आयुष्याच्या चित्रपटात......
लागली होती भुमिका कळायला....
ओढ तीची वाढतांनाच.....
वेळ ठेपली चित्रपटाची सरायला.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
येतील रे सुख दुःखाच्या भुमीका......
एक पण करशील का......
जे तुझ्यासोबत होऊ नये वाटते......
ते इतरांबरोबर करायला टाळशील का......
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
आयुष्याच्या रंगमंचावर......
असेही कलाकार भेटुन गेले......
नाही आवडत मी जतवतांना......
दिखावा आपलेपणाचा वाईट समजवुन गेले.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
आयुष्य एक रंगमंच.....
जन्म अन मृत्यूचा......
इथे पदोपदी चालला.....
संघर्ष जगण्याचा....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
खकाही भुमिका
बालपणाच्या ना त्या
आठवता त्या
काही भुमिका
तारूण्यात वठल्या
छान वाटल्या
काही भुमिका
संसारात जमल्या
नाही रमल्या
काही भुमिका
सुख दुःखाच्या ना त्या
अनुभव त्या
काही भुमीका
होत्या वठवायच्या
स्वप्न व्हायच्या
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
एक दिवस रंगमंचाचा खेळ सोडुन.....
खुप दुर सर्वाना जाव लागतं.....
सुंदर आहे रे जग.....
चांगल्या दृष्टीकोनातुन पाहव लागतं....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
तुला हवी असलेली भुमीका.....
आवडेल सख्या वठवायला......
सुख दुःखाच्या भुमिकेत असशील.......
ना सोबती जगणं हे नटवायला......
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
आयुष्य आहे रे रंगमंच......
कला आपली सादर करायची......
सुख दूःखाची भुमिका वठवतांना.....
माणुसकी आपली नाही हं भुलायची......
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
जीवनाच्या या रंगमंचावर.....
असाही येऊन भेटशील का मला.....
होशील माझा बाजीराव आणी....
मस्तानी आपली मानशील मला....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
दुःखाची भूमिका जगतांना....
गणीत जगण्याच रे मांडलं.....
होरपळलेल्या दुःखात .....
वाटा तुझाच हे ही म जाणलं....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