहमीच रेअस्तित्वाला.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

षडयंत्र नियतीही....
रचतेय रे वाटत.....
तु हवा असतांना....
अंतर का रे वाढतं....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                           शाही....✍️✍️


षडयंत्र.....चारोळी

नियतीचे ही षडयंत्र.....
कसे ना  रे जीवघेणे बरं.....
मोठे केल अनुभवांनी पण.....
, निरागसपण हीरावून घेतले खरं.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

षडयंत्र करणारी.....
आपलीच बर असतात.....
अभिमन्युच्या बलीदानात......
पुरावे आजही रे  दिसतात.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

नभातील शशीही वाटतं......
रचतोय षडयंत्र बर गं काही......

ढगाआड लपून लपून.......
खीडकीतून तो गं पहात राही....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

सहज कुठे रे घडले.....
स्वामित्व ते पुरूषाला देणे.....
युगा यूगापासून चाललेल्या षडयंत्रात....
आहे स्त्री चे ते मजबूर होणे....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

सोपा षडयंत्र आहे......
पंख तीचे छाटण्याचा बरं.....
प्रगती तीची वाढली की......
उठवतात चारीत्र्यावर तीच्या बोट हेच खरं.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कोरोना हा चिनचा षडयंत्र.....
की  होती नैसर्गिक विपदा..... 
आठवता आजही ते क्षण....
सल होते मनात रे खुपदा.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

गरीबी हा दैवी शाप....
नाही रे वाटत ना!.....
मानव रचीत षडयंत्र....
हे तुलाही पटत ना!.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

स्त्री- पुरूष भेदभाव....
षडयंत्र हा दुनियादारीचा....
कीती नुकसान यात रे.....
का कळेना मानव जातीचा.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

स्त्री- पुरूष भेदभाव....
षडयंत्र हा दुनियादारीचा....
कीती नुकसान यात रे.....
का कळेना मानव जातीचा.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                             शाही....✍️✍️


05 July 2022

चारोळी संग्रह.....

शब्दात जसा....
अर्थ असतो ना दडलेला.....
अंतरही आपल्यातला....
कळूनही  तसा न कळलेला.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

अश्रु आहेना जसा....
डोळ्यात रे लपून....
अंतर आपल्यातलं...
ठेऊ अस हं जपून ....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तु आणि मी जणू.....
नदीचे दोन  किनारे ना......
आपल्यातले अंतर आता....
कधीच न संपणारे ना.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तूझ्या माझ्यातील अंतराची.....
काय सांगू बर खेळी.....
जणू मृग आहे रे.....
कस्तुरीसाठीच वेडी....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मनाच अंतर.....
आपल्यात नसाव बर.....
मी सोबत नसताही .....
तु माझाच असावं खर.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

चातकासारख एकनिष्ट.....
खर रे होता यावं.....
तुझ्या माझ्यातील अंतराला.....
गमवण्याच्या भितीच नाव का द्याव.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

दुराव्यातही नाही संपत....
प्रेम तेच खरं.....
तुझ्या -माझ्यात असूदे...
कितीही अंतर बरं....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

पाण्याशिवाय मासा.....
जगेल का सांग बर......
तुझ्या माझ्यातील अंतराच.....
हेच असेल खर.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मेहंदीच्या पानात.....
लाल रंग लपलेला......
अंतर तुझ्या माझ्यात....
इतकाच मी जपलेला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

अंतर असावं....
तुझ्या माझ्यात रे थोड.....
भेटण्याची राहील ना....
मनात रे ओढ....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

अंतर तूझ्या माझ्यात....
नाही रे खास....
आपण दोघ माणूस....
तू विसरतो हाच फास....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

अंतर तुझ्या माझ्यात....
कस रे सांगावं.....
फुलात सुगंध इतका....
तु माझ्यात रेअसावं....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                          शाही....✍️✍️


अंतर तूझ्यात- माझ्यात....चारोळी

ऐक ना!! म्हणताच.....
तूझं बोल ना! म्हणणं....
तूझ्या माझ्यातल्या अंतराच....
कीती गोड ना रे विरघळणं....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

