20 February 2022

चारोळी संग्रह... 20/2/2022

एक सुंदर स्वप्न....
वेड रे लावून जातो....
डोळे मीटताच स्वप्नी येऊन....
मी तूझाच गं  म्हणून तो जातो...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁


काही स्वप्न शेष आहेत....

त्यासाठी रे जगतेय....
सावल्यांच्या खेळात बघ ना....
नियती कशी हरायची वाट बघतेय....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

स्वप्नांच्या ढिगार्यात.....
किती स्वप्न रे गाडली जातात....
कर्तव्य नी दूनियादारी जपता....
कितीदा रे ती जाळली जातात....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

सुंदर स्व्प्न आहे....
तुझ्या हसण्याच रे कारण व्हायचय...
शेवटच्या श्वासापर्यंत....
तूझच रे आहे रहायचं....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

असचं रे राजा तूला.....
हसतांना रे पहायचं.....
जीवनाच सुंदर स्वप्न....
सोबतीने तूझ्या जगायच....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

येईल ग भेटायला स्वप्नात....
असे तो बोलून गेला....
जागरणाला पूर्णवीराम....
आहे ग तो म दिला...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

स्वप्न हे कधी कधी....
खरच हवे वाटते.....
सुटलेल्या हातांना भेटण्याच....
हक्कांच ठीकाण गाठते...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

जीवन हे आशेवरच....
जगायचे रे असते.....
अपूर्ण राहणार्या ईच्छेलाच....
स्वप्न म्हणायचे ना असते.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

एक सुंदर स्वप्न....
रोज आता पहाते...
आईने चालाव घरभर....
मनात एकच रहाते....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

एक सुंदर स्वप्न....
वाटत रे पडाव.....
पतंग होऊन कधी....
नभात स्वच्छंदी उडाव....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                    शाही.....✍️✍️


सुंदर स्वप्न... 20/2/2022

सुंदर स्वप्न
शाप अपूर्णत्वाचा
मोह मनाचा

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

माझं एक स्वप्न.....
डोळ्यात त्याच्या लपलेल....
ऋणानुबंध अस गोड......
मनाशी मनाचं जपलेल.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

माझ्या शब्दफुलांना.....
मनामनात ग जपल जावं....
या सुंदर स्वप्नाने.....
डोळ्यांच्या पालखीत रोज गं याव.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

न भेटणार्यांबरोबर ही.....
स्वप्नात मैफील ना रंगते....
स्वप्नांची ही जादूच ग.....
मोह स्वप्नांचा पाडते....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

एक स्वप्न आई.....
लेकरांच्या सुखाच रोज बघते....
प्रार्थनेतही आपल्या ती....
शंभरदा  हेच मागते....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

एक सुंदर स्वप्न....
जातीभेद,लींगभेद संपून रे जावा....
माणसाने माणसापरी...
माणूसकीला जपून घ्यावा...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

समजून घेतली जाईल ती.....
स्वप्न रोजच पडलेलं....
उद्या होईल पुर्ण म्हणता....
रोजच तीला छळलेलं.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

खुप आहेत रे स्वप्न.....
कस धाऊ स्वप्नांच्या मागे....
चंद्रमौली झोपडी माझी.....
राजमहालाचे स्वप्न न भागे....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

हाताच्या ओंजळीत....
स्वप्न किती रे रेखाटलेली....
मुठ घट्ट आवळून ही....
होती रे खूप सांडलेली....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आपलं ते सुंदर घर....
नाही रे नुसत्या भिंती...
जगण्यासाठी वीणलेल सुंदर स्वप्न...
रहाव सलामत प्रार्थना रे मनामंधी...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

एक सुंदर स्वप्न....
असही जपल बर....
अबोल आपल प्रेम...
स्वप्नात तरी खुलाव खर....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                      शाही.....✍️✍️


19 February 2022

चारोळी संग्रह.....19/2/2022

त्याग आणी बलीदानातून....
रीत प्रेमाची निभवून गेले.....
नमन माझे शहीद जवानांना.....
पूलवामा हल्यात जे शहीद झाले....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आला  होता ग भेटायला....
I 💖 U म्हणून गेला....
प्रेम जतवायची औपचारीकता....
स्वप्नात येऊन तो निभवून गेला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

व्हँलेंटाईन  डे ला......
सांगीतले होते मनातले.....
नियतीचे खेळ सारे....
आले ना ध्यानातले....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

व्हँलेंटाईन डे ला....
नचुकता तू रेआठवतो....
व्हँलेंटाईन म्हणता.....
आजही का मनात साठवतो....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तूझ्या सोबतचा....
क्षण नी क्षण रे.....
असतो व्हँलेंटाईन डे....
जाणतो ना मन रे.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

व्हँलेंटाईन डे...
प्रेमाचा ग दिवस....
चल करूया......
आपणही नवस....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                     शाही.....✍️✍️


व्हँलेंटाईन डे...19/2/2021

व्हँलेंटाईन होते संत.....
प्रेमीयुगलांसाठी सत्तेशी लढलेले....
आजच्या दिवशीच होते....
शिक्षा म्हणून फाशीवर चढवलेले....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

माझ्या मुखात कवळी....
तूझ्या हाती रे काठी....
देऊया ना वचन राहू......
तेव्हाही व्हँलेंटाईन एकमेकांसाठी....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

रोज म्हणते रे I💖U....
दिवस नाही पहात खास.....
फक्त या क्षणांना सुंदर बनवण्याची....
होती मनात आज आस....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

ह्दयाच्या कोंदणात....
नाव तूझ जपलेल.....
तूच माझा व्हँलेंटाईन.....
तूझ्या माझ्यात रे लपलेल.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

खरा व्हँलेंटाईन कळण्यासाठी....
प्रेम काय ते कळायला हव....
अव्यक्तच गोड ही भावना.....
भावनांच्या बाजारात नको हिला हरायला हव....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

काळजी घ्यायची आजन्म तूझी....
होऊ का गं तूझा.....
आठवणीत जपलाय पहीला व्हँलेंटाईन डे....
तो खास तूझा आणी माझा....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

वाचलय रे राजा....
डोळ्यात तूझ्या प्रेम ते अव्यक्त....
होशील ना माझा व्हँलेंटाईन....
होकाराची आस राहील फक्त...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

प्रेम म्हणजे काय रे....
अनोळखी तो आपलासा ना वाटणं....
क्षणभराची नजरभेट नी......
अनेक जन्मांची ओळख ना पटणं...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

अधीर आहे रे प्रेम.....
आज व्यक्त व्हायला....
देना काही क्षण सोबतीचे....
भेट म्हणून रहायला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कर्तव्य आणी प्रेमामध्ये....
कर्तव्य नेहमी उजवी ठरली....
खूप प्रेम करते तूझ्यावर....
सांगायच होतं पण वेळ ती हरली...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

व्यक्त करायला प्रेम....
दिवस का रे खासच हवा.....
तू माझा आहे म्हणता....
तो क्षण माझा व्हँलेंटाईन डे व्हावा....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                                शाही.....✍️✍️


18 February 2022

चारोळी संग्रह.... 17/2/2022

खर खोट प्रेम....
नाही मला समजत....
एक क्षण ही राजा मला.....
तूझ्या शीवाय नाही रे उमजत....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

खर प्रेम एकनिष्ठ असत.....
हे ही तीतकच खर.....
नाही रे कमी होत कधी.....
कितीही वीरह येऊदे बर....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

खर प्रेम असेल तर....
कधी नाही ना रे सरत....
शब्दावीन कळतं सार....
शब्दांची गरज नाही रे  उरत....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

हजारो चुका माफ करतं.....
तेच तर ना प्रेम खर.....
त्याग ज्याची परीभाषा....
कस कमी होईल ते बर.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

