संकल्पांचं काय करावं....
खुपदा ते फसतात....
प्रयत्न असता पुन्हा पुन्हा ....
जिंकून ते म हसतात...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
विकल्प खूप आहेत ....
मार्ग रे चुकवायला.....
संकल्प एक कर....
पून्हा सुरूवात करायला...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
संकल्पांचे काय करू....
ध्येय तु असल्यावर....
सांभाळून घेतो तु....
नेहमी मी चुकल्यावर....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
विकल्प खूप येतील....
दुर तूला रे न्यायला......
संकल्प सोडू नको.....
माझं ते रे व्हायला....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
प्रयत्न करण्याचा संकल्प ....
नेहमी तु करत जा....
उन सावल्यांच्या खेळात....
अशी ही तु जिंकत जा.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
संकल्प ही वाट गं.....
ध्येयाकडे जाण्याची.....
नको माघारी फिरणं आता.....
सुरूवात करू पून्हा लढण्याची.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
संकल्प तो केला....
माघारी नाही फिरायच....
पुन्हा पुन्हा प्रयत्न करुन...
जिंकल्यावर थांबायच...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
पुन्हा संकल्प ...
नवीन कर...
पुर्णत्वाची त्यांच्या...
कास तु गं धर...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
नाही आवडत तुझ....
संकल्प ते, सोडून देणं....
सुरुवात कशी करू....
म्हणत स्वतःत गं अडणं...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
पून्हा नव्याने सुरूवात गं...
करायची सांग ना....
संकल्प हा करशील....
साद मला देशील का ...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
पुन्हा सुरूवात....
त्याने गं केली....
नभातील शशीने...
ग्रहणाची चिंता का केली...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही... ✍️✍️
अतिशय सुंदर रचना👌👌👌👌👌👌
ReplyDeleteअप्रतिम....अतिशय सुंदर...👌🏻👌🏻👌🏻👌🏻👌🏻💖💖💖💖💖🌹🌹🌹🌹🌹🍫🍫🍫🍫🍫🍫
ReplyDeleteKhupch Sundar....🌹🌹🌹
ReplyDeleteKhup khup khup chan👌👌👌👌👌👌👌👌
ReplyDelete