अंतराचीही बघना.....
कशी ती गंम्मत असते......
किती  गुंतलोय एकमेकात......
सांगण्याची त्याचीच तर हिम्मत असते....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

अंतरही मला.....
आपल्यातलं आवडून जातं.....
एकमेकांना जपण आपल.....
त्यानंतर कीती ना वाढून जातं.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

सप्तपदीत सरले होते ना.....
तुझ्या माझ्यातले रे अंतर......
का उठतात सांग मग गैरसमजांची....
वादळे ही निरंतर.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

सांगूनही कळेना.....
का रे तूला शब्द माझे....
का वाढले सांगशिल.....
अंतर तूझे माझे.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

पुन्हा  पुन्हा भेटावस वाटत तूला.....
पण बंधन तुझी का सुटतात.....
जपते तु ही मनात मला....
पण अंतर कुठे मिटतात....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

वेळ नाही म्हणत.....
संवाद आपले ते सरावे......
तूझ्या माझ्यातील अंतराला....
खरच नियतीला का  रे दोषी धरावे.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

त्या दोन डोळ्यांसारख....
अंतर तुझ्या माझ्यात.....
सोबत असूनही आता.....
भेट नाही रे जीवनात....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

शरीर नि आत्माच....
जणू आपण दोघं.....
अंतर येताच यात.....
अस्तित्वही सरेल बघ.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                            शाही....✍️✍️


04 July 2022

चारोळी संग्रह.....

शत्रूच बरे गं.....
समोरून वार  करतात....
मित्रच शत्रू झाले तर....
घाव ते विश्वासघात ठरतात....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मैत्री हे अनमोल नातं.....
पण,अपवाद असतात  ना सगळ्याला....
खुप गहन अर्थ गं सखी....
मित्रच शत्रू म्हणण्याला...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

श्वासांचा नाही रे भरवसा.....
दुरावा आला तर समजून  घेशिल ना....
मित्रच रहा शत्रू नको होऊ बर....
गैरसमज झाले तर उमजून तू घेशिल ना....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

श्वास नि स्पंदनांच्या नात्यात.....
नसतात कधीच रे बेड्या....
मित्रच तु शत्रू नाही होणार आहेच.....
इतका हक्क नि विश्वास फक्त तुझ्यावर वेड्या....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कस मांडू गणित.....
मीत्र की शत्रू बर.....
कुणी अस भेटलच नाही....
ज्याने छळल नाही खरं....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

ठरवून कुणीच......
मित्र किंवा शत्रू होत नसतो......
शब्दातून कींवा व्यवहारातून......
माणुस हा रे दुरावत असतो......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मित्रच शत्रू होऊन....
काळजात वार करून गेला....
जग होत जे नात कधी....
औपचारीकता आता ठरून गेला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

खरा मित्र कधीच....
शत्रू नाही होत बर....
स्वार्थातून केलेल्या मैत्रीचा....
अंत शत्रूत्वात होतो खर...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

नाही समजत दुनियादारी......
घरचे कितीदा समजवून गेले.....
मित्रच शत्रू झाले नि.....
पोचपावती ही देऊन गेले......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तुमचा जवळचा मित्रच....
होतो म्हणे शत्रू मोठा बर....
त्याला कळलेली असतात....
आपली  कमजोरी खर....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

शत्रूही आता....
मित्र म्हणून येतात....
बेगडी रूप असे....
घात करून जातात....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मित्र म्हणून भेटला......
पण शत्रूगत गं वागून गेला.....
खरच भरवसा नाही करायचा कुणावर....
खुणगाठ जन्मासाठी बांधून गेला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                           शाही....✍️✍️


मित्रच शत्रू.....चारोळी

मित्रच शत्रू......
होता बर वाटला......
अविश्वास नात्यात....
होता जेव्हा साठला......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मनातील गुपीत सांगण्याचे.....
असेही तोटे रे झाले.....
जवळचे मित्रच.......
शत्रू मग मोठे झाले......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

