नियतीचा खेळ तो.....
कसा ना रे टळणार.....
पल्याडच्या त्या पाऊसात....
आठवणी तुझ्या रे छळणार...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
आठवणिंच्या खेळामध्ये ....
नेहमी डाव माझ्यावर असतो....
कळूनही न कळण्याचा तुझा....
जुनाच तो भाव असतो....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
भाव सारे आज.....
कागदावर सांडले.....
कितीदा समजावले तरी.....
तुझ्या भेटीसाठी भांडले....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
जुने भाव ....
नव्याने ग मांडावे....
जगरहाटीचे खेळ ...
किती समजावून ग सांगावे
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही.... ✍️✍️