प्रेम खर ते अबोल.....
जाणीवेतून जाणवून जातं.....
कस कमी व्हाव रे ते.....
अमरत्वात ते गणल जातं.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

अव्यक्त राहूनही.....
कमी कुठे होत.....
त्याग आणी समर्पण....
खर प्रेम देत....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

खर प्रेम आईच.....
कूठे ग सरत......
लेकर किती चुकली तरी.....
नेहमी कवेतच धरत....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

प्रत्येक दुआमध्ये.....
सुख त्याच मागण असत....
खर प्रेम असही.....
न भेटता जपण असत....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मनाची मनाला.....
भाषा ती कळते.....
प्रेम कमी नाही होत.....
पण विरहात जळते....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

प्रेम केलय मी....
व्यवहार नाही केलेला.....
मी करते म्हणून तु कराव....
प्रेमाला नाही असा स्वार्थ आला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

ते तीन जादूई शब्द....
म्हणशील का तू कंधी....
मी ही जपून ठेवलेय ते....
ह्दयाच्या आत मंधी....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कस कमी व्हाव....
प्रेम ते खर माझ....
तूझ्या नावानेच आता....
होत रे ओळखण माझ....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

प्रेम आहे खर तूझ्यावर....
नाही रे कमी होणार.....
प्रत्येक श्वासात स्पंदन.....
फक्त तूझच नाव घेणार....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                         शाही....✍️✍️


खर प्रेम..... 17/2/2022

देशील ना रे साद....
तुझ्या खर्या प्रेमाची....
सरणावरही राहील आस....
कमी न ती होण्याची...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

खर प्रेम माझ.....
नाही रे होणार कमी.....
सावली होऊन असेन सोबती....
श्वासांची नाहीना देता येत हमी....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

नदीने जीवन अर्पण करता....
सागर तो  रे विशाल झाला....
अस्तीत्व एकमेका विलीन करता...
खर्या प्रेमाला ना अर्थ आला.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आहे रे खर प्रेम.....
जगाला नाही ते समजायच.....
कमी जास्त कस ना मांडू.....
शब्दांना नाही रे उमजायच....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आयूष्यभर बघशील का वाट....
खर प्रेम रे म्हणता....
विसरणार तर नाही ना....
दुनियादारित या रमता...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

दिव्याच्या वातीलाही....
खर प्रेम ना कळलेल....
तेलाच्या साथीशीवाय....
नाही रे ते जळलेल.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

सगळ्यांना कुठे जमत....
जीव ओतून प्रेम करणं....
खर असल तरी ही....
हव ना ते नशीबात असण....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मान अपमानाचा खेळ.....
नसतो रे खर्या प्रेमात....
विसरल नाही जात फक्त.....
रहाता याव रे ऐकमेकांच्या मनात.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

खर्या प्रेमाची कसोटी.....
नाही रे राजा कळलेली....
अश्रृतून व्यक्त होणार्या तूझ्या प्रेमापूढे....
आहे रे मी  राजा हरलेली....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

खरे प्रेम ते
समर्पणात आहे
त्याग ते आहे

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                        शाही..... ✍️✍️


17 February 2022

चारोळी संग्रह....17/2/2022

काळजाला गारवा....
मिठीत तुझ्या रेअसतो....
कधी तुझ्या डोळ्यातही....
हसतांना तो दिसतो....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मिठीत तू घेता.....
स्पर्श सारे  रे हसले होते.....
व्यक्त होता आज.....
शब्द नी अश्रृ थकले होते....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आठवणींची मिठी....
किती ना गोड असते.....
दुरावलेल्या नात्यांचीही.....
भेटीची ओढ त्यात असते.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

वादळे मनातील.....
अशीही सावरली जातात.....
भेटण अशक्य असता.....
शब्दमिठीनेही आवरली जातात....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

चुकीची शीक्षा म्हणून.....

मिठीत त्याला  ग घेण असतं....
या गोड शीक्षेसाठी म.....
उगाच  पून्हा  पून्हा चुकणं असतं.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

संस्मरणीय आजही......
नजरमिठी ती पहीली.....
हरवली तेव्हाच तूझ्यात....
कुठे माझी मी राहीली....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

सखीने दिलेली मिठी.....
गोड क्षणांनी भरलेली असते.....
बालपणीचे छान क्षण.....
डोळ्यातून गाळलेली असते....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

अब्बांची मिठी खरच.....
जादूची झप्पी असायची....
चिंता आणी संकट....
क्षणात त्या मिठीत विरायची.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आई तुझ्या प्रेमळ मिठीला......
नाही ग जगात तोड.....
माझ्या सुख दुःखांना नेहमी......
राहते तूझ्या मिठीची ओढ....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

घेऊन मला मिठीत.....
शांत करना मनाला.....
भेटण आता कठिण.....
समजाऊन सांग त्याला......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

वीजांचा तो कडकडाट....
आणी घाबरून मिठीत तूझ शीरण....
संस्मरणीय आहे आज ही ती मिठी....
आठवणीत त्या आजही हरणं....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

किती ग बडबड तूझी....
शांत ही राहत जा.....
मिठीत येऊन कधी....
स्पर्शालाही बोलू देत जा....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

प्रत्येकच मिठी तूझी....
संस्मरणीय असते.....
मनातील वादळ मिठीत तूझ्या....
क्षणात वीसरून बसते....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁


त्याची ती मिठी.....
विसरायला लावते सगळ....
सोबती आहे ना मी....
स्पर्शातून सांगणच वेगळ....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁



मीठी ती .....
खुप काही ग देऊन गेली......
मनात असलेल्या प्रश्नांना....
अबोल उत्तर ठेऊन गेली...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁






तुझ्या  हदयाची स्पंदन....
नाव माझं घेतात.....
मिठीत तूझ्या शीरता....
आजही ग्वाही देतात....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁


मिठी.... 17/2/2022

सांजवेळ  बहरते.....
सूर्य  मावळतीला  जातांना.....
सखी अलगद मनीचे गूज खोलते....
हळू मिठीत येतांना....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

एक क्षण पुरेसा होता ...
त्या नजरभेटीचा ...
स्पर्शच होता जणू....
तुझ्या गोड मीठीचा....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

ती वेळ  छान होती .....
पहीली भेट  जी घडली होती ...
गुलाब देता देता तु....
नजरमिठीत जडली    होती ...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

उशीर तूला झाला की.....
ठरवते तूला रागवायच......
तू मिठी घेताच वेड मन.....
बघ ना कस फितूर वागायच....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मिठी असते संस्मरणीय प्रत्येक.....
एक कशी ती सांगावी.....
प्रत्येक मिठी खूप काही बोलते......
उमजून घेण्याची रीत गं जाणावी.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कधी कधी नीयतीची....
वाटते रे भिती.....
आलच मरण तर.....
चुकू नये तुझी मिठी....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मनकवडा आहे गं......
उन्मळून पडतेय सांगाव नाही लागत...
अलगद मिठीत भरतो.....
आधार कधी मागावा नाही लागत....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

प्रत्येक श्वासाला.....
भेट तू घेशील का......
आजन्मासाठी कैद.....
मिठीत आपल्या करशील का....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

प्रत्येक श्वासाला.....
भेट तू घेशील का......
आजन्मासाठी कैद.....
मिठीत आपल्या करशील का....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आज तो तरू गं.....
कवेत मला ही घे म्हणला.....
देईन तूला छाया.....
कुर्हाडीचे घाव थांबव म्हणला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                         शाही.....✍️✍️