गैरसमजाने मित्राचा.....
शत्रू होता झाला.....
नशिबाने रुसल्याचा संकेत....
असाही होता गं दिला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मित्रच शत्रू.....
नाही ना वाटत खर.....
पण दुनियादारीत नात्यांच गणीत....
कधीही बदलत बर....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मित्रच तू.....
नको शत्रूत्व घेऊ बर.....
मनापासून निभावते नाते सगळे....
हे लक्षात असूदे खर....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मित्रच शत्रू.....
कसा रे तु होउन गेला.....
मैत्रीतल्या रूसण्याचा हक्क ही....
क्षणात तू गमवून दिला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

शत्रूंच्या गर्दित......
चेहरा तोही  खास होता....
सखा जो कधी ह्या.....
ह्दयाचा गं श्वास होता.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तुझ्या पेक्षा वेडू......
शत्रू गं माझे बरे......
तूला सोडणार नाही......
कितीदा म्हणतात खरे.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मित्र कसे असतील.....
दुःखात साथ जे सोडून गेले....
शत्रूच होते वाटत....
मी उगाच मित्र गणून गेले...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                              शाही....✍️✍️


03 July 2022

चारोळी संग्रह

सूर्यही करतो.....

अर्ध जगच प्रकाशमान बर....
अर्धजग अंधारात असत....
हा निसर्गनियम समज खर....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

रात अंधारेल.....
अटळ प्रवास बर.....
ज्ञानदीप  खरा सोबती....
जाण हे सत्य खर....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कधी हो तु काजवा.....
कधी होईन मी पणती.....
अंधार्राच्या जाळ्याची....
नकोच ती गणती....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

अंधाराच्या जाळ्याची.....
नाहीरे कधी केली तमा.....
तूझ्य्या सोबतीत वेड्या.....
खात्री यशाची आहे रे जमा....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

जाळून जीव जेव्हा....
केली ना मशाल....
अंधाराच जाळही....
सरल मग विक्राळ...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

होतजा बर.....
सूर्य तु कुणाचा.....

अंधाराच जाळ......
दुर करत जा जीवनाचा.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आई बाबांना पाहीलय.....
दिवा होऊन जळतांना......
अंधाराच जाळ दुर सारून.....
लेकरांच भविष्य घडवतांना.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

उन्हात काचेचे तुकडे.....
चमकतात बर.....
हिरा खरा पारखला जातो.....
अंधाराच्या जाळ्यात  खर.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तारे सदैव.....
चमकतात बर.....
पण अंधाराच्या जाळ्यातच....
दिसते त्यांचे अस्तित्व खर....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

दिव्याच्या प्रकाशाला.....
लागत अंधाराच जाळ.....
उगवतो सूर्य.....
अंधार असूदे किती काळ....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आशेचा किरण  बघ....
कशी धिटुकली पणती  देऊन गेली ....
मिळमिळणत्या प्रकाशाने....
अंधःकारातुन मार्ग  उजळवुन  गेली....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

गैरसमजही पसरवतो....
नात्यात अंधाराच जाळ....
विश्वास हरवता....
दिसत सगळ काळ....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

अंधाराच जाळ.....
मर्यादा ग त्याला.....
सूर्य उगवेल.....
कोण थांबवेल त्याला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

अंधाराचे जाळे विचारांनाही.....
लागतात खुपदा.....
श्रध्दा आणि अंधश्रध्दा यात.....
अंतर मिटतो खुपदा....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                         शाही....✍️✍️


अंधाराच जाळ....चारोळी

अंधारापाशी आहे....
लपवावपवीचा खेळ....
आतल्या गाठीच्या माणसांशी....
मन घालत उगाच ते मेळ....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

उजाडण्या आधी....
अंधार गडद होतं....

