27 January 2022

हायकु आणि चारोळी संग्रह...27/1/2022

पहिले प्रेम
गुपीत लपलेल
हो जपलेल

पहिले प्रेम
अव्यक्त राहीलेल
हो पाहिलेल

पहिले प्रेम
विरह का रे त्यात
परीक्षा त्यात

पहिले प्रेम
कठिण विसरण
नाही घडण

पहिले प्रेम
साथ हवी दोघांची
साथ भाग्याची

पहिले प्रेम
आठवतं नेहमी
भेटिची हमी

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तुला गमावण्याच्या भितीने....
गुदमरतो रे श्वास....
नाहि विसरणार पहिल्या प्रेमा तुला....
कसा रे देऊ सांग हा विश्वास....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तुला विसरताच......
श्वास साथ सोडतील.....
तूझ्या प्रेमात करार  असे....
आम्हा दोघात घडतील...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आवडलं असत रे.....
तुझं पहिल प्रेम व्हायला ,पण....
प्रेमात नसतो ना व्यवहार कळता....
जपल तुला आजन्म मनात रहायला....

जाणते मि नाहीच तुझ  तेप्रेम....
पण विसरणार नाही कधी तुला....
जाणतो नाही रे जमत मला....
दिनियादारीचे व्यवहारी गेम...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

माझ्यासाठी तरी स्वःताला गं जप......
अशी काळजी घेणार पहिलं प्रेम तु......
विसरण्या आधी तुला विसरेन स्वतःला.....
प्रेमात शिकली तुझ्याकडुन निस्वार्थ हा हेतु....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तु अशी भावना.....
जी कधीच नाही मीटणार.....
विसरली नाही पहिल प्रेम तु...
पण तुला आहे का हे  रे पटणार...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

समजवून सांगणारे खुप भेटले.....
समजून घेणारा तुच  तर होता.....
नाही विसरणार पहिल प्रेम म्हणता....
मनात  तुझ्या आठवांचा पुर होता....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तुच तर दिली ना लेखणी....
चोर पावलांनी प्रेम जीवनात आल्याची....
आज ही शब्दफुलात भास त्याचाच गं...
जाणिव त्याच्यातच मी गं हरवल्याची...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

अट कुठे होती.....
तु ही प्रेम रे करावं.....
तु पहिलं प्रेम माझं.....
तुला नाहीच मी विसराव.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

पहिल प्रेम ते.....
अव्यक्तच खुपदा राहतं....
होतच नाही ते विसरण....
मनावर राज्य त्याचच  तर राहतं....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁 

                          शाही.....✍️✍️


26 January 2022

रंगमंच....26/1/2022

आयुष्याच्या रंगमंचावर.....
बापच असा व्यक्ती असतो.....
नविन नविन वेषभुषा.....
तोच तर सादर करत असतो....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आयुष्याच्या चित्रपटात.......
नाटक कलाकार म्हणून कराव लागत.....
कसे आहात?विचारता अश्रृ लपवुन.....
छान आहोत अस म्हणाव लागत....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आनंदी भुमीका वठवतांना......
रंगमंचावर जीवनाच्या कळलं होतं......
स्वतःला विसरून आनंद देण्यातच.....
जीवनातलं सुख दडलं होतं......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आनंदी भुमीका वठवतांना......
रंगमंचावर जीवनाच्या कळलं होतं......
स्वतःला विसरून आनंद देण्यातच.....
जीवनातलं सुख दडलं होतं......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आयुष्याच्या चित्रपटाचे.....
आपण सगळे कलाकार......
जीवन जगण्याची कला श्रेष्ठ.....
चला होऊया आपलेच शील्पकार....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

जीवनाच्या रंगमंचावरील......
कठपुतली आपण सारे.....
दोरी त्या अल्लाह च्या हाती.....
हव तेव्हा आवरतो तोच पसारे....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आयुष्याच्या चित्रपटात.......    
कलाकारच अनभीज्ञ.......
कुठल असेल पुढचं दृश्य.....
सांगु शकत नाही सूज्ञ......
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कलाकार आपण.....
भुमिका छान वठवायची....
सुख दुःखाच्या क्षणांनाही.....
सवय आपल्याला नटवायची....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

या जगाच्या रंगमंचाचे....
आपण सार्या बाहुल्या....
उन सावलीच्या खेळात....
उरतात फक्त सावल्या....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आयुष्याच्या चित्रपटात.....
भुमिका कशीही येऊदे....
तु माझा राजा आणी.....
तुझी राणी मला होऊदे....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आयुष्याचा चित्रपट....
सुख दुःखाचा खेळ.....
समंजस होऊन घालावा....
यात सुरेख मेळ ....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁


आयुष्याच्या चित्रपटात......
उन सावल्यांचा खेळ.....
भुमीका ही क्षणाला बदलते.....
सांगुन कुठे येते वेळ.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                          शाही.....✍️✍️


चारोळी संग्रह आणी हायकु...26/1/2022

आयुष्याच्या चित्रपटात......
लागली होती भुमिका कळायला....
ओढ तीची वाढतांनाच.....
वेळ ठेपली चित्रपटाची सरायला.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

येतील  रे सुख दुःखाच्या भुमीका......
एक पण करशील का......
जे तुझ्यासोबत होऊ नये वाटते......
ते इतरांबरोबर करायला टाळशील का......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आयुष्याच्या रंगमंचावर......
असेही कलाकार भेटुन गेले......
नाही आवडत मी जतवतांना......
दिखावा आपलेपणाचा वाईट समजवुन गेले.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁


आयुष्य एक रंगमंच.....
जन्म अन मृत्यूचा......
इथे पदोपदी चालला.....
संघर्ष जगण्याचा....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁



