नाही लादत म्हणणे.....
कधी ती कुणावर....
समजून घेण्याची जबाबदारी .....
लादून घेते ती स्वतःवर...
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
पुर्ण दिवस जातो चंद्रा.....
वाट तुझी रे पहाण्यात.....
लादणार नाही म्हणणे कधी रे....
पण भेटणार ही नाही असू दे ध्यानात....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
तीच्यातर हसण्यावरही.....
सीमारेषा लादल्या जातात.....
समजून कुणी घेत नाही......
भावना अशाही दाबल्या जातात....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
लादल जात तीच्यावर.....
संस्काराच्या रे नावाखाली.....
कुंपणच शेत खातं म.....
समजुन घेणारा नाही रे वाली....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
तुझं म्हणणं लादून घेण्याची....
खोड रे मला जुनी....
दुनियादारीत मान तुझा.....
शेवटी तु तर आहे ना धनी....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
भाषा हा आहे ना .....
संवादाच साधन.....
का म लादल जाव......
बोलता भाषेच बंधन....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
कधी इशार्यांची रास मांडते.....
कधी गं अश्रूंचा पूर सांडते.....
कशी समजून घेऊ तुला.....
या विचारातच रात माझी गं भांडते....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
लादत नाही
म्हणणे त्याच्यावर
घे मनावर
लादत नाही
समजून घेणं ते
जपणं रे ते
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
समजून घेण्याच्या परीक्षेत....
नेहमीच का रे फसतो....
सरळ मनाच्या संवादालाही....
म्हणणे लादते म्हणतो.....
🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁🍁
शाही.... ✍️✍️
अतिशय सुंदर रचना👌👌👌👌👌👌
ReplyDeleteKhup khup khup chan di👌👌👌👌👌👌👍👍👍👍🍬🍬🍬🍬🍭🍭🍭🍭🍭🍭🍫🍫🍫🍫🍫🍫💐💐💐💐
ReplyDeleteखूपच सुंदर
ReplyDelete