उजाडायचं थांबत नाही ....
हे उशीरा उमजून येतझ....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

ज्ञानाचा दिवा.....
तेवावा घरोघरी.....
अज्ञानाचा अंधार.....
फिरेल मग माघारी....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

भरून आले मेघ.....
जाळ निराशेच सरलं.....
थेंब थेंब पाऊस होऊन.....
मन आनंदाने भरलं....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

वेडू तुझी सोबत .....
  जणू कीरण गं आशेचा....
फीटतील अंधाराचेही जाळे.....
विश्वास होतो वेड्या मनाचा...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

अंधाराच जाळ.....
पावलो पावली असेल....
प्रकाशालाही बघ तू.....
शाप अंधाराचा दिसेल....

खर्यालाही बघ तू....
खोट्याचा आला  शाप....
भ्रष्टाचार किती वाढला....
पण सत्याचच वरना माप...

धर्माला ही बघ तू....
अधर्माचा शाप आहे ....
जाती पाती च हे खुळ...
मानवतेचा रे  अंत आहे...

नको विसरू सहासाला....
दूःसाहासाचा शाप बर...
पुसटशीही सीमा...
नको ओलांडू खर....

दुःख,निराशा,लोभ....
अवीचार अंधाराच जाळ बर...
द्रव्याच्या हव्यासापाई...
बनू नको तु पशू खर...

अंधार्याच्या या जाळ्यात....
नकोच अडकू कधी....
परतीचा मार्ग नाही यातून...
समजून घे आधी....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                            शाही....✍️✍️

02 July 2022

चारोळी संग्रह....

सुख आणी दूःख.....
येतात ग पाहुणे होऊन.....
अनुभवाची भेट देऊन.....
जातात क्षणभर राहुन.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

क्षणभराची ती नजरभेट.....
बाकी सारा मनाचा खेळ......
क्षणभराच्या या सुखात आजही.....
सरते  बर रे कातरवेळ......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

क्षणभराच्या सुखासाठी.....
कळी तो  ग कुस्करून गेला.....
क्षणभराच्या मोहात बघ ना....
माणुसकीच तो हरवून गेला...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

क्षण क्षण सुखाचा होतो.....
तु सोबत रे असतांना.....
सुख म्हणजे तूच दिसतो.....
वेड्या मनाला हसतांना....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

क्षणभराच सुख......
येतं पाहुणा होऊन....
अहंकाराची परीक्षा....
जातं बरं घेऊन.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

क्षणभराच सुखही....
विकत नाही हं घेता येत.....
दुनियादारीच हे सत्य.....
का नाही रे ध्यानात येत.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

क्षणभराच सुखच होत.....
तुझ्याशी   ते रे भेटण....
आयुष्य आता त्या.....
गोड क्षणांवर रेटण.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

क्षणभराच्या सुखाच....
मोह वेड्या मनाला.....
सुख भाग्यात असाव....
कस समजाऊ त्याला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

क्षणभराच सुख.....
म्हणून आठवेल रे तुला.....
कधीतरी जमल तर बघ.....
तुही आठव बर मला.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

क्षणभराच सुख.....
मनभर करता याव....
आपल्या दृष्टीकोनावर.....
हे सगळ अवलंबून रहाव....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                         शाही....✍️✍️


क्षणभराच सुख....चारोळी

क्षणभराच्या सुखाची....
वाटते गं भिती.....
उगाच त्याच्या ओढीत....
दूःख गाठले किती....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

क्षणभराच्या सुखामागे....
इतका गं तो धावला....
स्वःलाही नाही मग.....
कधी तो गावला.....

गावला-भेटला

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁


क्षणभराच्या सुखासाठी.....
बळी प्राण्यांची देतो.....
कसा रे माणसा तू......
इतका रे स्वार्थी होतो.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

क्षणभराच्या सुखाचा.....
मोह नाही  रे बरा.....
पाठशिवणीचा खेळ हा....
ऊन सावल्यांचा सारा....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

क्षणभर भेटत सुख......
वेडू तुला गं आठवून........
देतजा गं अशा कधी.......
आठवणी तूझ्या बर पाठवून......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

क्षणभराच्या सुखामागे.....
किती रे पळशील......
आई बाबांना वेळ दे.....
खरे सुख कळतील.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