खकाही भुमिका
बालपणाच्या ना त्या
आठवता त्या

काही भुमिका
तारूण्यात वठल्या
छान वाटल्या

काही भुमिका
संसारात जमल्या
नाही रमल्या

काही भुमिका
सुख दुःखाच्या ना त्या
अनुभव त्या

काही भुमीका
होत्या  वठवायच्या
स्वप्न व्हायच्या

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

एक दिवस रंगमंचाचा खेळ सोडुन.....
खुप दुर सर्वाना जाव लागतं.....
सुंदर आहे रे जग.....
चांगल्या दृष्टीकोनातुन  पाहव लागतं....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

तुला हवी असलेली भुमीका.....
आवडेल सख्या वठवायला......
सुख दुःखाच्या भुमिकेत असशील.......
ना सोबती जगणं हे नटवायला......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आयुष्य आहे रे रंगमंच......
कला आपली सादर करायची......
सुख दूःखाची भुमिका वठवतांना.....
माणुसकी आपली नाही हं भुलायची......

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

जीवनाच्या या रंगमंचावर.....
असाही येऊन भेटशील  का  मला.....
होशील माझा बाजीराव आणी....
मस्तानी आपली मानशील मला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

दुःखाची भूमिका जगतांना....
गणीत जगण्याच  रे मांडलं.....
होरपळलेल्या दुःखात .....
वाटा तुझाच हे ही म  जाणलं....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁


25 January 2022

प्रेमात पडतांना.....24/1/2022

प्रेमात पडल्यावर.....
असते अपेक्षा किमान....
जपावा नेहमी त्याने...
तिचाही मान....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

शेवटचा श्वास ही.....
तुझ्या मिठीतच हवा मला....
प्रेमाची किमान अपेक्षा....
सांगायची राहीली तुला.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

कीमान अपेक्षा असते.....
प्रेमात रे पडतांना....
नकार नसावा उत्तरात.....
प्रेम आहे हे सांगतांना.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

किमान अपेक्षा असते....
प्रेमात ते पडतांना.....
काही क्षण असावे दोघांचे....
सुखद आठवणी जोडतांना....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

किमान अपेक्षा असते.....
प्रेमात रे पडतांना.....
गैरसमज नको व्हावे...
व्यक्त ते होतांना....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

किमान अपेक्षा असते....
प्रेमात ते पडतांना.....
कधी अव्यक्त राहु नये प्रेम....
मन मनाला जुळतांना....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

किमान अपेक्षा असते तीची....
प्रेमात ती पडतांना....
तीच असावी मनी ध्यानी....
संसार तो जपतांना....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

किमान अपेक्षा असते तीची.....
प्रेमात रे पडतांना.....
भावना तीच्या जपाव्या त्याने....
तीला आपली म्हणतांना....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

अपेक्षा नाही केली कधी.....
प्रेमात रे पडण्याची.....
किमान अपेक्षा नसतांना.....
जादु घडली मन जुळण्याची....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

अपेक्षा जिथे असते.....
तिथे प्रेम खर का असत.....
दुनियादारीच हे जगण....
प्रेमात बहुतेक नसतच....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

किमान अपेक्षा होती......
समजून घेणारा भेटावा.....
प्रेमात त्याच्या पडून.....
सोबतीने शेवट गाठावा....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

प्रेमात पडण हे......
ठरवुन कुठे होतं.....
किमान ओळखही नसते....
आणी अनोळखी तो जगण होतो....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                             शाही....✍️✍️


चारोळी संग्रह आणी हायकु... 24/1/2022

ऐकना आठवतं रे मला......
ते अवती भवती उगाच तुझ वावरणं....
नजरेला नजर भीडता....
अनोळख्या गत बावरण....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

हट्ट करायचा  हक्क देशील.....
प्रेमात तूझ्या पडल्यावर.....
समजुतदार होऊन थकली रे....
जगू देशिल  असं मनभर...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आवडेल मला.....
प्रेमात तूझ्याच पडायला.....
न सांगता ही हे कळावे तुला
हवी रे  जादु अशी घडायला....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

प्रेमात तुझ्या
गुंतण ते  रे झालं
जगण आलं

प्रेमात तुझ्या
निस्वार्थ आणि त्याग
नसतो राग

प्रेमात तुझ्या
अपेक्षा न कसली
मन हसली

प्रेमात तुझ्या
भेटीची ती रे आस
हो तुच खास

प्रेमात तुझ्या
नको रे विरह तो
जीव रे घेतो

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मनासारख्या घडणार्या गोष्टीत.....
भेट तुझी गणली होती....
अपेक्षाविरहीत परिस्थिती सांभाळुन घेण्याची....
सवय तुझी रे आवडली होती...


🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

प्रेमात पडतांना किमान.....
अपेक्षा आणी स्वार्थ नसावा....
निस्वार्थ या भावनेत.....
अहंकाराचा लवलेश ही नसावा...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

किमान अपेक्षा असते प्रेमात.....
अस्तित्व विसरून वहाता यायला हव....
हळुच कळत म अंतःर्मनातल....
प्रेमाच ते रूप नव हव...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

किमान अपेक्षा असते प्रेमात.....
अस्तित्व विसरून वहाता यायला हव....
हळुच कळत म अंतःर्मनातल....
प्रेमाच ते रूप नव हव...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

 अपेक्षा असते.....
निभाऊन घेण्याचीप्रेमात रे पडतांना....
खुप कठीण दोषांसकट.....
कुणाला आपलं म्हणतांना....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

प्रेमात पडतांना किमान......
प्रेमाचा अर्थ कळायला हवा.....
एकदा सावरलेल्या हाताला.....
आजन्माचा  साथ मानायला हवा.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                             शाही....✍️✍️


आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...