30 November 2021

स्वतः पासून सुरूवात कर... 30/11/2021

राम आणि  रावण.....
अंतर्मनात ग लपलेले....
अडगळ विचारांची दूर  करता...
दंव्द  दोघांत जुंपलेले....

राम आणि  रावण=चांगले आणि  वाईट वीचार

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

संस्कृती  चे बळ घेऊन......
मी का भरारी मारू नये......
अडगळ सारून परंपरेत रमणे.....
प्रगती याला का जाणू नये....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

विचारांची अडगळ....

ही समाजाचीही झालेली....
तु स्वतः  पासून सुरूवात कर ....
गती हळुह्रळु  आलेली....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

अडगळ विचारांची दूर केली...
सुरवात केली स्वतः पासून  झटकायला...
वेड्या  मना बरोबर छान  गेली म...
मनसोक्त  ते भटकायला...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

नव्या पिढीला  विचार  कधी....
अडगळीचे वाटतात....
बदल हा नियम सृष्टीचा....
तरी अनुभव का दाटतात....

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

अडगळ  विचारांची ....
दुर ती सारायला गेली....
पाऊलखणांची व्रण त्यांची....
मनावर खोलवर  राहून गेली...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

विचारांचि  अडगळ.....
कारणीभुत  वादाला.....
स्वतः पासून सुरूवात कर ...
अर्थ  येईल जगण्याला...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

स्वतः पासून सुरूवात केली ....
अडगळ विचारांची दूर करण्याची....
हळुह्रळु  लक्षात आलं  .....
मरगळ हीच होती जगण्याची ...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

स्वतः  पासून ...
सुरूवात कर...
अडगळ गैरसमजांची....
स्वतः आधी दूर कर...

🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁

                             शाही..... ✍️✍️


7 comments:

  1. अतिशय सुंदर शब्दरचना असते तुमची....👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻🌹🌹🌹🌹🌹🍫🍫🍫🍫🍫🙏🏼🙏🏼

    ReplyDelete
  2. एक नंबर लिहिल मस्तच....रमून जाते मी शब्दफूलांत तुझ्या....����������������������������������

    ReplyDelete
    Replies
    1. या गोड समीक्षेसाठी खूप खूप धन्यवाद सखी🙏🙏😊😊

      Delete
  3. एकदम मस्त रचना👌👌👌👌👌

    ReplyDelete

Welcome to Shaheen plz. Comments

आयुष्यातील धडे....चारोळी संग्रह

आयुष्यातल् पुस्तकातील धडे.... वाचुन कुठे कळतात.... स्वतःसोबत घडले तरच.... अर्थ त्यातले वळतात.... आयुष्यातल्या पुस्तकातील धडे..... प्रत...