16 February 2022

चारोळी संग्रह...16/2/2022

पाण्याशीवाय मासा.....
नाही ना रे जगत.....
तूझ्या शीवाय अस्तीत्व माझे....
मी नाही रे बघत....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मेहदींच्या पानामध्ये.....
लपलाय ना जसा रंग....
तसाच आहे ना.....
तुझा माझा संग.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तू आणी मी.....
जणू नदीचे दोन कीनारे.....
भेटणे असूदे किती कठीण....
सोबती असू आजन्म ना रे....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मी शब्द.....
तू आहेस अर्थ....
एकमेकांशीवाय.....
दोघेही ना व्यर्थ....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तु आणी मी.....
संसार रथाची चाके दोन.....
सुख  स्वप्नील जीवनाची स्वप्ने रंगवू.....
चल समजून घेऊ एकमेकांचे मन.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तू श्वास....
मी स्पंदन....
नेहमी जपू....
हे ना बंधन....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                      शाही.....✍️✍️


तू आणी मी...16/2/2022

तू रे छान कवी....
मी तुझी रे कवीता.....
जाणवते शब्दा शब्दात....
तूझी प्रेम सरीता...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

बुबुळाची काळजी.....
पापणी  घेतेना जशी.....
मी ही  घेईन काळजी.....
संगनी होऊन तुझी अशी...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मी होते रे शून्य......
जमा तूझ्यात रे झाले.....
जीवनाच्या गणीताचे....
उत्तर सहज  म आले.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मी तुझी रोहीणी....
तु माझा रे शशी.....
तुझ्या निस्वार्थ प्रेमाला....
मी वीसरेन   रे कशी....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

नयन आणी ज्योती......
संगतीला आहे जसे.....
वचन चल देऊना......
तु आणी मी राहू असे....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तू आणी मी.....
नेहमी रे असे असू.....
डोळ्यात लपलेले....
जसे ना आसू.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मी अवखळ पतंग.....
तू माझा मांजा....
नेहमी सावरशील मला...
विश्वास  राहील साजा...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

शींपला होऊन.....
जपेन गं तूला.....
मोती होऊन तू.....
राहशील ना संगतीला.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तू हो पूढे....
मी आहे मागे बघ.....
लढायच तुला एकलीला संकटांशी....
अशा बोलणार्यांपासून जप....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तू कप आणी.....
मी रे तुझी बशी.....
तूझ्या ओतलेल्या रागाला....
मी सामावून घेईल अशी....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

चल ना सुई दोरा होऊ....
तू आणी मी.....
उसवू देणार नाही  परीवार.....
देऊ हीच रे सगळ्यांना हमी....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                    शाही....✍️✍️


15 February 2022

भेट.... 15/2/2022

देशील का एक भेट.....
मला तू अशी....
मन भरून पहायचय....
तुला रे   शशी....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आवडते मला ती प्रत्येक भेट.....
उगाचच मला जेव्हा चिडवत असतो....
भेट लांबावी म्हणून अशी ना....
वादाची खेळी घडवत असतो...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आजही आवडतं का रे तूला....
मला ते चोरून बघण......
भेटीसाठी किती वेळ.....
खीडकीत तात्कळत उभ ठाकणं....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

माहेरच्या माणसांची....
भेट नेहमीच माझी आवडीची.....
उन्हामध्ये भागलेल्याला....
जशी कदर सावलीची....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मला आवडते म्हणून......
अब्बांनी आणलेली अंगठी.....
आवडती भेट म्हणून....
असायची नेहमी संगती...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

त्याचा मँसेजही....
माझी आवडती भेट गं.....
शब्दन शब्द उतरतो.....
त्याचा मनात थेट गं.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तूझ आयूष्यात येण....
नीयतीची भेट गोड....
आवडीने जपलेली....
आजही तूझीच ओढ....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तू दिलेला गूलाब....
आजही जपलेला....
आवडती तूझी भेट म्हणता.....
मनात आजही लपलेला.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

ती भेट आवडती...
आजही माझी.....
म्हटला होता तू.....
होशील ना माझी....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                          शाही....✍️✍️


आवडती भेट... 15/2/2022

भेट म्हणून नको रे......
आता तू देऊ काही.....
तूच माझा म्हटल्यावर.....
जगात नाही रे शील्लक काही.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

माझी आवडती भेट....
तू दिलेल" शाही "नाव....
या नावातच जपलय.....
तुझ्या माझ्या प्रेमाच गाव....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

माहेरच्या वाटेवरच्या......
सगळ्याच भेटी गं आवडतात.....
संसाराच्या राहटगाड्यात.....
कधीतरी सवडीने त्या घडतात....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

दुनियादारीच्या खेळात.....
गोतावळा रे सरत गेला.....
आवडत्या सगळ्या भेटी.....
आठवणीत गीरवल्या गेल्या....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

एकमेकांचे प्रतीबिंब.....
एकमेकांच्या डोळ्यात दिसावे....
सांग ना असे आपण....
कधी ते भेटावे......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मी आहे ना,काळजी नको.....
मँसेज गं ठेऊन जातो....
अशी आवडती काळजीची भेट....
खुपदा ग तो देऊन जातो....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

माझी आवडती भेट....
मनात तुझ्या रे दिलेली जागा....
नाही रे तुटू द्यायचा आता....
हा प्रेमाचा रेशीम धागा....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

रोज काही क्षण....
भेटीसाठी गं ठरवलेले....
त्याच्या या भेटीतच.....
जगणे माझे गं हरवलेले....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

माझी आवड आणी आवडीची भेट....
सख्या रे तूच आहे.....
तूच ये ना रे भेट म्हणून.....
माझयासाठी खूप आहे.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

माझी आवडती भेट.....
आहे ना ठाऊक तूला.....
मनसोक्त तुझ्याशी गप्पा.....
दुसर काही नको म मला.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                      शाही.....✍️✍️


14 February 2022

चारोळी संग्रह...14/2/2022

उन सावल्यांच्या खेळात.....
वचन एकत्र रहाण्याच देशील का....
उन कितीही आल तरी सावली मी होईल....
विश्वास हा सख्या तू घेशील का....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तु ईमानाने एकत्र राहण्याचे.....
वचन आपले पाळशील ना......
आयुष्यभर वाट पाहीन तुझी......
वचनाला मी ही जागेल जाणशील ना....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

देशील ना वचन.....
एकत्र रहाण्याचा.....
सुख दूःखात असं....
समजून घेण्याचा.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

एकत्र राहण्याच वचन....
देईनच मी तूला.....
तूला ही हव हेच....
एकदा सांगशील का मला...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

विश्वास आणी प्रेमाची.....
असावी नात्यात संगत......
एकत्र राहण्याच्या वचनात......
बघ कशी येईल रंगत.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

जमेल का तूला......
रामा सारख लेक ते व्हायला.....
वचन पुर्ततेसाठी......
रामराज्य सहज सोडायला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

नेहसी एकत्र रहाण्याचे वचन....
सप्तपदीत त्याने दिली.....
कधी हुंडा,कधी वंशाचा दिवा......
कारण ही देता पुर्तता नाहीच केली.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

वचन देऊनही होत....
अपरीहार्य जाण....
नियतीच्या खेळाशी....
नाही जमत भांडण....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                     शाही....✍️✍️


वचन....14/2/2022

नेहमी एकत्र रहाण्याचे वचन.....
अलीखीतच असते मैत्रीत.....
अपेक्षा नसतात ग या नात्यात......
नेहमी म्हणून गणतात खात्रीत....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁



एकत्र राहण्याचे वचन देतांना....
एकच रे सांगायचे होते.....
सुख.माझे तूझ्या ओंजळी धरतांना...
दूःख तूझे सारे पदरी मागायचे होते....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मनात जपू गं एकमेकांना.....
एकत्र रहाण्याचे वचन नीभवण्यासाठी....
सांग ना या जगाला...
नका न लागू आमच्या पाठी.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

एकत्र राहण्याच्या वचनाने......
खरच नाती बांधली का जातात....
सप्तपदीची सर्व वचने......
घटस्फोटात का दबली जातात....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

