जपशील ना
संकल्प
वेळ अत्यल्प
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
संकल्प भेटीचा नभातील शशीचा ....
खीडकीत येऊन ही गं फसला....
शाही साद देउन ही ....
चेहरा कुठे गं त्याला दिसला....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
नाती जपून ठेवण्याचा....
संकल्प तीचा ठरलेला.....
परकी म्हणता सगळे तरीही....
प्रयत्नांत खंड न पडलेला....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
प्रयत्न आपल्या हातात.....
सुरूवात कशीही रे करायची....
संकल्पांशी मैत्री आपली.....
नेहमी घट्ट न धरायची....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
संकल्प तीचे सारे....
कुठे ते पुरे होतात....
कर्तव्याच्या गर्दीत पुन्हा सुरूवात करू...
म्हणत किती रे उणे होतात....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
संकल्प गोड त्याचा....
हळूच त्याने सांगीतला....
जगायचं तुझ्या सोबत म्हणून....
साथ गं त्याने नेहमीसाठी मागीतला...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
त्याच्या शब्दांवर भुलायच नाही....
संकल्प खूपदा गं केलेला...
तो समोर येताच...
संकल्प पून्हा फसून गं गेलेला...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
वनसंवर्धनाचा संकल्प ....
मनी तो धरूया.....
झाडे खूप लावून....
सुरूवात अशी करूया ...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
पहाटेचा गोड गारवा....
संकल्प तो ठेऊन गेला....
लढायच नेहमी संकटांशी....
सांगावा जणू तू दिला...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
सहज सोप कुठे रे....
माझं ते संकल्प करणं....
सुरवात पुन्हा करता ही....
होतं की तुझ्यात हरण....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही..... ✍️✍️
अप्रतिम रचना👌👌👌👌👌👌
ReplyDeleteखूप सुंदर रचना 👌👌👌👌👌
ReplyDeleteApratim rachna👌👌👌👌 🍫🍫🍫🍫🍫🍫
ReplyDelete