सांगना चंद्रा मी.....
शोध तुझा कसा घ्यावा.....
तुला छंद चांदण्यात रमण्याचा.....
आणी मला सोबती तुच हवा....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
आवडेल तूला.....
माझ्यात रे रमायला....
शोधता स्वतः ला....
माझ्यात गुंतायला.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शोध घेता स्वतःचा.....
पसरलेल आयुष्य आवरत गेले ....
पाऊलखुणा तूझ्या वळणावळणावर होत्या....
त्यातच मी म हरवत रे गेले....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
कशी रमशील स्वतःत....
सुगंध होऊन श्वासात....
माझ्या गं वसली गालावरील ....
खोडकर खळी कशी तुझी हसली...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शोधता स्वतः ला.....
रुसवा तुझा भेटून गेला ....
अबोला तूझा असा.....
जीवघेणा होऊन गेला....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
तुझ्या माझ्यात आता ....
शोधत नाही स्वतःला.....
चंद्र ही हसून म्हटला.....
तूझ्याशीवाय तो बघे ना कुणाला....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
मी माझ्यात रमावे....
सहज कुठे घडते....
माझे अस्तीत्व....
तूझ्यातच रे अडते....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
रमावे कधी
माझ्यात मी का रे
छान ना वारे
तुझ्यात मी का
शोधावे ते स्वतः ला
प्रश्नच मला
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही.... ✍️✍️