वचन आणी भेट नसली तरीही
नेहमीच एकत्र असतात
माझ्या लीपी परीवारातील 
ऋणानुबंध कसे ना हसतात

येणार्या प्रत्येक वादळाला
प्रार्थना तुमच्या पळवून लावतात
किती मोठा आधार तुमचा
मांडाया शब्द ही थीटे पडतात

आपल्या माणसांना कधी
धन्यवाद नसतं ना म्हणायच
ऋणात नेहमीआहे मी  तुमच्या
शब्दातून होत हो सांगायचं

खुप खुप धन्यवाद लीपी परीवारातील सगळ्यांनाचा.अमूल्य प्रार्थनांनी नेहमीच आपण मला साथ दिलात.नेहमीच ही साथ अशीच राहील ही अपेक्षा.काळजी घ्या आणी स्वस्थ रहा.🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏🙏

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

एकत्र रहाण्याच वचन.....
शब्दांना रे मागीतलं......
चारोळ्यात बसतांना.....
त्यांनी ही होकार  म सांगीतलं...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

त्या डोळ्यांसारखा शाप.....
आला ना रे आपल्याला.....
नेहमी एकत्र राहण्याचे वचन पाळले....
पण विरहाचा कधी न  रे तो अंत झाला....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

एकत्र राहण्याच वचन.....
उगाच श्वासांकडून मागत बसले.....
ते ही सख्यासारखे होते....
वेडू म्हणून खुदकन हसले....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                           शाही.....✍️✍️


13 February 2022

पहिल प्रेम... 13/2/2022

हेच असाव का पहिले प्रेम
पहा तुम्हा ही पटत का....!!
पहाता त्या अनोळखीला
वाढणारी ह्दयाची धडधड का?
वळून त्याला पहाण्यासाठी
बंधनातील मनाची होणारी
ती जीवघेणी तळमळ का....!!
दिसावा दारावरून जातांना
म्हणुन दार आणी खीडकीत
लपून ते पहाता पहाता
क्षण क्षण झुरण का.....!!
त्याला आवडत असेल
म्हणून न आवडतही
जपून ते धरण का.....!!
अव्यक्त राहूनही
सुख त्याच मागण का...!!
भेटणार नाही कधीच तरीही
क्षण क्षण त्यासाठी
जीवघेण तात्काळण का...!!
त्याला आठवता येणार
खोडकर हसू का.....!!
मनामध्ये कल्पनेत रमून
होणारा तो गोड संवाद का....!!
त्याच्या आनंदात चेहर्यावर
येणार निस्वार्थ हसू का...!!
दुःखात त्याला पहाता
गळणारा अबोल तो आसू का...!!
सुख दुःखाच्या हिंदोळ्यावर
हवा हवासा वाटणारा
भावनांचा गोड खेळ का....!!!
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
                         शाही  ✍️✍️

प्रेम.. 13/2/2022

प्रेम म्हणजे काय.....
होता गं पुसून गेला.....
ह्दयाची स्पंदन दाखवता.....
मिठीत घेता हसून गेला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

ती वेळ  छान  होती....
मनात खुप काही  घडत होतं ...
प्रेमात आपण एकमेकांच्या...
हळूहळू  कळत होतं...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आई तूझ्या  सोबतीतच.....
प्रेमाचा खरा अर्थ  आहे....
अपेक्षा  आणी गैरसमजूतींनी.....
नाते  होतात का ग व्यर्थ  आहे .....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁


आहे का रे मी....
आजही तूझ्या ध्यानात....
पहिल प्रेम म्हणता.....
आजही तूच मनात.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁




शब्दात कुठे रे.....
सगळ ते सांगता आल.....
प्रेम होत तूझ्यावर पण....
हक्क कुठे रे मागता आलं....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁



आहे तशीच त्याने स्वीकारली....
हीच माझ्या प्रेमाची खासीयत....
म्हणूनच त्याच्या नावे......
माझ्या ह्दयाची ग वसीहत.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁


प्रेम म्हणू की फरीश्ता म्हणू तूला....
कळत नाही रे कंधी....
गोड संवेदना जागवली प्रेमाची....
तुच रे राजा लपला या मनामंधी....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁


ठरवून कुठे रे......
प्रेम ते केल जातं.....
चोरपावलांनी कुणी येऊन....
आजन्म मनात राहुन जातं....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁


पहिलं प्रेम...दुसर प्रेम.....
असं खरच रे नसतं....
गोड अशी ती रे भावना.....
व्यवहाराच्या क्रमवारीत बसत ते नसतं....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁


साधारण होते मी....
खास तु बनवून गेला....
तु ते पहिल प्रेम.....
विसरणं न झाल तुला...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

माझ्या शब्दफलांची साद......
खरच तुझ्या मनाला भीडते.....
तुच माझ पहिल प्रेम....
कुठे रे तुला कळते...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

माझ्या शब्दफूलांची साद......
खरच तुझ्या मनाला भीडते.....
तुच माझ पहिल प्रेम....
कुठे रे तुला कळते...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कितीदा नव्याने पडते......
पहिल्या प्रेमाच्या प्रेमात.....
अव्यक्त असला तरी.....
राज्य त्याचच आजही मनात....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

पहिल प्रेम म्हणता.....
का रे तु आठवाव......
का कुणाला मनाने.....
आपलं म्हणता साठवाव....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

पहिल प्रेम म्हणून.....
जपलय तुला ध्यानात.....
नव्हत जे नशीबात....
तेच राहील मनात....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

माझ पहिल प्रेम.....
आहेस रे राजा तू.......
जगण नाही तुझ्याशिवाय.....
जाणतो ना हे तू.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                         शाही....✍️✍️


12 February 2022

तो गुलाब .....13/2/2022

काट्याविन गुलाबाचा......
कोमलपणा व्यर्थ ना रे...
जीवनात सुख दूःखाला....
सोबतीने अर्थ ना रे...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

गुण दोषांसकट.....
याव एकमेका जपता....
काट्यावरील गुलाबाला म्हणून....
प्रेमाच प्रतीक ना म्हणता....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आजही तो  जुना गुलाब....
आहे रे वहीत जपून.....
तुला माझा म्हणतांना....
द्यायचा होता लपून....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

नोट्स म्हणता कसा ना तू.....
गुलाब लपवून दिला होता.....
तूझा तो खोडकरपणा.....
मनाला आवडून गेला होता.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

जुना तो गुलाब.....
सुगंध आपला जपून आहे.....
खरच का आजही मी.....
मनात तुझ्या लपून आहे....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कुस्करणार्यालाही सुगंध द्यावा.....
जुना गूलाब तो सांगून गेला....
त्यागातच खर प्रेम.....
जणण्यातून रे मांडून गेला.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कुस्करणार्यालाही सुगंध द्यावा.....
जुना गूलाब तो सांगून गेला....
त्यागातच खर प्रेम.....
जणण्यातून रे मांडून गेला.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तुझ माझं नात......
आहे भावनांशी जुळलेल....
जुन गुलाब जपतांना....
तुला ही ना कळलं....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तुला पहाता तो गुलाब....
होता गं स्वतःवर रुसला.....
तो सुंदर असल्याचा भ्रम....
होता गं त्याचा फसला.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

जाणते प्रेमाला असतो......
विरहाचा रे शाप ना.....
तरी जपून ठेवलाय.....
तो जूना गुलाब ना......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

काट्यांनसोबत राहूनही.....
कसा ना गोड असतो.....
त्या जुन्या गुलाबात......
आज ही भास तुझाच गं हसतो.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

