नाही रे अडकवायचे ....
शपथ तुझी देऊन....
निरागसपणे वागणे तूझे....
जाईल की जीव घेऊन....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
नवीन काही घडवायचं नाही
सांग ना सखि कसं ग म्हणायचं
नविन विषय तू दिल्यावर
शब्दांना नाही का म आशयात अडकवायचं
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
अडकायचे नाही ना रे तुला.....
शब्दफुले तरी भेटीला येतील....
नवीन घडणार नाही काही तरीही...
तूला सांगावा रोज प्रितीचा देतील....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
अडकायच नाही कधी.....
लोभाच्या रे जाळ्यात.....
नवीन घडवायचे नाही म्हणता.....
फसू नको भ्रष्टाचाराच्या आळ्यात.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
माहेरच्या उंबरठ्यावर.....
नाही रे मना अडकायचे.....
नविन संसाराच्या वहीवाटावर.....
संस्कार तिथले तर गिरवायचे.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
अडकायचे नाही गं.....
कोण काय म्हणेल यातं....
नवीन काही घडवायचं ....
तर बळ शोध तू त्यातं....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
अडकायचे
आहे फक्त तूझ्यात
मी न माझ्यात
घडवायच
योजलेले मनात
ठेव ध्यानात
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
नाविन्याची ओढ.....
मना मनात रे लपलेली....
अडायचे की बाहेर पडायचे....
दंव्दात या पडलेली.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
नाही गं अडायचे ....
संकुचित विचारसरणीत....
नवीन घडवायचे हेच....
करशील ना सुनिश्चित ....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही.... ✍️✍️
अतिशय सुरेख आणि सुंदर रचना👌👌👌👌👌
ReplyDeleteKhupch sundhar👌👌👌👌👌👌👌👌
ReplyDelete