24 January 2022

विश्वासघात... 23/1/2022

धन्यवाद विश्वासघात......
भेट म्हणुन देण्यासाठी.....
विश्वास विचारपुर्वक करावा.....
अनुभवातून गाठी बांधण्यासाठी.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तुटलेला विश्वास आणि निघुन गेलेली वेळ....
नाही ना येत परत....
तुटलेला आरसा दुरूस्त नाही होत....
हे सत्य नाही रे सरत....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

श्वास आणी स्पंदनाच नातं आपलं.......
आहे ना जीतक खर....
प्रेमात ही होईल विश्वासाची परीक्षा....
मी आहे सोबत घाबरू नको बर....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

विश्वास पाया जगण्याचा....
का रे ठरावा कुचकामी......
कधी तडकेल आरसा विश्वासाचा.....
दूनियादारीत याची नाही रे हमी....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तुटलेला आरसा......
दाखवतो चेहरा विद्रृप......
दुरूस्त नाही होणार आता....
बदलल त्याने स्वरूप.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तुटतो विश्वास जेव्हा.....
आपल्याच माणसा कडून....
घाव नाही भरत कधि हा....
राहतो सल करून....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

नाही रे कधि नात्यातला.....
विश्वास तो तुटावा जणु.....
तुटलेला आरसा नाहीरे....
कधी तो जुळावा.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

नेहमि करावा.....
विश्वास कुणावर.....
विश्वासघातातच ओझ.....
रहात मनावर.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

काच च जणु भरोसा.....
जप तु त्याला....
एकदा तुटला तर......
पुन्हा नाही दुरूस्त झाला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

सगळ्यात मोठा गून्हा....
आहे विश्वासघात....
केलेल्या विश्वासाला....
नको देऊ आघात.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

देवत्वालाही कूठे......
परीक्षा विश्वासाची चुकली....
एका परीटाच्या बोलावर....
सीता रामाला मुकली.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                         शाही.....✍️✍️


चारोळी संग्रह आणी हायकु... 24/1/2022

आवडेल मला तूझ्या विश्वात येऊन.....
विश्वास तूझा रे व्हायला.....
पण, नियती आणी श्वासांनी....
नको न दगा द्यायला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

विश्वास हा श्वास नात्यातला.....
कळत का  नाही कुणाला.....
आपलेच करतात विश्वासघात तेव्हा.....
कठीण होतं  खुप सावरायला मनाला.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तुटलेला हा
विश्वास च असेल
तोच फसेल

तुटलेला हा
आरसा ही ना होता
फरक होता

तुटलेला हा
मनाचा तो आरसा
घात हा कसा

तुटलेल हे
जोडायच नाही आता
खोडलं जाता

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तुटलेला विश्वास आणी  आरसा......
यावर दाखले द्यावे किती ....
जीथे कुंपणच शेत खाते .....
तिथे सांगावी कुणा बर ही भिती...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कितीदा होतो विश्वासघात पण.....
विश्वास करण्याची सवय नाही ना रे सुटत.....
माणुसकी नाही संपणार कधी.....
आस ही नाही ना रे तुटत.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

पुराण काळातही नाही रे......
तुटलेला आरसा दुरूस्त झाला.....
अग्नीपरीक्षा देऊनही तीला......
नसता ना  म वनवास आला.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तुटलेला आरसाही गुणधर्म.....
प्रतीबिंब दाखवण्याचे जपून घेतो.....
माणुसकीचा गुणधर्म विसरुन...
सांगना मानवा तु विश्वासघात कसा करून घेतो...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

सांगना नभातल्या शशी......
का ठेवावा तुझ्यावर विश्वास.....
चांदण्या आणी रोहीणीचा....
कसा रे तु एकाचवेळी खास.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तुटलेला आरसा नाही होत दुरुस्त.....
कटुसत्य हे जगण्यातल रे खर.....
विश्वास तु ठेव प्रामाणीकपणे प्रत्येकावर.....
विश्वासघात करणारा झुरावा पश्चातापात बर....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आज तो आरसाही......
कोड्यात असा टाकुन गेला......
श्वासाचाही नाही गं क्षणभर विश्वास.....
तु घाट हा अविश्वासाचा का म्हणे घालून दिला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

प्रेम आणी विश्वासाचा.....
कुणाच्या नको घेऊ रे फायदा.....
तुटलेला आरसा नाही होत दुरूस्त.....
हाच आहे विश्वासासाठी ही कायदा....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                           शाही....✍️✍️


23 January 2022

चारोळी संग्रह... 23/1/2022

कवेतही तुझ्या ......
अश्रृ  तीची गळली....
अबोल निशेच्या हुंदक्यातली....
वेदना तूला कधी न कळली...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आवडते मला गं....
नजरेआडुन तुझे ते बोलणे....
जणु सूर्याने ढगाआडून....
लाजत प्रभा गं सांडणे...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मावळलेला दिवस आणि .....
निशा, यायचा अवकाश....
तुझ्या  आठवांचा सुरू होतो......
पाठशिवणीचा खेळ  खास.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

निशा आणि  प्रभा.....
सोबती   आठवणींना  तूझ्या....
संध्याकाळी  वाट पाहील....
येशील भेटीला  ना माझ्या ....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

निशा असो की प्रभा सोबती .....
शब्दांच्या दुनियेत वेड मन रमतं.....
जाणतो ना तुझ्या  विरहात  मला....
कुठे काय रे जमतं.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