सांगावा तूझ्या  अबोल प्रेमाचा....
ज्याने तो दिला होता....
हो तो जूना गुलाब....
मी जपून आजही ठेवला होता....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तू दिलेला गुलाब....
आजही वहीत लपलेला.....
आपल्या प्रत्येक पाकळीत....
असंख्य आठवणी जपलेला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तो जूना गुलाब.....
तु ही का जपलेला.....
आठवतं देतांना तो....
किती होता न घाबरलेला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

गुलाब गं म्हणे तो.....
प्रेमाच  आहे ना प्रतीक....
काटे विरहाचे येतील....
परीक्षा प्रेमाची घेतील....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

खुप गुलाब दिलेस तू.....
त्या गुलाबा नंतर....
जुना झाला तरीही नाही....
दिले मी त्याला अंतर...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तो जूना गूलाब.....
आस मनाला देऊन जातो......
तुही जपल असेल मनात.....
भास गोड ठेऊन जातो....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                        शाही.....✍️✍️


तो जूना गुलाब....13/2/2022

आला होता गं तो वेडा....
घेऊन आज गुलाब.....
जातो म्हणता म्हणता.....
राहीला गं मनात.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

जुना तो गुलाब कधी....
निरखून तू पाहीला का रे....
माझं ह्दय आजही....
तुझ्या कडेच गहाण ना रे....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

सख्या तुझ्या प्रेमावीन.....
ओंजळ माझी रीकामी रे.....
जुन्या त्या गुलाबाने जपली....
अधुरी प्रेमाची कहाणी रे....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

नाहीरे प्रेमात असं......
हरण आणी जींकणं असत.....
गुलाब तो देता......
आजन्माची साथ मागणं असतं....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

जुना तो गुलाब.....
सय तुझी देतो.....
मनाचा पसारा.....
पसरवून जातो.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

द्यायचा आहे रे तुला गुलाब.....
काटे सगळे वेचून.....
इच्छा आहे एकच मनात....
ठेवेन तूला जपून.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

किती रे वाट बघावी......
येना रे आता भेटायला.....
जुना तो गुलाब आता......
लागलाय क्षण क्षण सतवायला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

जुना झाला तो गुलाब.....
दारावर तू जो होता ठेऊन गेलेला.....
तुझ्या अबोल प्रितीचा सांगावा.....
सुगंधातून होता तू देऊन गेलेला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

जपुन ठेवलेला पहिला...
गूलाब आज तुलाच देते....
एकदा पून्हा  प्रेमवेडी ....
सख्या तुझी रे होते....


🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

जपलाय का रे तू......
तो जुना गुलाब मनात.....
देतांना ज्याला म्हणली होती....
हवा रे तुच..........जीवनात.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                         शाही...✍️✍️


07 February 2022

चारोळी संग्रह.... 7/2/2022

बालपणीच्या आठवणीत आठवता का....
धपाटे शाळेत न जाण्यासाठी पडलेले....
आज त्याच शाळेच्या आठवणीत....
अश्रृ किती ना गळलेले....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

बालपणीच्या आठवणीत.....
आई ती स्वस्थ नी निरोगी दिसली.....
वयोपरत्वे आलेले परावलंबत्व पहात....
मनात होती फास रेफसली....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

बालपणीच्या आठवणीत.....
एक गोष्ट छान होती.....
निरागस त्या मनाला.....
दुःखाची कुठे जाण होती....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

बालपणीच्या आठवणीत....
जपलाय ना रे तो पाऊस....
ती होड्यांची गंम्मत....
आणी भीजण्याची ती  हौस....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

बालपणीच्या आठवणीत......
सखींसोबतचे खोडकर क्षण.....
त्या गमती जमती आठवता....
हुरहुरते भेटीस  गं मन.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

बालपणीच्या त्या आठवणी......
गुपीत गोड सांगून गेल्या.....
आयुष्याच्या पुस्तकाचे बालपणच.....
आनंदाचे पान  रे म्हणून गेल्या.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

किती गोड होतं ते.....
कट्टी सो च जगण......
दोष गूण सर्व विसरून....
निरागसपणे वागण.. ...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आठवणी त्या बालपणीच्या....
हव्या हव्याश्या वाटतात.....
कितीदा ही आठवा....
त्या नव्या नव्याश्या वाटतात....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

बालपणीचा क्षण क्षण....
आहे रे गोड आठवण.....
मनात जपलेली आजही....
सगळी ती साठवण....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

बालपणीच्या आठवणीत....
हरवल निरागसपणाच परीस....
उगाच पडलो ना.....
मोठं व्हायच्या भरीस....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

बालपणच आहे....
गोड ती आठवण.....
मनात जपलेली.....
आजन्माची साठवण....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

बालपणीच्या आठवणी.....
किती ना रे गोड.....
सरता सरत नाही.....
कधी त्यांची ओढ.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                  शाही.....✍️✍️


बालपणीच्या आठवणी....7/2/2022

आठवते ती खोडकर आठवण.....
प्रगती पुस्तकावर मारलेली बाबांची ती खोटी सही....
होमवर्क नाही केला म्हणता आठवते....
घरी राहीलेली ती वही....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

बालपणीच्या आठवणीत.....
चीऊ काऊ म्हणता आईच ते भरवणं...
पंचपक्वान कीती खाल्ली पण.....
नाही रे ती सर येण....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आठवतो ना कोल्डड्रिंकच्या झाकणाला....
दोरी बांधून केलेला बिल्ला....
आजही हवासा वाटतो...
किनार्यावरचा वाहून गेलेला तो किल्ला....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

भातुकलीचा तो खेळ.....
खुपदा रे मांडून पाहीला....
बालपणासारखा आनंद....
नाही रे आता घेता आला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

बालपण तर हरवल....
पण तो खोडकर पणा जपूया....

वेळेलाही अशी कधी.....
खोडकर शिक्षा  देउ या....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कैरी आणी बोर म्हणे.....
स्वतःच आता गळून जातात.....
नेम मारून तोडणार बालपण.....
मोबाईल मध्ये हरवून जातात.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

बालपणाचे किस्से आठवता.....
ओढ बालपणाची लागली.....
मोठे होऊन काय कमावले म्हणता....
होती रे वजाबाकी जागली....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                    



कळलं का आजही रे.....
ह्या बालपणीच्या प्रश्नाच उत्तर....
रात्रभर गळणारा पाऊस......
शाळेच्या वेळी कसा होतो शांत नी नीरूत्तर....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

बालपणीच्या आठवणीत जाणवले.....
खेळभावना कुठे तेव्हा कळायची.....
हरणं -जींकणं बाजूला ठेऊन.....
मैत्री कशी ना सहज ती जींकायची.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

बालपणीच्या आठवणीत
अपेक्षा,व्देश,जातीभेद नव्हता यांचा लवलेश
आता कळले चुक काय ते
का वाढता  मोठेपणी रे क्लेश

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आठवतो का रे तो प्रश्न....
मोठं झाल्यावर काय ते व्हायचे?.....
उत्तर आता चल सांगू सगळ्यांना....
बालपण आहे रे पून्हा जगायचे....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

बालपणीच्या आठवणीत आठवता का....
धपाटे शाळेत न जाण्यासाठी पडलेले....
आज त्याच शाळेच्या आठवणीत....
अश्रृ किती ना गळलेले....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                        शाही.....✍️✍️


06 February 2022

चारोळी संग्रह....6/2/2022

मनातील भावनांचा.....
नाही रे तूला किनारा केला....
जरी तू भेट शेवटची....
होता ना देऊन गेला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

ऐकना!.....
एकदा भेटायच आहे रे तुला....
पहीली की शेवटची भेट.....
निर्णयाचा हक्क दिलाय रे तुला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आठवते अजूनही.....
ती शेवटची भेट.....
अबोला तुझा काळजात.....
भीडला होता थेट...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

