26 November 2021

अनुभव.... 26/11/2021

अनुभव  हा गुरू....
सहज भेटत नाही.....
एकलव्यासारखी गुरूदक्षिणा ....
घेतल्याशिवाय  सोडत नाही ....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

मोठ्यांचे अनुभवाचे बोल....
जपून मनी ठेवावे....
संकटात दीपस्तंभाचे.....
मोल ते बोल दयावे..

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आई बाबांचे अनुभव  पाठी ते असावे....
येणारे संकट  क्षणात पळून जावे....
कळतच नाही  तुम्हा का ते म्हणायचे....
अनुभवाचे त्यांचे मोल कसे ते करायचे..

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

आपलेच गुण दोष उणे कसे करावे .....
चूका त्या आपल्या  कुणा सांगाव्या...
अनुभवाचे मोल लावावे कसे....
त्रयस्थपणे  स्वतःकडे पहावे कसे?! ....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

अनूभवासारखा  गुरू कुठे  असेल ....
सारं काही  चूकेल...
अनुभव नाही  हो चूकायचा....
मोल त्याचा कसा हो करायचा...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

सुगावा कुठे लागु  देतात....
अंतर्मनातील  वादळांचा....
हात त्यांचे रिकामेच रहातात....
सुर्य होतात असा ते लेकरांचा....

खरच भाग्यवान  आई बाबा  दोघेही  ज्यांच्या  जवळ आहेत  ते. खूप  कठिण  आयुष्य  होतं एकही हात यातला सुटला तर. सावरायला नियती वेळ  देत नाही  आणि त्यांच्या  शिवाय  जगणं म्हणजे  मनात रितेपण शिवाय काही  उरत नाही.....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                     शाही..... ✍️✍️




4 comments:

  1. अतिउत्कृष्ठ रचना👌👌👌👌🙏🙏🙏👌👌👌👌

    ReplyDelete
  2. फारच सुरेख रचना 👌👌👌

    ReplyDelete
  3. अतिशय सुंदर रचना 👌👌👌

    ReplyDelete
  4. Khupch sundhar apratim rachna 💞💞💞💞💞💞💞🥰🥰🥰🥰🥰🥰🥰🥰💐💐💐💐💐💐🍫🍫🍫🍫🍫🍫🍫

    ReplyDelete

Welcome to Shaheen plz. Comments

आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...