लेक म्हणे कोण तर....
आईची ती सावली असते.....
बापाच्या इभ्रतीची जाण....
तिला पावलो पावली असते....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
लेक माझी ती.....
जणू हसरी कळी....
खूडू नये कुणी....
जाणीव ही ग छळी....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
लेक राणी देवी ती....
तरीही डोळा पाणी रे....
सारेच तीचे असूनही....
का परकेपणाची जाणीव रे...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
बापाच्या खांद्यावरच ओझ....
कमी या आनंदात नवरी लेक ग हसली....
जगरहाटीच्या या खेळात कशी....
सोनूलि ग माझी फसली...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही.... ✍️✍️