अब्बांची आणी ताईची भेट......
शेवटची ती घडलीच नाही.....
संसार करण्यासाठी माहेर दुरावण्याची.....
रीत आजही कळली नाही....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कोरोना मुळे किती भेटी.....
शेवटच्या त्या ठरून गेल्या....
किती हात हरवले.....
आठवणी त्या उरून गेल्या....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

शेवटची भेट.....
  शाळेची आणी माझी.....
बालपण तीथे हरवल्याची पाऊलखूण....
आहे रे आजही ताजी....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

ती शेवटची भेट.....
आठवते का तुला....
येईल मी लव कर.....
म्हटला होता मला.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

ती भेट शेवटची......
आस ठेऊन गेलेली.....
भेटू कधीतरी म्हणता......
जगण्याच ध्येय होऊन गेलेली....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

ती शेवटची भेट......
आणी वळून तुझ पहाण.....
कळल होत मला तूझ.....
अस माझ्यात राहणं.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

ती शेवटची भेट.....
आणी काळजी घे म्हणण.....
कस बर विसराव.....
त्या क्षणात थांबल जगण.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                   शाही.......✍️✍️


शेवटची भेट.....6/2/2022

आवडेल मला शेवटचा श्वास....
मिठीत तुझ्या रे घ्यायला....
तू सुखी रहावा हीच सदीच्छा असेल....
तेव्हा ही  रे  द्यायला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

शेवटची भेट  माझी.....
घेशील का तु अशी....
तु मी आणी....
सोबतीला नभातला शशी....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

येऊन भेट ना त्या वळणावर....
सोडून जीथे तू होता गेला.....
तुझीच आहे रे आजही मी....
वचन  सर्व तु का विसरून गेला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

नाहीरे आठवावी वाटत.....
नातेवाईकांनी दिलेली ती शेवटची भेट....
परीस्थीती बदलता....
अबोला देऊन अपरीचीत झाले थेट...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कुठली भेट शेवटची....
आयुष्यात कस सांगायच.....
प्रत्येक भेटीला आनंदाने.....
का नाही मनसोक्त जगायच....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

शेवटच्या त्या भेटीचा....
मनात  होता कालवा....
डोळ्यातला पाऊसही....
होतो रे  म हळवा...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

का रे पाणवतात डोळे तूझे....
प्रत्येक आपल्या भेटीवर.....
जीव ओवाळून टाकते  रे....
निरपेक्ष तुझ्या या प्रितीवर.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

येईल गं स्वप्नात.....
भेट  तूझी घ्यायला.....
राहीलेली मिठी.....
घट्ट अशी द्यायला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

भेट ती शेवटची......
का म्हणून गेलास तू......
डोळ्यातील किनार्यांचा साकव.....
सहज मोडून गेलास  तू....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

नाही रडायच ठरल होत ना....
शेवटच्या त्या भेटीत.....
अश्रृंनीच घेतले पण.....
कसे एकमेकांना मिठीत.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कुठल्याही भेटीला.....
शेवट हा शब्द लागू नये....
नियतीने अपरीहार्य केल्याशीवाय....
नातं कुठलही टाकू नये....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                      शाही.....✍️✍️


05 February 2022

स्वतःसाठी उभे नाही गं चुकीचे...5/2/2022

बोलणारा जर आपल्या मर्यादा....
वीसरून जात असेल.....
उलटून उत्तर देणे त्याला....
योग्य गं पर्याय असेल....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

लढायच आहे स्वतःसाठी.....
बळ तू होशील ना.....
व्यक्त होतांना शब्दच नाही.....
अर्थ ही समजून घेशील ना.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तुच आहे वेड्या माझ......
व्यक्त होण्याच हक्काच ठीकाण....
चुकते खुप समजून घेतो तू.....
आहे रे तुझ्या निरपेक्ष प्रेमाची जाण....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कधी तरी स्वतःसाठी......
लढुन तु पहा.....
तुझ कोण कळेल क्षणात.....
अस ही जगून पहा......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

स्वतः साठी कुठे तो बोलतो....
काळजी सगळ्यांची करत असतो....
बाप,भाऊ,मुलगा,पती होऊन....
शांत  राहून का तू स्वतःला छळत असतो....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

शांत राहण्याला तुझ्या गं.....
अगतीकता म्हटली जाते......
हव तीथे व्यक्त व्हाव.....
अस्मीता ही जपली जाते.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

स्वाभीमान आणी अभीमान.....
फरक यातला घे समजून.....
स्वतःसाठी उभ राहतांना.....
गल्लत नको हं घे उमजून......
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

शांत राहणे योग्य नाही.....
व्यक्त होउन बघ गं कधी.....
समजून घेतील तूझे आपले....
नसावी मनात गमवण्याची भीती....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मांडली असती बाजू माझी.....
पण खर तुला समजले असते.....
बोट तूझ्याकडे वळता पाहून....
मार्ग तू का बदलले नसते.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तुझ्या नजरेतून स्वतःला.....
योग्य अयोग्य ठरवत गेले.....
स्वतःसाठी उभे रहायला हवे.....
पण अस्तीत्व असे हरवत गेले.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

वेळेवर स्वतःसाठी.....
याव गं लढण.....
शांत राहण ही होत.....
स्वतःला ते छळण....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

नाही गं चुकीच.....
स्वतःसाठी लढण....
योग्य नाही अस.....
चुक पाहून शांत पडण...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

योग्य अयोग्य काय.....
वेळीच ग कळाव.....
नको तीथे शांत राहण.....
नेहमी गं छळाव.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

खुप प्रश्न अशी...
शांत राहील्याने सुटतात.....
शब्दाला शब्द वाढता....
नाती ग तुटतात.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                  शाही.....✍️✍️


शांत राहण योग्य नाही....5/2/2022

चुकीच नसतच गं.....
स्वतःसाठी उभ राहणं....
मत तूझ मांडतांना.....
दुखवू नये मन  बर हे पहाणं.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

शांत राहण योग्य नाही.....
हे आहे नक्कीच खर.....
पण शब्दांचे अर्थ योग्यच घेतील....
याची शाश्वती नाही बर...

बोलू की नको बोलू.....
दंद्वात ती नेहमी असते.....
स्वतःसाठी लढण्याच गणीत....
यातच तीच फसून बसते.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

बोलू की नको बोलू.....
दंद्वात ती नेहमी असते.....
स्वतःसाठी लढण्याच गणीत....
यातच तीच फसून बसते.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

स्वतःसाठी उभे राहणे......
जमलच नाही कंधी.....
सगळे माझेच म्हटल्यावर.....
कसं याव मना मंधी....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

बोलूनही गैर अर्थ ......
निघत असेल शब्दातून......
अशा ठीकाणी शांत रहाव......
शिकले मी जगण्यातून.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

व्यक्त हो संयमच शेवटी तो......
कधीतरी संपायचाच......
पण तुझ्या मानसीकस्थीतीचा.....
खेळबर गं तोवर व्हायचा.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कुंपण शेत खाण्याला......
तुझ शांत राहणच जबाबदार....
वेळीच व्यक्त हो.....
हो की खबरदार.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

समाजाच्या भीतीने......
नाही योग्य गं शांत राहण.....
स्वतः साठी लढ की.....
किती तो स्वतःचा अंत पहाणं.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

शांत राहून ही कधी कधी.....
स्वतःसाठी लढता येते.....
नाते जपता जपता असे.....
मन ही जींकता येते.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

शांत राहून ही कधी कधी.....
स्वतःसाठी लढता येते.....
नाते जपता जपता असे.....
मन ही जींकता येते.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

बालकडु दिले जाते तीला......
नेहमी समजून घेण्याचे.......
स्वतःसाठी लढणे म......
वाटते तीला चुकीचे......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                   शाही......✍️✍️


04 February 2022

गळलेली पाने....4/2/2122

का रे हसतोस फुलपाखराला.....
फुलांवर अलगद बसता पाहुन....