नभातला शशी......
राती राती जागतो.....
सांगना निशा तु सोबती त्याची.....
अर्थ  तुला त्याचा का गं लागतो.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आठवणी तुझ्या.....
निशेला सोबती करून जातात....
प्रभा आली भेटीला तरीही....
ह्या  पाऊलखुणेत राहतात.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

ती निशा आणी शशी....
सोबतीला असतात.....
तूझे भास जेव्हा ....
उगाचच माझ्याशी हसतात.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

निशा ती सोबती येता....
नवे स्वप्न  देऊन जाते.....
प्रभा ही त्यांना पुर्णत्व  देण्यास....
आशेचे सुर्यकिरण घेऊन  येते....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

विरहाच्या  त्या क्षणी....
निशा होती सोबती.....
वाहणारे अश्रृ  आणी.....
तुझ्या  सोबतच्या  गमती जमती.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

प्रभा ची ती लाली.....
आणी सोबतीला  तूझा भास.....
किती निशा जागवल्या .....
सोबती घेऊन  गोड आस....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                           शाही.....✍️✍️


निशा आणी प्रभा सोबती...23/1/2022

आवडत मला निशा सोबती......
तूझ्या गप्पांमध्ये  रमणं......
प्रभाची लाली गाली का ग तूझ्या....
म्हणत उगाच ते रे छळणं....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

निशा सोबती
विचार ना एकांती
मनाची शांती

प्रभा सोबती
आशेचा  ग कीरण
नाही  मरण

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कधी निशा सोबती ......
कधी प्रभा सोबती .......
या पाठशिवणीच्या खेळात.....
दडली जीवनाची गती....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

निशा सोबती......
नि सावली ती विरली.....
तुझ्या  मिठीत  अलगद.....
होती का रे शिरली.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

निशेच्या सोबतीने  चांदवा.....
धरतीवर येतो.....
त्याचवेळी  तुझ्या आठवांचा  सागर.....
भरतीस  येतो...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

खिडकीतून डोकावणारा चंद्र ....
बघ ना कसा खुणावतो....
निशा सोबती भास तुझा ....
खूप दा असा सतावतो....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

निशेच्या सोबतीने.....
दुःख  दडवते ती मनात.....
प्रभा दिसता उषेची....
आशा हसते गं जगण्यात....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कधी ग्रहण कधी वृध्दी.....
कलेकलेचा खेळ सारा......
अमावस्या पुनवेत चालतो.....
निशा सोबती चंद्राचा जीवन पसारा.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

वेळेचे ते राहटगाडे......
कधी न ते थांबणार......
उषेची प्रभा गोड तीच्या......
ओढीने  निशा रात रात जागणार.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

निशा असता सोबती ....
तु प्रकाशाची वाट धुंडाळावी....
प्रभा तुझ्या  कतृत्वाची.....
पाऊलखुणात गं गीरवावी....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                            शाही...... ✍️✍️


22 January 2022

चारोळी संग्रह... 22/1/2022

तुझ ते खळखळून हसणं......
दुःख  लपवण्याचं असतं ना गं मनात.....
जगण्याचं तुझ हे गुपीत  वेडू....
आल गं माझ्या  ध्यानात .....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

दुनियादारीच्या खेळात.....
व्यवहार खूप रे  छळले....
सुख विकत घेणारा आणि ....
दुःख  विकणारा कोण नाही  रे कळले....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कसं गं जमत तुला....
ते लाघवी हसणं.....
दुःख  सारे लपवुन ....
स्वतःला फसवणं.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आनंदाचा एकमात्र क्षण....
शोधायचं  रे ठरल....
तूझ्या सोबतच्या क्षणांनी....
मिठीत अलगद म भरलं....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

लपवलेले दुःख  बघ ना...
कसे फितूर झाले...
पहातच तुला ते.....
डोळ्यातुन गळुन गेले ....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आयुष्याच गणीत....
सोपं होत सोडवायला...
क्षणिक सुखाच्या ओढीने.....
घोळ सारा रे केला.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आनंदाचा क्षण.....
शोधता रे कळले.....
आपल्या माणसांच्या सोबतीत....
होते ते  सर्व भरले....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

शोधावा लागलाच नाही....
आनंदाचा  गं क्षण.....
आईच्या  सहवासात....
आनंदाने भरलेले राही मन...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

दुःख सारे  म्हटलं.....
लपवून  पहावे.....
अनुभव ते सारे....
हरवुन नको जावे....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

पडाव आनंदाच उन.....
मनाच्या रे अंगणात.....
लपवलेले दुःख....
नको रहावे स्मरणात....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

शोधून  कुठे ....
आनंदाचा क्षण सापडतो.....
उगाच दुःखाला लपवण्याचा....
खेळ  असा चालतो.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आनंदाचा एक  क्षण....
सोबतीने  तूझ्या  तु नेला....
दुःख  लपवण्याचा प्रश्न .....
असा ऐरणीवर  आला.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

माझ्या  सर्व  दुःखाना......
तुझ्या  भेटीच्या क्षणाची ओढ रहायची....
आता नाही  ते शक्य  म्हणता.....
आठवण गोड  ती यायची....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

परीस कसा रे तु.....
शोधूनही हरवला....
तसाच आनंदाचा क्षण....
शोधून ही  तू दवडला.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तुला कधीच लागु नये.....
आनंदाचा क्षण शोधावा.....
खर्या मनाने तुझ्यासाठी.....
प्रार्थनेत असेल हा धावा.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

शोधून  आनंदाचा क्षण सापडेना.....
दुनियादारी  ही रे कळली.....
तेव्हा दुःखाची म....
समाधानाशी भेट घडली....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                         शाही..... ✍️✍️


आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...