क्षणीक सुख ते.....
जणू दव पानावर.....
अलगद निसटून जात.....
मन येत मग भानावर....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

क्षणिक सुखासाठी नको मांडू....
प्रेमाचा रे खेळ बर.....
तूझ्या ह्या खेळापायी....
उध्वस्त होतात आयुष्य खर.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

एश्वर्य आणी सुख.....
क्षणीक  इथले.....
आनंदाचे रंग म्हणता.....
उगाच जीव रे त्यात गुंतले...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

क्षणभराच सुख जणू.......
फुलपाखरु खोडकर......
निरपेक्ष असता भावना....
अलगद येऊन बसत मनपटलावर.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                           शाही....✍️✍️


01 July 2022

चारोळी संग्रह

चुकलेल्या निर्णयांचे.....
परीणाम ते रे जाणतात......
विचार करून निर्णय घ्यावे.....
उगाच का वडीलधारे म्हणतात.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

किती अशा प्रश्नांना......
सामोर ना जाव लागत......
चुक की बरोबर ठरवण्यासाठी.....
निर्णय आधी घ्यावा लागतो.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

घेतलेला निर्णय कधीच.....
चुकीचा नसतो रे बर.......
फक्त तो बरोबर आहे.....
हे सीध्द करण्याची जीद्द हवी रे खर....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

शंकेची पालच ती......
घात करून गेली......
निर्णय चुकीचा ठरणार म्हणत......
ती निर्णय घ्यायचच राहुन गेली.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

निर्णय चुक की बरोबर......
नको हा विचार आधी......
अनुभव भेटेल की आत्मविश्वास.....
हे निर्णय घेतल्यावर कळतरे कधी......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

अहंकाराशी मैत्री.....
चुकीचा निर्णय ठरते बर.....
हा निर्णय चुकीचा......
संगतीत याच्या हे कळत नाही खर.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

सुंदर विचारांऐवजी.....
सुंदर चेहरा आवडून गेला......
हा चुकीचा निर्णय.....
आयुष्यभर मग रडवून  गेला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

रागात घेतलेला निर्णय....
चुकतो रे बर.....
पश्चाताप होऊन....
सलतो मग खर ....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

निर्णय घेतांना.....
चुक नको रे व्हायला....
आजन्म राहील....
सल ती  सलायला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

निर्णय निर्णय असतात बर....
चुक की बरोबर....
हे वेळ आणी अनुभव....
ठरवते ना खर....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                             शाही....✍️✍️


चुकीचे निर्णय.....चारोळी

निर्णय चुकला म्हणून......
माणूस नसतो वाईट बर.....
परीस्थीती कधी कधी.....
टाकते अशाही प्रसंगात खर.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

क्षणभंगुर भावनांच्या ओघात.....
निर्णय नको घेऊ बर......
आयुष्यभर टोचत रहातील......
कठोर वाटत पण आहे खर......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

सोडून जाण्याचा निर्णय.....
शब्दातच रे होता खर......
मनातुन आठवणी......
कधी जातात का सांग बर.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

वेडू तु सोबत असता.......
नसते ग कसली भीती......
निर्णय चुक की बरोबर.....
प्रश्न असू दे मग किती.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

चुकीच्या निर्णयाविरोधात....
आवाज जो उठवतो.....
अस्तीत्व आपल तो.....
असही रे वठवतो....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

ठाम रहायला शिकाव.....
निर्णय चुकला तरी.....
स्वतःवर असला विश्वास तर....
सुरुवात कुठूनही करता येते खरी....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

चुकतात नियती.......
तूझे ही निर्णय बर.......
नशिबात नसलेल्यावर......
का ग प्रेम जडत खर......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

चुकीचे असतात.....
निर्णय ते सारे..........
स्वार्थ नी लोभाचे.....
विणलेले ना ज्यात दोरे.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तुझा कुठलाच निर्णय.....
चुकीचा नसतो बर.....
मला वेळेवर पटत नाही....
हे माझच रे चुकत खर......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                              शाही....✍️✍️


आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...