तु घेतला मनाचा ताबा माझ्या.....
अर्थ हाच ना त्यात राहून राहून...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

माळी त्या बकुळीला....
किती ना रे जपत होता....
सुगंध ओरबाडू नये कुणी.....
भीती तीची तो का जाणत होता...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

भुतकाळाला मागे सारत.....
भविष्याकडे नजर रोखून पहायचं.....
गळलेल्या पानांच सांगण....
बागेतल्या फुलांना हेच रे रहायचं....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

फुलपाखरातील  ते बदल....
टिपत होती फुले मोजतांना....
बदल आयुष्यात गरजेचा....
नियम ती होती जपतांना....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तु दिलेल्या गुलाबाची सर....
कुठल्याच फुलाला नव्हती....
मोजली खुप फुले पण....
एकही भरली मनात नव्हती....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

बागेतला तो मोगरा मनात असूनही.....
पहाता कानाडोळा रे करून गेला.....
तुझ्या रूसव्याचा भास असा....
क्षणभर तो ठेऊन गेला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मोजता फुले बागेतली....
निष्पर्ण चाफा मोहून गेला....
पानांनी साथ सोडताही....
होता ना तो बहरून गेला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मोजता बागेतली फुले......
सांडलेला तो पारीजातक......
रीते होण्यातला समृध्दपणा.....
मी राहीले रे बघत.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

बागेत फुले मोजतांना म्हणे......
मोगर्याला स्वप्न रंगांची पडली.....
खोड त्याला असमाधानी राहण्याची....
माणसाची होती वाटत जडली....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आवडायची ना तुला....
बागेतली अबोली....
तु सोबत नसता.....
ती तुझगं पुसून गेली....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

बागेत भरलेली......
फुले होती रे मोजायची.....
पडलेली पानच का.....
तुला साद द्यायची....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

बागेत भरलेली फुल.....
जणू तुझ्याशी बोलायची....
उगाच त्यांना मोजता तू.....
गूपीत मनाचे खोलायची.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

गळलेल्या पानांचे.....
दुःख कुणा कळले.....
आपल्यांशी दुरावल्याचे......
दुःख होते त्यांना छळले.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

नको मोजू तु......
गळणारी पाने.....
तुला दिसतील त्यांची....
तुटलेली मने.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                        शाही.....✍️✍️


बागेतली फुले...4/2/2022

तु लपवलेला मोगऱ्याचा  गजरा....
गुपीत सारे  खोलून गेला....
अबोल प्रितीचा सांगावा असा....
सुगंधात तो ठेउन गेला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तूझा दिलेला अबोलीचा गजरा....
सवयीचा झालेला....
नसला माळलेला तर वाटतं....
तूच दूर गेलेला.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तूझा दिलेला अबोलीचा गजरा....
सवयीचा झालेला....
नसला माळलेला तर वाटतं....
तूच दूर गेलेला.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

सुख दुःखाची मांडणी......
बागेत  बघ ना कशी.....
कुठे बहरलेली फुलांची ताटवे.....
कुठे गळणारी पाने अश्रृच जशी.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

नको मोजू पडणारी पाने.....
तो तर अनुभवांचा सडा.....
किती उन वारे झेलले......
किती सहली असेल रे पीडा....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

बागेतल्या सदाफुलीचे....
होते ग डोळे पाणवलेले.....
सुंगध नाही म्हणता तीला....
कितींनी ग हीणवले....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

हिरवा,पांढरा, पिवळा चाफा....
होता बागेत भरलेला.....
तूझ्या हस्याच्या रंगछटा.....
होता जणू तो पांघरलेला.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

बागेत भरलेली फुले मोजतांना.....
रातराणी ती रे हसली होती.....
नभातल्या शशीला पहाता.....
उगाच ती लाजली होती....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

अबोली शाल अबोल्याची......
का नात्यांना जपण्या तू पांघरली....
फुले मोजता खुपदा तू......
का ग असते गांगरली....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मोजता फुले बागेतली गुलाब.....
लपंडाव सुख दूःखाचा मांडून गेला....
पाकळ्या गळून पडतात गं....
काटा सोबती राहून गेला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                            शाही....✍️✍️


03 February 2022

वेदना कुठे सरतात.... 3/2/2022

कळतो रे आजही तू.....
दूर असा  होऊन.....
मी ही होते त्या गर्दीत जीथे....
खोटंच हसत होता तु राहून राहून....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

सांगूनही नाही कळत....
जीथे  कुणा वेदना....
खोट हसून का ग लपवाव्या....
अशांसाठी तु संवेदना....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कुठे रे कमी पडले.....
तुला ते जपतांना.....
वेदना होता मनाला......
  पहाता तूला खोटे हसतांना....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मुर्ख बनवल गर्दीलाही रे......
खोट्या त्या हसण्याने.....
वीरहाच्या वेदना  लपवता.....
त्रास होतो स्वतःलाच  रे फसवण्याने.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

खोटे खोटे हसता.....
तो विदूषकही वेदनांनी रे रडलेला....
अभिनय छान म्हणता.....
टाळ्यांचा पाऊस  होता गर्दीत रे पडलेला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

गर्दीलाही मुर्ख......
खोटं हसून बनवाव लागतं......
वेदना नाही सरत पण.....
दुनीयादारीला असही जपाव लागतं.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

खुप कठीण बर.....
वेदना लपवुन खोट हसणं....
त्या गर्दीतहीआपल्या माणसाला....
नाही होत तरी फसणं.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

खुप छान अभिनय तीचा....
गर्दीला मुर्ख बनवायचा....
खोट  ते हसून....
उगाच वेदना लपवायचा....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

नको गं हसत जाऊ.....
इतक तू खोट.....
अश्रृंनाही होतो भार....
वेदनेच ते मोठ.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

वेदना नाही ग कमी होत....
खोट तुझ्या हसण्यात.....
खुपदा दिसतात .....
झाकतांना तूझ्या डोळ्यात.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

वेडू तूझ खोटं हसणं....
गर्दीला मुर्ख बनवायच....
गुपीत तूझ वेदना लपवायच....
मला वेदनेत टाकुन जायच....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

खळखळून हसायची ती.....
गर्दीला मुर्ख बनवण्यासाठी.....
वेदना याने का कमी होतात......
यायच्या त्या डोळ्याकाठी......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                       शाही......✍️✍️


खोट हसू.....3/2/2022

आवडेल मला तुझ्या चेहर्यावर च.....
ते  रे हसू व्हायला......
तुझ्या सर्व वेदनांना.......
स्वतःत  असं सामावून ते घ्यायला.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

खोट हे हसणं.....
अपरीहार्य रे जगण्यासाठी.....
वेदनेचा त्रास नको आपल्यांना.....
म्हणून असाव नेहमी ते गाठी....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

ओठावर मांडते ती.....
खोटी हसरी कहाणी.....
ह्दयात दडवते ती.....
व्यथा अनामिक केवीलवाणी....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कस ना रे आयुष्य......
कधी झुरत  जगावं लागतं....
मनात वेदना लपवुनही.....
खोट  खोट हसाव लागत....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

डोळ्यात पहाता तुझ्या......
दिसतो गं ओलावा नात्यांसाठी......
चेहर्यावर खोटे हसू आणी......
मनात जपला कोलाहल म कुणा गं साठी......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

नाही ना रे संपली......
आपुलकी ती आपल्यातली.......
गर्दी असल्यागत  खोट हसलास......
का वेदना ती लपवून नेलीस......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

गर्दीलाच नाही तर ती.....
दुःखाला ही फसवत असते.....
खोटे हसण्यामागे जाणो.....
किती वेदना रिचवत असते....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

सासरी निघतांना लेक.....
खोटे खोटे हसत होती....
तीच्या मनाची ही घालमेल....
आईला रे डसत होती..

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

गर्दीत ती विधवा वेदना लपवत....
खोटे खोटे हसत होती.....
प्रश्नार्थक त्या नजरांमध्ये तरी.....
ती निर्लज्यच रे गणली होती....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मंडपातील गर्दीत तो.....
खोट खोटे हसत होता.....
पाठवणी करायची  लेकीची.....
वेदना  त्या उगाच लपवत होता.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

समजून घेशील ना रे......
गर्दीत खोटे हसता डोळे गळले तर.....
इभ्रतीवर गालबोट उठवले.....
म्हणणार नाही ना असे कळले तर.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                          शाही.....✍️✍️


02 February 2022

हायकु,चारोळी संग्रह... 2/2/2022

प्रकाश तो सुरवातीचा......
होऊया का आपण सारे......
मुळासकट भ्रष्टाचाराची कीड काढुन.....
भ्रष्टाचारमुक्त करून देशा अभीमानाचा सुर्योदय.... देऊ या कारे.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आवडेल ना!आशेचा किरण तो व्हायला.....
त्या निरागस स्त्री भ्रृणासाठी......
अंधश्रध्देची काजळी घालवून.....
नवीन जीवनाला सुर्योदय देण्यासाठी.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

जमेल  का आशेचा किरण व्हायला....
एका अबला निर्भयासाठी....
वासनाहीन कुविचाराला नष्ट करून....
जीवनात नविन सुर्योदय देण्यासाठी....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

एक आशेचा किरण.....
भेटावा गं माझ्या गरीब बळीला....
दुष्काळाच सावट जाऊन......
सपान  सुखाचं पडाव मनाला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आवडेल मला आशेचा प्रकाश....
तुझा रे व्हायला.....
नवीन जीवनाचा सुर्योदय....
संगतीने तूझ्या पहायला.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

सुर्योदय जीवनाचा.....
वाटतो व्हायला ना हवा.....
सुर्योसारख जळणही....
म यायला  रे हवा...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तो प्रकाश ना
उजाडले संकेत
संपली रात

तो प्रकाश,ना
आशेचा दिसावा तो
भेटावा रे तो

तो प्रकान ना
सुर्योदय असावा
रोज दिसावा

तो प्रकाश
उमेद जगण्याची
हो जपण्याणी

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आशेचा किरण आहेस तु.....
हे सांगायला लाजले....
सुर्योदय आणी सुर्यास्त जीवनाचा....
सोबतीने तूझ्या व्हावा स्वप्न हेरे जागले....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आशेचा किरण आहेस तु.....
हे सांगायला लाजले....
सुर्योदय आणी सुर्यास्त जीवनाचा....
सोबतीने तूझ्या व्हावा स्वप्न हेरे जागले....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तु सुर्य माझा.....
मी धिटुकली पणती तुझी....
उन सावल्यांच्या खेळत....
होईल संगती तुझी....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                       शाही...✍️✍️


मुखवटा.... 2/2/2022

विषय ईतका छान
आशेच्या प्रकाशाचा
तुझा खेळ थांबेना
कमी रेटींग करण्याचा
जप बर हात तुझे
पेरशील तेच उगवेल
त्रास देण्यात समाधान कस
विकृत बघ हं कुणी म्हणेल
काय तुला बोलावं
संस्कार ज्याचे त्याचे
घडले असते चांगले तर
सुचले नसते वागणे असे
नाही आवडत साहीत्य
आग्रह नाही च वाचायचा
विनाकारण त्रास नाही
रे असा द्यायचा
बाकीच्या समीक्षकांना
नाही का रे समजत
ऐकली असेल गोष्ट
एका अशा मुर्खाची
संमारंभात व्हाव
नावाचा घवघवा
म्हणून पिण्याच्या पाण्यात
लघुशंका केल्याची
तुच ठरव तुझ नाव
कस मोठ करायच
योग्य अयोग्य काय
स्वतःला नक्की विचारायच
मन तूझ दुखा़वल
माफ कर मला
समजून घेशील शब्द
आशा आहे मला

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                         शाही.....✍️✍️

01 February 2022

आनंदी राहण्याची इच्छा....1/2/2022

आपल्यांच्या उपेक्षेत......
होती रे वर्ष सरत गेली.....
आनंदी  रहाण्याच्या इच्छेने.....
अशी ही जगवून नेली.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

काळ  आणी वर्ष......
बदलू दे ना सख्या किती.....
बदलत नाही श्वास नी स्पंदनाच नातं....
नसावी ना कधी बदलण्याची तुला भीती....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

जगले रे.....
आनंदी रहाण्याच्या ईच्छेवर....
ऊन सावल्यांच्या खेळात...
सगळच घेत नाही रे मनावर....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

काळ बदलला....
वर्ष ही सरली....
आठवणीत क्षण क्षण....
आहे रे ती उरली...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

काळ बदलला.....
वर्ष गेली.....
तुझ्यात रमण्याची सवय....
नाही रे बदलू दिली....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

जाणतो ना जगले.....
आनंदी राहण्याच्या इच्छेवर....
तु होशील कधी माझा....
या भास आणी भ्रमावर....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आनंदी राहण्याच्या .....
इच्छेवरच  रे जगले.....
नीयतीलाही फसवलं.....
म्हटले नाही गं मी थकले....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

इच्छा आहे.....
आनंदी राहण्याची.....
काळ बदलला तरी.....
स्वप्न तूझे पहाणयाची.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आनंदी रहाण्याच्या....
ईच्छेनेच जगवले.....
वेळ काळ बदलला पण....
तु कुठे मनवले....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁


काळ आणी वर्ष.....
असतात बदलण्यासाठी....
जपल होत तूला.....
आनंदी राहण्यासाठी.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁


आनंदी रहाण्याच्या ईच्छेवर.....
सहज रे जगलेली.....
नभातल्या शशीलाही.....
आपल उगाच मानलेली....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁



आनंदी राहण्याच्या....
ईच्छेवर जगले.....
आठवणी तूझ्या....
नेहमीच  स्मरले....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                           शाही....✍️✍️


चारोळी संग्रह आणी हायकु...1/2/2022

तुझ ते अव्यक्त प्रेम.....
जपलय रे मना मंदी....
तुला पहाता सुखात....
जगले रे मी आनंदी....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

काळ बदलला....
वर्ष गेली....
आवड आजही तुच रे वेडू...
ती नाही हं  बदलली....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

एकच  रे इच्छा होती.....
आनंदी ती रहायची.....
इच्छेवर जगेल म्हणता.....
किती रे परीक्षा स्वतःचीच घ्यायची....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

काळ बदलला....
वर्ष सरली.....
तीला गृहीत धरण्याची खोड....
आहे आजही गं उरली.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

काळ बदलला.....
वर्ष सरली.....
अनुभवांची शिदोरी....
घट्ट आहे धरली.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

बदलला तो
काळच तोअसेल
तो बदलेल

बदलला तो
स्वभाव का असवा
असा नसावा

बदलला तो
निसर्गाचा नियम
ठेव संयम

बदलला तो
खोडकर सखा तो
छळतो  गं तो

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

काळ बदलला.....
वर्ष ती गेली......
बालपणींच्या आठवांनी.....
मन आजही गहीवरली.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

नियती आणी इच्छेचा.....
मिटला असता दुरावा.....
आनंदी असल्याचा म.....
द्यावा लागला नसता पुरावा....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

दिलं होत ना वचन तुला.....
नाही कधी रडणार.....
आनंदी राहण्याच्या इच्छेवर जगले....
पण का तुला कधी का कळणार.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

काळ बदलला.....
वर्ष ही गेली....
माणसातील माणुसकी....
यात हरवुन गेली....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                           शाही....✍️✍️


आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...